ये हृदयीचे ते हृदयी

Submitted by सामो on 5 June, 2025 - 12:31

कधी कधी मूड उगाचच नकारात्मक होउन जातो. जळी-स्थळी- काष्ठी-पाषाणी फक्त स्वतःच्या चूका आठवु लागतात. आणि त्याही १० पटींनी मॅग्निफाईड. खरे तर आपण सारे जण उन्नीस बीस त्याच किंवा तितक्याच गंभीर चूका करत असतो, जवळ जवळ चूक करता करता सावरलेलो असतो. ते काही का असेना, निखालस ईव्हिल आणि निर्दयी आपल्या इनर क्रिटिकला ते मंजूर नसते. खदाखदा हसत क्वचित कुत्सित हसत आपल्यातील प्रत्येक दोष तो १० पटींनी मॅग्निफाय करुन दाखवत असतो. कामच आहे ना ते त्याचे - उगाच तांडव करायचे. (आणि होय तो 'तो'च असतो Wink ती नसते ) त्याचे कामच छळायचे. मार्गदर्शन करतोय या नावा खाली छळ मांडायचे. काहीही चांगले लिहायचे, वाचायचे, बोलायचे ठरवले की हा म्हणणार "ए गपे! खाली बस" आणि हे असं शाळकरी मुलीसारखं वागवलं की आपणही आक्रसून जाणार आणि गप्प सुस्त पडून रहाणार हे ओघाने आलेच. तर डार्क मूड बरेचदा येतो. अश्यावेळी आपला स्वर्गातला 'गार्डिअन एंजलही' कुठे पत्ते पिसण्यात दंग असतो देव जाणे. पण कोणीच मदतीला येत नसते. You are wallowing in self-disgust or self-pity. आणि ते सुद्धा आलटून-पालटून बरं का. सुख दुखतं म्हणतात ना ते यालाच. ना गाणी ऐकता येत, ना पॉडकास्टस ना सिनेमे, ना पुस्तके - कश्शात म्हणजे कश्शात जीव रमत नसताना .......
.
"Ask and it shall be given you;
seek and you shall find;
knock, and it shall be opened unto you"

- असा अनुभव येतो. मी माझ्या जीवलग, मैत्रिणीला सांगते की मी बघ फेसबुक सन्यास घेत आहे, अन्य सोशल फोरम्स वरुन अदृष्य होत आहे. वैतागले आहे. मला काहीतरी दुखतय Sad आणि खरच दुखत असतं, आणि आपले म्हणणे, आपण खरेही करुन दाखवणार असतो. मेसेज टाकून आपण आपल्या 'कोशात' जाउन बसतो.
आणि whoa! दुसर्‍या दिवशी तिचे उत्तर आलेले असते ... इतके प्रेमळ, उत्साहवर्धक आणि मुख्य म्हणजे आपले कौतुक करणारे Happy याय!! ते फार महत्वाचे असते. इनर क्रिटिकच्या फाडकन मुस्काटात द्यायची असेल तर आवडत्या मैत्रिणीच्या जेन्युइन कौतुकाशिवाय तरणोपाय नाही. तिच्या स्तुतीशिवाय ते होणे नाही. ना ही स्तुती विकत घेता येते, साम-दाम-दंड-भेद- डिप्लोमसी कशानेही ती 'barTer' करता येत नाही. आणि अलगद पिकल्या फळासारखी आपल्या फाटक्या झोळीत येउन पडते Happy दूरच्या तिला मीठी तरी कशी मारणार कसं तिला सांगणार अगं राणी! हेच याचीच मला गरज होती. हेच ते औषध जे मला तातडीने हवे होते. आपण फक्त लिहीतो 'TY'. कुठे एखाद्या वाक्याला बदाम, कुठे एखाद्या वाक्याला स्मायली. मनात मात्र आता सुर्योदयाचा प्रकाश पिसारा फुलवुन थुईथुई नाचत असतो. आपण कोणालातरी आवडतो आणि आपली जगात या विश्वात कोणाला तरी किंमत आहे. हे व्हॅलिडेशन सर्वांनाच एखाद्या कातर क्षणी लागतच की. तिकडे, मैत्रिणीच्या पुण्याईच्या खात्यात झरझर पुण्य पडत असते. 'खोर्‍याने ओढतात' तद्वत, किंवा 'नोटा छापतात' तसे तिचे पुण्याईचे खाते भरत जाते. तिला कळते ते का नाही माहीत नाही कारण आपण काही हा अनुभव तिला स्पेल आऊट करुन सांगणार नसतो. तिला कळेलच की आपोआप. 'या हृदयीचे त्या हृदयी ..." Happy
.
हृदया हृदय येक जाले। ये हृदयीचे ते हृदयी घातले।
द्वैत न मोडता केले। आपणा ऐसे अर्जुना।।

.
असो. ती नक्की वाचणार आणि ती मनात ओळखणार. आता ती इथे माबोवर आहे की मी तिला लिंक पाठवेन ते मी गुलदस्त्यात ठेवणार आहे. परत माझीच टेप लावते ....... परवाच हा मैत्राचा अनुभव आला आणि आज शिवानींचा सुंदर लेख मैत्र जीवांचे वाचनात आला. जगात कोणताही योगायोग असा नसतो. एव्ह्रीथिंग इज प्लॅनड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण सारे जण उन्नीस बीस त्याच किंवा तितक्याच गंभीर चूका करत असतो>>> अगदी खरं आहे सामो.
पण निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतांना आपण मात्र स्वतःचेच निंदक बनत असतो.

मला माझाच लेख आठवला, 'आपुलची संवाद आपणसी....'

'आपुलची संवाद आपणसी....' होय आठवतोय तो लेख. स्वतःशी सकारात्मक संवाद साधण्याबद्दल आहे मला वाटतं.
>>>>आपण मात्र स्वतःचेच निंदक बनत असतो.
मुख्य म्हणजे ज्या अरेरावीच्या आणि उद्धट टोनमध्ये त्या चूका आपण दाखवतो (म्हणजे आपल्याला स्वतःला) तो टोन अन्य कुठे खपवुनच घेतल जाणार नाही.

छान मनोगत सामो.
कदाचित कर्क म्हणजे क(च) (अ) र्क असं असावं बहुतेक. त्यामुळे नकारात्मक हिंदोळे जास्त वेळा अनुभवास येतात. अर्थात् तुझा याबद्दल अभ्यास आहे त्यामुळे अधिक माहिती असणार. (पण हे अशी आपली कुणीतरी आपुलकी असणारं आवश्यक वाटतं, यातील भावनिक परावलंबित्व काही वेळा धोकादायक ठरू शकतं. हेमावैम) पण लेख शेवटास सकारात्मक विचार करणारा आहे बरं का.

>>>>>भावनिक परावलंबित्व काही वेळा धोकादायक ठरू शकतं
होय आणि होयच. व्हॅलिडेशन लागताच कामा नये. किंव अगदी क्वचित लागावे.

कर्क राशी भयंकर मूडी व भावनाप्रधान असते झालच बट आय हॅव्ह अ स्टेलिअम इन सेवेन्थ हाऊस. तुला कळलं असेलच ३ ग्रहं पडलेत सातव्या घरात आणि सगळे जड नाहीतर प्रखर नाहीतर ऑब्सेस्ड. त्यामुळे फार परप्रकाशी आहे मी. आय नीड कॉन्स्टन्ट व्हॅलिडेशन. Sad अर्थात माझ्या मर्यादा.

कदाचित कर्क म्हणजे क(च) (अ) र्क असं असावं बहुतेक. त्यामुळे नकारात्मक हिंदोळे जास्त वेळा अनुभवास येतात.>>> माझा +१ पण ह्यात येतो.

फार परप्रकाशी आहे मी. आय नीड कॉन्स्टन्ट व्हॅलिडेशन. >>कर्क नसले तरी मी या गटात येते.

अरे मस्त तूळ रास सुंदर. खूप रिफाइनड आणि इन्टेलेक्च्युअल रास आहे.
तुमची जशी कर्क-तूळ जोडी आहे तशीच आमचीही आहे Happy