Submitted by रानभुली on 12 May, 2025 - 10:27

आउटडोअर सायकलिंग हे निव्वळ व्यायामापेक्षा वेगळेच प्रकरण आहे. म्हणून हा धागा.
कॉलनीतल्या कॉलनीत सायकलिंग , परीसरातले सायकलिंग, शहराच्या आजूबाजूच्या सायकलिंगच्या ट्रीप्स आणि लांब अंतराच्या सायकलच्या ट्रीप्स असे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या सायकलची वेगवेगळी जॉमेट्री, त्यातून घडणारा व्यायाम, आनंद, वेग याची गोडी लागलेल्या सर्वांना इथे चर्चा करण्याचे नम्र आवाहन.
सायकल सोबत वेगवेगळे सेन्सर्स, सायक्लोमीटर्स (काँप्युटर्स) वापरत असाल तर त्याची आणि सायकलिंगशी संबंधित अॅप्सची चर्चा करण्यासाठी धागा.
गुगल मॅप्स मधे आपल्याकडे तरी सायकलिंग हा ऑप्शन दिसत नसल्याने स्ट्राव्हा आणि इतर अॅप्स वर अवलंबून रहावे लागते. जीपीएस आणि नेव्हीगेशन वाले सायक्लोमीटर्स असतात त्यातही मॅप्स असतात. ते अचूक असतात.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली वाचून सायकल सुरू केली
मायबोली वाचून सायकल सुरू केली. पण ती फक्त कॉलनीतल्या कॉलनीतच.
सायकल घेऊन बाहेर जावं हा विचार काही नव्हता. आमच्या पुल देशपांडे बागेपासून सारसबाग, कोथरूड असं सकाळी सकाळी सायकल चालवून झालं. पण मोठी राईड करायची इच्छा नव्हती. पहाटे लवकर गेल्यावर एक ग्रुप तिथे भेटायचा. ओळख झाली. त्यांच्या आग्रहाला बळी पडून सिंहगडपर्यंत जायची मनाची तयारी केली.
पण सुरूवातीला डीआयएटी पर्यंत गेलं कि त्राणच जायचं. मग तिथंच बसायचे. या ग्रुप सोबत पाठीमागून रायडर्स असतात. इमर्जनसी हेल्प म्हणून. त्यांच्या मागे बसून सिंहगड गाठलं जो फाऊल होता. पण ग्रुपमधल्या सर्वांनी सहकार्य केलं. हे फिजिकल पेक्षा जास्त सायकॉलॉजिकल आहे. ते डोक्यातून काढून टाक, आपोआप जमेल असे सतत बूस्ट केल्याने गेल्या दोन ट्रिपा कशाबशा सिंहगड पर्यंत केल्या.
मग एकाने माझी सायकल चालवून पाहिली. तो म्हणाला आधी ही सायकल बदल. १५ किमी चालवायची तर ४० किमीचे एफर्ट्स लागतात. हायब्रीड म्हणून घेतली होती. पण स्वस्त पार्ट्स घातले कि काय होतं हे समजलं. डेकॅथलॉनची हायब्रीड सायकल पाहिली. खूप स्मूथ वाटली. घरात एक हाय एण्ड एमटीबी होती पण ती कधी लांबच्या राईडला वापरावी हे डोक्यात आलं नाही. पण सिंहगडला जाताना अनेक जण एम टी बी वर मागून पुढे जाताना दिसायचे. ते चांगले स्पीड मधे असायचे.
मग ग्रुप मधल्या एकाला घरी बोलावलं. त्याने एम टी बी चेक करून सर्विसिंग करून हीच वापर असा निर्वाळा दिला.
आज पानशेतची ट्रीप होती. आणि खरंच योग्य सायकल वापरली कि काय होतं हे समजलं. आज चढ चढताना अजिबात त्रास झाला नाही. उलट गिअर बदलले कि छान पळते. फक्त सातच गिअर असून खूप वेग आहे सायकलला. सुंदर ट्रीप झाली.
पुल देशपांडे गार्डनजवळ साडेचारला जमायचं होतं. तिथून दुसरा स्टॉप अभिरूची च्या अलिकडचा फ्लायओवर. तिथे काही जण येऊन थांबले होते. तिथून निघता निघता साडेपाच झाले. मधे मायबोलीवर लॉगिन करून झालं. दोन तीन कमेण्ट्स पण केल्या. हा पण फाऊल आहे म्हणून सांगितलं गेलं.
आजच्या ट्रीप मुळे आत्मविश्वास वाढला. गेले काही आठवडे लोणावळा, अष्टविनायक अशा ट्रीप्सना नकारच दिला होता. आता विश्वास वाटतोय.
या ग्रुपचे काही जण इतर ग्रुप्ससोबत तिरूपती, पंढरपूर अशा ट्रिपा करून येतात. पंढरपूर एका दिवसात केलंय. मला आज पाच तास लागले. एकून अंतर ( अभिरूची पासूनचे) २८ + २८ झाले. हा झिरो पॉइण्ट असल्याने सायक्लोमीटर किंवा अॅप्स इथूनच चालू करायचे अशी ताकीद होती.
अॅप्स आणि सायक्लोमीटरची माहिती पुढच्या प्रतिसादात.
मस्त धागा! रानभुली शुभेच्छा!
मस्त धागा! रानभुली शुभेच्छा!
धन्यवाद छन्दिफन्दि
धन्यवाद छन्दिफन्दि
तुम्ही म्हटलंय तस सायकल
तुम्ही म्हटलंय तस सायकल चांगली नसेल/ जड असेल तर चालवताना खूप कष्ट पडतात याचा अनुभव मी घेतलाय. तेव्हा मलाही कळलं नव्हतं.. की बाकी लोक सहज चालवतायत आणि आपल्याला इतक कठीण जातंय यात सायकलला जबाबदार धरणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार नाहीये..
शाळे नंतर बऱ्याच वर्षांनी जेव्हा सायकल हातात घेतली होती तेव्हा भारी वाटलेले. काहीतरी परत गावसल्यासारखं..
पण माझी मजल जवळपासच्या भागात जाण्याइतकीच..
त्यामुळे तुमचा प्रयत्न आणि इच्छा दोन्हीचे कौतुक वाटले
मुळात शाळेत असताना BSA SLR आणि Atlas ह्या दोन सायकली माहीत होत्या. सायकलीतले इतके विविध प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये अलीकडच्या काही वर्षात कळत गेले.
ह्या धाग्यातून अजून माहिती मिळेल.
तुम्ही म्हटलंय तस सायकल
.
सायकल चांगली नसेल/ जड असेल तर
सायकल चांगली नसेल/ जड असेल तर चालवताना खूप कष्ट पडतात याचा अनुभव मी घेतलाय >> अगदीच. मी आवडीने आणलेली हायब्रीड स्टीलची होती आणि घरात असलेली मोठ्या टायर्सची अॅल्युमिनियमची आहे हे मला माहीत सुद्धा नव्हतं. इथे पुण्यात राजस्थान्यांची सायकलची दुकानं आहेत त्यांच्याकडून अजिबात सायकल घेऊ नये. कारण हे सगळे हिरोच्या सायकल्स ठेवतात. त्यातही हिरो सायकल्स नावाची कंपनी असेल तर चालण्यासारखे आहे. पण आणखी एक हिरो कंपनी आहे. हिरो नावाचा फायदा उचलून चीप पार्टस असलेल्या सायकली विकतात.
हा सायक्लोमीटर . आधी वायर्ड
हा सायक्लोमीटर . आधी वायर्ड सायक्लोमीटर लावला होता.
त्याने काही दिवस चांगली कामगिरी केली. पण एकद ९६ चा स्पीड दाखवल्यावर तो काढून टाकला. ग्रामिनचे पॉप्युलर आहेत. आयजीस्पोर्ट्सचे सर्वात स्वस्त आहेत असं सर्वांनी सांगितलेलं. पण त्यात नेव्हिगेशन , मॅप नाही. मला हाच स्वस्त वाटला. स्ट्राव्हा वर डेटा आपोआप अपलोड होतो.
(No subject)
सिंहगड चढून जायची ट्रीप पानशेतपर्यंत अशी बदलली त्याला कारण मीच. एकदम सिंहगड चढणे जमणार नाही हे निक्षून सांगितल्याने असा बदल केला. पण पानशेतपर्यंत याचा अर्थ खालीपर्यंत असा होतो असं माझी मराठी भाषा सांगते. चढून जायचं तर मग सिंहगड नसतं का केलं ?

मी इथेच तंबू टाकला. फाऊल तर फाऊल.
४८.५ चा जो स्पीड दिसतोय तो तीव्र उतार आहे.
असेच उतार सगळीकडे असावेत. मनपा ने पुल देशपांडे बागेपासून सगळीकडे उतरते फ्लायओव्हर बांधले तर बरं होईल. वर पर्यंत लिफ्टची व्यवस्था केली तरी चालेल.
>>> कॉलनीतल्या कॉलनीत
>>> कॉलनीतल्या कॉलनीत सायकलिंग ,>> किंवा बंद गल्लीत, किंवा ओसाड रस्त्यांवर ठीक आहे परंतू महामार्गांवर वेगवान, अनियंत्रित वाहनांच्या स्पर्धेत पादचाऱ्यांच्या बरोबर सायकलिंग व्यर्थ आहे.
एस आर डी >> तुमचं मत आपल्या
एस आर डी >> तुमचं मत आपल्या ठिकाणी बरोबर आहे. पण आपल्या दुर्दैवाने आपल्याला या जगात या सर्व गोष्टींसहीत जगायचंच आहे. जगणं कुणी सोडून देत नाही, तसंच आहे. नाही तर सरळ देशांतर करून जिथे हे सर्व नाही तिथे जाऊन सुखाने आयुष्य जगावं.
एकदा आपण सायकल चालवायला लागलो कि लक्षात येतं कि आपलं शहर इतकंही धोकादायक नाही. हा अनुभव सार्वत्रिक आहे.
https://www.youtube.com/watch?v=sssuPFrt9-M&t=106s&pp=ygUibXkgY2l0eSBpcy...
मुंबई
https://www.youtube.com/watch?v=i8KdL1bPwSY
>>>>सरळ देशांतर करून जिथे हे
>>>>सरळ देशांतर करून जिथे हे सर्व नाही तिथे जाऊन सुखाने आयुष्य जगावं.
जगी सर्व सुखी असा कोण आहे ...
राभु देशांतरीत लोकंही अनेक देशी आनंददायक आणि परिचित, ऋणानुबंध असलेल्या लोकांपासून, जागांपासुन, अनुभवांवाचून वंचितच असतात
अगदी बरोबर सामो
अगदी बरोबर सामो
सायकलिंगची आवड निर्माण होण्यासाठी बर्याच गोष्टी आहेत. पण एक प्रसंग असा आहे.
मी कँपमधून बंडगार्डनकडे स्कुटीवरून जात होते. चौकात एक कपल त्यांच्या दोन सायकल्सवर आलं. माझ्या समोरच चौकात दोघेही टुणकन सीटवरून खाली (नळीवर) उतरलं. दोघेही साठीच्या पुढचे पण एव्हढे तरतरीत आणि यंग दिसत होते कि न राहवून मी त्यांचा पिच्छा केला आणि हरे राम हरे कृष्ण मठापाशी त्यांना गाठलं. तेव्हां समजलं कि दोघेही कुठलंच वाहन वापरत नाहीत. सायकलवरूनच जोडीने सगळीकडे फिरतात. लडाख ट्रीप करून आलेत. काकांचं वय ६७ आणि काकूंचं ६० च्या पुढेच काही तरी. एक सुरकुती नाही कि एक्स्ट्रा फॅट नाही. केस मात्र अजिबात न रंगवल्याने वयाची चहाडी करणारे तसेच राहू दिलेले.
बाप रे काय फिट कपल आहे गं.
बाप रे काय फिट कपल आहे गं.
खरंच. आणि कपडे पण मस्त.
खरंच. आणि कपडे पण मस्त. दोघंही शॉर्टस आणि टी शर्ट मधे.
एकदम कॉलेजचं कपल असल्यासारखे. या वयात गेल्यावर आपण कसे दि(अ)सू ?
>>>या वयात गेल्यावर आपण कसे
>>>या वयात गेल्यावर आपण कसे दि(अ)सू ?
नातवंडांना एकदम प्राऊड वाटेल अशी आज्जी 
तू ऑलरेडी सायकलिंग वगैरे सवयी लावुन घेते आहेस. तूही तशीच मस्त दिसशील
जॉब लागल्यानंतर मी तीच
जॉब लागल्यानंतर मी तीच एक्स्क्युज धरुन, स्टेशनरी सायकलिंग बंद केलेले आहे. वजन वाढलय, मंद सुस्ती आलीये
आय मस्ट स्टार्ट.
>>>या वयात गेल्यावर आपण कसे
>>>या वयात गेल्यावर आपण कसे दि(अ)सू ?
खरंय
तू ऑलरेडी सायकलिंग वगैरे सवयी लावुन घेते आहेस. तूही तशीच मस्त दिसशील Happy नातवंडांना एकदम प्राऊड वाटेल अशी आज्जी>>>
नातवंडांना एकदम प्राऊड वाटेल
नातवंडांना एकदम प्राऊड वाटेल अशी आज्जी >>>
आय मस्ट स्टार्ट.>> at your earliest convenience.. सायकल इतका आनंददायक व्यायाम दुसरा कुठलाच नाही.
Thanks Samo and Chandifandi
आजची राईड. क्लाईंब नसल्याने
आजची राईड. क्लाईंब नसल्याने स्पीड वाढला. राईड संपल्या संपल्या कॉम्प्युटर मधे राईड एंड करायला विसरले. उगीच अर्धा तास वाढला.




कॅडेन्स सेन्सर अजून घेतलेले नाहीत. त्यामुळे पावर अचूक रीडिंग देत नाही. आज पावसाची शक्यता असल्याने हार्ट सेन्सर पण घरीच ठेवला होता. रोजच्या राईड मधे खूप कस लागत नाही. पण काही ना काही व्यायाम होतोच.
इथे कुठल्याही डेटा शिवाय पण
इथे कुठल्याही डेटा शिवाय पण नोंद करू शकता.
डिव्हाइस वापरल्याने डबल मजा येते, शिस्त लागणे आणि रेकॉर्ड जनरेट होणे हे फायदे होतात. अगदी डॉक्टरांना दाखवता येऊ शकते. पण हे मस्ट नाही.
चांगला धागा. सर्वांना
चांगला धागा. सर्वांना सायकलिंगसाठी किंवा तशा अन्य व्यायामासाठी शुभेच्छा!
मी आजवर स्ट्राव्हा वापरलंय फक्त. बाकी कोणतेही डिव्हाईसेस किंवा एप्स वापरले नाहीत. सहज जमतंय त्या टप्प्याचंच सायकलिंग रेग्युलर करत जायचं. आपोआप "सहज"ची रेंज वाढत जाते. अगदी १०- १५ किमीसुद्धा सातत्याने केलं तर महिनाभरात ३०- ४० ची राईडही सोपी वाटू शकते. आणि तेच चढाचंही आहे. सहज जमतात ते सोपे किंवा किंचित अवघड चढ- पूल करत राहिले की त्याचीही तयारी होत जाते. हळु हळु मोठे चढही जमत जातात.
आणि सायकल कोणतीही चालते- अगदी कोणतीही. जड असेल, थोडी बेसिक असेल तर ती अजून जास्त खडतर व्यायाम देते. १०० किलोमीटरपर्यंत कोणतीही सायकल चालते. अर्थात् सीटची उंची, ब्रेक सेटींग, गेअर सेटींग हे नीट करावं लागतं. हवा योग्य ठेवावी लागते. आणि सायकलिंगनंतरही पाय दुखू नयेत म्हणून स्ट्रेचिंग- वॉकिंग उपयोगी पडतं. नवीन करत असाल तर शक्यतो ग्रूपसोबत करू नका. कारण प्रत्येकाची स्पीड, तयारीची पातळी, फोर्स वेगळा असतो. शक्यतो स्वत:ला जे सहज जमतंय त्याहून फक्त १% जास्त जरी करत राहिलात आणि महिन्यातून २२ दिवस जरी सायकलिंग, वॉकिंग व असा पूरक व्यायाम केलात तरी सायकलिंग जास्त करता येईल. आणि मग त्याची अजून जास्त मजाही घेता येईल. आणखी मजा घेण्यासाठी शुभेच्छा!
क्या बात है, मार्गी .
क्या बात है, मार्गी .
कसला सुंदर प्रतिसाद. संपूर्ण प्रतिसाद मोटिवेट करणारा आहे.
सोबतच सुंदर टीप्स दिल्या आहेत.
जड सायकलने व्यायाम जास्त घडतो हे तर मनापासून पटले.
सोलो सायकलिंग बद्दल सांगितलेले आवडले.
ती मालिका वाचतेय.
१.सायकलिंगपेक्षा चालणे बरं हे
१.सायकलिंगपेक्षा चालणे बरं हे माझं मत. नवनवीन ठिकाणी बस/ रेल्वे/ सार्वजनिक वाहनाने जाऊन तिकडे चालणे, डोंगर चढणे करता येतं. महिन्यात दोनदा करता येईल. पाठीवर वजन ( सॅक)घेऊन डोंगर चढण्यात चांगला व्यायाम होत असावा. सायकलीचे ओढणं नसतं हा फायदा.
२. OsmAnd appआणि त्यातले offline maps रूट ट्रेसिंगला उपयोगी. हे शहरांत इतर भटकंतीसाठीही उपयुक्त आहेत. राज्यांचे maps 200 MB साइजात डाउनलोड होतात हे विशेष.
सायकलिंगपेक्षा चालणे बरं हे
सायकलिंगपेक्षाचालणे बरं हे माझं मत. >> कोणतीही activity केव्हाही चांगलीच. प्रत्येकाची आवड असते. आपली आवड आपल्या पाशी.तुम्ही सांगितलेले Map बघेन आता.
तुमच्या या activity साठी मनापासून शुभेच्छा. लवकरात लवकर इथे अपडेट करा.
सायकलिंगला अडचणी फार म्हणून
सायकलिंगला अडचणी फार म्हणून माझे मत तसे झाले. जर का चार किलोंची आणि फोल्डिंग टाईप सायकल आली तर मात्र उपयोगी पडेल. रेल्वेने आपल्या बरोबर न्यायची आणि तिकडे फिरवायची. त्या सायकलला वेग कमी असला तरी चालेल.
( अवांतर होतंय पण लिहिलं.)
आज सकाळी 7 वा मुक्ताई चौकातून
आज सकाळी 7 वा मुक्ताई चौकातून स्टार्ट.
1 तास 14 मिनिटे 43 सेकंद मूव्हिंग टाईम. 21.64 किमी अंतर.
सरासरी वेग 17 किमी पडला. कमी झाला आज. बहुतेक झोप नाही झाली म्हणून आज जोर नव्हता पायात.
आता या धाग्यावर एक्सपिडिशन असेल तेव्हा अपडेट करीन.
एकटीनंच काय लिहायचं?
पाऊस पडतोय पुण्यात.
पाऊस पडतोय पुण्यात.
मस्त भिजायचा आनंद घेतला. राईड पण झाली आणि भिजणंही.
आज पहाटे ४ वाजता मुकाई चौक ते
आज पहाटे ४ वाजता मुकाई चौक ते तळेगाव आणि परत असा फेरफटका झाला.
सकाळी सहाला परत.
आज सायक्लोकाँप्युटरचा कंटाळा केला. आज स्पीड वगैरे काही कळलं नाही.
मुंबई पुणे रस्त्याची भीती गेली.
वर मार्गी यांनी ग्रुपचे तोटे सांगितलेत ते पटले. पण पहाटे ग्रुपची सोबत लागतेच.
( आता लांबची राईड होईल तेव्हांच अपडेट करीन)
आज पहाटे ४ वाजता मुकाई चौक ते
आज पहाटे ४ वाजता मुकाई चौक ते तळेगाव आणि परत असा फेरफटका झाला.
सकाळी सहाला परत.>>>> डोळे बाहेर बाहेर येण्याचा emoji
सहा नंतर बाकीचा दिनक्रम... ऑफिस वगैरे??
काय secret असेल तर सांगून टाका
14 ते १५ किमी अंतर आहे. उलट
14 ते १५ किमी अंतर आहे. उलट जास्त वेळ लागला. मुकाई चोक किवळे - रावेत गावातला. सीक्रेट काही नाही.

सायकलला सायकलची सोबत
Pages