नेहरू नावाचे भूत...

Submitted by www.chittmanthan.com on 30 January, 2024 - 00:16

             

               दोस्तांनो आपण लहान असल्यापासून भुतांच्या गोष्टी ऐकत आलोय. माळावर राहणारा खवीस, वेताळ, वडाच्या झाडावरचा झुटिंग अश्या बर्‍याच व्हरायटी तुम्ही ऐकली असेल. पिशाच पण किती भयानक असतात. पण सांगू का ही किती जरी भयानक असली तरी त्यांना काही तरी तोड आहे, कुणाला कोंबडी दिली, कुणाला मटण, कुणाला दारू... काही ना काही उपाय आहे ज्यामुळे त्यांची पाठ सोडवता येते. पण आपल्या देशा मागे लागलेल जवाहरलाल नेहरु यांच भूत काही पाठ सोडवेना. आता बघाच की गेल्या 10 वर्षात आपण बातम्या ऐकतोय टीव्ही वर... 
महागाईला नेहरू जबाबदार, 
जातीय दंगली ना नेहरू जबाबदार, 
मणिपूर समस्या... नेहरू जबाबदार, 
शेतकरी आत्महत्या... नेहरू जबाबदार...
 आमच्या म्हशी गाभण राहीनात... नेहरू जबाबदार, 
आमच्या गावात पक्या उघड्यावर हागायला जातो त्याला पण नेहरू च जबाबदार, जनाची बायको पोटुशी राहीना त्याला पण नेहरू हे जबाबदार आहेत. आता मला सांगा इतक्या मोठ्या समस्या निर्माण करणार नेहरूंच भूत कस घालवायच राजकिय आरोपातून ते मला समजेना.
                 नेहरूंचा मृत्यू झाला 1966 ला पण आज पण जुन्या संसद भवनाच्या भिंतीना कान लावला रात्री तर आवाज येत असेल ...
              "आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
            समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य   घडविण्यास, तसेच  त्याच्या समस्त नागरिकांना:
सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ;दर्जाची व संधीची समानता;‍ निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करनेचा संकल्पपूर्वक निर्धार करत आहोत "
             काही वर्षापूर्वी एका माणसाला नेहरू नावाच भूत झपाटलेल पाहिल आहे मी... ज्याला झपाटल तो माणूस अचानक सर्वधर्म समभाव याबद्दल भाषण ठोकायला लागला.. अचानक होमी भाभा अणि विक्रम साराभाई यांच्या बद्दल बोलायला लागला. आयआयटी आणि आयआयएम च्या गप्पा ठोकायला लागला,अणुबॉम्ब बनवायच्या गप्पा करू लागला...हे नेहरूंचे भूत विज्ञानवादी आहे त्यामुळे ह्याला देवाची, मंत्र तंत्राची भीती किती असेल हे सांगता येत नाही. स्वतः ची 98% टक्के संपत्ती देशाला दान केलेल्या नेहरूंच भूत मला नाही वाटत की कोंबडी मटणाच्या नैवेद्याच्या आमिषाने ऐकेल म्हणुन. म्हणून त्याच्या समोर मी संविधान धरल अणि महात्मा गांधी यांचा फोटो समोर धरला अणि विचारल भारत सोडून कधी जाणार...  आनि किती दिवस भारताच्या राजकारणाचा अविभाज्य भाग बनून राहणार आहेस? तुझ्या मागण्या काय आहेत?तो काहितरी विचित्र अणि भयानक म्हणाला, "विज्ञानवादी लोक" "सर्वधर्मसमभाव",  जातीय सलोखा अणि कायद्याचा आदर अणि येत्या अमावास्येला एक आयआयटी किंवा एक आयआयएम स्थापन करा तरच मी जाणार नाहीतर आणखी नेहरू जन्माला घालणार... लोकाना उदारमतवादी बनविणार...!!! आता मला सांगा ह्या गोष्टी मी कश्या पुरवू नेहरूंच्या??? हित विज्ञानाचे शिक्षक सत्यनारायण घालतायत, पदवीधर पोर नोकरीसाठी, लग्नासाठी पत्रिका, ग्रह शांती करतात तिथ मी  विज्ञानवादी माणूस कसा आणू? आनि जातीय सलोखा निर्माण झाला तर बिचार्‍या राजकारणी लोकानी करायच तरी काय?.. आनि मला सांगा आयआयटी आणि आयआयएम स्थापून कोणत्या देशाच भल झालय ओ? एखाद धार्मिक स्थळ निर्माण केल तर कमीत कमी दहा भिकारी तरी उपाशी राहणार नाहीत.
                 काहीतरीच ह्या नेहरूंच.. जेव्हा जिवंत होते तेव्हा ISRO स्थापन केली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स स्थापन केली.. मला सांगा हजारो कोटी खर्च करून मंगळ अणि चंद्रावर यान पाठवतोय आपण. काय तर म्हणे पृथ्वी नष्ट झाली तर मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करायची. अरे इतके पैसे खर्च करण्यापेक्षा आपली पुराणे वाचली असती तर शनी अणि मंगळ कळला असता. आनि हो फोटो मध्ये मंगळ बघायच्या आधी पत्रिकेत मंगळ बघितलाय आम्ही म्हणुन सांगा त्या वैज्ञानिकांना.
                   असो वैताग आला तरी करणार काय... नेहरू नावच भूत काही "प्रधान सेवक" यांच्या पाठीवरून उतरणार नाही असंच दिसतय...!!

असेच आणखी लेख वाचण्यासाठी www.chittmanthan.com वर क्लिक करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देश स्वतंत्र झाला आणि देशाची मूळ चोकट कशी असावी हे ठरविण्यात आले तेव्हा नेहरूच सत्तेत होते.

भारता सरकार कसे निवडले जावे ह्या पासून देशाचं धोरण काय असावे, लोकशाही कोणत्या पद्धतीची असावी .
कोणाला संरक्षण द्यावे,कोणाला बिलकुल देवू नये हे सर्व नेहरूंनी च ठरवले आहे ( म्हणजे त्यांच्या सरकार नी च ते ठरवले आहे)
त्या मुळे आज च काय अजून दोनशे वर्षा नंतर पण ज्या समस्या देशात असतील त्याला नेहरूनाच जबाबदार धरले जाईल..

त्या मुळे आज च काय अजून दोनशे वर्षा नंतर पण ज्या समस्या देशात असतील त्याला नेहरूनाच जबाबदार धरले जाईल..

>>>> Lol तोच प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला फक्त समस्या च दिसतात.
त्यांच्या धोरणांमुळे झालेले फायदे पाहताना झापडे मिटतात.

दुर्दैवी आहे हे सगळं.
ज्यांनी इंग्रजांच्या मानगुटीवर बसून देशातून हकावल, त्या स्वातंत्र्य सैनिकांची (गांधी नेहरू पासून सावरकर बोस पर्यंत) आपल्या सोयीनुसार भूत बनवून राजकीय पक्षांनी आपल्या मानगुटीवर बसवली आहेत.
त्या वीरांची तत्व, मार्ग वेग वेगळे होते तरी लक्ष एक होत, आता लक्षच बदलल आहे...

<< देश स्वतंत्र झाला आणि देशाची मूळ चोकट कशी असावी हे ठरविण्यात आले तेव्हा नेहरूच सत्तेत होते.
भारता सरकार कसे निवडले जावे ह्या पासून देशाचं धोरण काय असावे, लोकशाही कोणत्या पद्धतीची असावी .
कोणाला संरक्षण द्यावे,कोणाला बिलकुल देवू नये हे सर्व नेहरूंनी च ठरवले आहे ( म्हणजे त्यांच्या सरकार नी च ते ठरवले आहे)
त्या मुळे आज च काय अजून दोनशे वर्षा नंतर पण ज्या समस्या देशात असतील त्याला नेहरूनाच जबाबदार धरले जाईल..
नवीन Submitted by Hemant 333 on 30 January, 2024 - 20:45. >>

------- गाय, गोबर, गोमांस या गोष्टींना महत्व न देता वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारला. इस्त्रो, DRDO, IIT अशा संस्थांची उभारणी केली म्हणून आज आपण चंद्र तसेच मंगळावर मजल मारु शकतो. नेहरु तसेच आंबेडकर यांच्या सारखे नेतृत्व मिळाले म्हणून लोकशाही बघायला मिळाली.