योगायोग

Submitted by अविनाश जोशी on 24 April, 2025 - 07:01

योगायोग
सायली गोंधळून गेली होती. तसं पाहिलं तर छोटंच कुटुंब होतं. एका धरणाजवळच्या गावात पाणलोटात गेलेली सात आठ एक्कर शेती . जमिनीच्या बदल्यात मिळालेली कोरडवाहू शेती , ती सुद्धा चौदा - पंधरा किलोमीटर लांब. त्यामुळे शेतीचा उपयोग शून्यच होता. वडिलांना धरणावर नोकरी मिळाली होती. वडील अचानक गेल्यावर तिच्या मोठ्या भावास अनुकंम्पा तत्वावर वडिलांच्या जागी नोकरी मिळाली. भावाचे लग्नही झाले होते. भावाची बायको त्या छोट्याश्या गावात बिऊटीपार्लर चालवत होती. सायलीला म्हंटले तर तसे कुठलेच टेन्शन नव्हते . तीने स्वतः IT मध्ये डिग्री घेतली होती आणि तिला शहरात चांगली नोकरी होती. कुटुंबाला एकच काळजी होती, ती म्हणजे सायलीचे लग्न . सायली गोरीपान होती, दिसायला सुंदर होती , पण लग्न काय जुळत नव्हते. लग्न ठरले ठरले असे सांगायची, मुला-मुलीच्या भेटी व्हायच्या आणि अचानक काहीतरी कारण निघून लग्न फिस्कटायचे. एकदा तर साखरपुडा झाल्यावर , दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्यावर काहीतरी खुसपट निघून लग्न मोडायचे. ती आणि तिच्या घरची मंडळी वैतागून गेली. तिच्या ऑफिस मधला शेखर मात्र एकदा तिच्या गावी गेल्यावर घर पाहून खुश झाला. दोन माजली घर होत. एका बाजूला गाई म्हशींचा गोठा होता . दुसऱ्या बाजूला बिऊटीपार्लर होते. दुसरा मजला सम्पूर्ण राहण्याकरिता होता. घर तसे सुखवस्तू होते. प्रचंड खर्च करून लग्न करण्याची ऐपत नव्हती. सायलीला अमेरिकेत जायची स्वप्न पडत होती. कोणत्यातरी ग्रहाचा जप हा त्यावर उत्तम उपाय होता. ऑफिसातील शेखर असेकाही सांगत असे. तो त्यांच्या घरी गेल्यावर नेहमी म्हणायचा , आई तुम्ही काळजी करू नका ती श्रीमंत घरी पडणार आणि अमेरिकेला जाणार. आई वैतागून म्हणायची तुझ्या तोंडात साखर पडो आत्ता तर दोन वेळचे वांदे आहेत आणि तू अमेरिकेला जायची गोष्टी करतोस . एकद तो त्यांच्या घरी गेलेला असताना त्याला असा भास झाला कि त्या घरावर प्रचंड संकट येणार आहे त्यामुळे सायलीला आणि तिच्या भावाला प्रवेशद्वारावर पंचमुखी मारुतीची तसबीर बसवण्यास सांगितले. अर्थातच नेहमीप्रमाणे सर्वजण ते विसरून गेले.
त्यातून सायलीचा देवावर विश्वास नव्हता . ऑफिसातल्या इतर मुली किंवा ग्रुप एखाद्या देवाला गेला तरी, सायली बाहेर उभी राहायची . अशा परिस्थितीत सायलीला जप सांगून काही उपयोग नव्हता कारण, जपाने स्वतःचेच मनः सामर्थ्य वाढते. कुठलाही देव प्रसन्न होऊन कामे होत नाहीत. विश्वाच्या पसाऱ्यात असंख्य परिणितीवर कशा गोष्टी घडतात हे कोणी सांगू शकत नाही. सध्याचे शास्त्र तीन परमितीत जाऊ शकते आणि चौथ्या पारिमितीत फक्त पुढे जाऊ शकते. चिदम्बरमला नटराजाची मूर्तीत सत्तावीस परिमिती दाखवल्या आहेत. त्यामुळे काय केले असता कुठल्या पारिमितीत काय होईल हे समजण्याची पात्रता आपली नाही. सायलीशी बोलता बोलता तिचा देवावरचा विश्वास का उडाला हे तिने सांगितले. एका वर्षी गौरी गणपतीत संद्याकाळी पूजा होती आणि वडील दुपार झाली तरी आले नव्हते. वडील त्यांच्या शेतावर गेले होते. सायलीने गौरी गणपतीला नवस केला आणि वडील लवकर येउदेत असे मागणे मागितले. वडील आले पण प्रेत वाहिकेतून. त्यांच्या भाऊबंदानी त्यांच्यावर विष प्रयोग केला होता. त्या क्षणापासून तिचा देवावरचा विश्वास उडाला. त्यानंतर पंधरवड्यातच मुंबई जोगेश्वरीच्या एका उच्चभ्रू सोसायटीत तिचा पहाण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत पडली . मुलगा लवकरच अमेरिकेला जाणार असल्याने त्याच दिवशी त्यांनी साखरपुडा आटपून घेतला. दुसऱ्यादिवशी ऑफिसात ती कौतुकाने हिऱ्याची अंगठी दाखवत होती.
हा कार्यक्रम पार पडला त्या दिवशी त्या कॉलनीतील शेजारच्या फ्लॅट मधल्या तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले. मुलाचे वडील उच्चपदस्थ असल्यामुळे तातडीने मुलाचा शोध सुरु झाला. तीन दिवसांनी मुलाचे प्रेत धरणाच्या गावाजवळ सापडले. आणि पुढच्या दोन दिवसातच सायलीच्या भावाला पोलिसांनी अपहरण संशयावरून अटक केली. खर तर त्याचा काहीही संबंध नव्हता. हि बातमी प्रसिद्ध झाल्यावर त्या मुलाने सायली बरोबरचे लग्न मोडले. सायलीचे वय ही वाढत होते. 29-30 वर्षाची झाली होती आणि आता स्थळ मिळणे अवघड झाले होते. त्या दिवशी सायली ऑफिस मध्ये आली. तिच्या डोक्याला गंध लावलेला होता आणि ती चक्क देवाला जाऊन डोके टेकवून आली होती. शेखरला ती म्हणाली, कोठेतरी काहीतरी शक्ती आहे. त्याला देव म्हणू किंवा काहीही म्हणा. परंतु अशा शक्तीचा आपल्याशी सम्बद्ध जोडायला काय हरकत आहे. शेखर ने तिला विचारले कि तुझी आता खात्री झाली का ? कि काही शक्ती आहे आणि आपल्याला त्या मदत करू शकतात. योग योगाने दुसऱ्या दिवशी सूर्य ग्रहण होते. सूर्यग्रहणाच्या दिवशी नदीपात्रात केलेला जप अत्यंत पवित्र असतो. शेखर बरोबर ती आळंदीला गेली आणि इंद्रायणी नदीत त्यांनी जपाच्या उच्चारला सुरवात केली. योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, पंधरा दिवसात तिला अति श्रीमंत स्थळ मिळाले आणि भावाची ही निर्दोष सुटका झाली. एका महिन्यात ती अमेरिकेला रवाना झाली. आज तिला दोन मुले असून ती अतिशय सुखात दिवस कंठीत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

????

कथा आहे. अजून खुलवता आली असती. वेगवान झाली आहे फार. एखाद्या प्रसंगावर विचारचक्र सुरू होते न तोच पुढचा प्रसंग घडत आहे.

नवीन प्रतिसाद लिहा