प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बीचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।

Submitted by चामुंडराय on 7 April, 2024 - 09:04

डूआयडीचे आठवावे लेख । डूआयडीचा आठवावा ताप ।
डूआयडीचा आठवावा प्रतिसाद । माबोमंडळी ।।१।।

डूआयडीचे कैसें लिहिणें । डूआयडीचे कैसें पिंकणें ।
डूआयडीचे काडी टाकणे । कैसें असे ।।२।।

मुळायडीचा केला त्याग । म्हणोनि साधिजें ट्यार्पीचा योग ।
जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।।

वापरावे विविध आयपी । तेव्हा मिळे डूआयडी ।
वापरावे फेक आयडी । पाडण्या जिल्बी ।।४।।

सकल डूआयडी आठवावे । फेकायडी डिलीटवत् मानावे ।
आंजालोकी माबोलोकी उरावे । पिंकरूपें ।।५।।

प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू ।
अखंड जिल्बीचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।६।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users