विहिरीचं रहस्य
वरील हकीकतीसारख्या असंख्य गोष्टी सैन्यदलात घडत असतात. बाहेर त्या येत नाहीत एवढंच. एका एअर फोर्स स्टेशन कमांडर ने विहिरीचे रहस्य एका संद्याकाळी आम्हाला सांगितले. Handling Over the Charge ही एक हाय प्रोफाइल सेरेमनी असते. जितके कोडे मोठे तितकी सेरेमनी भपकेबाज असते. एका मोठ्या एअर बेसचा चार्ज एक एअरव्हॉइस मार्शल दुसऱ्या एअर व्हॉइस मार्शलला देत होता. एअर फोर्स मधील ही पदे साधारणतः मेजर, जनरल यांच्या बरोबर असतात. अशा वेळेस कमांडरचे ऑफिस सजवले जाते. अशा वेळेस जाणारा कमांडर एका फाइलवर सही करतो आणि आपल्या खुर्चीवरून उठून उजवीकडे जातो. त्यानंतर तो डावीकडे उभ्या असलेल्या नवीन ऑफिसरकडे देतो. नवीन ऑफिसर टेबलावर बसून त्या फाइलवर सही करतो. त्या फायलीत त्या बेस विषयी सर्व माहिती असते यात सर्व प्रकारच्या इमारती , विमाने, शस्त्र-अस्त्र, माणसे , माणसांकडची हत्यारे , एअर बेस वरील दारू गोळा , प्रोव्हिजन्स इत्यादी मटेरिअलची माहिती असते. थोडक्यात पहिला अधिकारी ह्या सर्व गोष्टीची कमांड दुसऱ्या ऑफिसरला देतो. दुसरा ऑफिसर त्याचा स्वीकार करतो. या सर्व गोष्टी विश्वासावर केल्या जातात. या गोष्टी प्रत्यक्ष करायच्या झाल्यास कित्येक महिने जातील आणि तेवढा वेळ कोणापाशीच नसतो. प्रत्यक्ष येणार नवीन कमांडर , जुन्या कमांडरकडून असा चार्ज घेत असतो. असाच एक नवीन कमांडर श्री शर्मा यांनी जुन्या कमांडर कडून चार्ज घेतला आणि ते ऑफिस मध्ये रुजू झाले. त्यांचा हा चार्ज घ्यायचा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सहाय्यकाला विचारले 'कॅप्टन सिन्हा, तुम्ही नेतृत्व बदलाचे किती प्रसंग पाहिले आहेत?'
'तुमचं धरून तीनदा'.
'यातील नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याने कधी टोटल स्टॉक चेकिंग केले आहे का '?
'कधीच नाही'
'मग खऱ्या गोष्टी कशा आहेत याचे समाधान कुठल्या स्टेशन इनचार्जला आणि कसे होते ?
'सर , येणारा नवीन इन्चार्ज फायली बरोबरच असणार असे धरूनच चालतो.
सिन्हाजी 'यावर गेल्या दोन तीन वर्ष रँडम ऑडिट होत आहे. काही वेळा तर कॅग चे ऑडिट पण येत आहे. आपली स्थावर मालमत्ता तसेच शस्त्र-अस्त्रे आणि दारुगोळा यांची कसून तपासणी अशावेळी होणे शक्य आहे. सैन्यातुनच शस्त्र-अस्त्रे आणि दारुगोळा अतिरेक्यांना पुरवला जातो असे काही वर्तमानपत्रांचे म्हणने आहे त्यामुळे अगदी शुल्लक बाब सोडता बाकी सगळ्याची आता MHQ कडून कसून तपासणी करण्याचे आदेश आहेत.'
'एस सर, काय करायचं तुमचं प्लॅनिंग आहे. '
'सिन्हाजी आज आपण ओव्हरऑल एअर बेसवर फेरफटका मारू आणि कुठे काय आहे ते बघून घेऊ.'
'सर पण अशी तपासणी करायला 8-10 दिवस अगोदर तरी सर्व सूचना गेल्या पाहिजेत.'
'काही जरूर नाही. उद्यापासून दोन दिवस हाच उद्योग करू. तुम्ही तुमचे शनिवार- रविवारचे प्रोग्रॅम कॅन्सल करा.'
'एस सर'
झाले दुसऱ्यादिवशी सकाळी साध्या वेशात दोघेही तपासणीसाठी बाहेर पडले. पहिल्यांदा एअरक्राफ्ट्स , एअरक्राफ्ट्स हँगर्स , एअरक्राफ्ट्स मधील शस्त्र-अस्त्रे आणि दारुगोळा , रनवे चे आरोग्य , कंट्रोल टॉवर्स आणि त्याचे व्यवस्थापन ह्याची अगदी प्रात्यक्षिकासह तपासणी झाली. यामुळे ऑपेरेशन्समधील सर्व लोकांना उपस्थित राहावे लागले . एक दिवस याच्यातच गेला. दुसऱ्यादिवशी AVM शर्मानी इमारतीची पाहणी करण्याचे ठरवले. असे करता करता मॅप मध्ये दाखवलेली एक 35 फूट व्यासाची आणि सत्तर फूट खोलीची एक विहीर पाहण्यास गेले. कागदोपत्री त्याची रक्कम 68 लाख दाखवली होती. पण ......
...... ती विहीर जाग्यावर नव्हती. विहीर जाऊदे त्या ठिकाणावर साधा खड्डा सुद्धा नव्हता. शर्मा साहेबांच्या पोटात गोळा उठला. 15 वर्षांपूर्वी असलेली 68 लाख रुपये किंमतीची विहीर आता कुठून आणायची असा प्रश्न शर्मांपुढे उभा राहिला. शर्मा आणि सिन्हा दोघेही ताबडतोब आपल्या शेपट्यांसह तातडीने आपल्या ऑफिस कडे रवाना झाले. तिथे सिन्हांनी 17-18 वर्षांपूर्वीच्या फाइल्स काढल्या. त्या कागदपत्रात 18 वर्षांपूर्वी काढलेले पब्लिक टेंडर, विविध काँट्रॅक्टरनी भरलेले टेंडर्स , सर्व टेक्निकल इन्फॉर्मशन अशी कागदपत्रे होती.
कुठेच विहीर सापडेना म्हंटल्यावर वैतागून शर्मा म्हणाले 'विहीर बांधून इतकी वर्षे झाली पण पूर्वीच्या कमांडर ना हे लक्षात आले नाही ?'
सर, मी इथे दहा वर्ष आहे पण या पूर्वीच्या कुठल्याही कमांडर ने अशी तपासणी केली नव्हती. नंतर सिन्हा साहेबांकडे वळून म्हणाले 'सर, शोधाशोध करून काही उपयोग नाही. ही विहीर फक्त कागदावरच आणि फाइलवरच आहे ती पहिल्यांदा बघू ' सिन्हाने बरीच शोध करून ऑफिसात विहिरीच्या फाईलचा अखेर शोध लावला.
त्या दोघांनी ती फाईल चाळली. त्यामध्ये त्यांना खालील कागदपत्रे सापडली.
विहिरीचे सिविल डिझायन
विहिरीचे बिल ऑफ मटेरियल
विहरीचे एस्टीमेट , एस्टिमेट करिता CDA चे सर्टिफिकेट
विहरीकरिता काढलेले टेंडर
आलेल्या टेंडरची यादी . त्यात सिलेक्ट झालेल्या काँट्रॅक्टरचे नाव आणि एस्टीमेट
त्या काँट्रॅक्टरला दिलेली डीटेलेड ऑर्डर आणि नियम व शर्ती
काँट्रॅक्टरला दिलेली ऍडव्हान्स रक्कम . त्यानंतर तयार होत असलेल्या विहिरीचे इन्स्पेक्शन रिपोर्ट आणि 65 फुटावर पाणी लागल्याचे सर्टिफिकेट
विहिरीचा विस्तार वाढवून विहीर 35 फूट व्यास आणि 68 फूट खोल गेल्याचे सर्टिफिकेट
विहिरीचे आतील बांधकाम आणि तीन फुटी कठडा आणि दगडात बांधल्याचे सर्टिफिकेट
दोन इंची पाइप, फूटव्हॉल्व्ह आणि 5HP चा पंप बसवल्याने सर्टिफिकेट
कमांडर च्या हस्ते विहिरीचे उदघाटन या शिवाय त्या कॉन्ट्रॅक्टर ला वारंवार दिलेल्या रकमेची पत्रे, एकूण रक्कम अडुसष्ट लाख बत्तीस हजार सहाशे पन्नास रुपये.
अशा रीतीने फाइलमधील विहीर संपूर्ण होती त्यात काहीही कमी नव्हते. एवढी विहिरीचे कागदपत्रे असताना विहीर नाही याचा अर्थ एकच होता की विहीर न खणताच या सर्व लोकांनी पैसे खाल्ले
शर्मा मोठ्या काळजीत पडले पण सिन्हा सरकारी टेप्स मध्ये मुरलेले होते. ते शर्मा ना म्हणाले 'सर तुम्ही काही काळजी करू नका. दोन तीन महिन्यात आपण विहिरीचा बंदोबस्त करू मात्र मी आणलेल्या कागदपत्रावर तुम्ही सह्या ठोका.' शर्माना हो म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यानंतर सिन्हा तीन महिने बरेच कागद आणत गेले आणि शर्मा सह्या ठोकत गेले.
तीन महिन्यांनी सिन्हा, शर्माना परत इन्स्पेकशनसाठी घेऊन गेले. जागेवर गेल्यावर सिन्हा म्हणाले ती बघा आपली विहीर. शर्मा ना विहीर दिसेना ते सिंहाना म्हणाले 'सिन्हा मुझे क्या बेवखूप बना रहे हो ? कहा हे कुआ ? सर जैसे फाईल मे कुआ बन गया था वैसे ही फाईल मे कुवा निकाल दिया. आपण जर नवीन फाईल बघितली तर आपल्या लक्षात येईल कि विहिरीचं पाणी आटले होते त्यात लोकांनी कचरा टाकायला सुरवात केली त्यामुळे दुर्गंधी सगळीकडे पसरली त्यातून काही भटकी कुत्री , एक गाढव आत पडले त्यामुळे तर दुर्गंधी फारच वाढली. बऱ्याच तक्रारी झाल्यानंतर आपणच विहीर बुजवण्याचे कंत्राट काढले त्याला त्रेपन्न लाख सत्तेचाळीस हजार रुपये खर्च झाला त्यातले देऊन घेऊन आपल्याकडे सेहचाळीस लाख रुपये कॅश मध्ये शिल्लक आहेत. त्यातले तुम्हाला किती देऊ आणि मी किती घेऊ ?
शर्मा या प्रश्नाने थक्क झाले आणि त्याच बरोबर सिन्हांच्या हुशारीचे त्यांना कौतुक वाटले.
कागदावरच तयार झालेली विहिर कागदावरच बुजवण्यात आली दोन्ही वेळेला तुफान पैसे खाल्ले गेले. अर्थात एका नगरपालिकेचा रोडरोलर उंदराने खाल्ला ही कथा जास्तच रम्य आहे.
भयानक भ्रष्टाचार
भयानक भ्रष्टाचार
अशा आशयाचा एक 'विहीर' नावाचा
अशा आशयाचा एक 'विहीर' नावाचा मराठी चित्रपट पण आहे.