शब्दखेळ

Submitted by माबो वाचक on 26 February, 2024 - 23:19

मायबोलीकर aschig यांच्या शब्दखुळ कडून प्रेरणा घेऊन मी सुद्धा त्या प्रकारचा मराठी शब्दखेळ तयार केला आहे. हा शब्दखेळ इंग्रजी Wordle शी जास्त साधर्म्य असणारा आहे. यामध्ये मराठी शब्दाची फोड करून त्यातील अक्षरे व मात्रा यांची गुप्त शब्दाशी तुलना केली जाते. त्यामुळे हा खेळ शब्दखुळ पेक्षा जास्त आव्हानात्मक व म्हणून मजेदार आहे असे मला वाटते. सर्व शब्द तीन अक्षरी व मराठी आहेत. शब्दांच्या यादीसाठी मायबोलीकर aschig यांचे आभार.

या खेळाचे नियम व माहिती येथे मिळेल -
https://sites.google.com/view/marathi-shabdakhel/how-to-play

खेळाची लिंक - https://sites.google.com/view/marathi-shabdakhel

काही कारणास्तव गुगल इनपुट टूल्स यामध्ये काम करत नाही, पण बटनांवर टिचकी मारून लिहिता येईल. मोबाईल वरील कीबोर्ड चालतो.

पुढील गोष्टी अद्यावत केल्या आहेत.
१. आता हा खेळ दैनंदिन स्वरूपात सुद्धा खेळता येईल. पाठीमागच्या दिवशीचे शब्द सुद्धा जुनी तारीख निवडून खेळता येतील. कितीही वेळा खेळायचा पर्याय पूर्वीप्रमाणेच उपलब्द आहे.
२. सातव्या प्रयात्नानंतर मदत उपलब्ध होईल. दवंडीच्या चिन्हाशेजारी प्रश्नचिन्ह दिसू लागेल. त्याच्यावर टिचकी मारल्यानंतर clue दिसेल.
३. गुप्त शब्दाची फोड-लांबी कळू शकेल. गुप्त शब्दाच्या फोड-लांबी एव्हड्या चौरसांना निळी सीमा दिसेल. उर्वरित चौरसांना सीमा दिसणार नाही.
४. अँड्रॉइड वरील "पूल टू रिफ्रेश" अक्षम केले आहे. त्यामुळे चुकून पान ताजेतवाने होऊन चालू खेळ नष्ट होणार नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे कोडे.
कालचा शब्द आला होता.
आजचा दुर्गती आहे.. (Sorry, शब्द फोडतोय कारण इथे कोणाचाच प्रतिसाद नाही)
लेखकांसाठी : शब्द, अथवा रंग काॅपी पेस्ट होत नाहीयेत..
(मी Microsoft Edge Browser वापरतो)

अ'निरु'द्ध,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले निरीक्षण बरोबर आहे; कोणत्याच ब्राउजर वरून सध्या दवंडी कॉपी होत नाहीये. मलाही आताच कळले. हे अँप गुगल साईट मध्ये एम्बेड केल्यानंतर ही समस्या आली, कारण Apps Script मधुन उघडल्यावर कॉपी होत आहे. बघूया काय उपाय सापडतोय का.
हा खेळ daily नाही. कितीही वेळा खेळता येतो. प्रत्येक वेळी रँडम शब्द निवडला जातो. त्यामुळे येथे screenshot किंवा दवंडी देण्यास काहीच हरकत नाही. म्हणूनच दवंडीमध्येसुद्धा प्रयत्न केलेल्या शब्दांचा समावेश केला आहे. पण सध्यातरी ते कॉपी होत नाहीयेत.

खेळ रोचक आहे. मला कठीण वाटला.
सुरवातीलाच शब्दातले एक अक्षर (काना/मात्रा शिवाय) योग्य त्या जागी देउन खेळ सुरु केला तर?

धन्यवाद मानव, सामो.
क्लीपबोर्ड कॉपी ची समस्या सुटली नाही, त्यामुळे वेबसाईट वर एम्बेड केलेले पान बाहेर काढले आहे. आता थेट apps script च्या पानावर जाऊन खेळता येईल. तेथून दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी होत आहे. (कृपया याची पुष्टी करा.)

मानव,
<<< सुरवातीलाच शब्दातले एक अक्षर (काना/मात्रा शिवाय) योग्य त्या जागी देउन खेळ सुरु केला तर?>>>
रोचक कल्पना आहे. मी जरूर विचार करेन. धन्यवाद.

काॅपी पेस्ट होतंय आता.. Lol
पण माबोवर तो प्रतिसाद सेव्ह होत नाही. Sad

सभासदांना कल्पना यावी, रुची वाढावी आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत हा चांगला खेळ/कोडं पोहोचावं म्हणून सुरुवातीला शब्द फोडतोय.
माबो वाचक, हरकत असल्यास कृपया कळवावे..

धन्यवाद अ'निरु'द्ध. बदल केला आहे. शब्दखुळ ची style वापरत आहे.
आता मी स्वतः कॉपी पेस्ट करूनच पाहतो. म्हणजे पुन्हा अडचण राहायला नको. Lol
हा दैनंदिन खेळ नसल्यामुळे शब्द इथे देण्यास हरकत नसावी.

मी सहा प्रयत्नांत पुढील शब्द ओळखू शकलो.
❌❌❌❌❌↔️↔️❌
❌✅✅❌❌↔️
❌✅✅❌✅↔️
❌✅✅❌✅
❌✅✅❌❌
✅✅✅✅✅

पूर्णांक ❌प ❌ू ❌र ❌् ❌ण ↔️ा ↔️ं ❌क
शांतता ❌श ✅ा ✅ं ❌त ❌त ↔️ा
चांगला ❌च ✅ा ✅ं ❌ग ✅ल ↔️ा
धांदल ❌ध ✅ा ✅ं ❌द ✅ल
भांडण ❌भ ✅ा ✅ं ❌ड ❌ण
मांसल ✅म ✅ा ✅ं ✅स ✅ल

पहिल्या शब्दात जेवढी जोडाक्षरं वापरु, ते ही काना, मात्रा, वेलांटी, उकार यातल्या जास्तीत जास्त बाबींचा समावेश असलेली तर....
जास्त Clues मिळतात..

पूर्णांक ❌प ❌ू ❌र ❌् ↔️ण ❌ा ❌ं ❌क
लसुण ❌ल ❌स ❌ु ↔️ण
गणेश ❌ग ✅ण ❌े ❌श
ओणवा ❌ओ ✅ण ❌व ❌ा
खणिज ↔️ख ✅ण ❌ि ❌ज
आणखी ✅आ ✅ण ✅ख ✅ी

उत्पन्न ❌उ ❌त ❌् ❌प ❌न ❌् ❌न
धार्मिक ❌ध ✅ा ↔️र ❌् ❌म ❌ि ❌क
लांबड ❌ल ✅ा ❌ं ❌ब ❌ड
घागरा ❌घ ✅ा ❌ग ✅र ↔️ा
शास्त्रज्ञ ❌श ✅ा ↔️स ❌् ❌त ❌् ↔️र ❌ज ❌् ❌ञ
सावरी ✅स ✅ा ❌व ✅र ❌ी
साखर्टा ✅स ✅ा ✅ख ✅र ❌् ❌ट ↔️ा

@ माबोवाचक
योग्य शब्द साखर होता.
पण चौथ्या प्रयत्नातील घागरा शब्दातल्या र च्या कान्याला Yellow दर्शविले गेले.
(पहिला काना धार्मिक मधेच कायम म्हणजेच हिरवा झाला होता).
त्यामुळे दोन काने समजून {एक हिरवा आणि एक जागा चुकलेला पिवळा समजून} मी तसा खेळत राहिलो.
Wordle मधे एखादे अक्षर दोनदा टाकले पण प्रत्यक्षात एकदाच असेल तर एक अक्षर जागेनुसार (योग्य की अयोग्य) हिरवे किंवा पिवळे दर्शविले जाते आणि दुसरे अक्षर Blank/रंगहीन दर्शवतात.
म्हणजे 'त्याची पुनरावृत्ती नाही' हे स्पष्ट होते.
कृपया असा बदल करता येईल का हे पहावे..

@ अ'निरु'द्ध, आपले म्हणणे बरोबर आहे. छान निरीक्षण. सर्व बदलांचे संकलन करून कोडमध्ये एकत्र बदल करण्याचा प्रयत्न करीन.
बादवे, दवंडीच्या यादीमध्ये फक्त सातच शब्द का दिसत आहेत? आठवा शब्द का दिसत नाही?

बादवे, दवंडीच्या यादीमध्ये फक्त सातच शब्द का दिसत आहेत? आठवा शब्द का दिसत नाही? >>>
कालण सातव्या प्रयत्नात उत्तर आलं.. म्हणून..
(पहिली तीन अक्षरं बरोबर होती म्हणून App चा उत्तर बरोबर असल्याचा संदेश आला.)

(पहिली तीन अक्षरं बरोबर होती म्हणून App चा उत्तर बरोबर असल्याचा संदेश आला.) >>> रोचक. हा तर कोडमध्ये बग आहे असे म्हणावे लागेल. Sad

पर्णिका ✅प ❌र ❌् ❌ण ❌ि ❌क ↔️ा
पागडी ✅प ✅ा ❌ग ❌ड ✅ी
पाशवी ✅प ✅ा ❌श ❌व ✅ी
पाहती ✅प ✅ा ❌ह ❌त ✅ी
पाखळी ✅प ✅ा ❌ख ❌ळ ✅ी
पालथी ✅प ✅ा ↔️ल ❌थ ✅ी
पाजली ✅प ✅ा ❌ज ✅ल ✅ी
पाटली ✅प ✅ा ❌ट ✅ल ✅ी

योग्य शब्द होता : पायली

दुर्गती ❌द ❌ु ❌र ❌् ❌ग ↔️त ❌ी
तांबडा ↔️त ↔️ा ↔️ं ❌ब ❌ड ↔️ा
शांतता ❌श ↔️ा ↔️ं ↔️त ↔️त ↔️ा
पाताळ ↔️प ↔️ा ✅त ✅ा ❌ळ
कृतांत ❌क ❌ृ ✅त ✅ा ↔️ं ↔️त
संतप्त ✅स ✅ं ✅त ↔️प ❌् ↔️त
संतान ✅स ✅ं ✅त ✅ा ❌न
संतप्त ✅स ✅ं ✅त ↔️प ❌् ↔️त

योग्य शब्द होता : संताप
परंतु 'शांतता' या तिसऱ्या शब्दातील दोन्ही 'त' आहेत पण जागा चुकलेले, असे दर्शविल्यामुळे मी दोन 'त' असलेले शब्द शोधत बसलो.
एखादे अक्षर शब्दात एकदाच आले असेल पण आपण देत असलेल्या पर्यायात दोन किंवा जास्त वेळा आले असल्यास दोन्ही/ती सर्व अक्षरे रंगीत दिसता कामा नये..

@ अ'निरु'द्ध ,
आपल्या सूचनेची नोंद घेतली आहे, पण ती इतक्यात अंमलात आणता येणार नाही, कारण त्यासाठी खेळाच्या कोडच्या मुख्य लॉजिक मध्ये बदल करावे लागतील व बऱ्याच चाचण्या घ्याव्या लागतील.
आपल्याला खेळ आवडतो आहे पाहून आनंद वाटला.

श्रावणी ❌श ↔️् ❌र ↔️ा ❌व ❌ण ❌ी
मस्तिष्क ❌म ❌स ✅् ❌त ❌ि ❌ष ↔️् ❌क
उद्दाम ❌उ ✅द ✅् ↔️द ✅ा ❌म
अद्याप ✅अ ✅द ✅् ✅य ✅ा ✅प

श्रावणी ❌श ❌् ❌र ↔️ा ❌व ❌ण ❌ी
कोनाडा ❌क ❌ो ❌न ↔️ा ❌ड ↔️ा
हापूस ❌ह ↔️ा ❌प ❌ू ❌स
धमाल ❌ध ❌म ✅ा ❌ल
बटाटा ❌ब ❌ट ✅ा ❌ट ↔️ा
गजांत ❌ग ❌ज ✅ा ❌ं ↔️त
तळात ↔️त ❌ळ ✅ा ✅त
आयात ✅आ ✅य ✅ा ✅त

@ अ'निरु'द्ध ,
आपल्या सूचनेची नोंद घेतली आहे, पण ती इतक्यात अंमलात आणता येणार नाही, कारण त्यासाठी खेळाच्या कोडच्या मुख्य लॉजिक मध्ये बदल करावे लागतील व बऱ्याच चाचण्या घ्याव्या लागतील. >>> ओके..
आपल्याला खेळ आवडतो आहे पाहून आनंद वाटला. >>
येस.. मजा येतेय..

जवस ❌ज ↔️व ↔️स
वसंत ↔️व ↔️स ❌ं ❌त
स्वभाव ✅स ✅् ✅व ❌भ ↔️ा ↔️व
स्वाक्षरी ✅स ✅् ✅व ✅ा ❌क ↔️् ❌ष ↔️र ❌ी
स्वारस्य ✅स ✅् ✅व ✅ा ✅र ✅स ✅् ✅य

@ माबोवाचक, तुमच्या पिटलेल्या दवंडीत आणि माझ्या..
फरक का येतोय..?
(मी सुरुवातीला Edge Browser वापरत होतो, शेवटचा गुगल क्रोम आहे)

प्राविण्य ❌प ❌् ❌र ❌ा ❌व ❌ि ❌ण ❌् ❌य
स्वादिष्ट ❌स ❌् ❌व ❌ा ❌द ❌ि ❌ष ❌् ❌ट
लांच्छन ↔️ल ❌ा ❌ं ❌च ❌् ❌छ ❌न
खुशाल ❌ख ❌ु ❌श ❌ा ↔️ल
कलम ❌क ↔️ल ❌म
तल्लफ ❌त ↔️ल ❌् ✅ल ❌फ
गलोल ❌ग ↔️ल ❌ो ✅ल
घरेलू ❌घ ❌र ✅े ✅ल ❌ू

लांच्छनला ल पहिल्या घरात चुकीच्या जागी दाखवले.
खुशालला तिसऱ्या घरात चुकीच्या जागी दाखवले.
कलमला मधल्या घरात चुकीच्या जागी दाखवले.
तल्लफला मधल्या घरात एक चुकीच्या तर एक योग्य जागी दाखवले
गलोलला तिसऱ्या घरात योग्य जागी दाखवले.

@ अ'निरु'द्ध, काय फरक आहे दवंडीमध्ये? मलातरी काही दिसला नाही.
@ मानव पृथ्वीकर, मस्तच केवळ चार प्रयन्तांत ओळखले.

तुमच्या दवंडीत wordle प्रमाणे फक्त अक्षरं आणि रंग आहेत.
माझ्या दवंडीत लाल क्राॅस, आडवे निळे बाण वगैरे आहेत..
A bit complicated in my case..
मानव यांची दवंडी पण माझ्या दवंडीसारखीच आहे..

@ मानव पृथ्वीकर,
वापरकर्त्याने दिलेल्या शब्दाची फोड करून, त्या फोडीची गुप्त शब्दाच्या फोडीशी तुलना केली जाते, आणि त्यानुसार जागेचा रंग ठरतो. तुमच्या उदाहरणात, गुप्त शब्दाची फोड केल्यानंतर त्यात ल चौथ्या जागी आहे. याचा अर्थ मूळ शब्दामध्ये ल हे तिसऱ्या जागी असणार. कारण शब्दामध्ये जोडाक्षर आणि अनुस्वार नाही, हे अनुक्रमे पहिल्या आणि तिसऱ्या प्रयत्नांतून अगोदरच कळले आहे. म्हणजे मूळ शब्दामधले प्रत्येक अक्षर हे जास्तीत जास्त २ जागा घेऊ शकते. त्यामुळे ल हे मूळ शब्दामध्ये तिसऱ्या जागी आहे हे कळते.

@ अ'निरु'द्ध,
माझी ती दवंडी नाही. खेळ संपल्यानंतर चा स्क्रीनशॉट आहे. Happy

Pages