Submitted by अनन्त्_यात्री on 24 May, 2025 - 04:17
दिवास्वप्न पाहत असताना
अधांतराची भक्कम भूमी
सोडुनी थोडा भटकत गेलो
चुकलो का मी?
वायफळाचा मळा उन्हाळी
मृगजळ शिंपून वाढविला मी
पीक पाखरे खाऊन गेली
चुकलो का मी?
वृत्त, छंद, गण बेड्या तोडून
भ्रमरासम स्वच्छंदपणे मी
फिरता, घरची वाट विसरलो
चुकलो का मी?
विस्मरणाची गडद सावली
झाकोळत जरी होती तरी मी
स्मरणरंजनी वाहत गेलो
चुकलो का मी?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
क्या बात है!!
क्या बात है!!
>>>थोडा भटकत गेलो
नही! उतना तो चलता है|
>>>>भ्रमरासम स्वच्छंदपणे मी
फिरता, घरची वाट विसरलो
चुकलो का मी?
अजिबातच नाही.
>>>>>विस्मरणाची गडद सावली
खूप डार्क वाटले मला. डिमेन्शिया आठवला.
झाकोळत जरी होती तरी मी
स्मरणरंजनी वाहत गेलो
सुंदर... चुकलो नाही मी...
सुंदर...
चुकलो नाही मी...
सामो, द. सा. प्रतिसादा बद्दल
सामो, द. सा. प्रतिसादा बद्दल धन्यवाद
सुरेख!
सुरेख!
एकदा कविता वाचताना 'चुकलो का मी?' हे गोंधळलेल्या, प्रश्नार्थक स्वरांत वाचलं(ऐकलं)
दुसऱ्यांदा 'चुकलो का मी?' हे हताश, वैफल्यग्रस्त सुरांत म्हटलं. शब्दांच्या अर्थात, कवितेच्या भावच्छटांत लक्षणीय फरक पडला!
आणि मग लक्षात आलं, स्टेजेस ऑफ ग्रिव्हिंग च्या सगळ्या सुरांत तो प्रश्न मी वाचू शकतोय, आणि कवितेची खोली अधिकच गहिरी झाली!
अशी मोरपंखी कविता क्वचितच वाचनात येते!
व्वा, मस्त लिहिलेत
व्वा, मस्त लिहिलेत
छान कविता..!
छान कविता..!
छान कविता.
छान कविता.
शीर्षक वाचून क्षणभर इलाही जमादार यांची 'चुकले का हो' गझल आठवून गेली.
abuva, बेफ़िकीर, रूपाली, rmd
abuva, बेफ़िकीर, रूपाली, rmd आपल्या प्रतिसादाबद्दल आभार