राममंदीर - भाजपच्या राजकारणाचा बळी??

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 13 January, 2024 - 03:39

सध्या राममंदीराच्या ऊद्घाटनाचा कार्यक्रम भाजप पक्षाने हायजॅकेल्यांचं बोललं जातंय. सदर कार्यक्रम हा हिंदूंचा धार्मिक कार्यक्रम आहे. पण तो धार्मीक न राहता भाजपने हायजॅक करून राजकीय केलाय. ह्या कार्यक्रमावर हिंदूंच्या चारही शंकराचार्यांनी बहिष्कार घातलाय. तसंच राष्ट्रपतीही येणार नाहीये. १९४८ पासून राममंदिरासाठी लढणारे रामलल्ला समीती, निर्मोहीआखाडा ह्यांनाही कार्यक्रमातून बाजूला फेकल्यासारखं आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, शिवसेना अश्या संघटना ह्या आंदोलनात आघाडीवर होत्या त्यांना व त्यांच्या नेत्यांनाही हा कार्यक्रम बाजूला सारून होतोय.
मंदिर अपुर्ण आहे, तरीही फक्त भाजपला राजकिय फायदा व्हावा म्हणून ऊद्घाटन “ऊरकलं” जातंय कारण लगेच चार पाच महिण्यांनी लोकसभेच्या निवडणूका आहेत. एकंदरीत हिंदूंचा धार्मीक कार्यक्रम हायजॅक करणं योग्य आहे का?? हिंदूंच्या भावनांचा कुणी विचार करनार आहे का?? भाजपचे भक्तगण हिंदूंच्या शंकराचार्यांना शिव्या घालताहेत त्यांना कुणी आवर घालनार आहे का?? असे असंख्य प्रश्न हिंदूंना पडलेत.
राजकीय पक्षाने लोकांना पुरवलेल्या सेवा, विकास ह्यावर मत मागायला हवे. पण हिंदूंच्या इंग्रजकाळापासून लढत असलेल्या अनेक पिढ्यांची मेहनत त्यांना काहीही सन्मान न देता एक राजकीय पक्ष राजकीय फायद्यासाठी वापरतोय. ह्यावर ऊपाय काय?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बिचारा तोगडिया . हेचि फल काय मम तपाला आळवत असेल
अशोक सिंगल गेले म्हणून सुटले, नाहीतर त्यांना पण असंच अडगळीतून शोधून आणावं लागलं असतं.

फक्त माझंच थोबाड पहा ह्या योजने अंतर्गत सगळ्याच हिंदूत्ववाद्यांना लाथ घालून बाजूला फेकलंय.

शंकाराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं’, नारायण राणे यांचं आव्हान.
https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/bjp-leader-narayan-rane-gi...

जे काही केलंय ते भाजपनेच. ५०० वर्षांपासून भाजपच लढतंय मंदिरासाठी. ह्यांनी शंकराचार्यांनाही सोडलं नाही.

शंकाराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं’, नारायण राणे यांचं आव्हान.
https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/bjp-leader-narayan-rane-gi...

जे काही केलंय ते भाजपनेच. ५०० वर्षांपासून भाजपच लढतंय मंदिरासाठी. ह्यांनी शंकराचार्यांनाही सोडलं नाही.

व्हाईटहॅट ह्यांच्याशी अंशत: सहमत.
"मोदी मूर्तीला हात लावणार, मग आम्ही तिथे येऊन कसे चालणार" हे शंकराचार्य पूरी म्हणतात. राष्ट्रपती मुर्मू ह्यांना दिल्लीच्या जगन्नाथ मंदिरात गर्भगृहात येऊ दिले नाही ही फार जुनी गोष्ट नाही. मग अश्या लोकांना लिबरल लोकांनी का उचलून धरावे ? असो.

दुसरी बाजू - मोदींना नीच म्हणल्यावर भक्त आणि मोदींना सुद्धा ही जातीवाचक टिप्पणी आहे हे लगेच समजते. धनकड ह्यांना सुद्धा. आता मात्र ते शांत आहेत. ठीक आहे, मोदींचे आणि धनकड ह्यांचे समजते. ते आपल्या आणि शंकराचार्य ह्या तिन्ही पदांची गरिमा राखत आहेत. पण इतर भक्तांचे काय ? ते का गप्प आहेत ?
इतकेच काय, एका कणाहीन पत्रकाराने "गुरुदेव गुरुदेव" करत भक्तिभावाने पुरीच्या शंकराचार्यांची मुलाखत घेतली. त्यात ते स्पष्ट म्हणाले, जाती ही व्यापक आहे. वर्ण त्याचा आतच येतात. म्हणजे सगळे म्हणत असतात ना, हिंदू धर्मात जाती कधीच नव्हत्या, वर्णच होते, त्यांनी ह्या फुग्याला टाचणी लावली. त्या पत्रकाराची तर त्रेधा तिरपिट झाली. त्याने प्रश्न असा विचारलेला की नेहमीचे जाती वै सगळे अधार्मिक आहे हे affiirm होईल. पण झाले उलटेच. त्याने डॅमेज कंट्रोल म्हणून "पण गुर्देव वर्ण हे ह्या जन्माच्या कर्मावर आधारित असतात ना" असे विचारले. तिथे उत्तराने आणखीन गाळात गेला. मागच्या जन्माचे कर्म वर्ण ठरवते, हे उत्तर मिळाले. मग त्याने विषय सोडला.