मृत्युपत्र कसे करावे

Submitted by समीक्षा राव on 7 July, 2025 - 02:01

मला मृत्युपत्र करायचे असेल पण कसे करावे कळत नाही, तसेच मृत्यूनंतर माझे सर्व माझ्या नवऱ्याला न मिळता मुलीला मिळावे अगदी तिची कस्टडी सुद्धा माझ्या माहेरच्यांन मिळावी म्हणून काय करता येईल सांगा

गेली 8 वर्षे आम्ही वेगळे राहतोय, दुसरे लग्न दोघांनीही केले नाही, आता मुलगी 9 वर्षांची होईल, पन माझी तब्बेत बघता तिची काळजी वाटतेय. माझ्या कामाच्या ठिकाणी देखील कोणाला याबाबत माहिती न पडावे ह्याची आजवर काळजी घेतली मी, पण माझ्यानंतर माझ्या मुलीला सगळे मिळायला हवे अन मुख्य म्हणजे तिची कस्टडी माझ्या माहेरच्यांन्न मिळावी म्हणून काय करता येईल सांगा प्लिज

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताई, तुमची जी काही स्थावर जंगम मालमत्ता आहे ती नीटपणे लिहून काढा.त्यानंतर वकिलांना भेटा. त्यांना तुमच्या मालमत्तेचे डिटेल्स द्या. डॉक्टरांची सही आणि आणखीन साक्षीदारांच्या सह्या लागतात ते वकील तुम्हाला सांगतीलच. त्या मृत्युपत्राचे रजिस्ट्रेशन करून घ्या.
कस्टडीबाबत तुम्हाला वकील योग्य ते सांगू शकतील.
बेस्ट लक!

मृत्यु पत्रात मालमत्ता वाटप शक्य असेल पण माइनरची कस्टडी अंतर्भूत नसावी त्यामुळे वकीलाच्या मार्गदर्शनाने घटस्फोट आणि मुलीची कायम स्वरूपी कस्टडी तसेच काही पोटगी रक्कम वगैरे अपेक्षित नसेल तर ही प्रक्रिया लवकर होऊ शकेल असे आधी पहावे म्हणजे आधार कार्डला नावात बदल सुलभ होईल. ही पायरी आणि विल बनवण्याची पायरी दोन्हीचे जीने सर्वस्वी वेगळे असावेत.

एखाद्या तज्ञ वकिलाचा सल्ला घ्या. माझ्या मते तरी ही इतरांचे सल्ले ऐकुन पाककृती करण्याजोगी बाब नाहीये. तुम्ही मुंबईत असाल तर विपुत कळवा, मुंबईतील विल संबंधात काम करणाऱ्या वकिलाचा संपर्क देऊ शकेन

स्थावर जंगम मालमत्ता मृत्युपत्रामधे टाकता येतील..
नाबलीग अपत्याबद्दल शंक आहे....
बाकी देयानियांनि सांगितल्या प्रमाणे सगळे बरोबर आहे

वकिलांशीच बोला!
मुळात तुम्ही कायदेशीर घटस्फोट घेतला आहे का, आत्ता तिची फुल लीगल कस्टडी तुमच्याकडे आहे का, हे नीट लिहिलेलं नाहीत - आणि अर्थात इथे लिहिण्याचं प्रयोजनही नाही, वकीलांशी बोला!
तिच्या वडिलांना कस्टडी का मिळू नये याची भक्कम कारणं कोर्टात पुराव्यांनिशी द्यावी लागतील - त्यामुळे चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या.
मालमत्तेचा बहुधा ट्रस्ट फॉर्म करून मुलगी सज्ञान होईपर्यंत तो तुमच्या कुटुंबियांच्या अखत्यारीत ठेवता येईल. वकील योग्य ते सांगतीलच.

तुमच्या 10 ऑगस्ट 2021 च्या
लहान मुलांचा तिरळेपणा कमी।करायचे उपाय या पोस्ट मधे तुमची मुलगी 9 महिन्यांची होती मग 4 वर्षांनंतर आता ती मुलगी 9 वर्षांची कशी? दया कुछ तो भी गडबड है।

तुमची संपत्ती म्हणजे
१. घर . हे फक्त तुमच्या एकीच्या नावावर असले तर मुलीला वारस ( nomini 100%) करा.
दोघांच्या नावावर असेल तर वारस बदलण्यासाठी नवऱ्याची सही घ्यावी लागेल. नंतर ते सोसायटीत ब्लॉक असेल तर कमिटीला देऊन त्यांच्या नॉमिनेशन फार्मस तीन भरून एक प्रत सही शिक्क्याने मिळवून ठेवा.
२. बँक डिपॉझिटस किंवा इतर गुंतवणुकी...
२-अ. बहुतेक नवऱ्याच्या बरोबर सहमालकी ( joint account, either or operation) असेल तर ती मुदत संपल्यावर पैसे परत घ्या आणि ते पैसे. तुमच्या किंवा मुलीच्याppf account मध्ये टाका. ते एका नावावर असते. Nominee मुलीला करा.
२.ब एका नावाने बँक डिपॉझिटस करा व Nominee मुलीला करा.
२ -क बँक लॉकर - दोघांच्या नावावर असेल तर तो परत करा. नव्याने एकटीच्या नावाने अर्ज करून घ्या.
या गोष्टी वकिलाशिवाय आताच करता येतात. पुढे फार कटकटी होतात.
मुलींच्या नावे बँक खाती उघडून पैसे ठेवा. काही विशेष कन्या खातीसुद्धा आहेत. स्टेट बँकेत विचारा.

बाकी गोष्टींसाठी मृत्युपत्र करूच नका. त्यात प्रोबेट वगैरे अडचणी नंतर उपस्थित करून कोर्टकज्जे चालतात. म्हणजे तसा काही फायदा होत नाही.

मुलींची कस्टडी वगैरेसाठी मृत्युपत्र नकोच. आता तुम्ही घटस्फोटाचा अर्ज केला तरच कस्टडी मुद्दा येतो. पण मृत्यूनंतरच्या गोष्टी आपल्या हातात नसतात.

अगदी फारच वाटले तर हस्ताक्षरात दोन कागद( प्रती) ' इच्छापत्र ' बनवून , दोन साक्षीदारांच्या सह्यांनी ते रेजिस्टारकडे नोंद करून घेता येईल. हा अधिक परिणामकारक आणि स्वस्त समाधानकारक उपाय आहे. यामध्ये आर्थिक बाबींचा उल्लेख असावा. ‍

बाकी सर्व सुरळीत होवो हीच इच्छा.

भारतात नॉमिनेशनचे नियम वेगळे आहेत. निव्वळ नॉमिनी केल्याने ती व्यक्ती भारतात तरी, कायदेशीर वारसदार होत नाही. In India, a nominee is just a custodian of estate. The heirship is decided by the will and Indian succession laws. त्यामुळे कायदेशीर मृत्युपत्र लागेलच. कृपया वकिलाचा सल्ला घ्यावा.

नॉमिनी हा वारस नसतो. मृत्यूपत्र नसेल तर वारसा हा हिंदू वारसा हक्काने मिळतो नॉमिनीला नॉमिनी आहे म्हणून काहीही वारसा मिळत नाही. हिंदू वारसा हक्कात जो असेल तो मिळतो.
घटस्फोट झाला नसेल तर घटस्फोट घ्या. स्वतःच्या नावावरील घर जर लग्न झाल्यावर घेतलेलं असेल, त्यात लग्न झाल्यावर रहात असाल तर त्यावर पार्टनरचा ही निम्मा हक्क आमच्या राज्यांत तरी असतोच असतो., आणि ते सर्वार्थाने योग्य ही आहे. तुम्ही रहाता तिकडचे कायदे असे मायबोलीवर प्रश्न विचारुन समजणे शक्य नाही. तुमच्या पश्चांत अशा क्राऊड माहितीच्या ढिसुळ पायावर तुमच्या मुलीचे हित होईल असं वाटतं का? ताबडतोब हा धागा उडवून पैसे देऊन व्यावसायिक व्यक्तीकडून माहिती घ्या.
तुमच्या लेख शैलीवरुन आणि एकुन स्मोक टेस्ट वरुन मला ही धागा मुद्दाम खोडसाळ पणे काढलेला आहे असंच वाटतं आहे. पण नसेल तर शुभेच्छा. आणि ओपन फोरम वर प्रत्येक पोस्टची उलटतपासणी होणारच, झालीच पाहिजे.

मी बँक एफडी आणि सोसायटी ब्लॉकबद्दल लिहिलं आहे आणि ते पुरेसं आहे. मृत्युपत्रही लगेच लागू होत नाही त्याला कोर्ट कर्जे करावेच लागतात वाटणी साठी दावे लागले की.

In case of acquiring membership on the basis of nomination, such member shall hold the flat/unit in ‘Trust' till all the Heirs are brought on record and shall not have the right to ownership and shall not create the third party interest.
From model bye laws
नॉमिनेशनच्या आधारे शेअर्स आणि फ्लॅट ट्रान्सफर केला, तरी इतर वारसांकडून हक्क सोडपत्र मिळाल्याशिवाय मालकी मिळत नाही. अनेक सोसायट्यांमध्ये मॅनेजिंग कमिटी हे करत नाही.

रिझर्व बँकेच्या मास्टर सर्क्युलर मधून नॉमिनीला पैसे देताना t has been made clear to the survivor(s) / nominee that he would be receiving the payment from the bank as a trustee of the legal heirs of the deceased depositor, i.e., such payment to him shall not affect the right or claim which any person may have against the survivor(s) / nominee to whom the payment is made.

प्रश्न काय नी चिकित्सा काय? Lol>>>>अशा चिकित्सेतुन प्रश्नाच्या विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित होते Lol

मला माहिती आहे त्यानुसार - मृत्युपत्र फक्त नोटराइज केले असेल किंवा नुसतेच कागदावर लिहिले असेल तर प्रॉपर्टी वगैरे ट्रान्स्फर करायला रजिस्टार ते ग्राह्य धरत नाहीत. कोर्टात जाउन प्रोबेट करुन आणावे लागते.
जर मृत्युपत्र रजिस्टर केलेले असेल (रजिस्ट्रार समोर जाऊन जसे फ्लॅट वगैरे खरेदी करताना आपण खरेदी खत रजिस्टर करतो) तर ते ग्राह्य धरले जाते.

घ्या! इथे नॉमिनेशन करा, मृत्यूपत्र करा, ते नोटराईज करा, ते रजिस्टर करा, प्रोबेट करा इतके वेगवेगळे सल्ले आलेत. आता तुम्ही काय करणार?

बरोबर आहे, लोक सांगतात कोऱ्या कागदावर ही केलेलं चालत पण ते काही खरं नाही. दोन साक्षीदार, डॉक्टरच सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन ह्या सगळ्या गोष्टी लागतात. मृत्युपत्र मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि मद्रास ह्या चार महानगरात केलेलं असेल तर मृत्यूनंतर वारसांना ते कोर्टात जाऊन प्रोबेट करून घ्यावं लागतं , तेव्हाच ते कायदेशीर होतं. त्यामुळे मृत्युपत्र केलं सगळे प्रॉब्लेम संपले असं होत नाही. तरी त्यामुळे थोडी सुलभता नक्कीच येते म्हणून मृत्युपत्र करणे खूप आवश्यक आहे. सगळं चांगलं असेल तर मुलांना विश्वासात घ्यावे आणि त्याची कॉपी प्रत्येक मुलाकडे देऊन ठेवावी.
मृत्युपत्राने आपली इच्छा वारसांना कळून शक्य तेवढ्या सामोपचाराने वाटणी झाली तर बेस्टच आहे पण गाडी अगदीच अडली तर तेव्हा मात्र ते खूप उपयोगात येतं . तसेच वारसा हक्क डावलून जर आपली प्रॉपर्टी कोणाला आपल्याला द्यायची असेल तर ते फक्त आणि फक्त मृत्युपत्रा द्वारेच करता येत.

मृत्यूपत्राचा नंतर कोर्टात कीस पडतोच. म्हणूनच एक नाममात्र इच्छापत्र करून रजिस्टर करावे.

सोसायटी ब्लॉक आणि नॉमिनी यांचा आग्रह धरला जातो कारण सोसायटी यातून मोकळी होते कोण मेंटेनन्स भरणार याबाबत. पुढचे सोपस्कार नॉमिनीला करावेच लागतात. आणि मालकाने जर अमुक एका वारसाच्या नावे मालमत्ता करायची झाल्यास उत्तमच पण स्टँप ड्युटी लागते. जर का दोन नावाने ब्लॉक असेल आणि दुसऱ्याची सही मिळत नसेल तर काय करणार?

बँक एफडीचा मालक किंवा कोणाच्या नावे आहे हा पुरुष असेल तर वडिलोपार्जित संपत्ती ठरते. मग वारसांचा काथ्याकूट होतो. आईच्या, महिलेच्या नावावर असेल तर अडचणी येत नाहीत.

या चर्चेतून नवनवीन कायदेशीर, कायदेविषयक मुद्दे येत आहेत आणि खोडले जात आहेत किंवा सावध केले जात आहे सभासदांकडून ही चांगलीच गोष्ट आहे. मी म्हणतो तेच खरं असं अजिबात नाही. पण ते मुद्दे घेऊन शंकानिरसन करून घेण्यास वाट सापडेल.

मृत्युपत्र रजिस्टर केले तर ज्यांच्या नावे प्रॉपर्टी केली त्यांना ती मिळण्यात कमी त्रास होतो, पण विनासायास मिळेलच असे नाही.
माझ्या आजीने तिच्या नावे असलेली जमीन मृत्युपत्राद्वारे माझ्या नावे केली. दोन्ही आत्या साक्षीदार होत्या आणि रीतसर रजिस्टर केलं होतं.
तरी तिच्या मृत्यू पश्चात माझ्या काकाने केस केली की आम्ही तिला जबरदस्ती ते करायला लावलं. दोन्ही आत्यांनी समजवायचा प्रयत्न केला तरी त्यांनी केस मागे घेतली नाही. आज १५ वर्षे झाली ह्या गोष्टीला, केस सुरूच होती... तारीख पे तारीख वकील बघतात.
सांगायचा मुद्दा हा की तुम्ही काहीही करा, पुढे मिळणाऱ्याच्या नशीबात येणारा त्रास हा त्यांनाच भोगावा लागतो. रजिस्टर मृत्यूपत्र त्रास थोडा कमी करू शकतं, एवढंच!

<बँक एफडीचा मालक किंवा कोणाच्या नावे आहे हा पुरुष असेल तर वडिलोपार्जित संपत्ती ठरते.> नक्की?.

वडिलोपार्जित संपत्ती - हिंदू अविभक्त कुटुंबात किमान तीन पिढ्यांपासून वारशाने मिळालेली संपत्ती.

पुरुषाने स्वतः कमावलेली संपत्ती असेल, तर तिची वाटणी तो त्याला हवी तशी करू शकतो.

स्त्रीच्या मालमत्तेत पहिला हक्क तिच्या मुलांचा व पतीचा असतो. मात्र तिला माहेरहून वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीवर पतीचा हक्क नसतो.

भरत +१. मी ही असंच ऐकलं आहे.
सुटसुटीत पणाच्या दृष्टीने हयातीत तडीला लावू ते खरं, हे ही आहेच. गोंधळ होणार वाटत असेल तर ट्रस्ट करावा म्हणतात. खखोदेजा.

मयत व्यक्ती पुरुष असेल तर बँक सर्व वारसांचे नोटरी मागते. त्यामुळे लॉकर बद्दल तर जागरूक राहावे.

सोसायटी ब्लॉक आणि नॉमिनी - नॉमिनीच्या नावे शेअर सर्टिफिकेटवर नाव टाकून बदल केले जातात. तो जेव्हा ब्लॉक विकायला काढतो तेव्हा सर्व कायदेशीर सोपस्कार करावे लागतातच. पण मुलांच्या मालमत्तेचे वडील वारस ठरत नाहीत.