महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी का घसरत आहे?

Submitted by ashokkabade67@g... on 28 April, 2024 - 05:18

देशात पुरोगामी राज्य म्हणून गौरविण्यात आलेल्या महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार उदासीन दिसून येत असुन मतदानाकडे जवळपास बहुसंख्य मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे आणि हे खऱ्या लोकशाहीला मारक आहे .
मतदारांचा लोकशाहीवर असलेला विश्वास तर ढासळला नाहीना असाही प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे का ?याला कारणीभूत कोण आहेत सत्ताधारी की विरोधक का फक्त सत्ताजीवी असलेले तत्वहिन नेते या प्रश्नांची उत्तरे शोधयलाच हवित तरच लोकशाही टीकेल .
महाराष्ट्रातील विरोधीपक्ष नेत्यांवर विषेशतः अजीत पवारांवर स्वतः पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आणि ईडीला घाबरत अजीत पवार पक्षच घेऊन पळालेत
त्याआधी युतीसरकारच्या सोबत मंत्री असतांना भाजप व फडणवीस यांच्या त्रासाला कंटाळून मंत्रीपदाचा राजिनामा खिशात घेऊन फिरणारे शिंदे त्यांच्या सीएची ईडी चौकशी सुरु होताच रात्रीच्या अंधारात वेष बदलून काळोखात काळा चश्मा लावत फडणवीसांनी शिंदेना गाठीभेटी घेत ईडीच्या त्रासातुन सुटकेचा मार्ग दाखवला आणि तेही जेल पेक्षा भाजपची सोबत बरी म्हणत गुजरात व्हाया गोव्हाटी करत शिवसेना पक्षच पळवला त्यानंतर बऱ्याच काळ खोके बोके प्रकरण चालु होते म्हणजे शरद पवार वा ठाकरेंसोबत उरले ते स्वच्छ नेते ज्यांना ईडीची भिती वाटली नाही लोकसभा निवडणुकी जाहीर झाली नी एका पक्षान तिकीट न दिल्यान नाराज मंडळीच्या बेडुक उड्या सुरु झाल्यात जनता आता कुठल्याही पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास ठेवायला तयार नाही एका पक्षाच्या उमेदवारांना मत द्याव नी निवडूण येताच त्याने सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षात उडी घ्यावी याला आता जनता कंटाळली आहे पण हे लोकशाहीला मारक आहे आणि याला फक्त सत्ताजिवी नेतेच कारणीभूत आहेत .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या मते गेल्या वेळी एकूण मतदारांपैकी जेव्हढ्या लोकांनी मतदान केले, त्या प्रमाणात या वेळी लोकांनी मतदान केले नसल्याने मतदानाची टक्केवारी घसरली. चुभूदेघे.

(बहुधा) मी सुद्धा यावेळी मतदान करणार नाहीये..
कुणाला मत दिले की कुणाला जाणार याची मला खात्री नसल्याने माझी सुट्टी आणि वेळ खर्च करायची इच्छा नाही.
ते नोटा वगैरे बिन्फायद्याचे उपद्व्याप करायची सुद्धा गरज वाटत नाही.

"Every vote counts."
If it was true then they would not have allowed us to vote.
मी अभिमानाने सांगू शकतो कि मी एकदाही मतदान केलेले नाही. त्यामुळे देशाच्या सद्यस्थितीला मी जबाबदार नाही. ही मोठी सुखद जाणीव आहे.

केवळ महाराष्ट्र नाही, आतापर्यंत झालेल्या सगळ्या ठिकाणच्या मतदानाची टक्केवारी घसरली आहे

ऊन!

टक्केवारी घसरणे हे चित्र चिंताजनक आहे. उन्हाचे दिवस हे एक महत्वाचे कारण आहे. पण तेच एक कारण नसावे.

मुक्त आणि निष्पक्ष वातावरणांत निवडणूक होणारच नाही असा अनेकांचा समज झालेला आहे आणि तो किती खरा आहे हे दररोज दिसत आहे. सुरत मधे लाखो मतदार आहेत, त्यांना आज मतदान करायची अवशक्ताच नाही. त्यांचा खासदार निवडीचा हक्कच हिरावला गेला आहे.

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती करणार्‍या समितीमधे तीन लोक आहेत. पंतप्रधान, पंतप्रधानांनी नेमलेली व्यक्ती ( एखादा केंद्रातला मंत्री), विरोधी पक्षाचा नेता. म्हणजे आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत सर्व अधिकार एकाच व्यक्तीकडे ठेवले गेले आहेत. येथे विरोधी पक्ष नेत्याला दहा मिनीटे आधी ( short list नावांची) यादी दिली गेली होती.
https://indianexpress.com/article/political-pulse/adhir-ranjan-chowdhury...

आयुक्तांच्या निवड समिती मधे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि समिती संतुलित दिसत होती. आता सुधारणा करण्याची संधी मिळाल्यावर घटनेत दुरुस्ती केली आणि सरन्यायाधिशांच्या जागी पंतप्रधानांनी " नेमलेला " केंद्रातला एक मंत्री बसविला. किती हास्यास्पद आहे हा बदल? निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याची ऐतिहासिक संधी मिळाली होती पण संधी वाया घालविली.

आज निवड़णूक आयोगाला पाठिचा कणा राहिलेला नाही. आयोग स्वातंत्रपणे, स्वायत्तपणे, निष्पक्षपणे काम करु शकत नाही अशी परिस्थिती आहे.
निवड समितीची रचनाच लोकशाहीला मारक अशी करुन ठेवली आहे. हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

निवडणूक आयोग किती निष्पक्षपणे /स्वायत्त पणे काम करतो यावर निवडणूक प्रक्रियेचा दर्जा ठरतो.
२०१९ मधे निवडणूक आयोगासमोर आलेल्या सर्व तक्रारीं मधे सत्तधारी भाजपाला झुकते माप दिले गेले , बहुतेक तक्रारी २-१ अशा मताने फेटाळल्या गेल्या. ज्या आयुक्तांनी वेळोवेळी विरोधी मत नोंदवले होता त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला पुढे त्रास दिला गेला.

शिवसेनेला " जय भवानी... हिंदू " वापरांस बंदी पण भाजपाला " जय श्री राम... हिंदू... " मोकळे पणाने वापरता येते. तोंड उघडल्यावर मुस्लीम द्वेष येतो पण कळसुत्री आयोग काहीच करु शकत नाही. ज्यांनी नेमणूक केली आहे त्यांच्या विरुद्ध बोलायला धाडस लागते.
https://www.indiatoday.in/elections/lok-sabha/story/election-commission-...

AAPला कुठल्याशा कविते बद्दल आयोगाने बदल करण्यास सांगितला आहे. काय आहे आपची कविता? सर्व सत्य परिस्थितीचे वर्णन केले आहे. केजरीवाल अटक प्रसंगाचे फोटो आहेत, ED/ CBI च्या अटक सत्रांबद्दल आहे. कवितेमधे काही unverified असे आहे का?
https://economictimes.indiatimes.com/news/elections/lok-sabha/india/here...

पुलवामा स्फोटांत मरण पावलेल्या जवानांच्या त्यागाचे उल्लेख करत मतांची भिक मागणारे भाजपे आणि केजरीवाल यांच्या अटकेचे फोटो वापरणारे आपचे कार्यकर्ते फरक करायला हवा.

धर्माच्यानावाने मत मागणारे, धार्मिक द्वेष पसरविणारे एकाच पक्षाचे आहेत पण निवडणूक आयोग अशा सर्वच प्रसंगांत डोळ्यांवर काळी पट्टी लावतो, कान बंद करतो, आणि तोंडावर बोट ठेवतो - गोष्टीमधले तीन माकडे डोळ्यासमोर येतात.

एक स्वायत्त आयोग असायला हवा पण आज सत्ताधार्‍यां च्या हातातले कळसुत्री बाहुले बनले आहे.

आयुक्तांच्या निवड समिती मधे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश...>>> असते तरी त्यांनी काय दिवे लावले असते? अभिनंदन! तुमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे.
आमचा मात्र सुप्रीम लीडरवर विश्वास आहे. होपफुली जून २०२४ नंतर हे "लोकशाही लोकशाही. विश्वातील सगळ्यात मोठी " हे नाटक बंद होईल.