चित्रावरून लिखाण: घरटं !

Submitted by छन्दिफन्दि on 8 March, 2024 - 03:13

दुसरीच्या वर्गाची पालकसभा संपतच आलेली, तेव्हढ्यात “आता ह्या वेळचा प्रोजेक्ट म्हणजे मुलांना एक घरट बनवायचय ..” , बाईंच्या ह्या घोषणेने एकदम शांतता पसरली.
“ काय? घरट… ?? खऱ्या खुऱ्या पक्षा सारखं..” अशी प्रश्न मंजुषा मनात तयार होतेय तोच, वर्गाच्या मागच्या बाजूला जरा कुज बुज सुरू झाली, आणि लगेचच “ उह .. आह… वा..” असे उद्गार ऐकू आले, म्हणून मागे वळून बघितलं तर एका पालकांनी एक घरटच बाहेर काढलं होत
फिकट पिवळट सुकलेल्या गावापासून ( चाऱ्यापासून) बनवलेलं. गवताच्या काड्या गोल गोल करून एकमेकांत गुंफलेल्या.. इतकं सुबक दिसत होत ते..अगदी चित्रातल्या सारखं. क्षणभर वाटलं कुठल्या पक्षाचही इतकं सुंदर घरट बांधलेलं नाही बघितलय कधी .
इकडे बाईंच्या चेहऱ्यावर तर कौतुक ओसंडून वहात होत, इकडे त्या पालकाच्या अंगावर मूठभर (कसलं चांगल मणभर) मास चढलेलं.. “
ते घरट बघू, बाईंचा हर्षभरीत चेहरा बघू, की ह्या जग जिंकल्यासारखा चेहरा केलेल्या पालकाला बघू असं झालं..
त्या पलकाना शिंग बिग आहेत की काय आणि बाईंकडे एखादा जादूचा दिवा. “घरट बनवा” म्हणायचा अवकाश.. लगेच घरट हाजिर..
“ अगदी अस्सच … “, इति बाई.
अगदी बघवेना, ऐकवेना, अहो दुसऱ्याच्या डोळ्यातलं तिसर्यासाठीच कौतुक कुणाला बघवतय.
ह्या अति जागरूक पालकांचा अस्सा राग येतो ना, जिकडे तिकडे पुढे पुढे करतात.. आज तर कहर केला ह्यांनी.. काही दुसर आयुष्यात आहे की नाही ह्यांच्या..
ह्यांच्यामुळे आपल्याला बाईंच्या लाडक्या पालकांच्या ग्रुप मध्ये घुसता येत नाही…जाऊ दे आता हा तरी प्रोजेक्ट नीट करूया म्हणजे निदान नावडत्या लोकांच्या ग्रुपमध्ये तरी जाणार नाही.. हे आणि असे कित्येक विचार घोंगावत होते.
आत इतका डोंब उसळलेला असताना बाहेरून चेहऱ्यावर हसू ठेवत कौतुक करायचं ह्या कसरतीने थकून गेले त्यामुळे लगेचच काढता पाय घेतला.

***
“अग तो तबेला आहे ना तिकडेच मिळाला..”
“ हो..का??”

आता ह्या तबेल्यात काय आणायला गेलेल्या.. अरे देवा गवत… चारा… ओ नो.. घरट बनवायचय..
मी सपशेल विसरून गेले.. काय आई आहोत आपण.. अगदी कुचकामी..
आता कसलं गवत आणि कसला चारा?
तसही कधी तरी झाडावर, वळचणीला बांधलेली घरटी काड्यांचीच असतात..
आपणही आपल तसच realistic बनवू.. पटापट काड्या एकमेकांवर रचू की झालं घरट “ हाय काय नी नाय काय?”

तशीच तडक घरी आले, लेकाला खाली पिटाळल, “ भरपूर काड्या गोळा करून आण.. आपल्याला घरट बनवयाचय.. “

बाजूला मोठा काड्यांचा ढीग घेऊन बसलो दोघं..
एक जुना डबा घेतला, त्यात वेग वेगळ्या प्रकारे काड्या रचून घरट बांधणी सुरू केली.. पण काही सुधरेना...उलटपक्षी प्रत्येक सरत्या अपयशी प्रयत्नाबरोबर अजून अजुन चिडचिड होत होती.. जमत नाही म्हणजे काय..
डोक्यात बाकीच्यांनी कस केलं असेल, त्यांची सुंदर सुंदर घरटी आणि आपलंच हे अस.. ते तरी बनणारे का आता..
तास दीड तास जुंपल्यावर एका क्षणी सगळा धीर सुटला, “काय पण प्रजेक्ट दिलाय? मुलांना म्हणून देतात आणि शेवटी सगळं पालकांच्याच गळ्यात पडत. हे लोकं तरी ती घरटी स्वतः बनवतात का कुठून विकत आणतात देव जाणे. आपण तरी काय आहोत हे एक साधं छोत घरट ही बांधता येऊ नये आपल्याला टण टण टण.. “ माझं टीकास्त्र सुरू झालं..
तसं इतका वेळ शांतपणे बसून ते घरट बनविण्याचा सर्वतो परी प्रयत्न करणाऱ्या साडेसात वर्षाच्या मुलाने माझा तो सगळा त्रागा बघितला. पण जराही विचलित न होता निरागस चेहऱ्याने त्याने प्रश्न विचारला, “ आई, ते पक्षाच घरट असतं, ते आपल्या पिल्लांच्या सुरक्षितते साठी बांधतात ना, मग ते इतकं साधं सोप्प कस असेल.. आणि आपल्याला ते लगेचच कस जमेल..?”
त्या बोलानी मी एकदम गप्प झाले. दीर्घ श्वास घेतला.
किती खर बोलतोय हा, मी कुठल्या भ्रमात होते, कुठली झापड डोळ्यांवर बांधून पळत होते, कशासाठी हा अट्टाहास.. खर तर येव्हाढासा जीव, एवढीशी चोच तरी निगुतीने आपल्या लेकरासाठी निवारा तयार करतात, केव्हढ
मोठं ते निसर्गाचं वरदान आणि चमत्कार, त्याच कौतुक करायचं सोडून मी काय करत होते? स्पर्धा? त्यांच्या कौशल्याला कमी लेखत स्वतःचा वरचष्मा दाखवायचा होत का?? काही तरी चुकतंय..
हळूचकन म्हणाले, “ अगदी बरोबर आहे तुझं. मला वाटतं आपल्याला जसं जमेल तस आणि तेवढं केलंय की आपण घरट तयार.. तू घेऊन जा हे उद्या शाळेत.”

विस्मरणात गेलेल्या बहिणाबाईंच्या ह्या ओळी मग अचानक ओठी आल्या..

पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा
तिची उलुशीच चोच
तेच दात तेच ओठ
तुला दिले रे देवान
दोन हात, दहा बोट..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!!!
पूर्वी घराच्या खिडक्यांना जाळ्या नसायच्या तेव्हा घरात.. माळ्यावर सापडायची घरटी.

माझ्या घरी एक परम नंट घरटे स्पॉट आहे पण जमिनी वर वॉशिन्ग मशिन च्या मागे. तिथून एक बॅच बाहेर पडली आहे. मे त्या कबुतर बाळाचे नाव अभय ठेवले होते.

जब से बुलबुल तू ने दो तिनके लिए
टूटती हैं बिजलियाँ इन के लिए
- अमीर मीनाई

हा माझा आवडता शेर अहे.

मला लागलेला अर्थ हा - की इवल्याश्या, नगण्य जीवांनी कधी नव्हे ते, चिमुकले स्वप्नं काय पाहीले. संपूर्ण जग जीव खाऊन, त्यांच्या आनंदावरती विरजण टाकायला उठले.
अर्थात अन्यायाबद्दलचा हा शेर आहे.

सामो, स्वाती, शर्मिला, अमा प्रतिसादासाठी धन्यवाद!

अभय >>> Happy Happy Happy Happy समर्पक नाव

सामो शेर खूप छान आहे. Thank you for sharing

मस्त आहे लेख.
माझी आवडती कविता.
अगदी सुगरणीचा खोपा डोळ्यासमोर आला.
अवांतर: नर सुगरण घरट बांधतो, मादी येऊन अवलोकन करते. आवडलं तर मिलन होते.
चित्रातला पक्षी oriental white eye - चष्मेवाला आहे का?

There is a history of the name Abhay. I have a daschund dog who continuously kill big and small birds. I feel pain and that the bad karma can be avoided. This time I was determined to protect the eggs and little babies. That nest is pretty sad. Just two earbuds. I tried to put tissue for the mom to pick up. But kabutar are really dumb.

I built a wall of old Diwali anks as o that the dog can't attack. Somehow dog got the smell and was sniffing around. But she is also very old now. I was keen that no more bad karma. Abhay grew up and flew away I hope and now new bird and two eggs are in place. I hope the machine vibration does not hurt these families.

My maid and daughter want to clean up but I feel birth and raising young birds is more important. Also good company.

अमा खूपच छान. फार चांगले विचार.
मला एक माहीत आहे (१००%) ते हे की आपण जेव्हा तिव्र दु:खातून जात असतो, तेव्हा आपण हळवे होतोच पण त्यामुळे दुसर्‍याचे दु:ख चटकन कळू लागते. एक प्रकारे ना खूप कोमलहॄदयि बनतो आपण त्या काळात.

कुमार१ आणि ऋतुराज प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

चित्रातला पक्षी oriental white eye - चष्मेवाला आहे का?>> माहीत नाही, एका painting app वरील आहे ते चित्र.

अमा , तुमची कृती खूपच सुंदर!
वाचताना एकदम बरच काही मनात येऊन गेलं..

एक माहीत आहे (१००%) ते हे की आपण जेव्हा तिव्र दु:खातून जात असतो, तेव्हा आपण हळवे होतोच पण त्यामुळे दुसर्‍याचे दु:ख चटकन कळू लागते. एक प्रकारे ना खूप कोमलहॄदयि बनतो आपण त्या काळात.>> Hmm खर आहे सामो, कधीतरी ह्याचा एक अनुभव घेतलाय.

कुमार१ आणि ऋतुराज प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

चित्रातला पक्षी oriental white eye - चष्मेवाला आहे का?>> माहीत नाही, एका painting app वरील आहे ते चित्र.

अमा , तुमची कृती खूपच सुंदर!
वाचताना एकदम बरच काही मनात येऊन गेलं..

एक माहीत आहे (१००%) ते हे की आपण जेव्हा तिव्र दु:खातून जात असतो, तेव्हा आपण हळवे होतोच पण त्यामुळे दुसर्‍याचे दु:ख चटकन कळू लागते. एक प्रकारे ना खूप कोमलहॄदयि बनतो आपण त्या काळात.>> Hmm खर आहे सामो, कधीतरी ह्याचा एक अनुभव घेतलाय.