परंपरेने आलेल्या अनेक गोष्टी आपण खाण्या पिण्याच्या बाबतीत पाळत असतो. हल्ली या गोष्टींचं विस्मरण पण होत चाललंय.
कुठले फळ, भाजी कुणी खावी, कधी खावी, कशाबरोबर खावी कशासोबत खाऊ नये, कुठल्या वेळेला खावे असे आजीबाई सांगायच्या. आता आपल्या पिढीला हे माहिती नाही. अशा काही पारंपारिक गोष्टींची जंत्री करण्यासाठी हा धागा. काही चुकीचे समज, धारणा असतील तर त्यावर चर्चा झाली तर उत्तमच. जे योग्य असेल ते टिकून रहावे आणि एकत्रित रित्या सापडावे म्हणून हा धागा.
सुरूवात सध्या उन्हाळा चालू असल्याने कलिंगडापासून.
कलिंगड खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?
दूध, दही, आईस्क्रीम, मांस , फ्रीजचं किंवा बर्फ घातलेलं थंड पाणी.
कलिंगड खाल्ल्यानंतर दूध किंवा दूधाचे पदार्थ खाणे आरोग्याला हानीकारक ठरते ( नेमकं काय ते माहिती नाही, पण अॅसिडिटी, जळजळ असे सांगितले आहे).
मांस किंवा तत्सम आहार घेतल्यास पोटदुखी अपचन, उलट्या होऊ शकतात.
थंड पाणी , आइस्क्रीम दही यांच्या सेवनाने घसा धरणे आणि सर्दी अशा विकारांना आमंत्रण मिळते.
कलिंगड मधुमेहींनी खाऊ नये असा सल्ला दिला जातो कारण त्याची ग्लायसेमिक इंडेक्स ( जी आय) ७२ आहे जी खूपच जास्त आहे. पण कलिंगडाचा ग्यायसेमिक लोड खूप कमी (५) आहे. कारण त्यात ९०% पाणीच असते. त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर साखर जरी पटकन वाढली तरी एकूण कार्बोहायड्रेटसची मात्रा खूप कमी असल्याने एकूण साखर वाढायला ती हातभार लावत नाही. मधुमेहींनी एखादी फोड खावी असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण खूप प्रमाणात कलिंगड खाल्ल्यास जी एल वाढून साखर वाढू शकते.
कलिंगड खाण्याची योग्य वेळ
https://www.lokmat.com/sakhi/food/at-what-time-should-watermelon-not-be-...
कलिंगड आणि मीठ
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कापलेल्या फळांवर मीठ शिंपडले की ते पाणी सोडू लागते. यामुळे फळांमधील पोषक तत्त्वे निघून जातात. त्याचबरोबर मीठ किंवा चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम किडनीवर परिणाम करते. जर तुम्ही फळांवर चाट मसाला आणि मीठ दोन्ही टाकून खाल्लात तर शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होते. हे शरीरासाठी नुकसानदायक आहे.
https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-why-harmful-to-...
इतर अन्नपदार्थ आणि फळांबद्दल अशी माहिती या धाग्यावर अशाच पद्धतीने संकलित करूयात.
मासे आणि दुग्धजन्य पदार्थ
मासे आणि दुग्धजन्य पदार्थ
ताक व गूळ
ताक व गूळ
हे तीन इन्स्टाग्राम
हे तीन इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर्स या बद्दल सांगत असतात.
https://www.instagram.com/_masalalab/
https://www.instagram.com/ral.livezy/
https://www.instagram.com/upgrade_my_food/
यांच्यातल्याच कोणीतरी रात्री दही खाऊ नये हे मिथ आहे असं सांगितलेलं.
यातली एखादी गोष्ट नियमितपणे करायची असेल तरच मी आणखी माहिती शोधून क्रॉस चेक करतो.
फेसबुकवर एन इन्फ्ल्युएन्सर कपल दिसलं, ते गोष्टी sensationalise and exaggerate करतात हे दिसल्यावर त्यांना ब्लॉक करून टाकलं.
स्वस्ति आणि नि3, धन्यवाद भर
स्वस्ति आणि नि3, धन्यवाद भर घातल्याबद्दल. मासे आणि दूध हे लहानपणापासून ऐकलेले आहे. दूध आणि फळं एकत्र खाऊ नयेत हे ही ऐकण्यात आहे.
वरची कमेंट समजली नाही.
मी इन्स्टाग्राम वर नाही.
मासे आणि दुग्धजन्य पदार्थ..
मासे आणि दुग्धजन्य पदार्थ...बंगाली लोक मासे शिजवताना दही वापरतात.
तरीही हे विरुद्धान्न आहे इति आयुर्वेद.
दूधभात आणि मासे हे लहानपणचे कम्फर्ट फूड होते.
मासे व दूध एकत्र घेतलं तर
मासे व दूध एकत्र घेतलं तर त्वचारोग होतात असं म्हणतात. मासे असतील तर आई दूधाची मिठाई सुद्धा खात नाही.
तसंच चिकन मटन व दही पण नाही. पण पंजाबी रेसिपीमध्ये मॅरीनेशन बरेचदा दह्यातच करतात.
मी बऱ्यापैकी ओळखीच्या बंगाली
मी बऱ्यापैकी ओळखीच्या बंगाली लोकांमधे त्वचारोग पाहिला आहे. पण त्याचा मासे + दूध, दही याच्याशी संबंध आहे का हे माहीत नाही. कदाचित नदीच्या प्रदूषणाचा प्रभाव असेल. पुण्यात आता बंगाली लोक बारामतीच्या जवळपासच्या परीसरातला मासा घेतात.
बंगाल मधे ज्यांची स्वतंत्र घरं आहेत त्यांच्याकडे तळं, विहीर असते. त्यात मासे असतात. त्या पाण्याला खूप वास येतो. स्थिर पाणी असेल तर त्यातले मासे कसे असतील ते सांगता येत नाही.
डॉ. चांदनी गुप्ता म्हणतात कि दही आणि मासे एकत्र शिजवून खाल्ले तर हरकत नाही. पण काही जणांना अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्या तर म्हणतात दही मासे एकत्र (शिजवताना न वरून न घालता ) खाल्ले तरी चालेल.
पण दही घालून शिजवायचे तर ते फेटणार ना?
एक सेन नावाची फॅमिली आहे. ते म्हणतात की कोस्टल एरियात मासे, भात नारळ कितीही आणि कसेही खा ते अमृत आहे.
जोपर्यंत सायन्स निर्वाळा देत नाही तोपर्यंत पारंपरिक पाककृती वर तुम्ही विश्वास ठेवावा किंवा न ठेवावा हे तुमच्या अनुभवातून ठरवावे.
मी तरी आयुर्वेदावर विश्वास ठेवीन. आजीने पण सांगितलं होत.
चांगला धागा आहे.
चांगला धागा आहे.
मासे/चिकन्/मटन आणि दुध खाऊ नये एक साथ हे ऐकले आहे.
पण दह्यात वेगळे गूड बॅक्टेरिया असल्याने दही मासे चिकन ह्यांच्या मॅरिनेशन साठी सर्रास वापरताना पहिले आहे.
दूध फळे पण ऐकलेय त्यामुळे दूधातले फ्रूट सॅलड हा पदार्थ बनवणे खूप कमी केलेय.
पहिले दूध मासेच आठवले. या
पहिले दूध मासेच आठवले. या अनुषंगाने फार फेमस कॉम्बिनेशन आहे. घरी कधीच हे एकत्र खाल्ले नाही. किमान दोन तीन तासांचा फरक ठेवतोच.
फळे आणि दूध सुद्धा एकत्र टाळतो.
तसेच बरेच फळांवर लगेच पाणी सुद्धा पीत नाही
पण बाहेर पार्टीमध्ये मात्र कळत नकळत सगळे टेस्ट करायच्या नादात चिकन मटण मासे अंडी पनीर हलवा खीर आईसक्रीम फ्रूटसलाड असे सगळे एकत्र पोटात जातेच. त्याने पचनाचा इन्स्टंट त्रास तरी कधी झाला नाही.
मला लहानपणी मावा केक चहात
मला लहानपणी मावा केक चहात बुडवून खायला आवडायचे. केक टोस्ट सुद्धा अर्थात तसेच खायचो.
पण एकदा मळमळून उलटी झाली तसे धसका घेऊन सोडून दिले. आजही केक टोस्ट मध्ये अंडे असेल तर चहासोबत टाळतो.
अंडा दूध असलेले फ्रेंच टोस्ट आवडते. पण भीतीने जास्त खात नाही. एका लिमिटनंतर आता आपल्याला मळमळणार असे आधीच वाटते.
>>जे योग्य असेल ते टिकून
>>जे योग्य असेल ते टिकून रहावे आणि एकत्रित रित्या सापडावे म्हणून हा धागा.>>
धाग्याचा उद्देश आवडला 👍
'व्यक्ती तितक्या प्रकृती' ही उक्ती ह्या बाबतीत लागु पडत असल्यामुळे अमुक एका गोष्टीबरोबर/नंतर तमुक गोष्ट खाल्ली/प्यायली तर झाडुन सगळ्यांनाच त्रास होईल किंवा कोणालाही त्यामुळे काहीही त्रास होणार नाही अशा सरसकटीकरणावर माझातरी विश्वास नाही. अर्थात ह्याला काही काँबीनेशन्स नक्कीच अपवाद असु शकतील हे देखिल मान्य, पण त्याबद्दल काही माहिती/अनुभव नाही त्यामुळे काही सामान्य निरिक्षणे/अनुभव तेवढे (आठवतील तसे 😀) टप्प्याटप्याने प्रतिसादांत लिहीन.
>>कलिंगड खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?>>
गेली कित्येक वर्षे अनेकांना कलिंगडा बरोबर काहीही किंवा कश्याच्याही बरोबर कलिंगड खाताना बघितले आहे आणि रमझान काळात मुस्लिम मित्रांकडे इफ्तारीला चिकनच्या पदर्थांबरोबर कलिंगड, आंबा, पपई, द्राक्षे, अननस, चिकु, डाळिंब अशी फळे आणि फ्रुट ज्युस, मिल्क शेक सारख्या पदार्थांचे सेवनही केले आहे, परंतु मलातरी कधी त्याचा काही त्रास झाला नसल्याने त्याच्या बरोबर किंवा नंतर काय खाऊ नये हे सांगणं अवघड आहे, पण 'कलिंगडावर थंड/गरम/साधे असे कुठलेच पाणी पिऊ नये - जुलाब लागु शकतात' आणि 'साबुदाणा खिचडीवर जास्त पाणी पिऊ नये - पोटदुखीचा त्रास होऊ शकतो' ह्या आमच्या फॅमिली डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यांचे पालन मात्र न चुकता करतो. बाकी दुग्धजन्य पदार्थांवर पाणी पिऊ नये असे म्हणतात, पण मी पितो, आणि त्यामुळे निदान मलातरी कधी काही त्रास झाल्याचे स्मरत नाही.
या अनुषंगाने एक जुनी हिंदी
या अनुषंगाने एक जुनी हिंदी म्हण आठवली.
दही करेला ककडी और साथ में भूट्टा
खाके जो सो गया वो फिर कभी नहीं उठता..
थोडक्यात हे चार पदार्थ एकत्र खाऊ नयेत
"दही करेला ककडी और साथ में
"दही करेला ककडी और साथ में भूट्टा
खाके जो सो गया वो फिर कभी नहीं उठता.. "
बाब्बो... लैच डेडली प्रकरण दिसतंय म्हणजे हे!
मी कलिंगडावर व आंब्यावर पाणी
मी कलिंगडावर व आंब्यावर पाणी प्यायचे नाही हे सोडून कधीच काही पाळले नाही.
नॅानव्हेज वर दूधाचे पदार्थ खाणे, दूध व फळे एकत्र किंवा एका नंतर एक खाणे, मिल्कशेक्स पिणे, फळांवर पाणी पिणे हे सर्रास करायचो.
काही वर्षांपूर्वी स्किनवर पांढरे चट्टे आले. काही गेले काही तसेच राहीले. आयुर्वेदिक डॅाक्टरांचे म्हणणे होते की ते असे खाण्यामुळेच होते. Dermatologist कडे पण उपचार घेतले पण ते पूर्ण पणे कधीच गेले नाही.
दुसरा अनुभव दूध, मध, तूप यांचा.
दूध व तूप अनेक जण एकत्र करून पितात मी त्यात मध पण टाकायचो. त्यानंतर मला स्किन वर फोड यायला सुरुवात झाली. मला त्यावेळेस हे कारण लक्षात नाही आले. नंतर दूधात हे सगळे टाकणे बंद केल्यावर फोड येणे बंद झाले.
आम्हांला काप्या फणसाचे गरे
आम्हांला काप्या फणसाचे गरे खाल्ले की पाणी प्यायचं नाही निक्षून सांगतात, पोट दुखेल म्हणतात. आणि तेच बरक्या फणसाचे गरे खाल्ले की पाणी मस्ट असते.
चुरमुरे, भडंग, भेळ यावर लगेच पाणी पिऊ नये म्हणतात पोट बिघडते. पण साळीच्या लाह्यांवर पाणी पिऊन चालते.
थोडंसं अवांतर पण माझ्या आयुर्वेदिक डॉ मैत्रिणीने सांगितलेला सल्ला आणि मी अनुभवलेला सल्ला आहे - अति तामसी, तिखट, मसालेदार अन्न खाल्ल्यामुळे पोटात जळजळ होत असेल तर मूठभर साळीच्या लाह्या खाव्या. जळजळ कमी होते.
तेल आणि दूध
तेल आणि दूध
एकत्र करु नये म्हणे
तसेच फळे आणि दूध
चहा मध्ये बिस्कीट, टोस्ट
चहा मध्ये बिस्कीट, टोस्ट,चपाती बुडवून खाणे,गरम पाणी आणि मध,मुगाची खिचडी आणि दूध.,दूध भात लोणचे,पंजाबी भाज्यांच्या gravy बनवताना cream घालणे ..हा पण विरुद्ध आहार ch आहे..Skin disease, acidity,पोटाचे आजार ,Rheumatoid arthritis होण्याची शक्यता जास्त असते विरुद्ध आहार खात असाल तर...
चहा मध्ये बिस्कीट, टोस्ट
चहा मध्ये बिस्कीट, टोस्ट,चपाती बुडवून खाणे
>>>
बिस्कीट टोस्ट यासाठीच तर बनतात ना..
महाशिवरात्रीच्या आधी बाजारात
महाशिवरात्रीच्या आधी बाजारात आलेली द्राक्षं खाऊ नयेत, हमखास बाधतात, असं आमच्या घरी म्हणतात.
हे मी कटाक्षाने पाळते.
जांभळं मे महिन्याच्या अखेरीस खावीत.
द्राक्षाचा सीझन संपत आला की कलिंगड आणावं, त्याआधी नाही. आजकाल कलिंगडं जवळपास वर्षभर मिळतात. पण आणवत नाहीत.
Interesting विषय.
Interesting विषय.
काय, कसे, कधी, कशासोबत खावे - हे कोण आणि कसे ठरवते हे मला कधी नीट समजले नाही.
सांगणाऱ्या व्यक्तीचा स्वत:चा किंवा एखादा anecdotal evidence पुरेसा मानावा का ? दैनिक पेपर आणि रील्स मधे सल्ले देणारे खरेच आहारतज्ञ / आरोग्यतज्ञ असतात का ?
या समजांचा कुठे शास्त्रीय अभ्यास झाला / होतो आहे का? पुरेसा सँपल साइझ आणि नीट काढलेले निष्कर्ष असे?
“आयुर्वेदात म्हटले आहे” असे मोघम सर्वत्र ऐकायला येते उदा. रात्री दही खाऊ नये. अख्खा दक्षिण भारत शेकडो वर्षे रात्रीचा दहीभात खातो आहे. त्यांचा “आयुर्वेद” वेगळा असावा.
तसेच भात खाऊन शुगर/ लठ्ठपणा वाढतो तर मग सर्व दक्षिण भारतीय ढोलसाइझ असतात का ?
मुख्य मुद्दा हा की आज आपण खात असलेले अन्नपदार्थ ५०-१०० वर्षांपूर्वी उपलब्ध नव्हतेच. आजचे विरुद्ध अन्न = दही आणि fruits एकत्र असणारे श्रीखंड/ फलखंड मात्र होते.
या सर्व गुंत्याचा आणि अन्नपदार्थ, त्याकारणे होणारे रोग-त्रास यांचा cause and effect कसा समजायचा ?
काय, कसे, कधी, कशासोबत खावे -
काय, कसे, कधी, कशासोबत खावे - हे कोण आणि कसे ठरवते हे मला कधी नीट समजले नाही. >>
या समजांचा कुठे शास्त्रीय अभ्यास झाला / होतो आहे का? पुरेसा सँपल साइझ आणि नीट काढलेले निष्कर्ष असे? >>
हिंदुस्तानी संगीताचे राग विशिष्ट वेळी ऐकले की भूक छान लागते का? या विषयावर रिसर्च करायचा माझा विचार सुरू आहे. /s निष्कर्ष व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत जाहीर केले की त्याला लोकमान्यता मिळते असे ऐकून आहे.
तसेच भात खाऊन शुगर/ लठ्ठपणा
तसेच भात खाऊन शुगर/ लठ्ठपणा वाढतो तर मग सर्व दक्षिण भारतीय ढोलसाइझ असतात का?
>>>>>
हे तर मी नेहमी आम्हा कोकणी लोकांबद्दल बोलतो. आमच्याकडे जेवणात भात नसेल तर कोणाला जेवल्यासारखे वाटतच नाही. पण पोट कोणाचे सुटेल तर शप्पथ
आणि मी सुद्धा रोज रात्री दही खातो, ताक पितो. कारण दुपारचे जेवण ऑफिसला आणि रात्रीचेच घरी असते. मलाही तेव्हा रात्रीचे नको रे बाबा हाच सल्ला मिळतो. आणि मी जेव्हा काही होईल तेव्हा बघू रे बाबा म्हणत ताकाचा अजून एक घोट घेतो
काय, कसे, कधी, कशासोबत खावे -
काय, कसे, कधी, कशासोबत खावे - हे कोण आणि कसे ठरवते हे मला कधी नीट समजले नाही. >>> हे घराघरात चालत आलेलं आहे. त्या त्या भागात जे योग्य असेल ते. याचा आणि व्हॉट्स अॅपचा काहीच संबंध नाही. अलिकडे व्हॉट्स अॅप युनिव्हर्सिटी हा शब्द कुठेही वापरण्याची पद्धत आहे.
घाटावरच्या भागात भात खाण्याचे प्रमाण कमी आहे. ज्वारी, बाजरी हेच मुख्य अन्न असायचे. वरच्या एक दोन पोस्टमधे उल्लेख आहे त्याची पुनरावृत्ती.
कोस्टल एरियात भात, मासे आणि नारळ खाल्ला जातो. प्रदेशानुसार सुद्धा काय खावे हे ठरत असेल. पंजाबी लोकांसारखे जड जेवण महाराष्ट्र किंवा दक्षिणेत पचायला अवघड आहे. जिथे थंडीचे प्रमाण जास्त आहे तिथे शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी असा आहार गरजेचा असेल.
पण पारंपारिक कोणताही आहार असो, त्याच्या बरोबर शारीरीक कष्ट सुद्धा आहेत. जीवनशैली बदलल्याने कष्ट कमी झाले पण आहार तोच राहिल्याने दुष्परिणाम दिसतात.
संजय भावे सर आभार आपले.
संजय भावे सर आभार आपले.
धाग्याचा उद्देशच चुकीचे समज असतील तर खोडून काढले जावेत हा आहे.
रात्रीचं दही का खाऊ नये याबाबत टाईम्स मधलं हे आर्टिकल (व्हॉट्स अॅप नाही हे). माझाही हाच अनुभव आहे.
https://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/diet/why-y...
डॉक्टर व्ही के मिश्रा यांचं याबद्दल काय मत आहे ?
https://www.youtube.com/watch?v=6KJMe_Jepkk
<<<तसेच भात खाऊन शुगर/
<<<तसेच भात खाऊन शुगर/ लठ्ठपणा वाढतो तर मग सर्व दक्षिण भारतीय ढोलसाइझ असतात का ?>>>
अनिंद्य हा थोडा वेगळा विषय आहे. म्हणजे विरुध्दाहार ह्या आयुर्वेदिक संकल्पनेपेक्षा वेगळा. आधुनिक आहारशास्त्रतुन पुढे आलेला. भात (simple carbohydrates) खाऊन शरीरातील मेद (adipocytes) वाढतो ह्या विषयी पुरेसे संशोधन झाले आहे. हा वाढलेला मेद अ़तर्दाह (chronic low grade inflammation) आणि इन्सुलिन अवरोध (insulin resistance) निर्माण करतो. ह्या बद्दल संशोधनातुन निर्विवाद असे पुरावे मिळाले आहेत. बारीक चण असलेल्या व्यक्तींमध्येही हे होते आणि त्यांच्या आरोग्यासाठी ही ते तितकेच घातक असते. दक्षिण भारतात चयापचयाशी संबंधित विकारांचे (Fatty liver disease, hypertension, diabetes and heart disease) प्रमाण फार नाही हा पण एक गैरसमज आहे. वस्तुस्थिती तशी नाही. खरंतर हा एक स्वतंत्र लेखाचा किंवा लेखमालेचा विषय आहे.
महत्वाचा विषय. वाचतोय.
महत्वाचा विषय.
वाचतोय.
हवामानानुसार बदललेल्या आहार
हवामानानुसार बदललेल्या आहार सवयी +७८६
हवामानानुसार काय पचते आणि काय नाही हे जसे बदलते तसे एखाद्या ठराविक प्रदेशात, हवामानात ज्यांच्या कैक पिढ्या राहिल्या आहेत त्यांचे शरीर सुद्धा त्यानुसार बदलले असेलच. इकडचा नियम तिकडे असे सरसकट लावता येऊ नये.
कुठल्या पदार्थासोबत काय खाऊ नये याबाबत मात्र हवामान किंवा शरीर याच्याही आधी त्या दोन पदार्थांची आपसात काय केमिकल रिऍक्शन होते आणि त्यातून काय जन्माला येते यावर ते अवलंबून असावे असे वाटते.
महाशिवरात्रीच्या आधी बाजारात
महाशिवरात्रीच्या आधी बाजारात आलेली द्राक्षं खाऊ नयेत, हमखास बाधतात,...... Maza फळवlला म्हणाला होता की द्राक्षे द्राक्ष घेताना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर घ्या. त्यानंतर ती गोड असतात. मी नेहमी फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवdya नंतर घेते.
आताच एका आयुर्वेदावर आधारीत
आताच एका आयुर्वेदावर आधारीत लेक्चरला ऑनलाईन उपस्थिती लावली. पोदार आयु. हॉस्पिटलातले प्राध्यापक ही सिरिज करताहेत. आज ऋतुचर्या विषय होता, त्यातही द्राक्षे फेबृवारीत खावीत हे सांगितले.
दही पचायला जड म्हणुन रात्री खाऊ नये, पावसाळ्यात पचनशक्ती मंद होते म्हणुन दही खाऊ नये वगैरे वाचले.
कोकणासकट दक्षिण भारतात एकतर उकडा तांदुळ खायची पद्धत होती आणि कायम पेज वाळुनच भात खाल्ला जाई. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम झाले नाहीत. कोकणात लाल वालय भात खात. कुकरच्या आगमनानंतर पेज वाळायची पद्धत बंद झाली आणि अधिक उत्पादनासाठी संकरीत बियाणे वापरली जाऊ लागली, वालय मागे पडला. आता कोकणातही डायबेfunction at() {
[native code]
}इस, हृदयविकार, स्थुलपणा वगैरे आजार सर्रास आढळतात. तिकडच्या भाषेत शुगर हा आजार आता कोकणात खुप कॉमन आहे.
पण पारंपारिक कोणताही आहार असो
पण पारंपारिक कोणताही आहार असो, त्याच्या बरोबर शारीरीक कष्ट सुद्धा आहेत. जीवनशैली बदलल्याने कष्ट कमी झाले पण आहार तोच राहिल्याने दुष्परिणाम दिसतात>>>>>
जीवनशैली बदलली पण खाणे तेच ठेवले हाच तर मोठा प्रॉब आहे. लोक खेड्यातले अंगमेहनतीचे आयुष्य सोडुन शहरात दिवसभर खुर्चीत बसायचे जॉब करु लागले पण जेवण मात्र तेच घेत राहिले.
माझ्या एका कामाच्या ठिकाणी काही राजस्थानी कलिग्स होते. ते दुपारचा डब्बा भाजी चपातीचा आणत. एकदा मी सहज राजस्थानी थाळीचा उल्लेख केला. त्यावर ते म्हणाले की आमचे रात्रीचे जेवण आमच्या पद्धतीचे थाळी जेवण असते. दोन तिन भाज्या, फरसान, एक गोड पदार्थ वगैरे. दिवसा तितका वेळ नसतो म्हणुन रात्री कसर भरुन काढतो. हे लोक नालासोपारा, वसई वगैरे भागात राहात. पोचायला ९ वाजत, त्यानंतर जेवण. बायका घरीच असत त्यामुळे जेवण बनवले जाई पण ह्या उशिराने भरपेट जेऊन झोपण्याचा परिणाम तब्येतीवर दिसत असे. अर्थात त्याचे कारण तेव्हा माहित नव्हते.
Pages