
नमस्कार, मी मनू, मानसी कुलकर्णी. मी बे एरियामध्ये रहाते. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मला दोन मुलं आहेत. सकाळी ऑफिस, संध्याकाळी घर - मुलं, नवरा, मांजर आणि माझी बाग असा माझा दिवस असतो. थोड्याफार फरकाने सगळ्याच बे एरियात राहणाऱ्या भारतीय बायकांचा दिवस! जसे डिझाईन पॅटर्न असतात ना तसेच माणसाच्या आयुष्याचे पण असतात!
हे वर चित्र आहे ना, तसं आहे माझं जग. सुखी - perfect with small imperfections. कसलं गोड चित्र आहे, पण माझ्या हातातल्या मांजराला AI ने दोन शेपट्या काढल्या आहेत.
ती शेपटी दुरुस्त करायला प्रयत्न केले पाहिजेत हे खरं आहेच, पण कधीतरी नुसते हसरे चेहरे सुद्धा पहावे.
मी दुपारी जेवायला जाते ना, तेव्हा मला एखादी लहानशी गोष्ट, किस्सा वाचायला आवडतं. माझा मुख्य criteria असतो - की पाच दहा मिनिटात वाचून होणारी आणि पॉझिटिव्ह नोट वर संपणारी गोष्ट असावी. मग मला वाटलं की माझ्या सारखेच अजूनही लोकं असतील - ज्यांना असे साधे सोप्पे किस्से वाचायला आवडतील. त्यांच्या साठी ह्या छोट्या मोठ्या रोजच्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टी - आपल्या गोष्टी!
१. माझं लेकरू आणि मांजरु https://www.maayboli.com/node/86677
२. आंबे आणि आठवणी https://www.maayboli.com/node/86678
३. हवा तेवढाच त्रास https://www.maayboli.com/node/86680
४. मिमी (व्यक्तिचित्र) https://www.maayboli.com/node/86690
५. रेडवूड वारी https://www.maayboli.com/node/86697
६. मनूचं सरबत https://www.maayboli.com/node/86700
७. कोल्ह्याला द्राक्ष आंबट? https://www.maayboli.com/node/86702
८. टमी (व्यक्तिचित्र) https://www.maayboli.com/node/86712
९. जिलेबी https://www.maayboli.com/node/86720
मांजराला AI ने दोन शेपट्या
मांजराला AI ने दोन शेपट्या काढल्या आहेत >>>.
AI अश्या बर्याच गमतीजमती चुका करतंय शेवटी तेही परफेक्ट नाही.पण घिबली फोटो मस्त आलाय फॅमिलीचा.
पुढील लेखनास शुभेच्छा.
Thank you, तुमच्या
Thank you, तुमच्या प्रतिसादाने हुरूप वाढला आहे. Week end ला पुढचा भाग टाकेन.
साधे सोप्पे किस्से >> नक्कीच.
साधे सोप्पे किस्से >> नक्कीच.
अरे वा, आवडली कल्पना.
अरे वा, आवडली कल्पना. मनीम्याउ २ आहेत की ३? टमी टक्सिडो दिसतेय. मीमी टॅबी आहे का?
Thank you सिंडरेला!
Thank you सिंडरेला!
दोन मांजर - पांढरा कापसाचा गोळा - मिमी आणि tuxedo टमी!
तिसरी केसरी रंगाची शेजारची रॉन आहे. तिचं आणि मिमी च अजिबात पटत नाही! त्यांचा एक किस्सा आहे - लिहीन लवकरच
पुढील किस्सा कधी? आशाळभूतपणे
पुढील किस्सा कधी?
आशाळभूतपणे वाट पहातोय आम्ही 
हळू हळू लिहिते आहे एक एक,
हळू हळू लिहिते आहे एक एक, पुढचा लेख लिहिला आहे टमी विषयी. तुम्ही सगळे वाचत आहात आणि प्रतिक्रिया सुद्धा देता, त्यामुळे लिहायला अजूनच छान वाटत आहे