लोकहो, आधीचे कोडे मायबोलीकरांनी सोडवले आहे. आता त्याचीच एक पुढची आवृत्त्ती देत आहे
सर्व गोष्टी तशाच आहेत. जी बदललेली गोष्ट आहे ती डकवत आहे.
******************************************
एक राजा रानात शिकारीला गेला. त्याच्यावर एका वाघाने हल्ला केला. राजा एकटाच कसाबसा वाघाला मारून परत आला. पण त्यात तो खूपच जखमी झाला आणि त्याची शुद्ध गेली. राजवैद्यांनी प्रधानाला गंभीरपणे सांगितले 'राजेसाहेबांना वाचवण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वर्गातील नंदनवनात कल्पवृक्ष आहे त्याचे फळ आणणे. या फळाचा रस राजसाहेबांच्या मुखात सोडल्यासच ते शुद्धीवर येतील नाहीतर प्राण वाचवणे असंभव आहे'.
राजाकडे एक इच्छाधारी विमान होते. प्रधान लगेच विमानात स्वार होऊन नंदनवनाच्या दारापाशी पोचला. दारापाशी खुद्द इंद्र उभा होता. त्याने प्रधानाला हटकलं. प्रधानाने सगळी कहाणी सांगून कल्पवृक्षाचे फळ घेऊन जायची परवानगी मागितली.
इंद्र हसून म्हणाला 'माझ्या परवानगीशिवाय जो कल्पवृक्षाला स्पर्श करतो त्याचे भस्म होते. पण तू माझ्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिलंस तरच मी तुला फळ घ्यायची परवानगी देईन. बघ, त्या समोरच्या वेलींच्या मंडपाखाली तीन अतिसुंदर स्त्रिया उभ्या आहेत. त्या तीन अप्सरा आहेत, रंभा, मेनका आणि उर्वशी. आता तू मला त्यातली रंभा कोणती, मेनका कोणती आणि उर्वशी कोणती ते बिनचूक सांगायचस. आणि मगच तू फळ घेऊन जाऊ शकशील'
प्रधान म्हणाला 'पण मी त्या तिघींना पहिल्यांदाच बघतोय. त्यातली कोणती कोण ते मला कसं कळणार?'
इंद्र म्हणाला 'त्यासाठी मी तुला त्यांना तीन प्रश्न विचारायची परवानगी देतो. हे प्रश्न असे हवेत की त्यांची उत्तरे हो किंवा नाही या दोन्हींपैकीच असली पाहिजेत. आता हे तीन प्रश्न कसे विचारायचे ते तू ठरव. तू एका अप्सरेला तीन प्रश्न विचारू शकतोस, प्रत्येक अप्सरेला एक असे तीन प्रश्न विचारू शकतोस. किंवा एकीला दोन आणि दुसरीला एक असेही विचारू शकतोस. एकूण प्रश्नसंख्या तीन हवी. आणि एका वेळी एकाच अप्सरेला प्रश्न विचारायचा. तिचे उत्तर ऐकून मग पुढ़चा प्रश्न तिला अथवा दुसरीला विचारायचा का ते तूच ठरवायच आहेस’
प्रधान म्हणाला 'ठीक आहे' आणि अप्सरांकड़े जायला निघाला.
इंद्र त्याला रोखत म्हणाला 'थांब, माझं बोलणं संपलेलं नाही. आम्ही इथे देवलोकात नेहमी सत्य बोलतो. रंभा नेहमी सत्य बोलते. पण मेनका आणि उर्वशीला तपोभंग केल्यामुळे ऋषींनी शाप दिला आहे. त्यामुळे उर्वशी नेहमी असत्य बोलते आणि मेनका कधी सत्य तर कधी असत्य बोलते.'
प्रधान मान डोलावून परत पुढे जायला निघाला पण इंद्राने त्याला परत अडवले.
'अजून एक महत्वाचं. मी मगाशी म्हणालो की तुझ्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असेच आले पाहिजे. या अप्सरांना तुझी भाषा उत्तम कळते पण अप्सरालोकाच्या नियमाप्रमाणे त्या तुला उत्तर अप्सराभाषेत देतील. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला 'आर' किंवा 'पार' असे मिळेल. एका शब्दाचा अर्थ हो असा होतो आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ नाही असा होतो. अप्सरालोकाच्या नियमाप्रमाणे कुठल्या शब्दाचा नक्की काय अर्थ होतो ते मला तुला सांगता येणार नाही'. अप्सराभाषेत हो आणि नाही यांना कोणते शब्द वापरतात ते मी तुला सांगणार नाही. फक्त त्या अर्थाचे दोन अलग शब्द आहेत एवढेच सांगेन.
प्रधानाला राजाचे प्राण वाचवण्यासाठी इंद्राच्या कोड्याचे बरोबर उत्तर देणं भाग होतं. आता प्रधान कोडे कसे सोडवेल?
अभिजात कूट-तर्काधारित कोडं
अभिजात कूट-तर्काधारित कोडं आहे; पाहूया, माबोकर काय म्हणतात...
प्रयत्नांती एका प्रश्नात
.
खूपच मजेदार आणि तितकेच कठीण
खूपच मजेदार आणि तितकेच कठीण कोडे. विचार करत आहे पण अजून तरी उत्तर सापडले नाही. ते राजा आणि गुराख्याचे कोडे पण जाऊन बघितले, तरी काही धागा मिळालेला नाही.
कोडे वाचले. परत लॉजिक गेट्स
कोडे वाचले. परत लॉजिक गेट्स वापरावे लागणार आहेत.
उत्तर बरोबर येवो न येवो मजा येणार आहे सोडवायला.
होय/नाही असेच उत्तर देतात असे समजून आधी सोडवायचा प्रयत्न करतो, मग आर/पार वरून.
माहिती असलेला डेटा पडताळून
माहिती असलेला डेटा पडताळून पहावा लागेल गेल.
रं भा - सत्य
उर्वशी - असत्य
मेनका - दोन्ही
यांना अ, ब, क नावं दिली.
अ ला विचारले जर तुमच्या भाषेत हो म्हणजे आर आणि नाही म्हणजे पार असेल तर रंभा सत्य बोलते हे खरं आहे का?
जर उत्तर आर आले तर हो.
तिला दुसरा प्रश्न विचारायचा कि उर्वशी नेहमी खोटं बोलते हे खरं आहे का? उत्तर जर आर आले तर समजायचं ही रंभा.
पार आले तर मेनका. कारण एकदा खरं एकदा खोटं उत्तर दिले.
मेनका असेल तर पुढे जाऊन तिसरा प्रश्न विचारायचा.
पहिली रंभा असेल तर तिला सरळ विचारायचे कि शेजारच्या अप्सरेचे नाव मेनका / उर्वशी आहे का? आर उत्तर आले कि उरलेली अप्सरा समजेलच.
हेच ती उर्वशी असेल तर तिचं उत्तर खोटंच समजून उलट उत्तर समजून घ्यायचे. तिसऱ्या अप्सरेचे नाव आपोआपच समजते.
पण मेनका असेल तर तिसरा प्रश्न तिला न विचारता शेजारच्या अप्सरेला पहिलाच प्रश्न रिपीट करायचा. चुकीच उत्तर दिलं किती उर्वशी नाही तर रंभा.
हे कोडे फेमस असल्याने, आधीच
हे कोडे फेमस असल्याने, आधीच उत्तर माहीत असल्याने इथे माझा पास
त्या हो/नाही असेच उत्तर देतात
त्या हो/नाही असेच उत्तर देतात असे समजुन कोडे सुटले. यात राजा-गुराखी कोड्यासारखेच लॉजिक आहे. पहिल्या प्रश्नात मेनका एलिमिनेट करणे. मग आपण रंभा किंवा उर्वशी यांना प्रश्न विचारतो आणि पुढील दोन प्रश्नात कोडे सुटते.
पण यालाही तीन प्रश्न लागतातच.
तेव्हा आर/पार यातील हो/नाही कोणते माहीत नसतानाही तीनच प्रश्नात सुटत असेल तर हे फारच क्लासिक कोडे आहे.
पार आले तर मेनका. कारण एकदा
पार आले तर मेनका. कारण एकदा खरं एकदा खोटं उत्तर दिले.>>>
हे लॉजिक बरोबर नाही. मेनका कधी सत्य तर कधी असत्य बोलते. म्हणजे एकदा सत्य बोलल्यावर पुढचं असत्य बोलेल असं नाही. ती सलग दोनदा सत्य किंवा दोनदा असत्यही बोलू शकते.
करेक्ट चीकु अगदी हेच्च
करेक्ट चीकु अगदी हेच्च
बापरे. अवघड आहे मग.
बापरे. अवघड आहे मग.
फाशीच्या गेटच्या पहारेकऱ्याचं कोडं काहीच नाही यापुढे.
कोडं कूट-तर्कावर आहे. थोडं
कोडं कूट-तर्कावर आहे. थोडं गुंतागुंतीचं वाटत असलं तरी एकदा लॉजिक लक्षात आलं की मग पुढे सरकायला अवघड नाही.
प्रयत्न करा लोकहो, मी उद्या उत्तर टाकेन.
नका टाकू उत्तर. गडबडीत
नका टाकू उत्तर. गडबडीत असल्याने ट्राय केलं नाही नंतर.
नका टाकू उत्तर. गडबडीत
नका टाकू उत्तर. गडबडीत असल्याने ट्राय केलं नाही नंतर.>>
काळजी करु नका. आरामात ट्राय करा. मी उत्तर टाकण्याची घाई करणार नाही
बहुतेक मला आलय. घरी गेल्यावर
.
२ च प्रश्नात येतय की.
.
ओह एक कॅच आहे आर= होय किंवा
.
रंभा (खरे) ..................
रंभा (खरे) .......................... (१)
ऊर्वशी( खोटे) .............................. (२)
मेनका (खरे/ खोटे) ................................(३)
आता तीघींना विचारा की रंभा नेहमी खरे बोलते का?
सिनॅरिओ१ -
रंभा -आर म्हणेल
ऊर्वशी - पार म्हणेल
मेनका - आर म्हणेल ............................................. मग तुम्हाला ऊर्वशी (/रंभा) कळली.
----------------------------------
सिनॅरिओ २
रंभा - आर म्ह णेल
ऊर्वशी- पार म्ह णेल
मेनका - पार म्हणेल.
सो यु नो - रंभा(/उर्वशी)
तर एकजण आयसोलेट करायची जी की वेगळं उत्तर देते.
ती एक तर खरं बोलणारी आहे किंवा निखालस खोटं बोलणारी.
आता तिला विचारायचं की " तू रंभा आहेस का?"
पहील्या सिनॅरिओत, रंभा आर म्हणेल ....................... आर, आर असे सेम उत्तर म्हणजे = रंभा
दुसर्या सिनॅरिओत, उर्वशी आर म्हणेल ........... म्हणजे आर.पार अशीवेगवेगळी उत्तरे म्हणजे उर्वशी
एकदा एक कळली की मग तिलाच प्रश्न विचारुन दुसरी ओळखणे सोपे आहे.
मेनका - आर म्हणेल >>>
मेनका - आर म्हणेल >>>
मेनका कधी सत्य तर कधी असत्य बोलते म्हणजे ती आर किंवा पार यातील काहीही म्हणू शकते ना?
एखादी hint टाकू का थोड्या
एखादी hint टाकू का थोड्या वेळाने?
चिकु मेनक् चे २ सिनॅरिओ
चिकु मेनक् चे २ सिनॅरिओ घेतलेत की
हिन्ट कशाला? नीट वाचा हो
हिन्ट कशाला? नीट वाचा हो
ऑफिसात गेले कि परत आकडे
ऑफिसात गेले कि परत आकडे टाकुन लिहीते. प्लीज होल्ड ऑन
रंभा ( फक्त खरे) ऊर्वशी(
रंभा ( फक्त खरे) ऊर्वशी( फक्त खोटे) मेनका (खरे/ खोटे) ............................... हे झाले गृहितक.
आता तीघींना विचारा की रंभा नेहमी खरे बोलते का?
आर म्हणजे येस असे धरा. इट डझन्ट मॅटर.
सिनॅरिओ१ -
रंभा -आर म्हणेल
ऊर्वशी - पार म्हणेल
मेनका - आर म्हणेल ............................................. मधली जी आहे वेगळं बोललेली तिला आयसोलेट करा. ती रंभा तरी आहे नाहीतर ऊर्वशी तरी आहे. पण ती मेनका नाही हे नक्की.
----------------------------------
सिनॅरिओ २
रंभा - आर म्ह णेल
ऊर्वशी- पार म्ह णेल
मेनका - पार म्हणेल. ...... या २ र्या सिनॅरिओत मी मेनकेचे दुसरे उत्तर घेतले आहे.
परत जी वेगळी आहे तिला म्हणजे पहीलीला आयसोलेट करा. ती रंभा तरी आहे नाहीतर ऊर्वशी तरी आहे. पण ती मेनका नाही हे नक्की.
ही जी आय्सोलेट केलेली आहे, ती एक तर खरं बोलणारी आहे किंवा निखालस खोटं बोलणारी.
आता तिला विचारायचं की " तू रंभा आहेस का?"
पहील्या सिनॅरिओत, रंभा आर म्हणेल ....................... आर, आर असे सेम उत्तर म्हणजे = रंभा
दुसर्या सिनॅरिओत, उर्वशी आर म्हणेल ........... म्हणजे आर.पार अशीवेगवेगळी उत्तरे म्हणजे उर्वशी
एकदा एक कळली की मग तिलाच प्रश्न विचारुन दुसरी ओळखणे सोपे आहे.
एकदा रंभा किंवा ऊर्वशी कळली की तिलाच प्रश्न विचारायचा तीसरी मेनका आहे का?
-----------------
यापलिकडे मी एक्स्प्लेन कर शकत नाही. क्षमस्व.
-----------------
द्या हिंट.
सामो, तुम्ही already पाच
सामो, तुम्ही already पाच प्रश्न विचारलेत,(सुरुवातीला प्रत्येकीला एकेक आणि मग दोन) एकूण प्रश्नसंख्या तीनच हवी आहे.
हिंट मिळाली तर बरं होईल.
हिंट मिळाली तर बरं होईल.
थोडं थांबा. इतक्यात हिट पण
थोडं थांबा. इतक्यात हिट पण नको.
चित्र काढून प्रश्न ठरवणं चाललंय.
बहुतेक उत्तर सापडेल असं वाटतं.
आधीच्या प्रयत्नात प्रश्न असा
आधीच्या प्रयत्नात प्रश्न असा बनवला होता " जर तुमच्या भाषेत आर म्हणजे हो आणि पार म्हणजे नाही असेल तर.."
पण यामुळे काही फरक पडत नव्हता. कारण खोटं बोलणारी अप्सरा आर चा अर्थ खोटा लावेल आणि मनमौजी अप्सरा काहीही बोलेल.
म्हणून आता पुन्हा तिघींना अ, ब, क किंवा १, २, ३ नाव देऊ.
आता १ कडे जाऊन विचारले कि" तू रंभा असशील तर हो उत्तरांसाठी आर म्हणशील का? "
हा प्रश्न बनवला आहे. आता चित्र काढून सर्व शक्यता चाचपडत बघतेय. सलग वेळ मिळाला कि उत्तर लिहीन. कदाचित दोन दिवस पण लागतील.
प्लीज हिट नको. मग कोडं सोडवण्यातली मजा कमी होईल.
आधी त्या होय/नाही असेच उत्तर
आधी त्या होय/नाही असेच उत्तर देतात असे समजून:
समजा त्या एका रांगेत उभ्या आहेत.
प्रश्न१ मधलीला: तू रंभा आहेस का आणि तुझ्या डावीकडची मेनका का या दोन्ही प्रश्नांचे उत्तर सारखेच आहे का?
(किंवा: तू रंभा आहेस आणि तुझ्या डावीकडची मेनका आहे , ही दोन्ही विधाने एकाचवेळी बरोबर किंवा एकाचवेळी चूक आहेत का?)
हो उत्तर केव्हा येऊ शकते?
अ) डावीकडची मेनका आणि मधली रंभा असेल तर. (म्हणजे उजवीकडची मेनका नाहीय)
ब) डावीकडची मेनका आहे आणि मधली उर्वशी आहे (म्हणजे उजवीकडची मेनका नाहीय)
क) मधली मेनका आहे (म्हणजे उजवीकडची मेनका नाहीय).
उत्तर हो आले याचा अर्थ उजवीकडची नक्कीच मेनका नाही.
नाही उत्तर केव्हा येऊ शकते?
अ) डावीकडची मेनका नाही, मधली रंभा आहे. (म्हणजे डावीकडची मेनका नाही)
ब) डावीकडची मेनका नाही, मधली उर्वशी आहे. (म्हणजे डावीकडची मेनका नाही)
क) मधली मेनका आहे.(म्हणजे डावीकडची मेनका नाही)
उत्तर नाही आले म्हणजे डावी कडची नक्कीच मेनका नाही.
आता वरील उत्तरावरून जी मेनका नाही, तिला
प्रश्न २: रंभा नेहमी खरं बोलते हे बरोबर आहे का?
हो उत्तर आले तर ती रंभा.
तिला प्रश्न३: दुसरीकडे बोट दाखवून ही उर्वशी आहे का.
हो उत्तर आले तर बोट दाखलेली उर्वशी, उरलेली मेनका, नाही उत्तर आले तर व्हाईस अ व्हर्सा.
प्रश्न२ चे नाही उत्तर आले तर ती उर्वशी आहे.
तिला प्रश्न३: दुसरीकडे बोट दाखवून ही रंभा आहे का?
नाही उत्तर आले तर बोट दाखवलेली रंभा उरलेली मेनका
हो उत्तर आले तर व्हाईस अ व्हर्सा.
चीकू, यावर काय म्हणणं आहे?
पहिला प्रश्न तुम्ही ग्राह्य धरला, तर पुढे होय/नाही ऐवजी आर/पार यावर विचार करेन.
मानव जी तुम्ही पूर्ण सोडवून
मानव जी तुम्ही पूर्ण सोडवून इथे उत्तर डकवा.
मी अर्धवट काही सांगितले तर कोडे सोडवण्यातील मजा निघून जाईल.
ओके, इथे अजुन कुणाला उपयोगी
ओके, इथे अजुन कुणाला उपयोगी पडेल म्हणुन इथेच लिहितो. कारण हे कोडे होय किंवा नाही असे उत्तर देतात असे समजुन सोडवल्या शिवाय आर/पार वरून सुटणार नाही.
प्रश्न१ मधलीला असा केला: "मी तुला विचारलं की डावीकडची मेनका आहे का, तर तू काय उत्तर देशील?"
जर डावीकडची मेनका असेल आणि मधली रंभा असेल तर ती हो असं उत्तर देणार आणि रंभा खरं बोलते, म्हणुन ती म्हणणार होय.
जर डावीकडची खरंच मेनका आहे आणि मधली उर्वशी आहे, तर तिला माहीत आहे की मी म्हणजे उर्वशी नाही असं उत्तर देणार आहे पण उर्वशी खोटं बोलते म्हणुन याचे सुद्धा ती चुकीचे उत्तर देऊन होय असे उत्तर देईल.
पुढले लॉजिक वरील पोस्टप्रमाणेच.
Pages