Submitted by अनन्त्_यात्री on 25 April, 2025 - 06:08
त्या पडद्याच्या पल्याड वसते
गूढ असे "ते "काही
(अंतर "त्या"च्या-माझ्या मधले
घटते, कळतही नाही)
भेट अटळ आहेच "त्या"ची मग
वाट कशाला पाहू?
(अस्तित्वाचा सूर्य ग्रासण्या
अविरत टपला राहू)
"अस्तित्वाच्या पूर्णविरामा-
-नंतर काहीच नसते"-
(माहित असले - तरी मानसी
उत्कंठा का वसते?)
त्या पडद्याचे धूसर दर्शन
अधुनी मधुनी घडते
("जाऊनी वरती, परतुनी आले"
ऐसी कुजबुज होते )
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
होय असेच. खूप उत्कंठा आहे -
होय असेच. खूप उत्कंठा आहे - नक्की असतं तरी काय?
काय होतं?
सुंदर
सुंदर
(ते कंस का? ते कळले नाही)
आपुलाची वाद आपणासी चालला होता
आपुलाची वाद आपणासी चालला होता. त्यामुळे प्रतिवादीचे मत कंसात आहे
अच्छा
अच्छा
छान