Submitted by चेराज on 9 March, 2025 - 07:29
तिच्या स्पंदनांचे गीत ऐकता आले असते, तर बरे झाले असते.
एकल्या रात्री हळूच कुशीत सामावता आले असते, तर बरे झाले असते.
वाटा शोधता शोधता जीव भांबावून गेला नसता.
क्षणभराच्या ही निवांतीत, हृदय ओतून घेता आले असते, तर बरे झाले असते.
भल्या भावनांना जपून ठेवायला कोंदण कधी सापडलेच नाही, कदाचित सापडणारही नाही.
फक्त एकदाच का होईना, अश्रूंची किंमत जरी कळली असती, तर बरे झाले असते.
[सप्टेंबर २०२२]
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हृद्य आहे.
हृद्य आहे.
पूर्ण कविता कळली असे नाही
पूर्ण कविता कळली असे नाही (माबुदो) पण भावना पोचल्या.
भल्या भावनांना जपून ठेवायला कोंदण >> सुंदर कल्पना आहे ही.
मला वाटते मुलाने आईकरता
.
धनश्री आणि मानवदा, कविता
धनश्री आणि मानवदा, कविता वाचून प्रतिक्रिया दिली :). साडेतीन वर्षांपूर्वी "तिच्याबद्दल" लिहिली होती, पण आता एक जमाना झाला आहे. असो.
(No subject)
शीर्षक वाचून ग्रेस आठवले.
शीर्षक वाचून ग्रेस आठवले.
पण ही कविता तुमचीच आहे हे कळतं. फार deep लिहिलं आहे.
धन्यवाद भरत! डीप माहित नाही,
धन्यवाद भरत! डीप माहित नाही, अनुभवाचा भाग आहे, पण प्रामाणिक नक्कीच आहे.