नर्मदा परिक्रमे वरील माझ्या ब्लॉग चा दुवा कसा व कुठे टाकू ?

Submitted by Narmade Har on 2 December, 2023 - 18:52

नर्मदे हर ! इथे नवीन लिखाण कसे करावे ते उमगत नाही आहे . mazinarmadaparikrama डॉट blogspot डॉट com नामक एका ब्लॉग बाबत मला लेखन करायचे होते . कसे व कुठे करावे ? कुठल्या धाग्याअंतर्गत करावे ? कृपया मार्गदर्शन व्हावे ही प्रार्थना .

Group content visibility: 
Use group defaults

हे दोन ओळींचं लेखन केलं आहे, तसंच इथे तो मजकूर कॉपी पेस्ट करून टाका. छायाचित्रे असतील तर अपलोड करून टाका.
फक्त ब्लॉकची लिंक दिली तर फार कमी लोक वाचतील.

ब्लॉग चा दुवा नको.
इथेच संपूर्ण माहिती लिहा.
त्या ब्लॉगवर जे फोटो आहेत त्यावर क्लिक करून image link 'लिंक'मिळेल ती
उभ्या फोटोसाठी
<img src ="लिंक" width = "80%" />
आडव्या फोटोसाठी
<img src ="लिंक" width = "100%" /> मध्ये टाकून फोटो येतील.

अश्वत्थामा नाही दिसला परंतु तो जिथे भेटतो असे म्हणतात त्या शूलपाणीश्वराच्या झाडीत एका जख्मी उडीया साधूने पोटावरील जखमेवर लावायला तेल मागून घेतले . हा अश्वत्थामा नक्कीच नाही .

मी एक थिअरी मांडले त्यानुसार पांडव कौरव हे एलियन होते. युद्ध संपल्यावर पांडव त्यांच्या यानात बसून निघून गेले पण कौरवांचा चालक मारला गेला असावा आणि अश्वत्थामा इथेच अडकून पडला.

मी एक थिअरी मांडले त्यानुसार पांडव कौरव हे एलियन होते.>>>
मला ही थिअरी पटते. अश्वत्थामाचे शेवटचे दर्शन प्रिडेटर चित्रपटात आरोनॉल्डसोबत फायटिंग करतानी झालं होतं. पाण्यात भिजल्यामुळे त्याचे ब्रह्मास्त्र बिघडले.

लिंकमधला मराठी ब्लॉग धावता वाचला. चित्रे सुरेख आहेत. सर्चमध्ये wordpress वरचा इंग्रजीत blog सापडला. पण तो आवडला नाही. भाषांतर कृत्रिम होते.
मराठीतला चांगला आहे.
या कष्टप्राय भटकंतीचे कौतुक वाटते.
______________
बाकी परिक्रमेसंबंधी पाच सहा पुस्तके वाचली आहेत. प्रत्येकाचा अनुभव आणि हेतू वेगळा होता.
----------------
अश्वत्थामा हे रूपक असावे. तो प्रत्येक व्यक्तीत थोडाफार असतो हे माझे मत. म्हणजे नर्मदेकाठीच भेटतो असं नाही. कधीही कुठेही डोक्यावर काठी मारतो.

ब्लॉगवरचे काही लेख वाचले
सुंदर फोटो आणि छान अनुभव लिहिले आहेत
इथे टाका लेख आणि फोटो एकेक करून

काही लेख वाचले. बाकी वाचन सुरू आहे. अतिशय छान लिहिले आहे. मैय्याचे काही अनुभव प्रत्यक्षात घेतले असल्याने पुढे वाचनाची ओढ आणखीनच वाढली आहे.
आयुष्यात एक तरी परिक्रमा करायची इच्छा आहे. बाकी मैय्याची मर्जी. नर्मदे हर!

लेखनासाठी "विषय" रकान्यात कुठला विषय निवडावा ? ललित ? धार्मिक ? अध्यात्मिक ? भटकंती ? कृपया मार्गदर्शन व्हावे .

लेखनासाठी "विषय" रकान्यात कुठला विषय निवडावा ? ललित ? धार्मिक ? अध्यात्मिक ? भटकंती ? पर्यावरण ? कृपया मार्गदर्शन व्हावे .

Groups audience या रकान्यातील कुठल्या गटावर अधिक आवडीने हा विषय वाचणारे श्रोते मिळतील याबाबत कोणीतरी कृपया मार्गदर्शन करावे अशी माफक अपेक्षा आहे

तुम्ही त्यातल्या त्यात रिलेव्हांट कोणताही गट निवडू शकता.प्रकाशित करताना 'ग्रुप पुरतेच मर्यादित व्हिजिबलिटी' आणि 'सर्व सदस्यांसाठी' असे 2 पर्याय असतात.सर्व सदस्य वाला पर्याय निवडला तर लिखाण ग्रुप खाली वर्गीकृत पण राहील आणि गृप सदस्यत्व नसलेल्याना पण ग्रुप जॉईन न करता वाचता येईल.