जलराशी

Submitted by सामो on 8 March, 2024 - 12:01

कुंडलीमधील, जलराशीच्या आधिक्याबद्दल काही विस्कळीत विचार मांडायचे आहेत.

कर्क ही पहीली जलरास. मूडी , प्रचंड मूडी. नंतर येते वॄश्चिक, ब्रुडी, मनात खदखद, बाहेर शांत पण मनात वादळ. तीसरी आहे मीन. हां मीन मला नीट कळत नाही. कारण कदाचित एकही ग्रहं त्या राशीत नाही म्हणुन असेल किंवा का माहीत नाही पण ती रास सतत गूढ (इल्युसिव्ह) राहीलेली आहे. तर एक ग्रह कर्केचा व चार वृश्चिकेचे. जलराशीचे आधिक्य कुंडलीत आहे.
--------
मूड डिसॉर्डर , मूडीनेस हा त्याचाच भाग असावा. पावसाळी हवा आणि गलबलून येणारा मूड - https://www.maayboli.com/node/75487 याचेही तेच कारण असावे. खूपदा असं कोमल, मऊ मऊ वाटतं. म्हणजे कमळासारखं. हृदय कमळ असल्यासारखं. soulful. अनिस निन ची पुस्तके वाचली असतील तर तुम्हाला सरीअल म्हणजे काय ते कळेल. तिच्या गोष्टीमध्ये एक फ्रेम संपून , दुसर्‍या फ्रेममध्ये आपण कधी प्रवेश करतो ते कळत नाही. म्हणजेच स्वप्नवत. असं सबकॉन्शस किंवा मनाच्या अमूर्त पातळीवर काहीतरी घडत असतं तिच्या कथेत. ह्म्म्म!! फेब्रुवारी २१ (मीन रास) इतकेच नाही तर सूर्य+बुध+शनि+नेपचून मीन राशीत. तिचे पुस्तक वाचल्यानंतर मी तिची कुंडली जालावरती शोधली होती. याउलट मला, फार माहीतीपूर्ण, बौद्धिक असे लेख, चर्चा, वादविवाद म्हणजे वायूराशीचे जरा (नव्हे बरेच) वावडेच आहे बरं का. पाणी आणि हवा कधीही नांदा सौख्यभरे - असत नाहीत, असणार नाहीत. हां मला बुद्धीप्रधान लोकांचे आकर्षण वाटते पण त्यांच्याबरोबर कोप अप करता येइल, असे कधीही वाटत नाही. तसे होतही नाही.

खूपदा अशी प्रवाही भावावस्था(मूड) स्ट्राईक झ)ली की मग मी बेचैन होते. मला ओव्हरव्हेल्मिंग होते. कळत नाही काय करावं. आणि एकदा यावरती हमखास उपाय सापडला. सरळ 'दुर्गा सप्तशती' चे पुस्तक उघडणे व तिच्या कुशीत शिरणे. एक एक स्तोत्र वाचताना, विलक्षण शांती अनुभवास येते.

ॐ सती साध्वी भवप्रीता भवानी भवमोचनी ।
आर्या दुर्गा जया चाद्या त्रिनेत्रा शूलधारिणी

दुर्गा शतनाम स्तोत्रामधील, प्रत्येक नाव निव्वळ अमृताची पखरण मनावर करतं. अर्गला स्तोत्र, रात्रीसूक्त, चंडीपाठ, कुंजिका स्तोत्र, कीलक - एक एक स्तोत्रं असं आईने मांडीवर घ्यावं, लाड करावेत तसं अनुभव देत जातं. आणि हा गुणधर्म ना विष्णूस्तोत्रांत सापडतो, ना शिवस्तोत्रात ना गणपती किंवा हनुमान स्तोत्रांत. त्या मूडमध्ये दुर्गास्तोत्रेच काम करता. म्हणजे एखाद्या गोष्टीचे जसे साखरेचे व्यसन लागले की कसे साखरच आठवते, तशी ही त्या विशिष्ट भावास्थेमध्ये ही स्तोत्रेच बोलावु लागतात.

अप्रौढा चैव प्रौढा च वृद्धमाता बलप्रदा ।
महोदरी मुक्तकेशी घोररूपा महाबला

देवीचे 'Crone' अर्थात वृद्धमाता, कालरात्री हे रुप माझे सर्वात लाडके. कुमारिका नाही, मातृरुप नाही तर हे आहे देवीचे, प्रगल्भ आणि वयोवृद्ध, तपोवृद्ध , ज्ञानसंपन्न असे रुप. स्त्रीच्या आयुष्यात हा टप्पा येतो जेव्हा तिचा मासिकधर्म संपलेला असतो, निव्वळ रुप-तारुण्य सोडून तिच्याकडे अन्य देण्यासारखे भरपूर असते. wisdome, ज्ञान, शहाणीव (?), शहाणपण. मला हे रुप पूर्वीपासूनच सर्वाधिक लोभस वाटते, आदरयुक्त वाटते. अशा मेडीटेटिव्ह, तंद्रायुक्त (?) मूडमध्ये मग मी केवळ या रुपाचा शोध घेत रहाते.

ऐंकारी सृष्टिरुपायै र्‍हींकारी प्रतिपालिका ॥
क्लींकाली कालरुपिण्यै बीजरुपे नमोऽस्तु ते

सृजनशील, पालनतत्पर रुप तसेच भद्रकालीचे संहारक रुप. किती रुपांचे चिंतन करावे, किती रुपांमध्ये त्या अदिशक्तीस पहावे, त्याला मर्यादा नाही. पण अंतर्मुख झाले की सहज तिच्यापर्यंत पोचता येते. ती आपल्या आसपासच असते.

हे असे सर्वांना होते का ते माहीत नाही. होत असल्यास आपापल्या कुंडलीत जरुर डोकावुन बघा व कळवा की जलराशीची आधिक्य आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीन वाले गुरुच्या सहवासात, चिंतनात रमणारे असावेत. आपण बरे, आपलं ध्यान बरं हा विचार. वादविवादात शिरत नाहीत.
वृश्चिकचे वर्णन बरोबर. आतला विचार पक्का असतो, बोलून दाखवत नाहीत पण कृतीत दिसतात.
कर्क वाल्यांना प्राणी वश असतात. कुटुंबात यांचा दाब असतो.