तुम्हाला मराठीत लिहायला आवडते आणि तुम्ही अधून मधून ललित लेख, कथा, प्रवासवर्णन किंवा अनुभवकथन लिहिलेले आहे, असे असेल आणि तुम्हाला तुमच्या लेखनात अधिक सातत्य आणायचे असेल तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.
.
तुम्ही जर फार कधी लिहिले नसेल पण आपण लिहायला हवे असे तुमची इच्छा असेल आणि तुमच्या जवळ सांगायला खूप आहे पण कधी लिहायचे मनात आले नाही म्हणून किंवा संधी मिळाली नाही म्हणून ते राहून जात असेल तर तुम्ही हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.
.
तुम्ही आधी बरेच लिहिले आहे. पण मध्यंतरीच्या काळात आयुष्यातले वेगवेगळे टप्पे पार करतांना लिहिणे मागे राहून गेले आणि तुम्हाला एका संकेताची गरज आहे, असे काही तरी हवे आहे की तुमचे लिखाण पुन्हा सुरू व्हायला मदत मिळेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
.
माझा व्यवसाय संगणकाशी संबंधित सेवा देणाऱ्या संस्थेशी संबंधित असला तरी मला मराठी लिहायला आणि वाचायला आवडते. लिखाणाच्या आवडीमुळे नागपुरातल्या काही समविचारी लेखकांना घेऊन मी व्हॉटसॅप वर एक लेखक गट सुरू केला त्याला *सुरपाखरांचा थवा* असे नाव दिले होते. सुरवंटाची जिद्द मनात असून प्रयत्नाचा आणि वेळेचा समतोल उपयोग करून फुलपाखरू होण्याचा संकल्प करणारे लेखक आहोत असा विचार मनात घेऊन सुरपाखरांचा थवा असे नाव घेतले होते.
.
या गटामध्ये या वर्षी म्हणजेच २०२५ च्या जानेवारी महिन्यात आम्ही एक प्रयोग केला. ठरवून प्रत्येकाने किमान २५० शब्दांचा एक लेख ३० दिवस रोज लिहायचा आणि आपल्या नावासकट आपल्या समाजमाध्यमांवर ठराविक वेळेत प्रकाशित करायचा. प्रामुख्याने फेसबुक वर सगळे उपस्थित असल्याने फेसबुक वर तो पोस्ट करायचा असा तो संकल्प होता. ते सगळे लेख तुम्हाला #सुरपाखरू #प्रयोग२०२५ या हॅशटॅग ने शोधले तर फेसबुकवर वाचता येतील.
.
ते सगळे लेख #सुरपाखरू या हॅशटॅग ने फेसबुक वर उपलब्ध असणे हे आमचा प्रयोग सफल होण्याचे घसघशीत प्रमाण आहे. या प्रयोगात जे लेखक शामिल होते ते सगळे सुरवातीला साशंक होते की हे आपल्याला जमेल का? त्यांना बऱ्याच शंका होत्या की असे ठरवून लिहिले तर त्याला काय दर्जा असेल आणि ते वाचण्यालायक देखील असेल का? या सगळ्या शंका आणि प्रश्नांवर आमच्या गटात चर्चा चालत असे. त्या चर्चेच्या माध्यमातून आणि विचारांच्या आदानप्रदानातूनही अनेक कल्पना निघत. एकमेकांना प्रोत्साहन देत एक सहकार्याची उर्जा आमच्या गटाने अनुभवली आणि आपल्या उपक्रमात आपल्या सोबतीला अजूनही लेखक आहेत ही जाणीव देखील सातत्य टिकवण्यासाठी बळ देणारी ठरली.
.
लेखनाचे प्रकार, लेखनाच्या पद्धती, काय वाचले पाहिजे, लेख लिहितांना आलेले अनुभव आणि शिकायला मिळालेले धडे असे सगळे या गटात लेखकांच्या संवादातून आदान प्रदान होत होते आणि विचार बैठकीला दिशा मिळत होती आणि या लेखक गटातल्या लेखकांचा एक घनिष्ठ गट साकार होत होता.
.
जानेवारी महिना तिस दिवसात तिस लेख हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या गटाने आता पुढचे बावन आठवडे प्रत्येकी एक लेख लिहिण्याचा संकल्प सोडला आहे आणि तो संकल्प ते सगळे लेखक चिकाटीने चालवतात आहेत. हे पुढचे लेख आता फेसबुक आणि मायबोली संकेत स्थळावर देखील वाचायला उपलब्ध आहेत. तुम्ही #सुरपाखरू या हॅशटॅग ने मायबोली आणि फेसबुक वर हे लेख शोधून वाचू शकता.
.
याच प्रयोगाची सफलता नव्या लेखकांसोबत वाटून घेण्यासाठी, एक व्हॉटसॅप गट सुरू करतोय, त्याला सुरपाखरांचा थवा जून २०२५ असे नाव दिलेय आणि त्याला जाईन करायची लिंक या लेखाच्या खाली दिलेली आहे. तुम्हाला जर अश्या प्रकल्पात शामिल व्हायचे असेल किंवा तो प्रकल्प कसा पुढे जाईल याबद्दल कुतुहल असेल आणि प्रश्न विचारायचे असतील तर त्या गटात तुमचे सहर्ष स्वागत आहे.
.
या गटात तुम्हाला मी म्हणजेच तुषार जोशी आणि आमच्या गटाचे एक सक्रीय लेखक मनोज मोहिते यांच्याशी चर्चा करता येईल. प्रश्न विचारता येतील आणि तुम्हाला प्रयोगात शामिल व्हायचे असेल तर त्याची पूर्वतयारी म्हणून काय करायचे आहे त्याची माहिती घेता येईल.
.
तुम्ही सध्या सातत्याने लिहित असाल तरीही तुम्हाला या गटात येण्याचे सस्नेह निमंत्रण आहे, ज्याने तुम्हाला एका लेखक गटात चर्चा आणि विचारांच्या आदानप्रदानात सहभागी होता येईल. याच निमित्ताने नव्या लेखकांशी ओळख करण्याची संधी मिळेल, लेखकांना नवे वाचक मिळतील.
.
हा लेख तुम्ही तुमच्या मित्रमंडळात शेयर करू शकता, तुमच्या ओळखीचे कुणी लिहिण्यास उत्सुक असेल आणि त्यांना या प्रयोगात रस असेल असे तुम्हाला वाटले तर त्यांना या पोस्ट मधे टॅग करू शकता आणि हा लेख शेयर करू शकता. सुरपाखरू जून २०२५ च्या प्रयोगात अनेक मराठी लेखकांना शामिल व्हायची संधी मिळावी आणि आमचा सुरपाखरू जानेवारी २०२५ चा प्रयोग जसा यशस्वी झाला तसे आणि त्याहूनही अधिक समाधानकारक यश अनेकांना मिळावे म्हणून हा लेख प्रपंच करतोय.
.
व्हॉटसॅप गटात शामिल व्हायची लिंक: https://chat.whatsapp.com/Cyo7yTXeOVYJDm9WPuvJeM
.
#सुरपाखरू #प्रयोग२०२५ #लेखकगट #जून२०२५
.
(सुरपाखरांचा थवा संयोजक)
तुषार जोशी
नागपूर, शनिवार १७ मे २०२५
सुरपाखरांचा थवा जून २०२५
Submitted by तुष्कीनागपुरी on 17 May, 2025 - 07:23
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा