२ लेख - ज्योतिष

Submitted by धनश्री- on 26 May, 2025 - 09:10

एक लेख शोधता शोधता , माझा पूर्वीचा लेख सापडला -
Astrology is a fodder for creative writing for me.
---------------------
-------------------------------------------- कुंडली पहावी का-----------------------------------
खालील लेख हा एक तर ज्योतिषावरील आहे. मी ज्योतिषशास्त्र असेही म्हणणार नाही कारण हे शास्त्र नाही हे सर्वसंमतच आहे. पण हा लेख प्रचारकी नाही. तो तसा वाटल्यास वाचकाची मर्यादा एवढच मी म्हणेन. तेव्हा जरा कोणाचे असे दावे असतील की या लेखामुळे अंधश्रद्धेला खतपाणी वगैरे मिळते तर त्याचा दोष लेखिकेकडे जात नाही तर अनुभव न घेता, अभ्यास न करता जे लोक डोळे मिटून विश्वास ठेवतील त्यांजकडेच जाईल.
.
त्याचा शुक्र सिंहेचा - तिचा वृश्चिकेचा.म्हणजे त्याचा अग्नी राशीचा तर तिचा जलराशीचा . त्यात दोन्हीमध्ये 90 अंशाचे अंतर म्हणजे सर्वात अवघड आस्पेक्ट. याचा अर्थच हा की दोघांच्या राशींचे दोष आणि मर्यादा या नात्याच्या अगदी पृष्ठभागी तरंगणार्‍या तर उत्तम गुण हे, हातात भलामोठा फ्लडलाईट घेऊन धुंडाळूननाही क्वचित सापडणारे. त्याचा फायरी स्वभाव, मी-मी वृत्ती, चटकन काहीतरी अप्रिय पण परखड, स्पष्ट बोलून जाणारा, एक्स्ट्रोव्हर्ट स्वभाव कुठे आणि कुठे तिचा जलराशीचा त्यातही वृश्चिक जलराशीचा काळ्या डोहासारखा स्वभाव. इंटर्नलाइझ्ड , आता आत खूप बुडी घेणारा, समोरच्यांच्याही मनाचा तळ धुंडाळणारा. याचे जमावे तर कसे जमावे.
दोघेही स्थिर म्हणजे फिक्स्ड राशीचे अर्थात आपापल्या मुद्द्यावरती अविचल, अच्युत राहणारे, आग्रही, हट्टी.
शुक्र हा व्यक्तीचा कल, आवड दाखवितो. त्या व्यक्तीला सहजपणे, कोणत्याही प्रयासाविण, चटकन काय अपील होते ते शुक्राची रास दर्शविते. अन्य अस्पेकट, ग्रह प्रभाव अर्थातच टाकतात. सिंह राशीच्या व्यक्तीस तिचा जोडीदार अतिशय अतिशय आकर्षक, "Neighbor's envy, owner's pride" असा लागतो. याउलट वृश्चिक रास लेझर दृष्टीने आरपार वेध घेणारी तिला सुपरफिशिअ‍ॅलिटी कशी रुचावी. होय owner च.सिंहेची व्यक्ती ही मालकी गाजविणारी, स्वामित्व गाजवणारी, खरं तर खूप करकचून हावी होणारीच असते. कदाचित एखादी गोड, फ्लर्ट , " Iron feast in velvet glove" तुळेच्या स्त्रीने या सिंहाला एकदम Purring कॅट बनवून टाकलाही असतं. पण वृश्चिकेची स्त्री आणि तूळ राशीत जमीन अस्मानाचा फरक तेव्हा ते वृश्चिक स्त्रीस कसे जमावे?
.
सिंह हा राजा असतो आणि त्याला हवे तेव्हा तो फ्लर्ट करणारच. त्या फ्लरटींगमध्ये लैंगिक आकर्षणापेक्षा जास्त भाग हा स्वतः:कडे लक्ष वेधून घेणे असतो पण हे तिने कसे जाणावे. तिचा विंचवांचा स्वभाव हा अति अति पराकोटीचा मत्सरी आणि योग्य वेळ येताच डंख मारणारा. तो अगदी पूर्ण बेसावध असताना डंख मारणारा. त्याच्या ध्यानीमनी नसताना आभाळ डोक्यावर पडावे हा अनुभव कायमचाच.
सर्वच अग्नी राशीमध्ये (मेष, सिंह, धनु), पुरुष राशीमध्ये एक ऑप्टिमिस्टिक (आशावादी) आऊटलुक चमचम करतो. याउलट स्त्री राशी त्यातही जल राशी (कर्क, वृश्चिक, मीन) या निराशावादी, थोड्या गंभीर व नकारात्मक प्रकृतीच्या असतात. विषम आकड्याच्या राशी पुरुष राशी याना ज्योतिषात दिवस काळ दिलेला आहे तर स्त्री म्हणजे सम राशीना रात्रीचा. त्याचा मित्रपरिवार मोठा, थोड्याच मित्रांशी दाट पण लाईटहार्टेड मैत्री याउलट तिला अगदी मोजक्या मैत्रिणी खरं तर एखादीच अगदी जिवलग पण अशी जीव लावणारी की त्या मैत्रिणीला हिची सर्व सिक्रेटस ठाऊक. आणि होय - वृश्चिक राशी कडे सिक्रेटस नाहीत असे शक्यच नाहीत मग ती अगदी सिनफुलच असली पाहिजेत असेही काही नाही, फुटकळ सिक्रेटस का असेनात पण जेलसली गार्डेड सिक्रेटस. आणि ते त्याला कुठेतरी जाणवायचे की तिचा काही पास्ट आहे., काहीतरी सिक्रेटस आहेत पण ती तिच्याकडून काढून घेणे या सिंहाला जमणे शक्यच नव्हते आणि हे जाणून त्याची अजूनच चिडचिड होई. आणि त्याने खोदल्यामुळे(prying ओपन) ती त्याना अधिकच चिकटे. हा तो 90 अंशाचा अवघड अस्पेकट. एकमेकांबद्दलच्या विश्वासार्हतेबद्दल कारणाशिवाय शंका उपस्थित करणारा.
.
जगात अनंत जोडपी "Round peg in square hole" त्यातलेच हेदेखील एक जोडपे. पराकोटीची तडजोड करणारे , लग्न टिकवण्याचा, आटोकाट प्रयत्न करणारे एक सामान्य जोडपे. खरे तर एखादे कोमल व अतिशय गोंडस फुल वाळवंटात उमलून, कोणाच्याही दृष्टीस ना पडता, सुकून जावे तसे आपापले उत्तमोत्तम गुण, passion एका अंतहीन संघर्षात विरून गेलेले.
.
लग्न ही तडजोडच असते, जगी विशेषतः: संसारी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधोनी पाहे. वगैरे ओव्या अशा दु:खी जीवांना दिलासा देण्याकरताच निर्माण झाल्या असाव्यात. बोलायला काय जातं हो "देव मुद्दाम एकमेकांना compensate करायलाच परस्परविरोधी जोडपीच एकत्र आणतो." पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. पुढचा जन्म कोणी पाहिलाय. या जन्मी काय ते उपभोगायचे- आनंद किंवा दु:ख, बक्षीस किंवा शिक्षा. जल आणि अग्नी ही विरुद्ध म्हणजे एकमेकांना मारक तत्वे आहेत. त्यांच्यात तडजोड नाही. याउलट हवा-पाणी म्हणजे वायुराशी (मिथुन-तूळ -कुंभ)आणि जलराशी (कर्क-वृश्चिक-मीना) ही एकमेकांकरता उदासीन तत्वे आहेत. म्हणजे एकमेकांना ना मारक ना पूरक. न्यूट्रल. आणि जल व पृथ्वी (वृषभ-कन्या-मकर) ही मित्रतत्त्वे आहेत. जसे जल हे पृथ्वीस सिंचते जसे, पृथवीमधून सुगंधाचे वाफारे उसासवणे केवळ जळच करू जाणते तसेच चंचल पाण्याला बांध घालून पाण्याचे मूल्य वाढविणे त्याचा सकारात्मक उपयोग हा पृथ्वीचं करू जाणे.
.
कुंडली पाहून विवाह केला नाही म्हणून तो फार यशस्वी झाला असे नसते. तर परस्परातील राशीमेत्री, ग्रहमैत्री उत्तम असल्याने तो टिकाऊ व मुख्य म्हणजे आनंददायक असतो असा लेखिकेचा अनुभव आणि निराक्षणाअंती विश्वास बसलेला आहे. तो तसा सर्वांचा असावाच/नसावाच असेही नाही. आता 12 राशी, 9 ग्रहात जगातील सर्व लोक कसे फिट होतात याचे लेखिकेकडे उत्तर नाही. पण तिच्या मर्यादित निरीक्षणात लोक हे आपापल्या कुंडलीशी faithful असतात असाच अनुभव आहे.

-------------------- कर्केचा राहू----------------------------------
खूप जवळच्या आणि मला अति अति प्रिय अशा २ व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कर्केचा राहू (अर्थात मकरेचा केतू) सापडला. त्यामुळे माझ्या स्वभावानुसार पाठपुरावा करुन, मी या कुंडलीवैशिष्ठ्याचे स्पष्टीकरण शोधून काढले. अत्यंत रोचक असे मला तरी ते वाटले. तेव्हा जी काही माहीती मिळाली ती जालसंदर्भासहीत आपल्यापुढे मांडण्याकरता हा लेखप्रपंच. ज्या लोकांना "ज्योतिष" विषयात गम्य नसेल त्यांनी नाही वाचले तरी चालेल : ).

केतू (South Node / Dragon's tail) हा छायबिंदू कुंडलीमध्ये ज्या घरात किंवा राशीत पडतो त्या राशीचा स्वभाव आणि घराची वैशिष्ठ्ये/कारकत्व हे पूर्वजन्मेतिहास सांगतात.
याउलट राहू (North Node / Dragon's Head) हा छायबिंदू कुंडलीमध्ये ज्या घरात किंवा राशीत पडतो त्या राशीचा स्वभाव आणि घराची वैशिष्ठ्ये/कारकत्व हे या जन्मी ची जातकाच्या आत्म्याची ओढ/दिशा सांगतात.

तसे पाहता प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या घरात/राशीत राहू आणि विरुद्ध घर/राशीत केतू पडलेला असतो. आणि केतूचे गुणधर्म टाकून राहूचे अंगीकारणे कोणाही करता सोपे नसते कारन दोन्ही बिंदू बरोबर १८० अंश विरुद्ध असतात.

मकरेचा केतू हे दर्शवितो की पूर्वजन्मी आपण अत्यंत उच्च्पदस्थ व्यक्ती होतात. बिझनेस टायकून/ राजा/ एखाद्या संस्थेचे संस्थापक काहीही असू शकेल. अत्यंत श्रमपूर्वक आपण एखादी संस्था उभारून नावारुपाला आणलेली असू शकते. पूर्वीचा अनुभवामुळे व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्वगुण हे आपल्यामध्ये या जन्मी उपजतच आहेत. किंबहुना स्वतःच्या आवडीनिवडींना तिलांजली देऊन, एक प्रकारचे "स्टिफ अपर लिप" ठेवणे हे आपल्या अंगवळणीच पडले आहे. इतके की काही जातकांना हे वळत नाही की या जन्मी , लोक आपल्याला ज्याची सवय आहे तो सन्मान का देत नाहीत? पूर्वसुकृतानुसार आपण स्पर्धेच्या जगात चटकन "अ‍ॅडजस्ट" (मराठी शब्द? Sad ) होता. भावना लपवून ठेवता.

पण राहू कर्केचा असल्याने, पूर्वजन्मीच्या यशाचे नेणिवेच्या पातळीवरील अवजड ओझे झुगारून , कर्क राशीचे गुणधर्म विकसित करणे हे आपल्या आत्म्याचे ध्येय आहे. कर्क ही अतिशय कुटंबवत्सल, प्रेमळ, भावनाप्रधान रास असल्याकरणाने, कुटुंबात रमणे, अन्य लोकांच्या भावना जाणून घेऊन तदानुषंगीक मृदू व्यवहार करणे, स्वतःच्या भावना प्रकट करण्यास न कचरणे, बाहेरील यश कितीही खुणावत असले तरी कौटुंबिक जाबाबदार्‍या पार पाडण्यात समाधान मानणे आदि गोष्टी आपल्या आत्मोन्नत्तीस पोषक आहेत. आई-वडीलांनी दिलेला संस्कारांचा वारसा, बालपणीचे अनुभव यांचे मूल्य जाणून भले-बुरे सर्व स्वीकारणे, सकारात्मक संस्कारांचा, अनुभवांचा सन्मान करणे आदि गोष्टी आपणांस पोषक आहेत. आपल्यात वसलेल्या, आंतरीक लहान मूलाचा विकास करणे, अविश्वासाकडून विश्वासाकडे जाणे या आपल्याला अवघड वाटणार्‍या गोष्टी, या जन्मी साध्य करायच्या आहेत. पूर्वजन्मी स्पर्धा आणि भावनाशून्य अशा वातावरणात आपण लढलात पण आता तसे नाही. आता घर, कुटंब आपली वाट पाहताहेत जेथे मायेचा आत्यंतिक ओलावा आहे. तेव्हा आपला फोकस (एकाग्रता) बाह्यजगाकडून स्वतःकडे वळविण्याची ही वेळ आहे.

दुवा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा राहू कर्केचा आहे षष्ठात. कमरेवर मोठी जन्मखूण आहे. हे फळ एका द्वा. ना. राजे यांच्या जातकदीप पुस्तकात लिहिले होते. पण त्यांचे पुस्तक सायन पद्धतीवर आधारित आहे. माझी कुंडली निरयन आहे

कोणाचा सिंह शुक्र आहे का? व्हेरी डिग्निफाईड पीपल. सिंह चंद्र सुद्धा (मघा नक्षत्र. २ मॅनेजर्स होते. कम्प्लीट फेअर. एक तर मला अजुनही रेको देतो. ही इज नॉट जस्ट गुड बट अ ग्रेट लीडर.). सिंह सूर्य मात्र मला गोंधळात टाकतात. कोडे वाटतात.
पैकी मघा हे पूर्वजांचे नक्षत्र आहे. पूर्वज (अ‍ॅन्सेस्टर्स यांची नक्की कृपा असते) अर्यमा देवता. अर्यमा पितरांचा प्रमुख.
>>>>Magha Nakshatra shines in Vedic astrology with themes of authority and ancestral blessings.
सिंहासनाशी सुद्धा, काहीतरी संबंध आहे. आता आठवत नाही मला.

… सिंह चंद्र सुद्धा…

मी आहे. सिंह राशी सिंह लग्न, म्हणजे चंद्र सिंहेत असावा ना?

नक्षत्र मात्र कडक. मूळ ; supposedly the epic destroyer !

I do get scarce compliments on generosity and fairness but humility neither was nor is my virtue 😁

>>>>सिंह राशी सिंह लग्न, म्हणजे चंद्र सिंहेत असावा ना?
होय अनिंद्य. तुम्ही डबल सिंह आहात.
मूळ हे कालीचे नक्षत्र आहे. (असे सॅम जेप्पी म्हणतो) होय मूळापासून उखडणारे.
>>>> humility neither was nor is my virtue
हाहाहा

मूळ नक्षत्र म्हणजे धनु रास ना अनिंद्य?

सामो छान इंटेरेस्टिंग लिहिता पण सिंहेचा राहू म्हणजे नेमके काय हे कळालं नाही

झकासराव सिंहेचा राहू म्हणजे राहू हा छायाबिंदू सिंह या राशीत. हा धागा ज्योतिष विषयक बाराखडी माहीत असलेल्यांकरता आहे. Happy

झकासराव,

मला यातलं का ही ही समजत नाही.

इथली ज्योतिष विषयक बाराखडी सुद्धा माहित नाही. कुतुहल मात्र आहे थोडे.

^^मूळ नक्षत्र म्हणजे धनु रास^^
तज्ञ सांगतीलच, पण माझ्या माहितीप्रमाणे मूळ नक्षत्र सिंह राशीत येत नाही, धनु राशीत येते.

मग माझे काहीतरी चुकले असेल.

कुंडली बघून सिंह राशी सिंह लग्न हे अनेकदा आणि एकाधिक जोतिषांनी सांगितले असल्याने ते बरोबर असावे.

म्हणूनच म्हणतो बाराखडी सुद्धा माहित नाही Happy

मी 'बिहेव्हिओरल सायकॉलॉजी' घ्यायला हवे होते. मानवी स्वभावाचे नीरीक्षण आवडते. आणि लोकांची बलस्थाने, मर्यादा, धूर्तता, पॉलिटिक्स, सुप्त आशा, एखाद्या लहान कम्युनिटीमधील उतरंडीवरचे स्थान, प्रयत्न कळतात असे वाटते. मी चूकीची असू शकेन Happy