अदृष्ट

Submitted by अनन्त्_यात्री on 9 April, 2024 - 09:19

दिशाकोन ढळले सावरले,
अथांग उरले
रेणुबंध खिळखिळले जुळले,
अजोड उरले
नक्षत्रे विझली झळझळली,
ओजस उरले
चित्रलिपी अडली उलगडली,
अव्यक्त उरले
अज्ञेयाच्या उंबरठ्यावर ज्ञात थबकले,
अदृष्ट दिसले.

Group content visibility: 
Use group defaults