Submitted by अविनाश जोशी on 21 June, 2025 - 07:31
हलकं फुलकं
बहुतेक लोकांनां असे वाटते की खारीक म्हणजे वाळलेला खजूर परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. सध्या मार्केटमध्ये लाल नारंगी वर्णाचा ओला खजूर मिळतो तो अवश्य पाहावा व चव लुटावी.
दुसरे असेच विधान म्हणजे कोकिळा सुंदर गाते . कुहू कुहू बोले कोयालया असे कवी म्हणतात. परंतु हे पूर्ण चुकीचे आहे. गोड आवाजात कोकीळ गातो , कोकिळा नव्हे.
तसे पाहिले तर प्राणी सृष्टीत पुरुषच दिसायला आकर्षक असतात. उदारणार्थ मोराचा पिसारा पहा. त्यामानाने लांडोर अत्यंत साधी असते. दुसरं सिंहाची आयाळ पहा कशी आकर्षक असते , सिहिण त्यामानाने साधीच असते. साध्या कोंबड्याला सुद्धा छान तुरा असतो.
अश्या बऱ्याच गोष्टी आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा