पुणे गटग - १८ मे, रविवार, फोटो आणि वृ सहित

Submitted by किल्ली on 12 May, 2025 - 07:18

पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004

गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे

https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली Happy
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर

..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.

.
सेल्फि १
IMG-20250518-WA0011.jpg
.
सेल्फि २
IMG-20250518-WA0025.jpg
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा Happy
IMG-20250518-WA0014.jpg
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद Happy
IMG-20250518-WA0032.jpg
.
खास क्षण
IMG-20250518-WA0083.jpg
.
IMG-20250518-WA0071.jpg
.
IMG-20250518-WA0085.jpg
.
IMG-20250518-WA0034.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला यायची खूप इच्छा आहे पण मुलाची परीक्षा आहे त्याच दिवशी. त्याला ने आण करायला कोणी सापडले तर मी आलेच म्हणून समजा.
मेट्रो स्टेशन च्या जवळ चे ठिकाण शोधा.

मी येणार पण मला निगडी area मध्ये साडेनउपर्यंत काम आहे.
तिथून पुढे मला कमीत कमी पाउण तास ते 1 तास लागेल.
चालेल का?
की पळून जाणार तुम्ही लोकं?
दुचाकीवर येईन.
तिथे पार्किंग आहे म्हणून.
Veg घासफूस मिळतंय ना तिथे?
रविवार आहे हे बरंय
शनिवारी उपास असतो Lol

अरे वा Happy
मलाही आवडेल यायला. फक्त उन किती असेल (बहुदा नसेल) त्यावर ठरेल.

कट्ट्याला शुभेच्छा.
फोटोसह वृत्तान्ताच्या प्रतीक्षेत.

परंतु पुण्यातील कट्टा म्हणजे किमान दोन धागे तरी हवेत.

हे ९.२०च का ह्याचं आश्चर्य कोणालाच वाटत नाहिय का?
नऊ , सवा नऊ, साडेनऊ अशी वेळ न ठरवता एकदम पंचाग बघून मुहूर्त ठरवल्या सारखे वाटतेय...

हे ९.२०च का ह्याचं आश्चर्य कोणालाच वाटत नाहिय का? >>> मलाही प्रश्न पडला Happy

एन्जॉय करा सगळे! त्या कॅफेमधे मी गेलेलो नाही पण त्या लोकेशनचे वर्णन केवळ "वैशालीसमोर" हे पूर्वी पुरेसे झाले असते. आता इतके काही डिटेल्स महत्त्वाचे झाले आहेत, हे पाहून पूर्वीचे पुणे राहिले नाही याची खात्री झाली Happy

अमितकरता वापरलेला "सभासद ०" हा क्रमांक आवडला Happy

मेट्रो पासून जवळ हे पुण्याच्या पत्त्यात म्हणजे खरचं पूर्वीचं पुणं वगैरे झालं की! तसं असेल तर मग मी नक्की मेट्रोने येईन.
मला सगळ्यांना भेटायला आवडेल. जमत असेल त्या सगळ्यांनी या रे. याहून जास्त लाघवीपणा मी पुण्यात करणार नाही.

पण त्या लोकेशनचे वर्णन केवळ "वैशालीसमोर" हे पूर्वी पुरेसे झाले असते. >>

फा, पुर्वीच्या पुण्यानुसार ह्या कॅफेचा पत्ता ब्रिटीश लायब्ररीच्या शेजारी इतका सुद्धा पुरला असता.
ब्रिटीश लायब्ररी आता तिथून दुसरीकडे गेल्ये. शेजारचे जुने कौलारू घर आता कॅफेत कन्व्हर्ट केले आहे.

पुर्वीचे पुणे राहीले नाही हे खरेच !

या सगळे बिनधास्त
.
Veg मिळतं हो झकासराव,मी आहे ना घासफूस वाली, काळजी नसावी.
या तुम्ही तुमचं कामं झालं की, गप्पा रंगल्या की ब्रेकफास्ट ते लंच time पर्यंत वेळ कशी सरली समजत नाही.
मागच्या गटगला वाडेश्वर च्या बाहेर bye करायला थांबलो तेव्हा एक तास गप्पा झाल्या होत्या. Proud
वेळ नऊ वीस ची का आहे ह्याचं कारण गटग ला भेटल्यावर सांगेन.

हेडर मध्ये येतो म्हणणारे जे आहेत त्यांची नावं लिहा
म्हणजे positive दबाव राहील सदैव

प्रज्ञा जमवच की तेवढं
अश्विनी 11, तेजो, कृष्णा, आबा, अतरंगी अजून कोण वाडेकर राहिले?

मी पण येईन.
थोडा उशीर होईल मात्र. साधारण ९.४५ होतील.

नमस्कार. त्या दिवशी मी पुण्यात आहे. मुलांना यायला परवानगी असेल तर येऊ. माझ्याबरोबर माझी आई पण असेल. Is that ok?

एविता वेलकम
तुमचे लेख वाचलेत
फार आवडलेली आहे तुमची शैली
तेजो अश्विनी Happy

मी आदल्या दिवशी पुण्यातून बाहेरगावी जाणार आहे. रविवारी पुण्यात परत येणार आहे. सकाळी पोचण्याचा प्रयत्न करते. यायला नक्कीच आवडेल. त्यामुळे शक्य तितका प्रयत्न करते.

अरे वाह! यादी आकार घेत्ये!

एविता - जरूर सगळ्यांना घेऊन ये. फक्त किती जण येताय तो आकडा नक्की सांग म्हणजे जागा राखून ठेवतेवेळी उपयोगी ठरेल.

जरूर सगळ्यांना घेऊन ये. फक्त किती जण येताय तो आकडा नक्की सांग म्हणजे जागा राखून ठेवतेवेळी उपयोगी ठरेल. <<
एका अश्विनींपुढे +११ आणि दुसर्‍या अश्विनींपुढे + ९९ वाटतंय..
Lol

एका अश्विनींपुढे +११ आणि दुसर्‍या अश्विनींपुढे + ९९ वाटतंय.. >>>

आणि अजूनतरी फक्त दोनच अश्विनी आहेत यादीत Wink

Pages