Submitted by mrunali.samad on 12 November, 2024 - 09:38
किल्लीच्या धाग्यावर संदर्भ आला कि खाऊगल्ली सारखा धावूगल्ली धागा असायला हवा.. जीथे रोज कुणी काय व्यायाम केला याचा अपडेट देता येईल...
व्यायाम प्रत्येकाला नियमित केला पाहिजे हे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती होते काहीवेळा..इथे इतरांचे अपडेट वाचून कुणी मोटिवेट होत असेल तर तेवढंच पुण्य अपडेट लिहिणार्याला..
तर व्हा सुरू लोकहो.. जे पूर्वीपासून व्यायाम करताएत ते,ज्यांनी नुकताच सुरू केलाय ते आणि ज्यांना सुरू करायचाय असे, सगळ्यांचं स्वागत आहे या धाग्यावर....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हुश्श, तिथे ग च लिहीले आहे.
हुश्श, तिथे ग च लिहीले आहे.
काळजी गेली.
चला सुरुवात करते मी..
चला सुरुवात करते मी..
माझ्या व्यायामाची सुरुवात कशी झाली...
बरोब्बर १३नोव्हेंबर२०२३ ला जीम लावली..
त्याआधी २०२२ मधे दोनदा जाऊन चौकशी करून आले होते... पण लावू कि नको हे ठरवायला एक वर्ष लागलं...
त्याच्या आधी २०२० मधे योगा सुरू केला होता..कोरोना लॉकडाऊन नंतर..मार्च २०२१ पासून रोजचं चार-साडेचार किमी चालणं सुरू केलेले..
२०२२ मधे वाटायला लागले जे करतेय ते फार कमी आहे...नुसतं ऐक्टिव नाही राहायचंय..शरीर शेपमधे आलं पाहिजे..पोट फ्लाट झालं पाहिजे, स्ट्रेन्थ वाढली पाहिजे आणि फ्लेक्झीबिलीटी वाढवायची आहे..हे डोक्यात ठेवून जीम सुरू केली..
अजून २०% पण अचिव नाही केलं असं वाटतंय.. स्लो आणि स्टेडी अजून बरंच करायचंय...
सध्या आठवड्यात चार दिवस स्ट्रेन्थ ट्रेनिंग एक दिवस क्रॉसफीट एक दिवस कोअर वर्काऊट असं माझं शेड्युल आहे..रोजचा एक ते सवा तास..
आज क्रॉसफीट..
वार्मप सायकलिंग + स्ट्रेचींग १५ मिनटं.
knee push-ups, jumping jacks, knees up, side crunches, free sumo squats प्रत्येकी १०० counts.
Plank 30 sec *3
वार्मडाऊन ५ मिनटं.
सध्या आठवड्यातून दोनदा
सध्या आठवड्यातून दोनदा इलेक्ट्रिक सायकलवर येऊन जाऊन ५० किमी रनिंग होतंय. ( २५ किमी एका बाजूने. चार तास चार्जिंग झाल्यावर पुन्हा माघारी).
इलेक्ट्रिक असल्याने एफर्ट्स कमी लागतात पण व्यायाम होतो. कफ गेला.
छान आहे
छान आहे
लिहित जाईन माझे अपडेट्स.
मृ, एक नंबर र आ, भारीच की.
मृ, एक नंबर
र आ, भारीच की.
धन्यवाद ऋतुराज
धन्यवाद ऋतुराज


नवीन सायकल ऑनलाईन घेतली. घरी स्वतः जोडली. फक्त सायकलला चड्डी घालण्यासाठी दुकानात नेली होती.
र आ मस्त .
र आ मस्त .
मी व माझी पत्नी (७२ व ६८)
मी व माझी पत्नी (७२ व ६८) आठव ड्यातून ५ वेळा ३.५ किमी ४० मिनिटात कटाक्षाने चालत आहोत ( २५ वर्षां पासून)
आधी हे अंतर ४.५ किमी होते
या मुळे खूप ताजे तवाने वाटते... सकाळी ७ ते ८.३० दरम्यान हे करतो... चुकलेल्या दिवशी अपराधी वाटते.
रविवारी व गुरुवारी सुट्टी व स्टेचिंग व्यायाम....
याहून जास्त झेपत नाही.... या मुळे आम्हा उभयतांच्या गुढग्यांचा त्रास नियंत्रणात आहे... सहलीवर असताना लांब अंतरे ( १५००० स्टेप्स देखील) आरामात चालू शकतो.... माझा रक्तदाब नियंत्रणात आणि मधुमेह पूर्व साखर ६.१ वरून ५.८ वर आली आहे.
आपले शरीर आपल्याला सांगते की हालचाल करा आणि त्याचे ऐकले तर आनंद मिळतो
आज लेग डे
मस्त व्यायाम रूटिन रेव्यू सर..
आज लेग डे
वार्मप सायकलिंग + स्ट्रेचींग 15 मिनटं
वीथ बार sqauts,sumo sqauts,lunges 20*3
Leg press 20*3
Leg curl 20*3
आणि दोन लेग मशीन १०*3 with 40kg plates
Calf raises 15*3
Plank 35sec *3
वार्मडाऊन 5 मिनटं.
रेव्यु, मस्त! या वयातही
मृणाली, तुम्ही ग्रेट आहात. अगदी प्रेरणादायी.
रेव्यु, मस्त! या वयातही स्ट्रेंग्थ ट्रेनिंग गरजेचे आहे. जोडीला बॅलन्स आणि फ्लेक्झिबिलिटी सुद्धा.
असे व्यायाम शिकवणारं एक फेसबुक पेज आहे. https://www.facebook.com/talkingwellness
आणखी एक आहे. ते शोधून देतो.
https://www.facebook.com/growyoungfitness/
माझा सध्याचा फंडा - फार उच्च लक्ष्य न ठेवता झेपेल तितका व्यायाम करायचा. सध्या सातत्य टिकवणं महत्त्वाचं वाटतं. या वर्षात दोन मोठे ब्रेक्स झाले.
र. आ. व इतर...
र. आ. व इतर...
बाहेर जाऊन दररोज सायकल चालवायला जमत नसेल, ट्रॅफिक/उन्ह-पावसाचा ताप असेल तर घरच्याघरी सायकल चालवण्यासाठी ही ॲटॅचमेंट आहे..
(स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी असलेली माॅडेल्स महाग आहेत कारण यात Training/Ultimate Fitness साठीची पण सेटिंग्ज आहेत)
https://bumsonthesaddle.com/products/magene-t110-electronic-direct-drive...
https://www.decathlon.in/cycle-accessories/turbo-home-trainers-18166?id=...
अनिरुद्ध
अनिरुद्ध
घरातल्या घरात चालवायची सायकल स्वस्तात मिळते.
हो पण तीच सायकल तुम्ही
हो पण तीच सायकल तुम्ही रस्त्यावर नाही चालवू शकत
घरातली सायकल नंतर कपडे वाळत घालायचा स्टँड होते
यांच्यात अजून स्वस्त मिळतात,
यांच्यात अजून स्वस्त मिळतात, सेकंड हँड सुद्धा मिळतात
मी असाच एक 2500 ला घेतलाय, पावसाळ्यात मी माझी सायकल त्याला लावून सराव करतो
इतर वेळेला रस्त्यावर
बेस्ट प्रोडक्ट
Submitted by आशुचँप on 13
Submitted by आशुचँप on 13 November, 2024 - 16:02 >> समजलं नाही.
मला एक सायकल घ्यायची आहे ५०k
मला एक सायकल घ्यायची आहे ५०k बजेट आहे कुठली घेऊ?
घरातली सायकल नंतर कपडे वाळत
घरातली सायकल नंतर कपडे वाळत घालायचा स्टँड होते

>>>>
अगदी अगदी
आमच्याकडे आहे असा एक स्टँड.. पण मुले धडपडली एकदोनदा तर मी नेऊन तिला स्टोअर रूमच्या बाल्कनीत टांगली.
अर्थात ज्याना खरेच व्यायामाची आवड आहे पण बाहेर सायकल चालवणे शक्य नाही त्यांनी ती योग्य विचार करून घ्यायला हरकत नाही. पण आळसावर उपाय/पर्याय म्हणून घेतले तर हेच होणार.
माझा हा आठवडा रोज सकाळी १ तास
माझा हा आठवडा रोज सकाळी १ तास व्यायाम (its a fitness class that I go to) आणि सन्ध्याकाळी पाउण ते एक तास walk.
शुक्रवार , शनिवार , रवीवार क्लास नसतो. तेव्हा १ दिवस टेकडी आणि at list 2/3 वेळा walk हे जमवायचे आहे.
या आठवड्याचे चार दिवस मेडन
या आठवड्याचे चार दिवस मेडन गेले. येत्या तीन दिवसात कोटा पूर्ण करायचा आहे.
भरत सर असं काही नाही ओ.रूटिन
भरत सर, थँक्यू, असं काही नाही पण .. रूटिन चा एक भाग झाला पाहिजे व्यायाम हे डोक्यात आहे फक्त.
आज वार्मप सायकलिंग+स्ट्रेचींग १२ मिनटं.
बेंच प्रेस तीन टाइप्स वीथ डंबेल ५-५kg 20*3
4 machines workout 20*3
Plank 30sec*3 कालच्या लेग वर्काऊट नंतर प्लांक करताना पाय लटपटायला लागले म्हणून आज ५सेकंद कमी झाले कालपेक्षा...
वार्मडाऊन ५ मिनटं.
2014 मध्ये भाग मिल्खा भाग
2014 मध्ये भाग मिल्खा भाग आईने चित्रपट गृहात नेऊन दाखवला व नकळत उत्तम आरोग्याचे बीज मनात पेरले. आई बाबा(वय 55व59)गेले 10 वर्षे (2014जे आज) सकाळी 5 वाजता उठून 20-30जणांच्या योग ग्रुपला व्यायामास जातात. रूटीन बनल्याने अतिशय फायदा. ते या वयात solo आणि dual ट्रीप करतात. काश्मीर खोरे, chang la करताना व्यायामाने त्यांना साथ दिली.
मी 2014 पासून भारतीय व्यायामाच्या मागे लागलो 6 महिने कष्ट करून 5 deeps, जोर मारू लागलो. ठरवलेले 100 deeps + जोर हे लक्ष्य 3 वर्षानंतर जून 2017 मध्ये साध्य झाले. मग शरीर चांगलं athelete बनल. याला ब्रेक लागला तो दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत 2018 मध्ये. पुढे शरीर पूर्ण सुस्त/ बेढब झालं. वजन वाढलं. लॉक डाऊनने व्यायामाची सवय गेली. काम/wfh ने वेळ काढताच येईना. 2021 पावसाळ्यात चालण्या पासून सुरुवात केली. सोबत कृष्णेत पोहणे, फुटबॉल खेळणे जोडले.
काम, प्रवास रूटीन ला छळतो नेहमी. व्यावसायिक, घरगुती खाणे व आईचा आग्रह diet तोडते, तरी जुन्या उमेदीने पुन्हा भारतीय व्यायाम, योगासने, प्राणायाम चालू ठेवतो.
एक सूत्र लक्षात आले. रूटीन बिघडते, पण ते मी मनाला लावून घेणे सोडले. पुन्हा पुन्हा, जितका जमेल तितका आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि जो जमेल तो व्यायाम प्रकार चालू ठेवतो.(मिलिंद सोमण हेच म्हणतो, वेळ मिळेल तेव्हा काही जमेल ते करा, अगदी 5 मिनिट ही चालेल.)
धाग्याचा प्रतिसाद काउंट
धाग्याचा प्रतिसाद काउंट वाढवायला.
मी रोज सकाळी स्ट्रेचिंग + मग १/२ बॉडी पार्ट्स साठी स्ट्रेंग्थ एक्सरसाइज + मग ब्रह्मविद्या - श्वसन + हालचाली. Tai chi सारखं.
या आठवड्यात दर तासाला ४०० पावलं चालाय ला सुरुवात केली. आणि 8 fit मधलं एक सेशन सुरू केलं. डिफिकल्टी लेव्हल वाढवायची नाही. त्यामुळे एक सेशन तीन दिवस करतोय. आज दुसरं सेशन केलं.
काल knees and hips. आज chest and ankles.
काल ५५३८ पावलं.
चांगला धागा आहे की.
चांगला धागा आहे की.
रेग्युलर व्यायामासाठी मदत होईल.
भरत ब्रह्मविद्या श्वसन बद्दल थोडं अजून सांगणार का?
काय वेगळेपणा? काय फायदे जाणवतात?
किती वेळ वै
रोज सकाळी एक आड एक दिवस
रोज सकाळी एक आड एक दिवस सूर्यनमस्कार, योगासने आणि जोर बैठका असा वीस मिनिटाचा व्यायामाचा शिरस्ता आहे. आणि त्यानंतर दहा मिनिटं शवासन किंवा योगनिद्रा आणि रोज संध्याकाळी कमीत कमी ४० ते ५० मिनिटे वेगवेगळ्या परिसरांमध्ये चालायला जाणे.. कधी टेकडीवर , कधी सोसायटीच्या शांत गल्यां मध्ये तर कधी महानगरपालिकेने तयार करून दिलेल्या वॉकिंग ट्रॅक वर.
आणि या सगळ्याबरोबर जमेल तसं सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास शास्त्रीय संगीताचा गायनाचा रियाज हा एक मोठा प्राणायामच असतो....
हे सगळे चालू असले की रात्री झोपताना समाधानी असण्याचा फील येत राहतो.
मी १ जानेवारीला व्यायाम सुरू
मी १ जानेवारीला व्यायाम सुरू करणार आहे.
रोज ३०-४० मिनिटे जिम सकाळी +
रोज ३०-४० मिनिटे जिम सकाळी + ३० मिनिटे वॉक संध्याकाळी - ३ महीने झाले. छान चालू आहे. वजन २५ पौंडस कमी झाले आहे.
इट फील्स ग्रेट.
आयुष्यात कधीही कोणी मला चेक आऊट केलेले नाही. पण आता करतात किंवा माझ्या लक्षात तरी येतय
आज अप्पर बैक ७ वेरीएशन्स २०*३
आज अप्पर बैक ७ वेरीएशन्स २०*३
वार्मप १२ मिनटं.
वार्मडाऊन ५ मिनटं..
आज प्लांक ४५sec*1, 40sec*2.
मी पण बऱ्यापैकी नियमितपणे
मी पण बऱ्यापैकी नियमितपणे (See what I did there? :)) व्यायाम करतो. इथे अपडेट्स देत जाईन.
आज सकाळी सिंहगड चढाई (वेळ ७० मि. वर जायला - ५० मि. उतरायला)
काल ६२७२ पावलं झाली. रात्री
काल ६२७२ पावलं झाली. रात्री घरी परतायला उशिर झाल्याने आज फक्त स्ट्रेचिंग + ब्रह्मविद्या. पण हे असं जुम्मे के जुम्मे होतं आहे. Back and abs चे व्यायाम राहून जातात. आज संध्याकाळी तरी करायला हवे.
झकासराव, ब्रह्मविद्येने श्वसनाचे महत्त्व कळले. आपण खोल आणि दीर्घ श्वास घेत नाही. पूर्ण उच्छ्वास करत नाही. त्यामुळे फु फ्फुसे पूर्ण क्षमतेने वापरली जात नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे.
व्यायाम प्रकारांत प्राणायाम आहे (अनुलोम - विलोम). काही व्यायाम प्रकार घेतलेला श्वास रोखून करायचे आहेत. एकात उच्छ्वास सोडून श्वास न घेता करायचं आहे. एक दोन मध्ये श्वास घेत आणि सोडत ठरावीक हालचाली आहेत. हालचाली (हात, मान, कंबरेतून ) सावकाश करायच्या आहेत.
श्वसनासोबत मला स्ट्रेचिंगचाही लाभ जाणवतो. सांधे मोकळे होतात. व्यायाम करताना त्यावर पूर्ण फोकस करता आला, तर मेंदूची तेवढा वेळ मल्टिटास्किंगमधून सुटका होते.
एक कोर्स २२ आठवड्यांचा असतो. आठवड्यातून एक दिवस. व्यायाम+ ध्यान. जानेवारी आणि जुलैमध्ये नव्या बॅचेस सुरू होतात.
धन्यवाद भरत
धन्यवाद भरत
त्यांची जाहिरात पाहिली आहे वर्तमानपत्रात
पण काही माहीत नव्हते म्हणून विचारले.
ह्यावेळी बघतो संपर्क करून.
सामो ग्रेट
25 pounds मोठी अचिव्हमेंट आहे
Pages