नवा गडी

Submitted by अजिंक्यराव पाटील on 1 March, 2024 - 08:01

"हेज्यायची कटकट" करवादत तो भेलकांडत उठला. बंगालीकडचा हा नवा स्टॉक जरा जास्त पावरबाज निघाला होता त्याच्यासाठी. तरी बंगाली सांगत होता, बॉडी बारीक आहे तर जरा कमी दम मार म्हणून. पण बॉडीने काय होतंय भेंडी.. अर्ध्या शहरात आपली हवा आहे, कोन माय का लाल पण आपल्या नादाला लागत नाही. चुकून कोणी तसं वाटलं तरी आपला कोयता आणि तो... साल पण घरच्याना लै प्रॉब्लेम. पूर्वी महिन्यातून एकदा अंडी आणि पाव्हने आल्यावर चिकन खाणारे हे, आता रोज बोट्या हाणतात तेव्हा नाय दिसत का हा पैसा कुटून आला. जाउंदे भेंडी.. सकाळ सकाळ काय भोसडा उदास करायचा.. मनातल्या मनात हे चालू असताना मोन्याने चूळ भरली, अंगणात आला तर सूर्य डोक्यावर.. 10 पावलावर टपरीवर जाऊन त्याने सिगरेट पेटवली आणि टपरीवाल्याला एक टपली हाणली. आज दिवस कसा सत्कारणी लावायचा याचा विचार चालू असताना त्याला परवाची संध्याकाळ आठवली.. पलीकडच्या गल्लीत सुरू असलेल्या क्लाससमोरची ती बोळ.. क्लासमधून बाहेर पडलेली ती साधीशी पण फटाकडी पोरगी, आणि त्याने केलेला तो प्रकार.. आठवून पुन्हा गुदगुल्या होत होत्या त्याला. आज पण तिकडे जायचं ठरवून तो मोकळा झाला.

"आज काय विषय?" म्हणत तो त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर बसला. खरं तर त्याला कंटाळा आला होता.. मागच्या 302 मधून वाचण्यासाठी जोशींभाऊनी जरा सुमडीत राहायला सांगितलं होतं म्हणून.. नाहीतर सलग 2 आठवडे शहरात राहण्याची ही वेळच आली नसती. जोशींभाऊनी सांगितलं म्हणजे थांबायला हवं.. जोशी नसता तर आपले हाल कुत्र्याने खाल्ले नसते याची त्याला जाणीव होती.

काय नाय भाई, काल तो चायनिजवाला मला म्हणतो कसा, शेठ 15 दिवस झाले रोज खाऊन जाताय, जरा बिलाचे पैसे बघा, पूर्ण नको, पण अर्धे तरी जमवा शेठ.. त्याला म्हणलं मोन्याभाईसाठी नेतोय चायनीज
"मग..?"
मग काय भाई, त्याची टिरटीर चालूच.. दिली मग एक साटकन ठेवून, तर त्याने माझी कॉलर धरली भाई, म्हणाला मोन्याभाई आहे म्हणून अर्धे मागतोय.. त्याला सांगून आलोय, आज रात्री 9 वाजता तुझा हिशोब करायला मोन्याभाई सोत्ता येणार..
अच्छा..
हे लक्षण काय ठीक नव्हतं.. आपली हवा कमी होतेय हे मोन्याला लक्षात आलं. तो उठला, आपल्या गाडीला सेल मारून निघाला, त्याच्यामागे त्याचे दोनचार पंटर.. गुरू थेटरात एक पिच्चर पाहून ते बंगालीच्या अड्ड्यावर गेले.. चार आठ दम मारले, आणि सोबत दारु.. जसे 8 वाजले तसे मोन्याला क्लास आठवला. पण ती पोरगी आलीच नव्हती. मग दिसेल तिला जरा चिडीमारी करून शेवटी तो चायनीज गाडीवर पोचला.. तिथे सात आठ गिऱ्हाईक. गर्दी बघून त्याने आवाज मोठा करून चायनीजवाल्याला शिव्या देणं सुरू केलं आणि धावल्यासारखा त्याच्या अंगावर गेला.. जाताना त्याने एकदोघांना धक्का मारला.. की त्याला कुणी धक्का मारला? विचार करायला वेळ नव्हता कारण त्याला आता चायनिजवाल्याला राउंडमध्ये घ्यायचं होतं.. साला आपल्याला पैसे मागतो भेंडी.. गांजाची तार चांगलीच डोक्यात गेली होती.. त्याला ती लाल गाडी हलताना दिसत होती.. आज जरा जास्त स्ट्रॉंग झालाय कार्यक्रम.. त्याच्या लक्षात आलं.. पण पण.. विचार करता करता तो भेलकांडून जाऊन भिजवलेल्या मंचुरीयनच्या टोपल्यात पडला.. त्याचे पंटर त्याला उचलायचा प्रयत्न करत होते.. पण मोन्याला स्वस्थ होताच येत नव्हतं.. खूप तडफड करत त्याचं सगळं शरीर एकाजागी गोळा झालं.. त्याची अवस्था बघुन पंटर पळून गेले.. शेवटी चायनीजवाल्यानेच त्याला सिव्हिलला दाखल केलं.. पण.. उशीर झाला होता..

दुसऱ्या दिवशी पेपरात, नशेचा, दारूचा अतिरेक वगैरे मथळ्यात त्याची बातमी आली.. जोशीने सूत्रं फिरवून त्याचा आपल्याशी असलेला संबंध लपवला होता..

सिव्हिल हॉस्पिटल: मोन्याच्या मृत्यूमध्ये पोलिसांनी लक्ष देण्यासारखं फार नसलं तरी डॉक्टर शिंदे मात्र अस्वस्थ होते. मोन्याच्या रक्तात त्यांना एक अनोळखी संयुगाचे ट्रेसेस सापडले होते. गांजा, दारू अतिसेवनाच्या केसेस त्यांनी भरपूर पाहिल्या असल्या तरी ही केस काहीतरी वेगळी होती.. मोन्याच्या यातना त्यांनी पाहिल्या होत्या.. त्याच्या प्रायव्हेट पार्टला झालेला अतिशय जास्त रक्तपुरवठा, आणि शिवाय, एक अनोळखी संयुग जे ट्रेस करण्यापूर्वी विघटित झालं असावं.. दंडावर असलेल्या छोट्या छोट्या puncture wounds त्यांनी पाहिल्या, पण मोन्याच्या ड्रग abuse history त्यांना माहीत होती. शंका नको म्हणून शिंदेंच्या सूचनेनुसार पोलिसांनी गुपचूप जाऊन बंगालीकडून आणलेला गांजा शिंदेंनी चेक केला होता, पण त्यात प्राणघातक असं काही नव्हतं.

पोलिसांच्या सूचनेनुसार रिपोर्टमध्ये त्यांनी गांजा दारू वगैरे कारणं दिली असली तरी, ही केस त्यांच्या डोक्यात फिट्ट होती.. अशी केस त्यांनी आधी पाहिल्याचं त्यांना अंधुक आठवत होतं, पण केव्हा कुठे ते जाम डोक्याबाहेर गेलं होतं..

मोन्याच्या घरात दुःखाचं वातावरण म्हटलं तर होतं, म्हटलं तर नव्हतं.. एक पीडा गेली असं एकीकडे वाटत होतं, तर पैश्याचा ओघ थांबला असं दुसरीकडे..

त्या घरात जरी संमिश्र भावना असल्या, तरी कॉलनीत, व्यापारी वर्गात आणि इतर सगळ्यांना आनंद झाला होता. खास करून त्या मुलीच्या घरात...

क्रमशः
https://www.maayboli.com/node/84755

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद, काल प्रवासात लिहिली कथा, शेवटचा हात फिरवण्याआधीच पोस्ट केल्या गेली. @आबा आता स्पष्ट होईल कदाचित, पुन्हा वाचून बघा.

होय, आता स्पष्ट होतंय Happy