शब्दाएवढा दाणा

Submitted by पॅडी on 13 March, 2024 - 03:46

कलंदर आयुष्याने ठेवला
हातावर शब्दाएवढा दाणा
म्हटला असू दे गाठीपदरी
जगायला एखादा बहाणा

हळूवार हातांनी रुजव
पाहून सुपीक काळी माती
सावली धरेल सांजसकाळ
जेव्हा गळून पडतील नाती

ह्यात दडलीय भविष्याची हाक
उफानत्या सागराची गाज
हुरड्यात आल्यावर कणीस
फिरवून फिरवून खमंग भाज

कैकदा आडवे येतील लोभ
वधारल्यागत वाटेल भाव
तेव्हाही फुलाफळांवर भागव
घालू नकोस मुळांवर घाव

सजग सावध काटी-कुपाटी
थोडा चोरा - ढोरांचा बंदोबस्त
जरा कुठे गाफील राहिल्यास
व्हायचे उभे आयुष्य फस्त..!

ढगाळो नभ; पसरो काळोख
ऋतूंवर पक्का भरोसा ठेव
फुलोर पाहून वाऱ्यालाही
येतच असतो माजोरा चेव

जगरहाटी वेंगाडेल तोंड
हसेल-फिस्कारेल किरटे गाव
तरी उद्याच्या तरतुदीसाठी
मनात कवितेचे झाड लाव

खूप नको काही खतपाणी
अन् वेळच्यावेळी मशागत
तणकटाच्या सानिध्यातही
उगतो - तगतोच तथागत...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली
फु स थोडं थांबत थांबत कविता टाकत चला म्हणजे सगळ्यांकडून वाचल्या जातील

Hi yes take a break . Travel or have an ice-cream with kids. Bring flowers to the wife.

>>>>>yes take a break . Travel or have an ice-cream with kids. Bring flowers to the wife.
या गोष्टी व कविता लिहीणे हे म्युचुअली एक्स्क्लुझिव्ह नाही. दोन्ही एकत्रच जमेल इन फॅक्ट! आयुष्य जगण्यातूनच कविता उमलेल.

Hi I love all your poems. It must be tough for you to be at that level of intensity all the time. Do post. Much love and take care.

सामो - मन:पूर्वक आभार आपले. With due respect, I always look forward to your exclusive comments .. बाकी - " आयुष्य जगण्यातून कविता उमलेल " एकदम झकास!!
Happy

अश्विनीमामी, Gratitude! Touched by your words... Thanks tons again....!!
As for the intensity; I shall share that secret in my next poem.....HAHAHAHA...

खूप छान कविता. आवडली.
वरच्या प्रतिसादांशी सहमत. थोडं थांबून थांबून इथे टाका कविता. इतक्या चांगल्या कविता वाचता वाचता आमची दमछाक होते आहे. काही चांगल्या अश्याच खाली दुर्लक्षित राहतील अश्याने.

हरचंद पालव जी - आभार! और आपका हुकुम सर आंखो पर...
बाकी , कविता लिहताना जेवढी दमझाक होत नाही त्याच्या कैकपट ती वाचताना होते ह्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे!!

कविता लिहताना जेवढी दमझाक होत नाही त्याच्या कैकपट ती वाचताना होते ह्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे! >> Lol Lol

तुम्हाला राग आला असेल तर सॉरी.