एक जादूगार आपल्या उडत्या गालीच्यावरुन आकाशात विहार करत होता. अचानक त्याला खाली समुद्रात एका छोट्या बेटाला आग लागल्याचे दिसले. आपल्या जादुई शक्तीने त्याने आगीतून बचावलेल्या सर्वांना एका दूरवरच्या रिकाम्या बेटावर हलवले. ९९ वाघ आणि १ हरीण आगीतून बचावले होते. जादूगाराने त्या बेटावर एक हिरव्या गवताचं कुरण बनवलं ज्यातील गवत कितीही खाल्लेत तरी कमी होणार नाही. तसेच एक गुहा बनवली ज्यात अगणित मांसाचा साठा होता. जादूगाराने वाघांना सांगितलं की त्याने एक मायावी जादू त्यांच्यावर घातली आहे. जर एखाद्या वाघाने हरणाला खाल्लं तर त्या वाघाचं हरणात रूपांतर होईल. असं सांगून जादूगार निघून गेला.
सगळे वाघ हुशार होते. ते अगणित मांसाच्या साठ्यावर जरी खूष असले तरी मनातून त्यांना हरीण खायला आवडलं असतं. हरिणात रूपांतर व्हायचीही त्यांची ना नव्हती जर त्यांना खात्री मिळाली की दुसरा कोणी वाघ त्यांना खाणार नाही तरच.
जादूगाराने १०० दिवसांनंतर परत त्या बेटाला भेट दिली. त्याला आता तिथे किती वाघ आणि हरणं दिसतील?
० वाघ. ९९ हरिणं. एका हरणाचं
० वाघ. ९९ हरिणं. एका हरणाचं मांस ९९ वाघांना पुरलं नसेल पण.
भरत जी धन्यवाद श्रीगणेशा
भरत जी धन्यवाद श्रीगणेशा केल्याबद्दल
मी उद्या इथे साधारण याच वेळी उत्तर टाकेन. तोपर्यंत उत्तरे येऊ द्यात. आत्ता लगेच कुठले बरोबर आणि कुठले चुकीचे ते सांगत नाही
१ हरीण
१ हरीण
98 हरीण, 1 वाघ
97 हरीण
मलाही वाटते, एक हरिण फक्त
मलाही वाटते, एक हरिण फक्त उरलं असेल.
१ हरीण ९८ वाघ ( दुसरा
१ हरीण ९८ वाघ ( दुसरा कोणी वाघ बदललेले हरीण खाणार नाही, एक हरीण एकच वाघ खातो नि सगळ्या वाघांमधे मिळून एका दिवशी एकच हरीण खाल्ले गेले (शेअर नाही ) असे धरले तर)
हरीण आपल्याला(च) मिळावे पण
हरीण आपल्याला(च) मिळावे पण आपलं हरीण झाल्यावर इतर वाघांनी आपल्याला खाऊ नये आणि म्हणून इतर वाघ उरूच नयेत असा विचार करून सर्व वाघांनी आपसात लढाई करून एकमेकांना ठार मारून टाकले.
सर्व वाघ अशातऱ्हेने वाघावस्थेतच मरण पावल्याने उरले ते एक ओरिजिनल, ऑरगॅनिक हरीण.
म्हणजे वाघ हरीण तेव्हाच खाणार
म्हणजे वाघ हरीण तेव्हाच खाणार जेव्हा त्यांना खात्री असते की उर्वरित वाघांपैकी कोणीही तो हरीण झाल्यावर त्याला खाणार नाही.
एक हरीण एक वाघ असेल तर तो वाघ हरीण खाईल. कारण तो हरीण झाल्यावर त्याला खाणारा वाघच उरणार नाही.
दोन वाघ एक हरीण असेल तर कुठलाही वाघ हरीण खाणार नाही. कारण त्याने खाल्ला तर तो हरीण होईल. मग उरले एक वाघ एक हरीण. उरलेला वाघ त्याला खाईल.
तीन वाघ एक हरीण: वाघांना माहीत आहे की एकाने हरिणाला खाल्ले तर तो हरीण होईल आणि उरले दोन वाघ एक हरीण.
त्यातील एकाने मला खाल्ले तर उरेल एक वाघ एक हरीण. मग उरलेला वाघ त्यालाही खाईल. म्हणजे आधी जो कोणी एक खाऊ शकेल तो हरीण झाला तरी उरलेले दोन वाघ स्वतःला वाचवण्यास त्याला खाणार नाही.
थोडक्यात या तर्काने वाघांची संख्या सम असेल तर कोणीच हरीण खाणार नाही. विषम असेल तर सगळे हरिणाला खायला धावतील, त्यातील जो कोणी आधी हरिणाला खाईल तो नशीबवान. तो हरीण होईल. पण उरलेल्या वाघांची संख्या सम असल्याने वरील तर्काने कुणीही त्याला खायला धजावणार नाही.
म्हणजे उरले ९८ वाघ आणि १ हरीण (मूळ हरिणाला खाऊन हरीण बनलेला वाघ).
सगळे वाघ हुशार होते. ते अगणित
सगळे वाघ हुशार होते. ते अगणित मांसाच्या साठ्यावर जरी खूष असले तरी मनातून त्यांना हरीण खायला आवडलं असतं. हरिणात रूपांतर व्हायचीही त्यांची ना नव्हती जर त्यांना खात्री मिळाली की दुसरा कोणी वाघ त्यांना खाणार नाही तरच.
या अटी हे की वर्ड असतील तर उत्तर वेगळे असेल. मनातून त्यांना हरीण खायला आवडले असते ही वाघाची नैसर्गिक टेंडसी लक्षात घेतली आणि तो वाघ आहे, माणूस नाही असा विचार केला तर हरणाला एक तरी वाघ खाऊन टाकेल मग तो हरीण बनेल. तोपर्यंत वाघांचे आपसात कुठलेच म्युच्युअल अॅग्रीमेंट झालेले नाही. शिवाय एकच हरीण असल्याने ते खाऊन टाकणार्या वाघाला कोण गॅरण्टी देणार ? ज्या वाघाचे हरणात रूपांतर होईल त्याला दुसरा वाघ खाऊन टाकेल. अशीच साखळी चालत राहून शेवटी जो वाघ उरला तो उरलेल्या एकमेव हरणाला खाऊन स्वतः हरीण बनेल. त्याला खाणारा वाघ शिल्लक नसेल.
जादुगाराने अट घातली पण तिची
जादुगाराने अट घातली पण तिची सत्यता पटवुन घेण्याकरता ९९ पैकि एका वाघाने हरीण खाल्लं, आणि तो हरीण झाला. उरलेल्या ९८ वाघांना जादुगाराच्या अटीचा पडताळा आल्यावर त्यांनी गपगुमान हरीणाकडे दुर्लक्ष करुन आपला मोर्चा गुहेतल्या मांसाकडे वळवला..
उत्तर - ९८ वाघ, १ हरीण...
खालील दोन्ही वाक्यात
खालील दोन्ही वाक्यात विरोधाभास आहे.
१) सगळे वाघ हुशार होते
२) हरिणात रूपांतर व्हायचीही त्यांची ना नव्हती...
यातील पहिले वाक्य उडवता येईल का? किंवा बदलून सगळे वाघ हावरट होते असे करता येईल का?
कारण जगातला कुठला हुशार प्राणी एका वेळच्या जेवणासाठी स्वतःला असे कायमचे दुसऱ्या जनावरात बदलून घेईल.
(No subject)
कोडे दिल्याबद्दल धन्यवाद.
कोडे दिल्याबद्दल धन्यवाद. छान कोडे आहे. विचार करायला मजा येते आहे, जरी उत्तर सापडले नाही तरीही.
त्या १०० दिवसांचा काही संदर्भ आहे का ? कि कितीही दिवसांनी चालेल ?
अजून, एक हरीण एकाच वाघाला पुरते असे काही आहे का? कि एक हरीण कितीही वाघ खाऊ शकतात?
जर एक हरीण कितीही वाघांना पुरत असेल तर सर्व वाघ संगनमताने एकाच वेळी ते हरीण खातील व सर्वांचे ९९ हरणात रूपांतर होईल. त्यांना खायला कोणी वाघ उरू नये यासाठी संगनमताने एकाच वेळी सर्वांनी खायला हवे. (ते जीव देणारे प्रेमी युगुल असतात ना, एकमेकांचा हात घट्ट धरून कड्यावरून एकाच वेळी उडी मारतात कि जेणेकरून कोणी पाठीमागे राहू नये. तसे :D)
जर एक हरीण एकाच वाघाला पुरणार असेल तर कोणीही ते खाण्याचे धाडस करणार नाही. म्हणजे ९९ वाघ आणि एक हरीण अशी जैसे थे परिस्थिती राहील .
विचारांती मला दोन वाघ एक हरिण
विचारांती मला दोन वाघ एक हरिण ही योग्य उत्तर वाटते आहे
मानव पृथ्वीकर यांचा तर्क व
मानव पृथ्वीकर यांचा तर्क व उत्तर पटले. मलाही तेच उत्तर असावे असे वाटते.
सम विषम काही पटले नाही. दोन
सम विषम काही पटले नाही. किंबहुना कळलेच नाही. दोन तीन वाघ असा विचार करतील हे एकवेळ ठीक आहे पण ९८…९९ वाघ आपण सम आहोत की विषम हा हिशोब करून हरीण खायचे की नाही हा निर्णय घेतील का.. काय कॉम्प्युटर प्रोग्राम आहे का तो.. आणि ९८ वाघ असताना त्यातील एक वाघ हरीण का नाही खाणार? म्हणजे हे नक्की काय लॉजिक आहे की आपण ९८ म्हणजे सम आहोत तर खाण्यात रिस्क आहे..
हा धागा 28 एप्रिल रोजी
हा धागा 28 एप्रिल रोजी सायंकाळी आला आहे
100 दिवस अचूक मोजा. धागा कर्ते त्या वेळी पाहणी करण्यासाठी येतील. तेव्हा इथल्या सर्व वाघांचे हरीण झालेले असेल.
वाघमारे, वाघमोडे, वाघचोरे, वाघभिववे नंतर येतात ते वाघाचे हरीण करणारे वाघहर्णे!
<<जर एखाद्या वाघाने हरणाला
<<जर एखाद्या वाघाने हरणाला खाल्लं तर त्या वाघाचं हरणात रूपांतर होईल>> यावरून कोड्यात एखादा वाघ हरीण मारून खाऊन टाकतो ( शेअर करत नाही ) असे सूचीत होते. हे जीव वापरून केलेले लॉजिकल कोडे आहे, जीव प्रत्यक्षात कसे वागतात, एका वेळेस किती खातात, शेअर करतात की नाही याचा संबंध नसावा असे वाटते. अन्यथा मग वाघांना माणसाचे बोलणे, हरीण खाल्ले तर तो हरीण होईल हे तरी कसे समजणार?
वाघ आइन्स्टाइनएवढे हुशार पण कोडेकर्त्याच्या अटी तंतोतंत पाळणारे मर्यादाव्याघ्रोत्तमही आहेत असे गृहीत धरायला हवे.
हरीण शेअर करणार असतील तर (कितीजण शेअर करतील असे कोड्यातच नमूद केले नसेल तर) कोड्याला अर्थच उरत नाही. एक हरिण किती वाघ खातील हा ज्याचा ताचा तर्क, कुणी म्हणेल वाघ सुदाम्यासारखे, ९९ तुकडे करून वाटून खातील, कुणी म्हणेल मला वाटते त्यांना फक्त चव नकोय तर खाण्याचे समाधान हवेय मला वाटते फार तर चार वाघ शेअर करतील, कुणी म्हणेल सहा.
आणि एक हरीण सगळेच शेअर करणार असतील तर एवढे सोपे कोडे चीकू (जे मस्त व कठीण कोडे घालतात) कशाला पोस्ट करतील?
मानव, पटलं.
मानव, पटलं.
मी कोडं दिसल्या दिसल्या जे पहिलं उत्तर सुचलं ते लिहिलं.
आता इतरांची उत्तरे वाचल्यावर पुन्हा पहिल्यापासून सोडवणे कठीण आहे.
कोड्याला थोडा ट्विस्ट द्यायचा
कोड्याला थोडा ट्विस्ट द्यायचा झाला तर...
तो जादूगार सर्व वाघ आणि एका हरीणाला पूरणमासी की रात नव्या बेटावर हलवतो आणि त्या वाघातला एक राहुल रॉय असतो. तर दुसर्या दिवशी काय सिनारिओ असेल? 100 दिवसांनी काय सिनारिओ असेल?
कुठल्या तिथीला हलवतो हे
कुठल्या तिथीला हलवतो हे सुद्धा सांगा म्हणजे १०० दिवसात किती पुरनमासी येतील हे मोजता येतील.
आणि अजून थोडे क्लिष्ट करायचे असेल तर एखादा वरून धवन सुद्धा सोडा त्यात..
अवांतर,
नव्या बेटावर हलवतो >>> यातील हलवतो हे शुद्ध मराठीनुसार आहे की हिंदीतून भाषांतर करून आलेला शब्द?
अरे लिहीलंय ना पूरणमासी की
अरे लिहीलंय ना पूरणमासी की रात.
मराठीत म्हणतात ना 'सामान हलवलं' तसं प्राणी हलवले.
Shifted, not shook.
हिंदीतून भाषांतर करून >>
हिंदीतून भाषांतर करून >> म्हणजे नक्की कसं?
उत्तर माहीत नाही पण सर्वांचे
उत्तर माहीत नाही पण सर्वांचे प्रतिसाद मस्त आहेत.
मामींचा ट्विस्ट तर भारीच...
जादूगार उडत्या गालीच्यावरुन वरून धवनला सोडणार. खालून कसा सोडणार ?
अरे लिहीलंय ना पूरणमासी की
अरे लिहीलंय ना पूरणमासी की रात.. >>> अच्छा हो बरोबर कन्फ्युजन झाले..
रानभुली,
उदाहरणार्थ, भाजपला घेऊन सध्या सारेच नाराज आहेत... या वाक्यात 'भाजपा को लेकर" या हिंदी विधानाचे 'भाजपला घेऊन' असे शब्दशः भाषांतर झाले आहे. वरचे सुद्धा तसेच झाले आहे का शंका वाटली म्हणून क्लिअर केले.
@ मराठी कोडे
आतापर्यंत आलेल्या उत्तरात एखादे उत्तर असेलही बरोबर. पण समाधान अजूनपर्यंत एकाही उत्तराने नाही झाले. काहीतरी लूपहोल सापडत आहेच. कदाचित अंतिम उत्तरात सुद्धा तसे असू शकेल.
हिंदीत सरकाना, ले जाना ऐकले
हिंदीत सरकाना, ले जाना ऐकले आहे.
ओके मी त्यावर वेगळा धागा काढत
ओके मी त्यावर वेगळा धागा काढत आहे लवकरच. इथे अवांतर जास्त नको.
मंडळी सर्वांना उत्तर आणि
मंडळी सर्वांना उत्तर आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद!
पूरणमासी, राहुल रॉय
खूप मजा येतेय वाचून!
मी साधारण तास- दीड तासात उत्तर टाकेन.
उत्तर आहे ९८ वाघ आणि १ हरीण!
उत्तर आहे ९८ वाघ आणि १ हरीण!
मानव पृथ्वीकर यांनी बरोबर उत्तर आणि तर्क मांडला आहे. त्यांचाच तर्क मी इथे कॉपी पेस्ट करत आहे. कारण मी जे स्पष्टीकरण लिहिलं होतं त्यापेक्षाही त्यांनी ते उत्तमपणे समजावून सांगितले आहे.
म्हणजे वाघ हरीण तेव्हाच खाणार जेव्हा त्यांना खात्री असते की उर्वरित वाघांपैकी कोणीही तो हरीण झाल्यावर त्याला खाणार नाही.
एक हरीण एक वाघ असेल तर तो वाघ हरीण खाईल. कारण तो हरीण झाल्यावर त्याला खाणारा वाघच उरणार नाही.
दोन वाघ एक हरीण असेल तर कुठलाही वाघ हरीण खाणार नाही. कारण त्याने खाल्ला तर तो हरीण होईल. मग उरले एक वाघ एक हरीण. उरलेला वाघ त्याला खाईल.
तीन वाघ एक हरीण: वाघांना माहीत आहे की एकाने हरिणाला खाल्ले तर तो हरीण होईल आणि उरले दोन वाघ एक हरीण.
त्यातील एकाने मला खाल्ले तर उरेल एक वाघ एक हरीण. मग उरलेला वाघ त्यालाही खाईल. म्हणजे आधी जो कोणी एक खाऊ शकेल तो हरीण झाला तरी उरलेले दोन वाघ स्वतःला वाचवण्यास त्याला खाणार नाही.
थोडक्यात या तर्काने वाघांची संख्या सम असेल तर कोणीच हरीण खाणार नाही. विषम असेल तर सगळे हरिणाला खायला धावतील, त्यातील जो कोणी आधी हरिणाला खाईल तो नशीबवान. तो हरीण होईल. पण उरलेल्या वाघांची संख्या सम असल्याने वरील तर्काने कुणीही त्याला खायला धजावणार नाही.
म्हणजे उरले ९८ वाघ आणि १ हरीण (मूळ हरिणाला खाऊन हरीण बनलेला वाघ).
इथे हरीण वाघ शेअर करतात का असा एक मुद्दा आलेला आहे. कोड्यात एक वाघ एक पूर्ण हरीण खातो असे अभिप्रेत असले तरी आपण वाघ हरीण शेअर करू शकतात असे धरून चालू. आता समजा सर्व वाघांनी संगनमताने ते हरीण ९९ तुकडे करून वाटून खायचे ठरवले. आता सर्व वाघ हुशार आहेत. या बेतातली रिस्क अशी आहे की एक (किंवा एकापेक्षा जास्त) वाघ हरीण खाल्ल्याचे नाटक करू शकतो किंवा अगदी आयत्या वेळी बाकी वाघांनी हरीण खाणे सुरु केल्यावर माघार घेऊ शकतो. हे त्या बाहेर पडणाऱ्या वाघासाठी लाभदायक आहे कारण काही घास हरीण मिळण्यापेक्षा त्याला बाकीचे वाघ हरीण बनले आहेत त्यातील एक पूर्ण हरीण तो फस्त करू शकतो. इथे हरीण ९९ वाघांमधे शेअर केले काय की १० वाघांमधे शेअर केले काय, सारखीच रिस्क आहे. यात हरीण बनलेल्या वाघाला आपण सुरक्षित राहू शकू याची कोणतीही गॅरंटी नाही मग ते ती रिस्क का घेतील? त्यामुळे हरीण शेअर करणे हा वरकरणी सरळ दिसत असला तरी जीवावरील जोखमीचा पर्याय आहे, जो कुठलाही वाघ स्वीकारणार नाही
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार!
मला दोन तीन शक्यता दिसतात.
मला दोन तीन शक्यता दिसतात.
सगळे ९९ वाघ एक हरीण मिळून खातील. एक एक घास. पूर्ण हरीण कोणीच न खाल्याने कोणीच हरीण होणार नाही. अन फक्त ९९ वाघ राहतील
दुसरा ऑप्शन असा की हरीण एक सभा घेईल. तुमच्यातला सर्वात बलवान जो असेल तोच मला खाईल. तेव्हा आपापसात लढा. यात सगळे वाघ गलितगात्र होऊन मरणास लागतील. मरतील. अन एक हरीणच जिवंत राहिल.
तिसरं, कितीही छान लागत असलं अन आवडत असलं तरी एकदा हरीण खाऊन आयुष्यभर इतर वाघांसमोर हरीण बनून रहाणं प्रत्येक वाघाला अपमानास्पद वाटलं. त्यामुळे कोणीच हरीण खाल्लं नाही. अन ९९ वाघ व एक हरीण जिवंत राहिले.
Pages