दोन अमेरिका ट्रीपमध्ये भारतात किती काळ रहाणे गरजेचे आहे ?

Submitted by meghdhara on 12 July, 2025 - 20:00

नमस्कार मंडळी

Aamhiआ नोव्हेंबर अखेरीस अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मुलांकडून भारतात परत जाणार आहोत. काही कौटुंबिक अनिवार्य गरजांमुळे फेब्रुवारी मध्ये अमेरिकेत पुन्हा यावं लागणार आहे. सहा महिने अमेरिकेत राहिल्यावर , तीन महिने भारतात राहून पुन्हा सहा महिन्यांसाठी अमेरिकेत येता येईल का ? तसे कुठलेच पक्के नियम शोधून सापडले नाहीयेत. कुणाला काही अनुभव माहिती असेल तर प्लिज सांगा. आम्ही B1/B2 व्हीसा वर आहोत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

किती वेळा जाणार याबद्दल काही नियम नाहीत. ईमिग्रेशन ऑफिसर चा मुड आणि तुमची काय गरज आहे ( ईथे लिहायची गरज नाही) यावर अवलंबुन आहे. उदा लहान मुलाना सांभाळण्यास जात असल्यास त्याबद्दल शंका येउ शकते. कारण त्यामुळे अमेरिकेतल्या एका माणसाचा जॉब जाईल. तुम्ही मागच्या वेळी ६ महिने राहिल्यामुळे आणि लगेच पुन्हा ३ महिने जायचा प्लॅन असल्याने थोडे जोखमिचे आहे.
मी स्वतः B1/B2 व्हीसा वर एका वर्षात चार वेळा कंपनीच्या कामासाठी साधारन्तः महिन्याच्या अंतराने प्रवास केला आहे. पण त्यावेळी माझी प्रत्येक ट्रिप फक्त फक्त ८ ते १५ दिवसाची होती. शेवटच्या ट्रीप मध्ये ईमिग्रेशन ऑफिसरने बॅक ऑफिस मध्ये पाठवले, तिथे बरेच प्रश्न विचारले. एकदा त्याचा विश्वास बसला की मी अमेरिकेत काम करत नाही तेव्हा जाउ दिले.

थँक्यू साहिल शहा .. तसा काहीतरी मार्ग निघेलच .. पण आम्ही सध्या या नियमाबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही म्हणता तसं इमिग्रेशन ऑफिसरच्या मूडवर आणि सध्या सतत बदलत असलेल्या धोरणावर अप्रोच वर अवलंबून आहे. पण लोकांचे अनुभव कळले तर जरा अंदाज घेता येईल. अर्थात आत्ता तीन महिन्यांनी येऊन पुढचं येणं आम्ही धोक्यात टाकू शकत नाही. पाहू .. आमच्यासारख्या व्हिसीटींग पालकांचे काही अनुभव कळले तर बघू ..

माझ्या मते तुम्ही जर भारतीय पासपोर्ट असेल तर एका वर्षात जास्तीत जास्त १८० दिवस बाहेर राहू शकता. त्यात तुम्ही दोन तीन वेळा ही जाऊ येऊ शकता.

नियमांत आडकाठी नाही. सध्याचे सरकार जाऊ देईल का? तुम्हीच विचार करा. आल्यापावली परत यायची तयारी ठेवून जा.
चार लोकांना विचारून त्यांना जाऊ दिलं म्हणजे तुम्हाला अल साल्वाडोरला पाठवणार नाहीत याची खात्री नाही. एक अनुभव घ्या! सोडलं उत्तम, नाही सोडलं तर एक लेख लिहा. शुभेछा!

हाहा .. चार लोकांना विचारून सध्या काय ट्रेंड सुरु आहे हेसमजून घ्यायचा प्रयत्न करतेय.
आणि गरज आहे म्हणून इतकी चौकशी करतेय. शुभेच्छांसाठी धन्यवाद.

सोडलं उत्तम, नाही सोडलं तर एक लेख लिहा. शुभेछा! अमितव hahaha
आमच्या ऑफिस मध्ये रजा मंजूर होण्यासाठी धार्मिक कार्यक्रम हे फारच स्ट्राँग कारण होतं. तेच इथे सांगून बघा.

चर्चा खूप ऐकल्या आहेत. प्रत्यक्ष अनुभव - जवळच्या नातेवाईकांचे / परिचितांचे वेगळे आहेत. कुणाला अडवलं नाहीये. ह्यातली बहुतांश मंडळी (व्हिजिटर्स व्हिसा / ग्रीन कार्ड) वेगवेगळ्या इंटरव्हलमधे, पण एका वर्षापेक्षा कमी काळात अमेरिकेत दुसर्यांदा आलेली आहेत.

एक परिचित दोन वर्षांपूर्वी पाच महिने अमेरिकेत होते मग ३-४ महिन्यांसाठी भारतात येऊन परत ३ महिन्यांसाठी अमेरिकेत गेले. ते मुलीच्या बाळंतपणासाठी आधी गेले होते. नंतर तिच्या सासूबाई सहा महिने राहाणार होत्या पण त्यांच्या मुलीची इथे काही अडचण आली म्हणून त्यांना लवकर परत यावं लागलं, त्यामुळे परिचित दंपती परत अमेरिकेला गेले. यायचे कारण विचारल्यावर visiting, sightseeing अशी उत्तरे दिली. तुम्ही आदल्या वर्षी पण आला होतात तेव्हा हे केलं नाही का असं विचारलंच ऑफिसरने. तेव्हा त्यांनी आम्ही ईस्ट कोस्ट बघितला होता कारण मुलगी ईस्ट कोस्टला होती आता वेस्ट कोस्ट बघणार आहोत कारण ती मूव्ह झाली आहे असे सांगितले. अनायासे तिचा पत्ताही बदलला होता. ऑफिसरला पटलं की नाही माहिती नाही पण त्याने जाऊ दिलं.

तसा काही लिखित नियम दिसत नाही. पुन्हा लगेच येणारे सहा महिन्यांच्या नियमातून पळवाट काढायला मधेच एक भारतात छोटी ट्रिप करून येत आहेत व त्यातून जास्तीत जास्त इथेच राहण्याचा प्रयत्न करत आहेत अशी शंका आली तर ते नाकारू शकतात. तीन महिने तसा अगदी छोटा काळ नाही. तरीही दोन व्हिजिट्स मधला भारतातील काळ जास्तीत जास्त वाढवता येईल का पाहा. आत्ताही नोव्हेंबरपर्यंत राहणे आवश्यक असल्यास इमिग्रेशन वकिलाकडून रीतसर सल्ला घ्या. अशी माहिती एखादा वकील पहिल्या फ्री कन्सल्टेशनमधेच देईल बहुधा. येथील कंपन्या व्हिसा प्रोसेसिंग करता इमिग्रेशन लीगल फर्म्स बरोबर काम करतात. तुमच्यापैकी जे इथे नोकरीवर आहेत त्यांच्या कंपनीबरोबर काम करणारा त्यातील एखादा वकील सुद्धा ही माहिती कदाचित देईल. ते त्याला बांधील नाहीत पण प्रश्न जेनेरिक माहितीबद्दल आहे त्यामुळे देतीलही कदाचित.

तुमच्या माहितीवरून हे खूप गरजेचे दिसत आहे, त्यामुळे वकिलाला चार्ज देउन रीतसर सल्ला घेणे चांगले.

फेसबुकवर असाल तर SOS Global Indians®️USA Solutions & Networking For Indians In US हा ग्रूप जॉईन करा.
तिथे हा प्रश्न विचारलात तर बरेच अनुभव ऐकायला मिळू शकतील.

https://www.facebook.com/groups/sosglobalindiansusa

सहा महिने अमेरिकेत राहिल्यावर , तीन महिने भारतात राहून पुन्हा सहा महिन्यांसाठी अमेरिकेत येता येईल का ?>>> टेक्निकली येस पण दोन अमेरिकावारी मधल अन्तर जितक जास्त तितक चान्गल...यातही वन फॉर ऑल अस कुठलही सोल्युशन कीवा उपाय नाही.प्रत्येकाला वेगळा अनुभव आलाय...त्यातल्या त्यात नातवडाना साभाळायला किवा बाळतपणात मदत हे कारण असल तरी अजिबात सान्गु नका.. ते इमिग्रेशन ऑफिसर्सला फारस आवडत नाही असाच सार्वत्रिक अनुभव आहे.

३ /४ वर्षांपूर्वी माझ्या चुलत बहिणीवर तीन महिन्यात परत जायची वेळ आली होती. डिलिव्हरीसाठी नाही पण मुलीची तब्येत जरा बरी नव्हती, तेव्हा ऑफिसरने तिला अडवून प्रश्न विचारले होते , ती बिचारी खूप घाबरून गेली होती , तिचे इंग्रजीपण अगदी लिमिटेड होते . पण शेवटी ऑफिसरने वॉर्निंग देऊन जाऊ दिले. साधारण माझ्या ओळखीत, नात्यात कोणीच ही रिस्क घेत नाहीत . मला वाटते पहिल्यांदा असे होत असेल तर काही होणार नाही . . पूर्वी केले असेल तर मात्र अडवू शकतात . माझे असे मत आहे की बरेच देसी /बिगरदेसी टुरिस्ट व्हिसाचा गैरवापर करत होते. इतकी वर्षे अमेरिकेने कळूनही चालू दिले .पण आता इमिग्रेशनवाले बरेच सतर्क आहेत. आणि सध्याच्या सरकारचाही त्यास पाठिंबा आहे . त्यामुळे शक्य असल्यास सहा महिन्याच्या आत जाणे टाळावे .

काय विसा आहे?
कारण काय देणारए?
आणि ईमिग्रेशन ऑफिसरचा मूड.
बस्स इतकेच आहे. पण थोडी रिस्क आहे.

शक्यतो अमेरिकेत जाऊन ६ महिने

शक्यतो अमेरिकेत जाऊन ६ महिने राहून परत आलात (विसा वर -- ग्रीनकार्ड नव्हे ) आणि ३/४ महिन्यात परत अमेरिकेत आलात तर इमिग्रेशन 'तुम्ही इथे राहण्याचा प्रयत्न करताय' असा संशय घेऊन तुम्हाला परत पाठवू शकेल.
...
उलट
ग्रीन कार्ड असेल , आणि भारतात ६ महिन्यापेक्षा जास्त राहीलात तर, 'तुम्हाला ग्रीनकार्डची गरज नाही' असे धरून ग्रीनकार्ड (या दिवसात) जाऊ शकेल.
दोन्ही केसेस बघितल्या आहेत, तेव्हा जपून..

मुलीला/ मुलाला मदत करायला ... हे कारण सध्या बदनाम आहे. परवा बायकोने Global Entry साठी Interview दिला. त्यात त्या ऑफिसरने..
'Do you have children/daughter? Do you help them? Many Indian come into the country for this.. Do not do this.. ' असा प्रेमळ सल्ला दिला. Global Entry मिळाली, त्यात काही Problem नाहि आला.

सर्वांचे खूप आभार .. अमेरिकेतील पुढचं येणं धोक्यात घालायचं नाहीये त्यामुळे डिसेम्बर मध्ये परत गेलो की जास्तीत जास्त काळ भारतात रहायचा प्रयत्न करू. बघू काहीतरी मार्ग निघेल ..