Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता थांबायचं नाय
आता थांबायचं नाय
मस्त सणसणीत चित्रपट आहे. फार आवडला.
जरूर बघा. मुलांना सुद्धा दाखवा.
वेळ मिळेल तसे सविस्तर लिहितो. चुकवू नका...
जय बीएमसी, जय महाराष्ट्र !
इथे स्वतंत्र धाग्यात परीक्षण
इथे स्वतंत्र धाग्यात परीक्षण लिहिले आहे.
https://www.maayboli.com/node/86714
"पाणी" - प्राइमवर. अमेरिकेत
"पाणी" - प्राइमवर. अमेरिकेत रेण्टवर/विकत उपलब्ध आहे.
आधी इथे इतरांनी लिहीलेले वाचले होते. अस्मिताने नांदेड-ऑथेण्टिसिटी सर्टिफिकेटही दिले होते. त्यामुळे खूप उत्सुकता होती. पिक्चर सत्यघटनेवर आधारित असल्याने काय होणार याचा अंदाज होताच. दोन्ही प्रमुख लीड्सची कामे मस्त आहेत. मला इव्हन सुबोध भावेचेही आवडले. मात्र तो गावाचा पाणीप्रश्न कसा सोडवला याचे डिटेलिंग अजून हवे होते. मला ते नीट समजले नाही. आधी वाटले डोंगर उतारावर खाचरे/वाफे तयार करून त्यात पावसाचे पाणी साठवणार्/जिरवणार. मग खाली असलेल्या विहिरीला झरे लागणार. पण नक्की माहीत नाही.
तरीही माझा रेको.
"जिलबी" - तो ही प्राइमवर रेण्टवर/विकत
यावरही वरती कोणीतरी लिहीले आहे असे आठवते. पण मुद्दाम ते पुन्हा वाचत नाही आधी. पिक्चर "बघणेबल" वाटला मला. स्वप्नील जोशी, पर्ण पेठे, प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वे - सर्वांची कामे चांगली आहेत. शिवानीचे मराठी बाळबोध का आहे त्याचे उत्तर नंतर मिळते. मला ट्रेलर मधे पर्ण पेठे ममव मुस्लिम रोल करत आहे असे वाटले पण पिक्चर मधे मला वाटले त्यापेक्षा तिचे काम चांगले आहे. वाळवी मधली शिवानी सुर्वे "बदाम गॉगल" लेव्हल अफलातून होती. इथेही तिचे काम चांगले आहे. स्वप्नील जोशी पोलिस म्हणून बिलिव्हेबल वाटला. त्याला चेकमेट मधे चांगले काम करताना पाहिले आहे. तसाच इथेही वाटला. गणेश यादवचेही काम चांगले आहे. स्वप्नील जोशीबरोबरचे पोलिस दाखवलेत ते ही मस्त आहेत. पण तो पोलिस इन्स्पेक्टर वाटतो, एसीपी नाही.
प्रत्येकाच्या एण्ट्रीला आधी शूज दाखवून मग कॅमेरा वर उचलणे, सीनमधे येणार्या गाड्या सर्रकन येउन थांबणे वगैरे प्रकार आता जुने झाले. मराठी लोकांनी काहीतरी नवीन स्टायलिंग शोधले पाहिजे.
पिक्चर मधला थरार, गुतागुंत बळंच आहे. कंपनीच्या चेअरमन पदाकरता खून, सह्या करण्याकरता ब्लॅकमेल करणे वगैरे कायच्या काय आहे. यात लोक "व्हेटो/व्हीटो पॉवर" वापरून लोकांची "नेमणूक" कशी करतात ते यांनाच माहीत. व्हीटो पॉवर ही इतरांनी ठरवलेले निर्णय अडवायला/नाकारायला वापरली जाते. कोणाला निवडून द्यायला नाही. आणि कोणाला कंपनीचे चेअरमन केले म्हणजे १५०० कोटीचे डबोले मिळाले अशा थाटात सगळे चालले होते. तो सगळा भाग मराठी सिरीयलच्या लेव्हलचा अतर्क्य आहे. १५०० कोटींकरता ४-५ खून म्हणजे फार झाले. मराठी सिरीयल्स मधे हजारो कोटीच्या कंपन्यांचे निर्णय घरून लाडू आणून होतात.
पिक्चर बघणेबल आहे. बोअर होणार नाही.
प्रत्येकाच्या एण्ट्रीला आधी
प्रत्येकाच्या एण्ट्रीला आधी शूज दाखवून मग कॅमेरा वर उचलणे, सीनमधे येणार्या गाड्या सर्रकन येउन थांबणे वगैरे प्रकार आता जुने झाले >>> पण ते इम्पॅक्टफुल असतात खरे. उगाच साऊथकडे वापरत असतील का?
रेको बद्दल थँक्स रे!
जिलबी बद्दल फार छान वाचले
जिलबी बद्दल फार छान वाचले नव्हते वाटते.. पण अतर्क्य लॉजिक बाजूला ठेवून पाहिला तर बघणेबल असू शकतो. स्वप्नील जोशी अश्या भूमिकेत चांगले काम करतो.. चेकमेट सारखेच वाळवी सुद्धा एक उदाहरण आहे.
गुलकंद बद्दल या धाग्यावर
गुलकंद बद्दल इथे स्वतंत्र धाग्यात लिहिले आहे.
https://www.maayboli.com/node/86728
फा, पाणीप्रश्न कसा सोडवला हे
फा, पाणीप्रश्न कसा सोडवला हे नीट (technically) दाखवले नाही म्हणून मी जेव्हा लिहिले होते तेव्हा हे शोधून वाचले होते. फार नेमकं नाही पण थोडीफार कल्पना येईल. ही त्याच हनुमंत केंद्रे यांच्या बातमीची लिंक आहे. जरा डीपर नरेटिव्ह जे फिल्मी होऊन बसले होते. त्यांनी नेमकं कुठलं स्ट्रक्चर बांधलं ज्याने पाण्याचे संवर्धन झाले हेच बहुतेक तुला जाणून घ्यायचं असेल तर ते ह्यात आहे. - The project involved building structures such as check dams, percolation tanks, and contour bunds to conserve water.
जिलबी पाहिला. वेगवान आहे.
जिलबी पाहिला. वेगवान आहे. तांत्रिकदृष्ट्या चांगला आहे चित्रपट. कोठेही कॉम्प्रमाइज केले नाही. सर्वांचा अभिनय एक नंबर आहे. बरीच Action आहे. गोळीबार, पाठलाग वगैरे. कथेतली गुंतागुंत समजायला थोडी कठीण गेली. एकही गाणे नाही. Action-Thriller आहे.
Sshort and Ssweet (हेच्च
Sshort and Ssweet (हेच्च स्पेलिंग आहे!) नावाचा एक सिनेमा iptv वर पाहीला. ट्रेलर इथे. सिनियर सोकु आहे आणि छान काम केलंय. मला आवडला सिनेमा. हटके कथानक आहे. एकदा बघावा असा आहे.
एकदा येऊन तर बघा हा चित्रपट
एकदा येऊन तर बघा हा चित्रपट प्राईमवर पाहिला. प्रचंड आवडला. अनेक कलाकारांची फौज आहे. त्यातले बरेचसे कलाकार हास्य जत्रे मधले आहेत. सर्वांचा अभिनय उत्तम आहे. वेगवान कथानक, उत्तम पटकथा, दर्जेदार अभिनय, खुसखुशीत विनोद. तांत्रिकदृष्ट्या सुद्धा चित्रपट खूप चांगला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संकलन छान आहे. गाणी एक की दोन आहेत, मात्र काही खास नाहीत. चित्रपटाची कथा हटके आहे.
ह्या चित्रपटाची फार चर्चा झाली नाही याचे आश्चर्य वाटते. थिएटरला तो चालला की आपटला याचे कुतूहल आहे.
माबो वाचक.. सुचवल्या बद्दल
माबो वाचक.. सुचवल्या बद्दल धन्यवाद. बघेन हा मग.. मला बरेचदा दिसायचा मी पुढे जायचो. विचार करायचो फसलेला असावा का वगैरे.. बहुधा अश्या एका रेकोची गरज लागते. मग पुढे आवडेल न आवडेल ते माझे नशीब.
एप्रिल मे 99 रिव्ह्यू चांगले
एप्रिल मे 99 रिव्ह्यू चांगले येत आहेत.
मी मंगळवारी सकुसप जातोय. म्हणजे तिकीट किंमत सुद्धा 99 असेल.
वेड आज पाहिला. एव्हढा का
वेड आज पाहिला. एव्हढा का चालला ??
(चालला याचा आनंद आहे)
जेनेलियाचं कॅरेक्टर आशा काळे, अलका कुबल युग सुरू करू शकतं.
पिक्चरचं नाव वेड ऐवजी आशिकीच्या चालीवर सोशिकी शोभलं असतं.
राभु अर्धवट पाहिला आहे पण
राभु
अर्धवट पाहिला आहे पण गाणी बरी वाटली होती.
गाणी छान आहेत. पण संथ
गाणी छान आहेत. पण संथ पिक्चरला अजून सनथ करतात. (संथ फास्ट आहे शब्द)
सोशिकी >>>
सोशिकी >>>
आशिकीच्या चालीवर सोशिकी शोभलं
आशिकीच्या चालीवर सोशिकी शोभलं असतं.
>>>
(No subject)
फा, पाणीप्रश्न कसा सोडवला हे
फा, पाणीप्रश्न कसा सोडवला हे नीट (technically) दाखवले नाही म्हणून मी जेव्हा लिहिले होते तेव्हा हे शोधून वाचले होते. फार नेमकं नाही पण थोडीफार कल्पना येईल. ही त्याच हनुमंत केंद्रे यांच्या बातमीची लिंक आहे >>> थँक्स. मिळाली माहिती थोडीफार. यातले फोटो पाहिले की लक्षात येते की पिक्चरमधल्या फ्रेम्सही तशाच आहेत. पिक्चर या लोकांना दाखवताना त्यांची प्रतिक्रिया कशी होती ते लिहीले आहे त्यावरूनही पिक्चर जमला आहे हे कळते. आणि ते "चेक डॅम" वगैरे वाचून अजून माहिती मिळाली.
सोशिकी :ड
सोशिकी :ड
सोशिकी << : हाहा:
सोशिकी <<
सोशिकी >>>
सोशिकी >>>
सोशिकी >>>
सोशिकी >>>
बिनधास्त नावाचा १९९९ साली
बिनधास्त नावाचा १९९९ साली आलेला मराठी चित्रपट री-रीलीज केलाय असं एक रील परवा सहज दिसलं.
झी-५ वर हा चित्रपट आहे. मला तेव्हा शाळेत असताना तो चित्रपट फार फार आवडला होता. म्हणुन शनिवार रविवारी झी५ वरती परत एकदा बघितला.सुरुवातीचा १५-२० मिनिटे बघुन कंटाळा आला आणि मग पळवत पाहिला..
त्यावेळी हा चित्रपट बघायला आम्हा मैत्रिणींसोबत माझी आई सोबत म्हणुन आली होती. चित्रपट बघुन घरी आल्यावर मस्त आहे ना पिच्चर असं मी म्हणताच.. एकदम उचकली होती.. "काय वाया गेलेल्या मुली आहेत.. मैत्रिणीचा वाढदिवस म्हणुन रात्री १२ ला धिंगाणा, लोकांकडुन पैसे गोळा करुन ट्रिपा, आपल्याच शिक्षकांना , हॉस्टेल च्या रेक्टर ला उद्धटपणे उर्मट उत्तरे देणं..यात असला आलाय बिन्धास्त पणा.. असले फालतु पिच्चर बघत जाउ नका" असं तिचं म्हणणं होतं..त्यावेळी.. काय ही आई.. इतका भारी चित्रपट आहे..हिचं काहीतरीच.. असं आम्हाला वाटलं होतं..
काल २५-२६ वर्षांनी ( आणि आता एका १५ वर्षांच्या मुलीची आई या भुमिकेत आल्यावर) जेव्हा परत हा चित्रपट बघितला तेव्हा माझ्या आईने त्या वेळी काढलेले उद्गार तंतोतंत पटले..
खरंच या चित्रपटाच वैजु चं पात्र बिनधास्त दाखवण्याच्या नादात वाह्यात, वाया गेलेलं वाटलं.. त्यात कहर म्हणजे तिची आई प्रिन्सिपल मॅडम ना भेटते आणि स्वत: च्या मुलीच्या चुकांसाठी त्यांनाच सुनावते हा सीन तर अजुनच अतर्क्य वाटला...बाकी खून , त्याचा शोध वगैरे चित्रपट म्हणुन ठीक पण त्या वेळी ममव कॉलेज लाईफ यापद्धतिने दाखवणे म्हणजे गादारोळ कसा काय झाला नाही असं आता वाटतं...
"तु आई झालीस म्हणजे कळेल".. अशी वाक्य लहान असताना काहीवेळा कानावर यायची त्याची प्रचिती आली
बिनधास्त आता फारसा आठवत नाही.
बिनधास्त आता फारसा आठवत नाही. तुम्ही उल्लेख केले तसे ते ते प्रसंग आठवले. पण एक आठवतेय की यात सर्व बायकापोरीच होत्या. तशीच त्याची जाहिरात केली होती. आणि कदाचित त्याच आकर्षणातून पाहिला असावा. कारण बिनधास्त म्हटले की आजही शर्वरी जेमेनीसच आठवते
बाई दवे,
छिचोरे बघितलेल्या आताच्या पिढीला बिनधास्तचे कौतुक नसावे. थोडा वाह्यातपणा मुलांसोबत बघू शकतो मी. पुन्हा एकदा बघावा असे वाटू लागलेय आता. पण झी 5 नाहीये बहुधा सध्या.
बिनधास्त चंद्रकांत कुलकर्णी
बिनधास्त चंद्रकांत कुलकर्णी चा पहिला मराठी चित्रपट चाटे कोचिंग क्लासेस चे चाटे ह्याचे निर्माते होते चित्रपटाचे. सर्व सुटिंग संभाजीनगर व आजूबाजूला झालं होतं त्यावेळी चांगलाच गाजला होता ....
हो चाटे कोचिंग क्लासेसचा होता
हो चाटे कोचिंग क्लासेसचा होता.. त्या क्लासेसने त्या काळी उच्छाद मांडला होता. जिथे तिथे त्यांच्या जाहिराती बघून वीट यायचा. आताही आहे का तो क्लास चालू?
नाही आता तुरळक एक दोन ठिकाणी
नाही आता तुरळक एक दोन ठिकाणी आहेत फक्त
जिलबी बघितला , नाव जिलबी का
जिलबी बघितला , नाव जिलबी का ठेवलं कळलं नाही , त्याऐवजी सिगारेट ठेवलं असतं तर जास्त बरं झालं असतं
बिनधास्त चे शुटिंग आमच्या
बिनधास्त चे शुटिंग आमच्या कॉलेजात आणि हॉस्टेल मध्ये झालं होते म्हणून त्यावेळी मुद्दाम बघितला होता.
त्यावेळी तो चित्रपट खूप फ्रेश वाटला होता.
आताही आहे का तो क्लास चालू?>>> आता बहुतेक कॉलेज सुरू केलं आहे त्यांनी.
Pages