
१. फणसाच्या आठळ्या
२. फोडणीचे साहित्य
३. कांदे (आठळ्यांच्या प्रमाणात)
४. कोकम ( चवीनुसार)
५. गोडा मसाला
६. कोथिंबीर (पर्यायी)
७. मीठ
८. पाणी
तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या म्हणजेच फणसाच्या बिया ! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्या आठळ्या टाकून द्यायच्या नाहीत अस बजावून ठेवलेल होतेच.
एक वेळच्या भाजीला पुरे होतील आणि भाजी शेजारी देता येइल इतपत आठळ्या जमा झाल्या . मग मुहूर्त जमवून आणला फणसाच्या आठळ्याच्या भाजीचा .
कोकणात ही भाजी करतात . माझी आईची आई ही भाजी सुरेख करायची . आईलाही ही भाजी प्रचंड आवडायची.. त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला की एका रात्री हा फक्कड बेत असायचा भाकरीबरोबर. आठळ्या फोडायचे काम आजोबांकडे असायचे. वाराप्रमाणे त्यात काळे वाटाणे/ सुका जवळा/ सुके बोंबिल अशी पुरवणी असायची. जोडीला भाकरी , पिठल भात
याची कृती अगदीच सोपी .
आठळ्या धुवून घ्याव्यात . खलबत्याने साधारण एक सारखे तुकडे करावेत. नेहमीची फोडणी करून कांदा परतून, कोकम घालून त्यावर आठळ्या परतून घ्याव्यात . खात असलात तर सुका जवळा / बोंबिल टाकावे . प्रमाणानुसार गोडा मसाला आणि हवे तितके पाणी घालून वाफ काढावी. मीठ आणि हवे असल्यास कोथिंबीर घालून अंगसरशी भाजी करावी.
बस इतकेच.
कोकम टाकल्याने छान तिखट आंबट चवीची भाजी मिळुन येते. तेव्हा कोकम वगळू नका.
मस्त रेसिपी आणि फोटो तर
मस्त रेसिपी आणि फोटो तर लाळगाळू! नुसती खायला पण भारी लागेल. खरमरीत फोडणी पाहिजे वरून घालायला जर नुसतीच खायची असेल तर.
पाकृ आवडली
पाकृ आवडली
आठळ्या उकडायच्या नाहीत का?
आठळ्या उकडायच्या नाहीत का?
मी त्या फोडून उकडून सोलून करते.
छान आहे पाककृती ..!
छान आहे पाककृती ..!
सगळ्यांना धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद
धनवंती, मी ही भाजी नुसत्या वाफेवर शिजवली. पुरेशी शिजते भाजी
जाई, करून बघते नक्की...
जाई, करून बघते नक्की... Tempting आहे
छान आहे रेसिपी. आठळ्यांची
छान आहे रेसिपी. आठळ्यांची भाजी खाल्ल्याची आठवत नाहीये कधी.
आम्ही वाटण लावतो कच्च्या
डबल पोस्ट
आम्ही वाटण लावतो कच्च्या
https://www.maayboli.com/node/48564
आम्ही वाटण लावतो कच्च्या
मायबोलीवर अशी एक रेसीपी सुद्धा आहे ,
https://www.maayboli.com/node/48564
सायो, थँक्स
सायो, थँक्स
मस्त रेसिपी आहे. आमच्याकडे
मस्त रेसिपी आहे. आमच्याकडे प्रॉन्स आणि टॉमेटो घालून करतात किंवा मायाळूच्या भाजीत घालतो आठळ्या. आता अशा पद्धतीने करुन पाहीन.
छान वाटतेय रेसिपी. इथे आठळ्या
छान वाटतेय रेसिपी. इथे आठळ्या मिळाल्या तर करून पाहणार.
छान आहे रेसिपी, आमच्याकडे
छान आहे रेसिपी, आमच्याकडे आहेत सध्या आठळ्या त्यामुळे करून बघते.
आमच्याकडे कधी भाजी केलेली बघितली नाहीये. पण आळवात आमटीत घालतात आवर्जून. तसेच मीठ घालून उकडून ही खातात. भाजून ही अप्रतिम लागतात पण फटाफट उडतात , भाजायची भीती त्यामुळे मुंबईला कधी भाजत नाही. गावाला मात्र पावसाळ्यात चुलीत भाजून खायला मजा येते. असो.
आठळ्याची भाजी खाल्ली की
आठळ्याची भाजी खाल्ली की दुसऱ्या दिवशी ठो ठो ....
वाह छान रेसिपी. कधीतरी
वाह छान रेसिपी. कधीतरी नवऱ्यासाठी करेन. तशाही मी मिठात उकडून, कढीत, आमटीत, तवा पुलाव, रस्सा भाजी हयात थोड्या थोड्या घालत असते (जेव्हा जास्त असतात तेव्हा), हे सर्व त्याला आवडतं. अशा थोड्या बाकीच्या गोष्टींबरोबर मलाही आवडतात. पूर्ण भाजी कधी खाल्लीच नाहीये.
आमच्याकडे कधी भाजी केलेली बघितली नाहीये. >>> सेम हेमाताई, मी ही पूर्ण भाजी माहेरी सासरी कधी केलेली बघितली नाहीये.
छान आहे रेसिपी
छान आहे रेसिपी
धन्यवाद भ्रमर
धन्यवाद

भ्रमर
आठळ्या उकडून मीठ लावुन
आठळ्या उकडून मीठ लावुन खाल्लेल्या आहेत. आवडतात.
कोकणात ही भाजी करताना भरपूर
कोकणात ही भाजी करताना भरपूर वेळ शिजवतात, त्यामुळे त्या मस्त मिळून येतात. आणि आठळ्या दगडावर चेचून घालतात , त्यामुळे भाजी चांगली मिळून येते.
छान दिसतेय.
छान दिसतेय.
आमच्याकडे फणसाच्या गोट्या असे सुद्धा म्हणतात.
उकडून खायला सुद्धा छान लागतात.
भाजी बरीच वर्षे खाल्ली नाही. अर्थात आई बनवायची तेव्हा मी लहान होतो आणि कुठल्याही भाज्या खायच्या नावाने बोंबच होती. म्हणून माझ्यासाठी काही असेच उकडले जायचे. नंतरही जेव्हा बाहेरून विकतचे फणस सोललेले गरे आणायचो त्याच्या गोट्या कधीच फेकून दिल्या नाहीत. कुकर सोबत लावून उकडून खाल्या जातातच.
आठवड्यांची भाजी किंवा फक्त
आठवड्यांची भाजी किंवा फक्त उकडून आवडतात. पण एकदा आठळ्या महिनाभर ठेवल्या होत्या त्या नंतर कुकरच्या पंधरा शिट्ट्यानेही शिजल्या नाहीत. असं का?
काही आठळ्या गोड चवीच्या असतात त्यांची मात्र भाजी चांगली लागत नाही.
जाई मस्तच!
जाई मस्तच!
कालच गावाहून फणस आले आहेत तेव्हा लवकरच होईल ही भाजी घरी...
आमच्या नॉन वेज/वेज दोन्ही होतात.. फक्त बिया चेचून घेतात दगडाने..
छान दिसतेय भाजी. फणसाच्या
छान दिसतेय भाजी. फणसाच्या भाजीतही बिया आवडतात.
तेव्हा ही भाजी नक्की करून बघेन.
छान आणि वेगळी वाटते आहे कृती
छान आणि वेगळी वाटते आहे कृती. मी नेहमी आठळ्या उकडून केलेली सात्त्विक टाइप भाजीच खाल्ली आहे.
आमच्याकडे फणसाच्या गोट्या असे
आमच्याकडे फणसाच्या गोट्या असे सुद्धा म्हणतात. >> आम्ही घोट्या म्हणतो..
सर्वांना थँक्स
सर्वांना थँक्स
जुई, मानवदा, भरत नक्की करा ही भाजी आणि कसे लागले ते सांगा .
ऋणमेश, आठळ्यासाठीचा नवा शब्द कळला .
एसआरडी, कदाचित आठळ्या खराब असतील किंवा जास्त ठेवल्याने जुन झालेल्या असतील म्हणून शिजल्या नसतील
आम्ही घोट्या म्हणतो..+ १
आम्ही घोट्या म्हणतो..+ १
कधी ऐकला नाही प्रकार, कच्च्या
कधी ऐकला नाही प्रकार, कच्च्या फणसाची च भाजी ऐकुन आहे.
आठळ्या चेचून घातल्या आहेत असे लिहिले आहे पण फोटोत अक्ख्या आठळ्या दिसत आहेत..
aashu29
aashu29
गावी असताना आठळ्या मोकळ्या अंगणात मोठ्या खलबत्याने नीट फोडून घेतात
इथे मुंबईत संगमरावरी ओट्यावर लहान खलबत्यात जेवढ्या फोडता आल्या आहेत तेवढ्या फोडून घेतल्या आहेत . चेचून घेतल्या आहेत असे लिहिलेले नाही.
Pages