ग्रीष्म झळा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 3 May, 2025 - 04:48

ग्रीष्म बरसतो असा
रान धपापे उसासा
सुनसान रानाला या
वावटळींचा दिलासा

दूर दाटे मृगजळ
तहानले नदी नाले
या विहिरीच्या काठाला
कसे तरवे हे ओले?

तहानल्या रानवाटा
बारवे भोवती फेरा
हंडे, कळश्या गराडा
तळी आपटे पोहरा

झाडांच्या फांदीवरती
पाखरं ऊन्हाची आली
कळ तहान, भुकेची
किलबिलाटी दाटली

सोसोनीया ग्रीष्म झळा
येई गार पाणकळा
भेगाळल्या भुई पोटी
गर्द हिरवा उमाळा
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.