निर्भीड पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भ्याड हल्ला

Submitted by उदय on 10 February, 2024 - 00:32

काल पुण्यामधे सभा घेण्यासाठी "निर्भय बनो" चे पत्रकार/सुधारक श्री. निखिल वागळे आणि समविचारी जाणार होते. सभेला जात असणार्‍या त्यांच्या ताफ्यावर काही भ्याड गुंडांनी अत्यंत सुनियोजीत रितीने प्राणघातक हल्ला केला. बैठकीला जात असणार्‍या या ताफ्यावर अनेक वेळा हल्ला झाला, त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला, गाडीच्या काचा फोडल्याचे व्हिडिओ सर्वत्र पसरत आहेत. अशा प्रकारच्या सर्वच हल्ल्यांचा निषेध करावा तेव्हढा थोडा आहे.

प्राणघातक हल्ला झाल्यावरही वागळे हे सभास्थाना पर्यंत पोहोचले. त्यांच्या निर्भयपणाला सलाम. या आधी ( महानगर घटना ) पण त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. तरी ते त्यांच्या विचारांवर ठाम राहिले आहेत.

वागळे हे पत्रकार आहेत. त्यांची मते ते निर्भीड पणे मांडत असतात. सर्वांनाच त्यांचे विचार पटत नसतील, काहींना वादग्रस्त वाटत असतील पण म्हणून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणे हे उत्तर नाही. पत्रकारांवर/ विरोधी विचारांच्या लोकांवर प्राणघातक हल्ला होणे हे राज्यात कायदा सुव्यावस्था अस्तित्वात नसल्याचे दर्शवते.

त्यांनी काही वादग्रस्त विधाने केली असतील तर कायदेशीर कारवाईचा लोकशाही मार्ग अवलंबायला हवा होता. केंद्रात तर तसेच राज्यात भाजपाचेच सक्षम सरकार असतांना - बेकायदेशीर असा हिंसक मार्ग का निवडला? हल्लेखोरांना कायद्याचा धाक / भिती काहीच राहिलेली दिसत नाही.

राज्याची सांस्कृतीक राजधानी असणार्‍या पुणे शहरांत एका पत्रकारावर अशाप्रकारे प्राणघातक हल्ला होतो हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. पत्रकारांना त्यांची मते निर्भीड पणे मांडता येत नसतील तर लोकशाहीचा हा चौथा स्तंभ(ही) खिळखिळा झालेला आहे, पोखरला आहे असे वाटते. सशक्त लोकशाही साठी निर्भीड पत्रकारीता जगविणे गरजेचे आहे अन्यथा अराजकाला आमंत्रण देत आहोत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रतिसादांसाठी पर्याय
१ हल्ला वागळेंनीच घडवून आणला,
२ हल्ला व्हायला वागळेच जबाबदार,
३काचा फोडणे हेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य,
४चंद्रकांत पाटील, करमुसे, पालघरचे साधू ,अर्णव गोस्वामी, इ. प्रकरणी तुम्ही धागा का नाही काढला?

हल्ल्याचा निषेध!

राजकीय चर्चा कधी बघत नाही. त्यामुळे वागळे यांच्याबद्दल चांगले वाईट असे कुठलेही वैयक्तिक मत नाही.
ते एक पत्रकार आहेत आणि निर्भीडपणे आपली मते मांडतात अशी त्यांची इमेज आहे हे मात्र ठाउक आहे.
अश्या पत्रकारांवर हल्ला होत असेल तर ते निषेधार्ह आणि चिंताजनक आहे.

हल्लेखोरांना पकडणे अवघड नाही. योग्य ती कारवाई शिक्षा होईल अशी अपेक्षा.

अशा प्रकारच्या सर्वच हल्ल्यांचा निषेध करावा तेव्हढा थोडा आहे.
>>>
अगदी अगदी बरोबर

तरी ते त्यांच्या विचारांवर ठाम राहिले आहेत.
>>>
कधी, एकेकाळी सेनेला आणि पवारांना नावे ठेवणारी ही व्यक्ती. एक नितीश आणि दुसरे हे. आज या बाजूला तर उद्या त्या बाजूला जाणारे पलटी व्यक्तिमत्त्व.

राज्यात कायदा सुव्यावस्था अस्तित्वात नसल्याचे दर्शवते.
>>>
शंभर टक्के, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे हे मात्र नक्की. याची बीजे कोणी रोवली हा संशोधनाचा विषय आहे.

त्यांनी काही वादग्रस्त विधाने केली असतील तर कायदेशीर कारवाईचा लोकशाही मार्ग अवलंबायला हवा होता.
>>>
FIR दाखल झाली आहे

केंद्रात तर तसेच राज्यात भाजपाचेच सक्षम सरकार असतांना - बेकायदेशीर असा हिंसक मार्ग का निवडला? हल्लेखोरांना कायद्याचा धाक / भिती काहीच राहिलेली दिसत नाही.
>>>
कुठल्या हल्लेखोरांना ही भीती असते? भीती असती तर असे कार्य केलेच नसते. कायदा हातात घेतात म्हणजेच त्याची भीती नाहीये.

राज्याची सांस्कृतीक राजधानी असणार्‍या पुणे शहरांत एका पत्रकारावर अशाप्रकारे प्राणघातक हल्ला होतो हे माझ्यासाठी धक्कादायक आहे.
>>>
पहिली घटना नाहीये, दाभोळकर यांना विसरू नका.

पत्रकारांना त्यांची मते निर्भीड पणे मांडता येत नसतील तर लोकशाहीचा हा चौथा स्तंभ(ही) खिळखिळा झालेला आहे, पोखरला आहे असे वाटते. सशक्त लोकशाही साठी निर्भीड पत्रकारीता जगविणे गरजेचे आहे अन्यथा अराजकाला आमंत्रण देत आहोत.
>>>
हा स्तंभ केव्हाच निखळला. इमर्जन्सी लागू झाली त्यानंतर बऱ्याच लोकांनी (पत्रकारांनी) त्याची धास्ती घेतली आणि त्यांच्या आवडीच्या/सवडीच्या पक्षाची तळी उचलायला सुरुवात केली. आता तर एकही मोठे नाव असणारा विश्वासू पत्रकार (राजकारण कव्हर करणारा) माझ्या तरी बघण्यात, वाचनात नाही.

वागळे यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती/ कबूली सोशल मिडिआ मधे लिहीलेली आहे, व्हिडिओ मधे हल्लेखोरांचे चेहेरे कैद आहेत.... आता गृहमंत्री हल्लेखोरांवर काय कारवाई करणार आहेत?

IAC आंदोलनाच्या काळात सगळे पत्रकार किती निर्भय होते नाही?
सरकारला वाटेल ते प्रश्न विचारू शकत. रवीशकुमारने तर लष्कराने बंड करावे असे म्हटले होते.

हल्ल्याचा निषेध!
भरत यांनी दिलेल्या पर्यायातील 2,3,4 नामंजूर.

या भ्याड हल्ल्याचा निषेध. आपल्या विरोधी कोणीही बोलूच नये किंवा काहीही विरोध करू नये नये ही सत्ताधारी पक्षाची वृत्ती पाहिल्यावर लोकशाही किती दिवस शिल्लक राहील ही चिंता वाटते. इतके लोकमत, सत्ता तुमच्या बाजूने आहे ना मग एखाद्या विरोधकाच्या भाषणाची तुम्हाला कसली आणि का काळजी वाटते ?
हेच जर उबाठा किंवा काँग्रेस सत्तेत असताना झाले असते तर आताच्या गृहमंत्र्यांनी किती थयथयाट केला असता पण आता मात्र ते याचे राजकारण करू नका असे सोयीस्कर सल्ले देत आहेत.

बाकी वागळे आता वाचले तरी लवकरच त्यांना तुरुंगात टाकतील किंवा मारतील असे वाटतेय.

निषेध..आज सकाळ मध्ये ह्या सभेचा फोटो आहे, त्यात चिनुक्स सारखा दिसणारा एक जण आहे. तो तूच आहे का चिन्मय?

प्रतिसादांसाठी पर्याय

५. काल यांच्या भानगडीत रस्त्याला इतकं जास्त ट्रॅफिक होतं.. वैताग आला नुसता !! बद्धकोष्ठ झाल्यासारखा रस्ता तुंबला होता अगदी :/

हल्ल्याचा तीव्र निषेध!
वरच्या लिंक वाचल्या नाहीत अजून, पण हे इतकं राजरोस असेल तर कासुव्य खरंच बिहार लेव्हलची आहे का आता पुण्यात?

हल्ल्याचा तीव्र निषेध.

यापुढे भारतातील घटनांबद्दल ऐकल्यावर ‘तिथे कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही, की त्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही’ हा चकितचंदू प्रश्न पडणार नाही.

आपल्या विरोधी कोणीही बोलूच नये किंवा काहीही विरोध करू नये नये ही सत्ताधारी पक्षाची वृत्ती पाहिल्यावर लोकशाही किती दिवस शिल्लक राहील ही चिंता वाटते.
>>>
वर्षानुवर्षे असेच सुरू आहे आणि असेच सुरू राहणार. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजी केले, त्या नंतर लोकशाही मार्गाने सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी केले. अनंत करमुसेला तर घरात बोलावून मारले.

<< वाहता धागा आहे का? >>
----- नाही... तसा नसावा.

<< वरच्या लिंक वाचल्या नाहीत अजून, पण हे इतकं राजरोस असेल तर कासुव्य खरंच बिहार लेव्हलची आहे का आता पुण्यात? >>
------ निर्भय बनो च्या सभेसाठी परवानगी दिल्यास, आम्ही सभा उधळू असे भजपा शहर नेत्यांनी सांगितले होते. त्यांची वक्तव्ये/ धमक्या सोशल मिडिआ वर आहेत.

वागळे आणि सहकारी यांच्या जिवाला धोका आहे, ताफ्यावर हल्ला होणार आहे हे पुणे पोलीसांना माहित होते. अशा वेळी धमक्या देणार्‍या नेत्यांना अटक होणे अपेक्षित होते जेणेकरुन कायदा सुव्यावस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसता. पण तसे काही झाले नाही उलट सभा घेण्यासाठी आलेल्या वागळेंना चार तास डांबून ठेवले जेणेकरुन ते सभास्थानी वेळेवर पोहोचणारच नाही.

काही दिवसांपूर्वी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला. आज निर्भय बनो च्या कार्यकर्त्यांवर... पुणे तिथे काय उणे.

श्री निखिल वागळे यांच्या विषयी पूर्वी मला आदर होता. पण गेल्या काही दिवसात त्यांचा आक्रसताळेपणा वाढत चाललेला दिसतो. गेल्या काही वर्षात ते पत्रकार असलेले वृत्तपत्र बंद पडले ,ते ज्या चॅनलवर काम करत त्यांनी त्यांना काढून टाकले. गेले काही दिवस त्यांच्यावरचा प्रसिद्धीचा झोत बराच कमी झाला होता
गेल्या आठवड्यातच बाळासाहेब आंबेडकरांविरुद्ध काही विधाने करून त्यांनी त्यांच्या अनुयायांचा रोष ओढवून घेतला आहे. आता भाजपवाल्यांचा .

तुम्हाला जी माणसे आवडत नाही ती बाकीच्यांना वंदनीय असतात त्यांच्याविषयी कमेंट करताना जरा बेताने करावेत व त्यांच्या अनुयायाना अंगावर घेऊ नये हा झाला कॉमन सेन्स.
याउलट अशा लोकप्रिय व्यक्तींविषयी टोकाचे कमेंट करून अंगावर माणसे घ्यायची आणि मार खायचा असा माझा इतिहास आहे असे ते स्वतःच सांगतात.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ,काही दिवसापूर्वी वंचित, आता भाजप
सर्व पक्षांच्या नेत्यांबद्दल त्यांनी अतिशय वैयक्तिक ,टोकाची आणि वादग्रस्त विधाने केली आहेत.
यात समाजाचे काही होत नाही. फक्त सनसनाटी निर्माण होते.
बाकी याधागा शीर्षकातील दोन शब्दाविषयी मला आक्षेप नोंदवायचे आहेत
पहिला असा की वागळे निर्भीड नाहीत , आक्रस्ताळी व कांगावखोर आहेत
दुसरा असा की हल्ला भ्याड नाही, त्यांना अगोदर हा हल्ला होणार आहे असे माहित होते, हल्ला लपून छपून नाही समोरून झालेला आहे.
असो. बाकी येथील ठराविक लोकांचे ठराविक कॉमेंट वाचून मनोरंजन मात्र खूप होते .
आणि हो, या हल्ल्याचा मीही निषेध करतो.

Happy

छबुराव, छान केलंत कि हे लिहीलंत.
सोमिवर आता दोनच प्रकारची मतं मांडली जातात. दोन सेट्स आहेत. ध्रुवीकरण पहायला मिळते. त्या पेक्षा वेगळं मत मांडलं कि त्याला इकडे किंवा तिकडे ढकलले जाते. निखिल वागळे हे पत्रकार म्हणून नाही तर एखादे राजकारणी असल्याप्रमाणे मत मांडतात. आक्रस्ताळेपणा करतात. स्वतःच न्यायाधीश बनतात. हे उद्योग ते सनातनच्या बाबतीत करायचे तेव्हांही ते जाणवायचे.

त्यांना हृदयरोग आहे. मनासारखे मत मांडले नाही तर ते एकदम हायपर होतात. त्यामुळे बरेच जण त्यांच्याशी वाद घालत नाहीत.
पत्रकारितेत ठाम मत मांडावे पण ते मांडण्याची एक शांत पद्धत त्यांनी रवीशकुमार कडून शिकून घ्यावी. रवीशकुमार हे सुद्धा काही लोकांच्या रडारवर आहेत. पण त्यांच्या मत मांडण्याच्या शालीन पद्धतीमुळे एक ठराविक कंपू सोडला तर इतरांचे त्यांच्या विरोधात असे मत नाही. असे बरेच पत्रकार आहेत.

वागळे हे पुरोगामी गोटातले अर्णब गोस्वामी आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
प्रसिद्धीसाठी ते काहीही करू शकतात असे त्यांच्या जवळचे लोक सांगतात. खखोनिवाठा.

<< पहिला असा की वागळे निर्भीड नाहीत , आक्रस्ताळी व कांगावखोर आहेत
दुसरा असा की हल्ला भ्याड नाही, त्यांना अगोदर हा हल्ला होणार आहे असे माहित होते, हल्ला लपून छपून नाही समोरून झालेला आहे. >>

----- तुम्ही वर उल्लेख केला आहे... वागळे यांनी या आधी शिवसेना, राष्ट्रवादी, रि प, वंचित, काँग्रेस , भाजपा अशा सर्वांवरच खरपूस टिका केली रहे. ते पत्रकार आहेत, आणि निष्पक्ष टिका करणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा आहे. आज जे स्टेज वर बसलेले आहेत त्यांच्यावरही ते पुढे टिका करतील आणि हेच तर पत्रकारांकडून अपेक्षित आहे.

बाळासाहेब ठाकरे (काय दरारा होता त्यांचा त्या काळांत) तसेच शिवसेना यांच्यावरही टिका केली आहे. महानगर हल्ला झाल्यानंतरही त्यांची विचारधारा डळमळली नाही किंवा घेतलेली भुमिका सोडली नाही. आताचा हल्ला आणि मृत्यु समोर दिसत असतांनाही ते डळमळले नाहीत, सभास्थानी पोहोचले. तिथे भाषण दिले , संवाद साधला. म्हणून निर्भीड पत्रकार. तुम्ही म्हणत आहात तसा " कॉमन सेन्स " त्यांच्याकडे नाही म्हणून निर्भिड.

नाही तर शेतकरी आंदोलनाच्या वेळी, पूलावर Z+ सुरक्षेत तब्बल २० थांबावे लागले होते आणि आंदोलकांमुळे भाषण न देताच आल्या पावली परतावे लागल्याचा ५६" किस्सा आहे.

आताचा हल्ला झाला त्या वेळी वागळे आणि सहकारी निशस्त्र होते . त्यांच्यावर हल्ला करणारे चारही बाजूने आले होते असे अनेक व्हिडीओत दिसत आहे. काचा फोडणारे हे हिंसा करण्याच्या तयारीतच आलेले होता. एका निशस्त्रावर दगड, विटा , काठ्या, अंडी असा सुनियोजित रितीने हल्ला करण्यात आला म्हणून भ्याड हल्ला.
महात्मा गांधी यांच्या वर गोळ्या " समोरुन " झाडण्यात आल्या होत्या. हल्ला एका निशस्त्र वृद्धावर शस्त्राने झाला होता म्हणून भ्याड.
कसाबने मुंबईमधे अनेक निशस्त्र लोकांना गोळ्या घालून मारले..... काहींना अगदी समोरुन मारले पण निशस्त्र व्यक्तींवर शस्त्राने हल्ला केला आहे म्हणून भ्याड ( cowardice) हल्ला असा उल्लेख होतो.

<< पत्रकारितेत ठाम मत मांडावे पण ते मांडण्याची एक शांत पद्धत त्यांनी रवीशकुमार कडून शिकून घ्यावी. रवीशकुमार हे सुद्धा काही लोकांच्या रडारवर आहेत. पण त्यांच्या मत मांडण्याच्या शालीन पद्धतीमुळे एक ठराविक कंपू सोडला तर इतरांचे त्यांच्या विरोधात असे मत नाही. असे बरेच पत्रकार आहेत. >>

------ रवीश कुमार बद्दल सहमत... अभ्यास करुन मत मांडतो, कुठलाही आक्रस्ताळेपणा आढळत नाही.

हल्ल्याचा निषेध.
त्यांची मते पटली नाहीत तर उदाहरणे देऊन खोडून काढा किंवा अनुल्लेखाने मारा.

त्यांना मी निर्भीड पत्रकार वगैरे मानत नाही. कारण त्यांनीही राजकिय वातकुक्कुट असल्याचे दाखवून दिले आहे. व अलिकडे काही दिवसात त्यांचे व्हिडीओ बेताल/असंतुलित झाल्याचे दिसते.
हल्ल्यामुळे वागळे यांना उगीच प्रसिद्धी मिळाली/काही विशिष्ट वर्तुळात पत वाढली असे मी म्हणेन.

वागळे कायम आक्रस्ताळे आणि प्रोव्होकेटिव्ह बोलतात मच्युरीटी ही कमीच आहे आणि मला स्वतःला ते अजिबात आवडत नाहीत. न्हवे अत्यंत डोक्यात जातात.
हल्लीचा इतिहास माहीत नाही, हे १० -१५ वर्षांपूर्वी तयार झालेले मत आहे.
त्याचा आणि हल्ल्याचा काही संबंध असू नये. असे मोदी, रागा, सोनिया, ठाकरे आजोबा, पिता आणि पुत्र, पवार काका पुतण्या आणि बरेच लोक आहेत जे डोक्यात जातात. मग?

वागळे ह्या माणसाविषयी काहीच मत नाही. पण अश्या प्रकारे मारहाण करणं (आधी सांगून, नंतर जवाबदारी घेऊन, न सांगता, कुठल्याही प्रकारे) हा गुन्हाच आहे आणि त्याचा निषेध!!

ललित कला च्या धाग्यावर लिहायचं राहिलं आणि तो धागा बहुदा बंद झालाय म्हणून इथेच लिहितो, ह्या, त्या आणि तश्या प्रकारच्या कुठल्याही ‘फिजिकल अ‍ॅब्यूज' चं कुठलंही समर्थन स्विकारार्ह नाही. हा प्रकार निषेधार्हच आहे.

प्रत्येक नेत्याला, पक्षाला काळी बाजू असू शकते. पण ती मांडणे शक्य नसते कारण चोपतात. मग कोण मांडतो? त्यांच्या विरोधात असणारे तेवढेच बलवान असतात त्यांची प्यादी मांडतात.
पत्रकारिता म्हणण्यापेक्षा ते जर कुठल्या पक्षात गेले तर उपयोग होईल.

Pages