ऊन लागले कलू

Submitted by द्वैत on 28 May, 2025 - 01:28

ऊन लागले कलू
लांबल्या दिशा पुढे
शीळ गुंजते इथे
पैल पाखरू उडे

भार पापणीवरी
आणि स्तब्ध पाउले
ओंजळीत दे भरू
लालकेशरी फुले

गंधभारली हवा
वाहते हळूहळू
स्पर्श पाहतो पुन्हा
स्पंदनांत दरवळू

हीच आपुली व्यथा
भास वाटती खरे
मेघ दाटता नभी
प्राण खोल थरथरे

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! सुंदर!

>>>
शीळ गुंजते इथे
पैल पाखरू उडे
<<<
फार आवडलं.

या कवितेला चाल लावली आणि उत्तम संगीत मिळाले तर बहार येइल. शब्द अलवार आहेत.
>>>>>ओंजळीत दे भरू
लालकेशरी फुले
केशरी आवडता रंग आहे. लाल केशरी म्हणजे प्राजक्त Happy