पाऊले चालती भाजपाची वाट

Submitted by रघू आचार्य on 12 February, 2024 - 20:35

पाऊले चालती भाजपाची वाट
काल पासून सततच्या नोटिफिकेशन्स मुळे मोबाईल मधे नोटिफिकेशन सेटींग्ज बंद करून टाकले.

मविआच्या मित्रांच्या पोस्ट्स आहेत ज्यात भाजपाने अशोक चव्हाण भ्रष्टाचारी असल्याचे २०१९ ला म्हटले होते. तर भाजपाकडून अशोक चव्हाण हे कसे कर्तबगार आहेत असे म्हटलेले आहे.

राजकारणाचा स्तर इतका खालावलेला आहे कि आपण काही काळापूर्वी काय भूमिका घेत होतो याचे भान दोन्हीकडच्यांना नाही. जर मविआला अशोक चव्हाण भ्रष्टाचारी असल्याचा साक्षात्कार काल झाला असेल तर इतके दिवस त्यांना पक्षात का ठेवले होते ? आणि भाजपाला जर काल अशोक चव्हाण हे भ्रष्टाचारी होते हे माहिती होते तर आज त्यांना पक्षात कसे काय घेतले ?

अशोक चव्हाण हे एक नाव झाले.
काल त्या जागी राधाकृष्ण विखे पाटील होते, अजितदादा पवार होते, मुख्यमंत्री शिंदे होते आणि असे शेकडो लोक होते.
दोन्हीकडच्या ठरलेल्या प्रतिक्रिया वाचूनही उबग आलेला आहे.

428375554_799270608886079_2638760753746959083_n.jpg

मविआचे लोक म्हणतात "आता ते भाजपाच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छ होणार".
भाजपचे लोक म्हणणार " तुम्हाला आज समजले का ते भ्रष्ट होते ?"

किती दिवस या उपहासाला, ब्लॅक ह्युमरला दाद द्यायची ? असे भ्रष्ट नेते पक्षात ठेवून काय लढाई लढायची ?
काँग्रेसचे एक दरबारी नेते आहेत जे स्वतःच्या बळावर निवडून येऊ शकत नाहीत, पण मुख्यमंत्री होते. ते पक्षावर नाराज आहेत. खरे तर त्यांची निवडून येण्याची क्षमता नसल्याने भाजप त्यांना पक्षात घेत नाही. पक्षात राहूनच ते भाजपला अनुकूल कारवाया करत आहेत. माढा आणि अन्य काही मतदारसंघात त्यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केले. त्यांच्या जवळच्या लोकांना भाजपने तिकीट दिले होते. दोन जण भाजपच्या तिकीटावर निवडून आले.

जयंत पाटील , विश्वजित कदम आणि बंटी पाटील हे भाजपच्या संजयकाका पाटलांसाठी भिडेंच्या सांगण्यावरून फिल्डींग लावतात.
हे लोक निव्वळ इडीमुळेच असे करतात असे काहीही नाही.

यांची संस्थाने आहेत. या संस्थानात दुसरा कुणी मोठा होऊ नये एव्हढीच या माऊलींची इच्छा असते. आर आर पाटलांचे महत्व वाढू लागल्यावर जयंत पाटील अस्वस्थ व्हायचे. आर आर यांना पाडण्यासाठी विजयसिंग मोहिते पाटील ( आता भाजपमधे) आणि जयंत पाटील हे संजय काका पाटलांना विधानसभेला मदत करायचे. एकदा आर आर हे पराभूत होणार असे वाटत असताना थोडक्यात निवडून आले. त्या नंतर संजयपाट्का पाटील लोकसभेला उभे राहू लागले. गेल्या खेपेला निवडून आले.

संस्थानिकांना जिल्हा पण पहावा लागतो. हे सांगली ,कोल्हापूर भागात वर्चस्व ठेवू पाहतात. पण इथे वसंतदादा पाटलांना मानणारा मतदार आजही आहे. वसंतदादा पाटलांच्या घराण्याला नेस्तनाबूत केल्याशिवाय या मंडळींचे वर्चस्व राहणार नाही. यामुळेच पूर्वी पतंगराव कदम भिडेंना मदत करत. आता त्यांचे पुत्र विश्वजीत कदम, जयंत पाटील आणि अन्य काही नेते भिडेंच्या संघटनेला मदत करतात. या संघटनेच्या मदतीने पाडापाडी चालते, याचा फायदा पूर्वी सेना भाजपला व्हायचा. या मंडळींच्या कारवाया पाहून निवेदिता माने राष्ट्रवादी कडून उभे रहायचे कि सेनेकडून याचा निर्णय घेत. आता त्या ही भाजपसोबत आहेत.

भाजपची स्वतःची ताकद कमी आहे. पण संस्थानिकांच्या या राज़कारणाने भाजपा आज महाराष्ट्रात शक्तिशाली वाटतेय. तशी ती नाही.
भाजपा विदर्भात सुद्धा काही काळापूर्वी दुबळीच होती. तिथे काँग्रेस राष्ट्रवादीच्या जातीच्या राजकारणामुळे ओबीसी भाजपाकडे गेला. काही वर्षांपूर्वी याच पाडापाडीच्या राजकारणामुळे विदर्भात भाजपाला मदत झाली. आज तिथे ओबीसींना भाजपा निवडून येणारा पक्ष वाढतो. काँग्रेसच्या एकजातीय वर्चस्ववादाला उत्तर म्हणून त्यांनी भाजपला जवळ केले.

ज्यांना धर्मनिरपेक्षता, हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद,पुरोगामित्व यासाठी या दोन्ही बाजू लढतात असे वाटते ते वेगळ्या नंदनवनात राहतात.
एखादा राजकीय कार्यकर्ता जरी तुमच्या संपर्कात असेल तर तुम्हाला हे उघडे नागडे राजकारण कळून येईल. विचारधारेचा आणि या मंडळींचा दूरान्वयेही संबंध नाही. निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी एक बाजू सातत्याने फुले - शाहू - आंबेडकर या नावांचा जप करते. दुसरी बाजू सावरकर- बाळासाहेब ठाकरे - अटलबिहारी वाजपेयी असा जप करते.

किमान मूळचे भाजपायी विचारांसाठी तरी लढत आहेत. त्यांच्या दृष्टीने हे इनकमिंग पक्षवाढीसाठी उपयुक्त आहेत. एकदा का समोरचू बाजू संपली कि मग आपले हार्डकोअर कार्यकर्ते निवडून येतील. हा त्यांचा मनसुबा आहे.

हा मनसुबा माहिती असूनही विरोधी खेमा काहीही काळजी घेत नाही. कारण काळजी घेण्यासारखे काहीच हातात नाही. एकेकाळी निवडून येणे या एकमेव निकषावर नको ते लोक पक्षात घेतले होते. आज त्यांच्या कलाने प़क्ष चालतो. त्यांच्यावर कारवाई करण्यासारखे धैर्य या पक्षात कधीही नव्हते.

आदर्श घोटाळा झाला होता हे आज चव्हाण भाजपात गेल्यावर का होईना काँग्रेस मान्य करतेय. सत्तर हजार कोटींचा घोटाळा झाला हे सुप्रिया सुळे आज मान्य करताहेत. ते भाजपावर टीकेच्या निमित्ताने हे मान्य करत आहेत कि इतके दिवस आम्ही या भ्रष्टाचारावर गप्प बसलो होतो.

मतदारांना काहीही अक्कल नाही हा या राजकारण्याचा समज आहे कि खरंच मतदार त्याच पात्रतेचा आहे हे कळायला मार्ग नाही. मतदार सुद्धा चटकन बाजू बदलत असेल तर अवघड आहे. या नेत्यांना दोन्हीकडचा मतदार जाब कधी विचारणार ?

सात्विक सोज्वळ संघी मतदार भ्रष्ट नेत्यांच्या आयातीबद्दल फडणवीस मोदी शहा यांना का खडसावून विचारत नाही.
मविआ चा मतदार एव्हढा पैसा यांनी खाल्ला असेल तर मग आमच्या दुर्दशेचे कारण तुम्हीच आहात हे का विचारत नाही ?

या परिस्थितीत कुणीही निवडून आला तरी मतदारांच्या कल्याणाचे कोण बघणार आहे ?
सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत. एकेकाळी भय भूक भ्रष्टाचार या पासून मुक्ती ही आपली टॅगलाईन होती हे भाजपाला कोण आठवण करून देईल ?

( धाग्यावर गोंधळ झाला तर फक्त प्रतिक्रिया उडवल्या जाव्यात. धागा बंद करू नये ही विनंती)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतदारांना काहीही अक्कल नाही हा या राजकारण्याचा समज आहे कि खरंच मतदार त्याच पात्रतेचा आहे हे कळायला मार्ग नाही >> +१

मुद्देसूद आणि कळकळीने लिहिलेले आहे.
संस्थानिकांच्या या खोलवर राजकारणाची काही कल्पना नव्हती. आणि केवळ निवडुन येतो या निकषांवरुन खोगीर भर्ती केलेले नेते. एकंरीत भारतातील राजकारणाबद्द्ल इट्स अ जंगल आउट देअर फिलिंग (कितव्यांदातरी) आले.
या लेखाबद्दल धन्यवाद. राजकारणावर असे विचारप्रवर्तक लेख यायला हवेत आणि चर्चा घडायला हव्यात.

दिल्लीवाले कॉन्ग्रेस नेते महाराष्ट्रातील नेत्यांचा वापर करून घेतात हे मागील उदाहरणांवरून कळले तरी इथल्या नेत्यांना वळत नव्हते. एकेक शहाणे होत आहेत.

लेख पटला. विशेषतः नवसंस्थानिकांबाबत.

निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष उरल्यासारखे झाले आहे. निवडणुका लढवायला पैसा लागतो. (आज इलेक्शन बाँडच्या माध्यमातून त्याचा मोठा ओघ भाजपकडे वळला आहे.) जो पैसा खर्च करू शकेल त्याला तिकीट. मग तो आणखी पैशाच्या मागे असे दुष्टचक्र आहे. म्हणजे असे नसते तर त्यांनी पैसा केलाच नसता, असे नाही, पण हे एक राजरोस कारण झाले.

(आज इलेक्शन बाँडच्या माध्यमातून त्याचा मोठा ओघ भाजपकडे वळला आहे.)

दिल्लीवाले कॉन्ग्रेस नेते महाराष्ट्रातील नेत्यांचा वापर करून घेतात हे मागील उदाहरणांवरून कळले तरी इथल्या नेत्यांना वळत नव्हते. एकेक शहाणे होत आहेत.

>>> दिल्लीश्वर भाजपने तर त्यांच्या महाराष्टीयन नेत्यांचे निव्वळ पायपुसणे करून ठेवले आहे,
त्यांना कुठलीही महत्वाकांक्षा किंवा ध्येय ठेवण्याची मुभाच नाहीये,

इतर सर्व पक्षनेते निदान मराठी अस्मिता सांभाळून आपल्या वरिष्ठांना सहकार्य करतात
पण भाजपात केवळ वेठबिगारी आहे तीही बिनपगारी !!

कधी कुठल्या विरोधीपक्ष नेत्याला शिव्या ऐवजी आपलीच खुर्ची खाली करून द्यावी लागेल हे महाराष्ट्रातील भाजपचा सर्वोच्च नेता ही सांगू शकत नाही.

एका वाक्यात उत्तर:.
भाजप

अटल बिहारी वाजपेयी एका मताने लोकसभा हरल्यावर
भाजपवाल्यांनी स्वतःच्या पक्षाची भगवी काँग्रेस केली आहे..
वाक्य संपले.
जय महाराष्ट्र जय हिंद

मानव, उदय आणि भरत आभार तुमचे.

भरतजी सविस्तर प्रतिसाद वाचला. यातले

निवडणुका लढवायला पैसा लागतो. (आज इलेक्शन बाँडच्या माध्यमातून त्याचा मोठा ओघ भाजपकडे वळला आहे.) जो पैसा खर्च करू शकेल त्याला तिकीट. मग तो आणखी पैशाच्या मागे असे दुष्टचक्र आहे. म्हणजे असे नसते तर त्यांनी पैसा केलाच नसता, असे नाही, पण हे एक राजरोस कारण झाले.

हे एक पर्सेप्शन जाणीवपूर्वक पसरवले गेलेले आहे. काही छोटे पक्ष नव्वदच्या दशकात जन्माला आले. कुठल्याच बड्या भांडवलदाराचे पाठबळ नसताना मोठे झाले. अलिकडच्या काळात आम आदमी पक्ष हे उदाहरण आहे. आप ला विदेशी भारतियांनी फंडींग केले हे खरेच आहे. काहीही असो.
या मंडळींनी पक्षासाठी निधी जमा केलेला नाही. त्यांनाही पक्षासाठी देणग्या स्विकारण्याचा मार्ग खुला होताच की. उलट निवडणुका या गरीबाला सुद्धा लढवता याव्यात यासाठी जी काही आचारसंहिता होती ती धाब्यावर बसवण्याची सुरूवात काँग्रेसने केली. ते नसते झाले तर हे दुष्टचक्र नसते निर्माण झाले. लहान असताना अपक्ष सुद्धा लोकसभा लढवत हे आठवते. चांगली लढत देत. कार्यकर्ते मोफत काम करत. आता निवडून जाणारा उमेदवार बक्कळ माया जमवतो हे माहिती असल्याने फुकट कुणी काम करायला तयार होत नाही हे खरे कारण आहे.

पैसा नाईलाजाने कमवावा लागतो हे गुन्ह्याचे सौम्यीकरण झाले.
याही पुढे जाऊन भाजप आणि काँग्रेस असे दोनच पक्ष (ध्रुव) असणे आणि कोणताही गैरप्रकार "त्यांच्याकडे बघा, त्यांनी केले म्हणून आम्ही केले" या पालुपदावर आणून ठेवायचा ही पळवाट मुद्दामून काढली गेली आहे. किमान सर्वसामान्यांनी यापासून लांब राहीले पाहीजे.

इलेक्शन मोसम,पक्ष फुटीचा मोसम.
शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली,jdu झाली,काँग्रेस झाली...
आता पक्ष फुटायची पाळी भाजपची.
सुब्रमण्यम स्वामी नाराज दिसतातच आहेत, पंकजा पण.
बघू आता.
आता मतदारही निबर झालेत.कोणालाच काहीच वाटत नाही.

काहीही म्हणा... अशोक चव्हाण भाजपात गेल्याच दु:ख कॉग्रेसला झाल नाहि इतक मराठी पत्रकाराना झालय.

राज्यसभेची उमेदवारी त्यांना मिळाली आणि यथोचित सन्मान मिळाला. आता भगवी वस्त्रे छान शोभतील.

भक्तांनी राणे, अजित पवार या दिग्गज महा भ्रष्टाचार्‍यांसाठी यशस्वी बॅटिंग केलेली असल्यामुळे त्यांना अशोक चव्हाण ( त्यामानाने सौम्य भ्रष्टाचारी ) यांची पाठराखण करणे सोपी जाईल.

डाग ( भ्रष्टाचार, बलात्कार, खून , बाँब स्फोट, गाडीच्या काचा फोडणे ) कितीही काळा असला तरी पक्षांत १०० % संरक्षण मिळेल हा एक आश्वासक / आशेचा संदेश १४३ कोटी जनांना दिला आहे.

अटलजींच्या काळातील तत्ववादी पार्टी आँफ डिफरंन्ट असलेल्या भाजपच काँग्रेस संपवण्याच्या नावान काँग्रेसीकरण केंव्हा झाल हे भाजपला सत्तेवर आणण्यासाठी जीवाच रान करनाऱ्यांना कळलच नाही आज त्यांची स्थिती काय आहे पायपुसन केलय त्यांच,खरतर त्यांनीही आता भाजपकडे आरक्षण मागण्याची गरज आहे .आणि भाजपनेही ते द्याव नाहीतर आयात करता करता निर्यात केंव्हा सुरु झाली हेच दोन सत्ताधाऱ्यांना कळणार नाही.

कॉग्रेसमधले तसेच वेगवेगळ्या पक्षातले नेते भाजपात सामावुन घेऊन भाजपाच पायपुसणेच काय अगदी भाजपाच नाहीसा झाला
तर बरच आहे की ! वर चढणार्या प्रत्येक पक्षाला उतरण ही लागतेच, भाजपाला त्यामानाने लगेच ही उतरण लागलेली आहे . येत्या निवडणूकीपासुनच भाजपाच्या पतनाला सुरुवात होणार आहे व कदाचीत ह्यातच काँग्रेस पक्षाच्या विजयाची बिजे लपलेली आहेत.
अनेक अनुभवी , विद्वान, उच्च शिक्षीत नेत्यांनी परिपुर्ण असलेल्या काँग्रेस पक्षाला येत्या निवडणूकीत विजया पासुन कोणीही रोखु शकणार नाही. भाजपाच्या पतनानंतर एकट्या काँग्रेस पक्षाला भारत देशाची परिस्थिती बदलायला कंबर कसुन उभ रहाव लागेल.

भाजपाचा ह्रास हाच काँग्रेसचा लाभ आहे. गेल्या अनेक दशका पासुन भारतावर राज्य करणार्या काँग्रेस पक्षाला सरकार चालवण्याचा चांगलाच अनुभव आहे. भाजपाचे सर्व कार्यक्रम हे काँग्रेसच्याच दुरद्रूष्टी असलेल्या सरकारने सुरु केलेले उपक्रम असुन , भाजपाने तेच उपक्रम स्वःताच्या नावाने पुन्हा चालु केलेले होते. भाजपाने आक्रस्ताळेपणाने घडवुन आणलेले बदल आता पुर्ववत करुन संपुर्ण भारतीय जनतेचे कल्याण कॉ़ग्रेसला साधता येऊ शकेल.

भाजपने (मोदीने) अजून एक टर्म काढावी. अजून बरी ह मंदिरे बांधून व्हायची आहेत. अदानीला नंबर 1 होण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. सनातन धर्म आणि मनुवाद अजुन मागील बाकावर आहेत ते अग्रस्थानी आणायचे आहेत.

सोशल मीडीया आणि मीडीयातली भाजपा आणि काँग्रेस ही साठमारी कंटाळवाणी आहे. तेच तेच आरोप एकमेकांवर करत हा येऊ नये म्हणून तो किंवा तो येऊ नये म्हणून हा असे दोनच पर्याय समोर ठेवले जातात. ज्यांना हे दोन्ही पर्याय मान्य नाहीत त्यांना वेड्यात काढले जाते किंवा गद्दार वगैरे विशेषणे लावली जातात.

सध्या भाजपमधे जाणारी मंडळी खूप शहाणी आहेत अशातला भाग नाही. यांना भाजपचे कसलेही वावडे नाही. मिरज सांगली दंगलीत काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सेना भाजपशी संगनमत करून होते. भिडेंच्या पाठीमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. ज्या पद्धतीने मुंबईत शिवसेना बनवून कम्युनिस्ट आणि स्वपक्षातल्या प्रतिस्पर्ध्यांचा काटा काँग्रेसचे नेते काढत त्याच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात या मंडळींनी भिडेंचा सहारा घेतलेला आहे. मुंबईतून काँग्रेस याच कारणाने हद्दपार झाली. पश्चिम महाराष्ट्र हा बालेकिल्ला असताना काँग्रेस राष्ट्रवादीने स्वत:ची कबर खोदलेली आहे.

या मंडळींच्या घरातले एक जण सेनेत, एक जण भाजपात, एक शेकापत असतो. पक्षाने उमेदवारी नाकारली कि लगेच घरातला कुणी तरी दुसर्‍या पक्षाकडून उभा राहतो. काही वेळा एकाच घरातले दोघे तिघे वेगवेगळ्या पक्षातून उभे राहतात. कुणीही आला तरी सत्ता घरातच,

हे राजकारण वृत्तपत्रे किंवा टिव्हीच्या बातम्यांवर पोसलेल्या शहरी माणसाला समजत नाही.
ग्रामीण भागात काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक सेना भाजप हाताशी असू दे म्हणून ठेवत असतात.
प्रचंड भ्रष्टाचारामुळेच भाजपला या लोकांना पक्षात ओढता येतंय.

भाजपने ज्यांच्यावर आरोप होऊ शकतात अशांना दूर सारले किंवा बिनमहवत्वाच्या पदावर ठेवले.
खडसे , मुंडे कन्या यांना बाजूला सारले. त्यामुळे भाजपवर आरोप करता येत नाहीत.
ईव्हीएम च्या विरोधात एल के अडवाणी आणि नरसिंहराव यांनी पुस्तक लिहीले. दोघांनाही बाजूला काढल्याने आता भाजप हात वर करतेय,

काँग्रेस राष्ट्रवादीने अशोक चव्हाण, अजितदादा पवार, विखे पाटील आणि असे शेकडो लोक प्रामाणिक कार्यकर्ते नेत्यांना संधी न देता वर्षानुवर्षे ठेवलेले होते. आता तेच सोडून जाताहेत. आता काँग्रेसवाले म्हणतात कि बरं झालं गेले . आता तरूणांना संधी मिळेल.
हे आधी का नाही सुचले ?

भाजपचे काँग्रेसीकरण झाले हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्याच्या कडे बोट दाखवून आपले दोष झाकणे हे अजून किती वर्षे चालेल ?
भाजपला फटका बसणारच आहे. निष्ठावान किती दिवस सहन करतील ? शिस्तीला राजकारणात मर्यादा असते.

बॉक्सिंगपटू विजेंदर आला की भाजपात. मज्जा आहे सगळी.
Singh said, “I slept [after retweeting] and when I woke up, I realised that I was doing something wrong and was on the wrong platform. I realised I needed to join the Bharatiya Janata Party and from here, I will go in the right direction. This is why, I decided to join the party.”

https://www.hindustantimes.com/india-news/vijender-singh-switching-to-bj...