हलकं फुलकं

Submitted by अविनाश जोशी on 22 July, 2025 - 06:03

हलकं फुलकं
चित्रपटात अडचणीच्या वेळेस डमी किंवा डुप्लिकेट वापरले जातात. धोकादायक स्टंट्स मध्ये त्यांचा नेहमीच उपयोग होतो. परंतु काही वेगळ्या कारणांमुळे असे डुप्लिकेट वापरले जातात.
के असिफ यांच्या अतिभव्य मुगले आजम यातले 'प्यार किया तो डरना क्या ' या अजरामर गाण्यात बहुतेक वेळा मधुबाला नसून डुप्लिकेट वापरले आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मधुबालेला नृत्य करणे शक्य नव्हते. कारण नृत्य दिग्दर्शक लच्छु महाराज यांच्या एका शिष्याने हे नृत्य केले आहे (बहुतेक त्याचे नाव कल्याण असावे). नृत्य करताना त्याला एक मुखवटा बसवण्यात आला होता. या मुखवट्याकरिता बिडकर नावाच्या माणसाने मधुबालाच्या चेहऱ्यावर पेपर पल्प थापाला आणि वाळल्यावर त्याने आतून रबरी फुग्याच्या फॅक्टरीतून त्याच्या आतून रबर बसवले . हा मुखवटा घालूनच कल्याण ने नृत्य केले.
राजकुमार हा नट चित्रपट सृष्टीत येण्यापुर्णी माहीमला पोलीस अधिकारी होता. पाकिजा चित्रपटाच्या शेवटी नायक वरात घेऊन येतो आणि आल्यावर सेहरा बाजूस सारतो असे दृश्य आहे. या चित्रीकरणाच्या अगोदर एके रात्री राजकुमार मित्राबरोबर बाहेर गेला असता, एका माणसाने मित्राच्या बायकोला छेडले , राजकुमाराने मध्ये पडून त्या माणसाला आवरले. यात त्या माणसाचा मृत्यू झाला व कारण नसताना राजकुमारला खुनाच्या आरोपाखाली अटक झाली. शूटिंगला फार उशीर करणे शक्य नव्हते वराती करिता पाहुण्यांना एकत्रित करण्यात आले होते. शेवटी विचारांती हे चित्रीकरण धर्मेंद्र बरोबर करण्यात आले. काही दिवसातच राजकुमार निर्दोष सुटला. वरातीचे संपूर्ण शूटिंग परत करणे फारच अवघड आणि कष्टदायक होते. शेवटी योग्य ते शूटिंग करून धर्मेंद्र ऐवजी सेहऱ्यातून राजकुमाराच्या चेहऱ्याचे चित्रीकरण झाले.
चित्रपट सृष्टीतले गायक बड़े गुलाम अली खान कधीही गात नसत. के असिफ ना कोणत्याही परिस्थितीत त्यांचे गाणे मुगले आजम मध्ये हवेच होते. तो नवशाद ना घेऊन त्यांच्या घरी गेला आणि धरणे धरून बसला . शेवटी खान साहेबानी नवशादला बाजूला बोलावून सांगितले 'किस पागल को यहाँ लाये हो , एस्को इतनी किमत बतानी चाहीए कि वो भाग जायेगा'. खान साहेबानी आत येऊन सांगितले कि 'मी चित्रपटाकरिता गाणे म्हणेन पण मला प्रत्येक गाण्याकरिता पंचवीस हजार हवेत'. हे ऐकून नवशाद थक्क झाले. कारण त्या काळात लता - रफी सुद्धा गाण्याचे पाचशे ते सातशे रुपये घेत असत. खुद्द खान साहेब बैठकीचे हजार दीड हजार घेत असत. असिफ यांनी खिश्यातुन दहा हजार रुपये काढून खा साहेबांना देत सांगितले कि ठीक आहे या चित्रपटात तुम्हीच गाणं गायचं अशा रीतीने मुगले आजम मधील 'प्रेम ज़ोगन बन के ' अजरामर झाला. सर्वात महागडे गायन असिफ यांनी या चित्रपटात केले, कुठेही तडजोड केली नाही. शेवटी सलीम अकबर युद्धात त्यांना चार-पाच हजार उंट , कित्येक घोडे आणि सैन्य हवं होत. शहापूरजी पालनजी यांनी फायनान्स केलेला हा बहुतेक पहिलाच आणि शेवटचा चित्रपट असावा. दहा-बारा वर्ष चित्रीकरण चाललेल्या या चित्रपटासाठी त्या काळी त्यांना दीड कोटीहून जास्त खर्च आला. आजच्या दोनशे -तीनशे कोटी रुपयांच्या चित्रपट निर्मितीत हा खर्च नगण्य वाटतो. पण त्याकाळी बहुतेक चित्रपट तीन चार लाखात होत असत. शहापूरजी पालनजी हे एक धनाढ्य पारशी कुटुंब टाटा सन्स मध्ये 20% पेक्षा अधिक शेअर आहेत. (त्यातला एक सायरस टाटा सन्स चा चेअरमन होता.) या एका लढाई करिता दिग्दर्शकाचे बजेट सात लाखाचे होते. दोन-तीन महिन्याच्या धडपडीनंतर तत्कालीन रक्षामंत्री व्ही के मेनन (चीन ने आक्रमण केले तेव्हा) यांनी राजस्थान रेजिमेंट मधून आवश्यक ती युद्ध सामुग्री दिली.
देवानंद , धर्मेंद्र व जॉनी वॉकर पडद्यावर फारसे रडले नाही. देवानंद तर कधीच नाही. जॉनी वॉकर रडायच्या अभिनयात तोंडावर फडके किंवा रुमाल घेत असे. देवानंदला आपली चॉकलेट बॉय इमेज जपायची होती. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला इंग्लंड मध्ये मरण आले आणि तो कुठल्याही प्रसारमाध्यांशिवाय तेथेच दफन झाला. येथे आल्यावरही कुठल्याही शोकसभा झाल्या नाहीत. हे सर्व त्याच्या इच्छेप्रमाणे झाले. काही वर्षांपूर्वी ही - मॅन विनोद खन्नाचे हॉस्पिटल बाहेरचे फोटो आठवून पहा .
भारतीय चित्र सृष्टीची सुरवात कलकत्त्यापासून झाली. बिमल रॉय , सत्यजित रे हे त्यावेळचे दिग्गज होते. फाळणी नंतर बंगाली प्रेक्षक वर्ग कमी झाल्याने चित्रपट सृष्टी मुंबईत बहरली. त्यामुळे बऱ्याच बंगाली नावांचा सुरवातीस दबदबा होता. गुरुदत्तांसारखा प्रतिभाशाली दिग्दर्शक त्यामुळे बंगाली वाटतो. त्यांचे खरे नाव वसंत पदुकोने. लहानपणाच्या सतत आजारनंतर त्याच्या काकांनी त्याचे नाव गुरुदत्त ठेवले. गुरुदत्त , देवानंद, रेहमान हे तिघे पहिल्यापासून पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटचे सहाध्यायी. आजही इन्स्टिटयूमधील झाडाचा एक कट्टा गुरुदत्तच्या नावाने प्रसिद्ध आहे. आजची तरुण पोरं-पोरी त्या पारावर बसल्यावर आपण गुरुदत्त होऊ अशी अपेक्षा करतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users