
२०१५ ला अमेरिकेत आल्यावरची पहिलीच दिवाळी. गणपती होताच इंडिया बझार मध्ये रांगोळीचे रंग, पणत्या, फुलांच्या माळा छान मांडून ठेवायला सुरुवात झाली होती. तर Costco मध्ये Christmas सजावटीचे सामान आलेले त्यातून लाईटची माळ उचलली. आकाशकंदील काही कुठे दिसला नाही. हल्लीच म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांतच इकडे पटेल ब्रदरस् मध्ये आकाशकंदील पण बघायला मिळू लागलेत.
असो! मी गिफ्ट wrapping चे पातळ paper आणले. आणि करांजांचे जसे जमतील तसे आकाशकंदील बनवले.
लांबलचक बाल्कनीमध्ये लाईटच्या माळा लावल्या आकाशकंदील लावले. पण बल्ब लावायला काही सोय नव्हती त्यामुळे मग ते तसेच टांगले.
लाडू, चिवडा केला. बाकी फराळ भारतातून आईने पाठवलेला. जो आजपर्यंत प्रत्येक वर्षी ती पाठवते आहे.
पहिल्याच दिवशी जोराचा पाऊस-वारा आला आणि सगळे आकाशकंदील पावसात भिजून पार चिपाड झाले. सगळी मेहनत पाण्यात गेली. त्यानंतर परत कधी आकाशकंदील बनविले नाहीत .बाकी यथासांग घरच्या घरी दिवाळी साजरी केली .
दिवाळी निमित्ताने एका हौशी पालिकेच्या पुढाकाराने दरवर्षी शाळेतल्या शिक्षिकांसाठी छान लंच आखले जायचे. माझे ते पहिलेच वर्ष होते. मेनू ठरला. सगळ्या बायकांनी पदार्थ आपापसात वाटून घेतले. काही पालकांनी गिफ्ट साठी वर्गणी दिली. प्रत्येकीने ५० माणसांना पुरेल एवढा पदार्थ करून आणायचा. मुख्य मेनू मध्ये शेवयांचा उपमा, लेमन राईस, पुरी, श्रीखंड, रसमलाई, बटाट्याची डोसा भाजी, इडली, चटणी,सांबार, सलाड, आणि डोसे असा जंगी बेत ठरला. गिफ्ट बॅगमध्ये मिठाई म्हणून एकीने बेसनाच्या वड्या करायच कंत्राट घेतल - जवळ जवळ दोन अडीचशे वड्या. कोणीतरी फरसाणची जबाबदारी घेतली
ही जी पुढारी पालक होती तिने मुख्य दिवशी डोसा बनविण्याचे कंत्राट घेतले. स्टाफरूम मधील स्टोववर दोन-चार तवे टाकून लाइव्ह डोसा काउंटर करण्याचा तिचा मानस मला तर अगदीच महत्त्वाकांक्षी वाटला. पन्नास एक लोकांसाठी डोसे करायचे म्हणजे काय खायची गोष्ट आहे का?
नंतरच्या काळात इकडे भारतीय ( आणि बांगला देशी) महिलांना दोन-तीन दिवस राबून ४०-५० माणसांचा स्वयंपाक लिलया करताना पाहिलंय, अगदी ३-४ कोर्स जेवण, दोन अडीचशे दहीवडे, तीन एकशे पेढे, एका माणसाला उचलवणार नाही येव्हढी मोठी पातेली भरून उपमा वगैरे वगैरे. आणि हे सगळं मुलांच्या शाळा-क्लासेसना सोडण-आणण, घरातील इतर काम सांभाळून. ह्या महिलांच्या दहा टक्केही क्षमता गेल्या आठ वर्षांत सुद्धा कमवता आली नसल्याने त्यांना दंडवत ठोकून हा लेख पुढे नेते.
माझ्या वाट्याला तसा अगदीच (वरवर) सोपा वाटणारा पदार्थ आला, तो म्हणजे चाट सलाड.
सलाड असले म्हणून काय झालं, मुंबईत असताना सातआठ माणसांच्या वरती स्वयंपाक करायची अजिबात सवय तर नव्हतीच पण मोठ्या प्रमाणावर काही केलही नव्हतं कधी. कारण कधी पाहुणे आले तर स्वयंपाकाच्या मावशी, प्रशांत कॉर्नर, गोखले उपहारगृह असे बरेच पर्याय असायचे ताट सजवायला.
घरात एवढी मोठी भांडीही नव्हती, आणि ते बनवलेलं सलाड शाळेत घेऊन कसं जाणार हाही एक प्रश्नच होता. ते सगळे प्रश्न माझ्या शेजजारणीने चुटकीसरशी सोडवले. ती आणि मी मिळून सलाड करायचे आणि तिच्या गाडीने ट्रे घेऊन जायचे ठरविले.
मोड आलेले मूंग, काबुली चणे, बटाटे, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, गाजर, बीट, आणि चाट मसाला.
दोन मोठे बेकिंग ट्रे आणले. त्यात सलाड भरून वर गाजर, बीट किस, कोथिंबीर पसरवून छान सजावटही केली.
गाडीने शाळेत गेलो. ते जड ट्रे घेऊन स्टाफ रूम मध्ये पोहचलो तर सुंदर सजावट केली होती- पताका, रांगोळ्या, गिफ्ट बॅग..
वरून डोसे, चटणी, सांबार ह्यांचा सुगंध आमचीच भूक चाळवून गेला.
छान सजविलेल्या टेबलांवर सगळे पदार्थ विराजमान झाले. प्रत्येक पदार्थाच्या समोर त्याचे नाव आणि त्यातल्या जिंन्नसांची यादी ठेवली गेली. बरोबर बारा वीसला एकेक शिक्षक/ शिक्षिका यायला सुरुवात झाली. तसा इकडे डोसा काउंटरही सुरू झाला. ज्या रीतीने ट्रे खालती होत होते, डोसे केले जात होते त्यावरून त्या सगळ्या गोऱ्या मंडळींना ते पदार्थ खूपच आवडलेले दिसले.
कोणाला सलाड आवडले, तर कोणाला श्रीखंड-रसमलाई. पण सगळ्यात जास्त भाव कुरकुरीत डोसे खाऊन गेले. एका प्रामाणिक शिक्षिकेने तिला भारतीय पदार्थ जरा तेलकट किंवा मसाल्याचे वाटतात पण सलाड आणि श्रीखंड मात्र खूप आवडल्याचे सांगितले. मी पण मनातल्या मनात सुखावत, मीच ते बनवल्याचे अजिबात कळू दिले नाही.
तर एकाने इतका कुरकुरीत गरमा गरम डोसा किंवा तसा कुठलाही पदार्थ आधी कधी काही खाल्ला नसल्याची कबुली दिली.
पण ती पालक त्याच वर्षी भारतात निघून गेल्याने मग नंतर शाळेत कधी दिवाळी पार्टी झाली नाही.
त्यानंतरच्या दरवर्षीची दिवाळी साधारण अशीच गेली. इकडच्या मित्र-मैत्रिणी, हाताच्या बोटावर मोजता येण्याइतके नातेवाईक, यांच्याबरोबर दिवाळी नंतरच्या वीकएंड ना साजरी करत. इकडे वणवे, लाकडाची घरे यांमुळे क्वचितच एखादी पेटी फुलबाज्या लावल्या तरच अन्यथा फटाके अगदीच तुरळक. पणत्याही अगदी मोजक्याच, शास्त्रा पुरत्या. मग हवे तर LED दिवे लावा हवे तेव्हढे. त्यातल्या त्यात त्याच जरा हौसेनी रंगवायच्या. हळू हळू इकडे रुळताना मग दिवाळीला इकडच्याच गोतावळ्यातील अभारतीय लोकांना दिवाळी निमित्ताने त्यांना मनापासून आवडलेली चितळ्यांची बाकरवडी किंवा रसमलाई खिलविणे हेही सालाबाद झाले. यंदा आमच्या शेजारणीने मी झाड लोट करत असताना हटकले, “लायटिंग लागल म्हणजे दिवाळी आली वाटतं? Happy Diwali“ मग मीही संभाषण पुढे नेत, “ तुला भारतीय मिठाई आवडते का? मी दिली तर आवडेल का तुम्हाला? “
“आम्ही कधी खालीच नाहीये. तू दिलीस तर आम्ही खाऊन बघतो. पण आम्ही चॉकलेट नाही खात. “
“chickpea (बेसन), clarified बटर (तूप) , wheat (rawa) अस असतं. चालेल का?”
“हो चालेल चालेल.”
त्यामुळे ह्या वर्षी शेजारीच ( उतार भारतीय कुटुंब) नाही तर पाजारीही (अमेरिकन कुटुंब)दिवाळी फराळ दिल्यावर अगदी जुन्या मनातल्या दिवाळीच्या एक पाऊल जवळ गेल्यासारखं वाटलं.
एक वर्षी दिवाळीत DMV (डिपार्टमेंट ऑफ मोटर वेहिकल) च्या ऑफिसमध्ये गेले होते तिकडे बऱ्याच अभारतीय स्त्री कर्मचारी लेहेंगा किंवा साड्या नेसून आल्या होत्याआणि मीच नेहेमीच्या जीन्स-हुडी मध्ये होते. त्या ताड-माड उंच, धिप्पाड गोऱ्या- काळया बायकांना त्या पोशाखात बघून एकदम गंमत वाटली.
बहुदा बे एरियात भारतीय लोकांच प्राबल्य असल्याने असेल परंतु इकडच्या बऱ्याच ऑफीसात, शाळेत म्हणजे कर्मचारी वर्गात दिवाळीच्या पार्ट्या होत असतात. ह्या वर्षी तर नासामध्ये ही पहिल्यांदाच छोटेखानी दिवाळी साजरी झाली हे एका नासा कर्मचारीच्या पोस्ट वरून कळले. Icecles ह्या आईसक्रीमच्या दुकानामध्ये दिवाळी स्पेशल “गुलाब जामून” फ्लेवरच ice-cream होतं.
Costco मध्ये त्यांच्या कीर्तीला शोभणारा भला मोठा साजूक तुपातल्या मोतीचुराच्या लाडवांचा बॉक्स मिळाला.
ह्या रेट ने बहुदा काही वर्षात Costco मध्ये दिवाळीत पणत्या, उटणे, आणि आकाशकंदील दिसले तरी आश्चर्य नको वाटायला.
ह्या वर्षीची दिवाळी तर झालिये, फराळही संपला असेलच! तो आमचा पण संपला. पण लगेच इकडे आमची आता Thanks Giviing सुट्टीची आणि ब्लॅक फ्रायडे सेलची तयारी सुरू झालीय.

--
---
--
--
--
--
--
--
---

---

--

छान लिहिलंय..
छान लिहिलंय.. फोटो पण मस्त
छान आठवणी
छान आठवणी
थोडा अजुन सम्पादित केला.
थोडा अजुन सम्पादित केला.
मनिम्याऊ आणि धनवन्ति धन्यवाद!
मस्तच.
मस्तच.
धन्य्वाद अन्जु!
धन्य्वाद अन्जु!
लेख आणि फोटो दोन्ही मस्त..!
लेख आणि फोटो दोन्ही मस्त..!
धन्यवाद रुपाली!
धन्यवाद रुपाली!
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
शर्मिला धन्यवाद!
शर्मिला धन्यवाद!
छान लिहिले आहे,फोटो पण छान
छान लिहिले आहे,फोटो पण छान आहे!
AhenS धन्यवाद!
AhenS धन्यवाद!
दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या
दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'अमेरिकेतील दिवाळी' या लेखात गंमतीने लिहिले होते की मोतीचूर लाडवांबरोबर आता काही वर्षात बहुदा इकडे Costco मध्ये आकाश कंदील आणि पणत्याही मिळतील.
या वर्षी दिवाळीत Costco / Walmart ( इकडच्या मोठ्या रिटेल चेन्स) मध्ये आकाशकंदील, पणत्या, फुलांच्या ( कृत्रिम) माळा, तोरणे , चितळ्यांचा फराळ सगळं काही मिळतंय .
एव्हढच नाही तर Costco च्या प्रवेशद्वाराजवळ मोठा बोर्ड होता, "दिवाळी साठी स्पेशल २४ ct सोन्याचा लक्ष्मी बार"!
काल रात्री साडे आठच्या दरम्यान तनिष्क ( हो टाटांचे Tanishq, आता त्यांची एक शाखा इकडे सॅन होजे मध्येही चालू झाली आहे. PNG आधी पडूनच होती) मध्ये रस्त्यावरून दिसेल एव्हढी गर्दी होती.
वाटलं, इकडे असलेल्या भारतीयांच्या क्रयशक्तीचच हे लक्षण नाही का?
अमेरिकेत बहुतांश घरे लाकडाची
अमेरिकेत बहुतांश घरे लाकडाची असतात, शिवाय दिवाळी येते ती पानगळीच्या मोसमात, जिकडे तिकडे सुकी पाने उडत असतात.
अशावेळी फटाके उडवणे खरे तर शहाणपणाचे नाही, पण भारतीयांना सिव्हिक सेन्स वगैरे ..
यावर्षी एडिसन मध्ये सात ठिकाणी आगीचे बंब बोलवावे लागले. रात्री ११ वाजेपर्यंत फटाके उडत होते, वीक डे असल्याने अमेरिकन लोकांची चिडचिड होणे साहजिकच होते. दिवाळीच्या दुसर्या दिवशी रस्ताभर फटाक्याचा कचरा वगैरे आठवणींनी nostalgic होत असावेत.
इकडे रस्त्यावर वगैरे फटाके
इकडे रस्त्यावर वगैरे फटाके उडवलेले मी बघतले नाहीयेत कधी... Except downtown ला स्पॅनिश/ Mexican कुठल्यातरी सणाला उडविल्याचं ऐकलं/ बातम्यांमध्ये पाहिलं आहे.
एक इकडचं गोरा माणूस म्हणालेला ४ July ला घरीच थांबतो.. चुकून एखादा फटाका घरात शिरला तर.. २०१५ मध्ये ऐकलेल.
फटक्याचा आवाज, कचरा, होळीचे रंग ह्या बाबतीत खरंच जबाबदारीने वागले पाहिजे... आपला उत्साह / उत्सव दुसऱ्यांना तापदायक ठरता कामा नये.
>>पण भारतीयांना सिव्हिक सेन्स
>>पण भारतीयांना सिव्हिक सेन्स वगैरे ..
>> फटक्याचा आवाज, कचरा, होळीचे रंग ह्या बाबतीत खरंच जबाबदारीने वागले पाहिजे... आपला उत्साह / उत्सव दुसऱ्यांना तापदायक ठरता कामा नये.
+++ प्रचंड सहमत. यात गणेशोत्सव ही सामील केला पाहीजे.
कॉस्टकोत कंदिल मिळायला
कॉस्टकोत कंदिल मिळायला लागला? वा.
फटाके अमेरीकेत काय कुठेही उडवणं मुर्खपणाच आहे.
२ वर्षापुर्वी एडिसन मध्ये एका मित्राला घरातून पळ काढावा लागला कारण शोभेचाच फटाकाचा किटळ ट्रॅश वर उडाला का लाईटींगवर.
ह्या वर्षी वाशीत एका ओळखीच्या फॅमिलीत दिवाळीत भीषण आग( कशाने माहित नाही नक्की) पण ह्या गोष्टी दिवाळीतच घडतात ज्यास्त.
असो.
सर्वांनी काळजी घेवुन करावी सण साजरे.
नाही , कंदील वॉलमार्ट मध्ये..
नाही , कंदील वॉलमार्ट मध्ये..
बहुतेक 1-2 वर्षात Costco मधेही येईल .
फटाके चुकीच्या पद्धतीने फुटले तरी अपघात होतात.
दुसरीत एक मुलगी होती. ती झाड / भुईनळा लावायला गेली aanibto फुटला वाटतं.. तिचा हात पूर्ण भाजलेला.
स्पेअर अमेरिका फ्रॉम नॉइझ
स्पेअर अमेरिका फ्रॉम नॉइझ पोल्युशन. इथे येउनही वृत्ती काही बदलत नाही.
आज न्यू जर्सी फटाक्यांचा
आज न्यू जर्सी फटाक्यांचा व्हिडिओ बघायला.
भयानक चिंताजनक आणि संतापजनक..
पाहिला व्हिडिओ आता तुमची
पाहिला व्हिडिओ आता तुमची पोस्ट वाचून.
बरे झाले इथे उल्लेख केला. जरा शाळेच्या ग्रूपवर टाकतो. काही मित्रांना दाखवायचा आहे मुद्दाम..
आज न्यू जर्सी फटाक्यांचा
आज न्यू जर्सी फटाक्यांचा व्हिडिओ बघायला.
भयानक चिंताजनक आणि संतापजनक..>>>>
चिंता व संताप येण्यासारखे काय झाले? तिकडे पोलिस परवानगी घेऊनच सार्वजनिक जागी कार्यक्रम करावे लागतात असे इथे माबोवरच वाचलेय. तसे केले नाही की आग वगैरे लागली?
अनेकांनी परवानगी न घेताच
अनेकांनी परवानगी न घेताच उडवले, शिवात साडेअकरा पर्यंत.
महापौर सॅम जोशी रडकुंडीला आले होते व उडालेले फटाके पाण्यात बुडवूनच कचर्यात टाका असे अवाहन करत होते.
८-१० वर्षापूर्वी पर्यंत न्यू जर्सीत फटाक्याना बंदीच होती व तेच चांगले होते.
अमेरिकन लोक इतके मागास आहेत
अमेरिकन लोक इतके मागास आहेत की ते अजूनही लाकडाची घरं बांधतात, त्यामुळेच ते घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं.
४ जुलैला आगी लागत नाहीत का?
इ.इ.
अनेकांनी परवानगी न घेताच
अनेकांनी परवानगी न घेताच उडवले, शिवात साडेअकरा पर्यंत.>>>>
ते नवे नवे आले असणार अमेरिकेत… चांगला दंड मारायला हवा म्हणजे कळेल बरोबर…आणि पुढच्या वर्षी लक्षात राहिल.
८-१० वर्षापूर्वी पर्यंत न्यू जर्सीत फटाक्याना बंदीच होती व तेच चांगले होते.>>>>> परत घाला म्हणावे बंदी. फटाक्यामुळे काहीही लाभ होत नाही.
महापौर जोशी आहेत??? मग रडकुंडीला काय येता, चांगले फटकावयास हवे होतेत्यानी एकेकाला. त्यांना माहित नाही का की लातोंके भुत बातोंसे नही मानते.
या वर्षी दिवाळीत Costco /
या वर्षी दिवाळीत Costco / Walmart ( इकडच्या मोठ्या रिटेल चेन्स) मध्ये आकाशकंदील, पणत्या, फुलांच्या ( कृत्रिम) माळा, तोरणे , चितळ्यांचा फराळ सगळं काही मिळतंय .>>> अरे वा! आमच्याकडे इतक सगळ काय मिळत नाही पण कॉस्टकोत मिल्क केक, रसमलई,मिक्स मिठाई, पणत्या होत्या.
अॅमेझॉनवर ऑप्शन जास्त दिसले.
अॅमेझॉनवर ऑप्शन जास्त दिसले.
आमच्या इथे मराठी मंडळाच्या
आमच्या इथे मराठी मंडळाच्या दिवाळीला सगळ्यात मेन स्पॉन्सर फटाके वालाच. त्यामुळे मौजा ही मौजा :रागः
दिवाळीनंतर फेसबूक, नेक्स्ट डोअर वगैरेंवर रात्री बेरात्री दुसर्यांच्या झोपेचा, सुरक्षेचा अजिबात विचार न करता फटाके उडवणार्यांवर खूप (रेसिस्ट) कमेंट आल्या. त्यात मला खरे तर फारसे वावगे वाटले नाही. बेफाम इमिग्रेशन आणि त्यात जवळपास ७५% भारतीयांची संख्या असल्याने कॅनडात येत्या काही वर्षात बॅकलॅश असेल.
फटाके विरोधात बोलल्याने एक दोन मराठी ग्रुपातून गच्छंति मिळाली.
इथे तिथे सगळीकडे लोक मूर्ख. भारतीयांना सिविक सेन्स कमी हे मत पक्के होत जात आहे.
रागाऊ नका ओ सर… भारतात आपली
रागाऊ नका ओ सर… भारतात आपली स्वच्छता आपण करावी, आपला आवाज कमी ठेवावा, दुसर्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी वगैरे कोणी कोणाला शिकवत नाही. पालक व शिक्षक हे शिकले नसल्यांने मुलांना शिकवणारेही कुणी नाही. परदेशात गेलेले भारतीय तिथे ४-५ वर्षे झाली की इतरांचे बघुन शिकतात.
बाहेरुन आलेल्या माबोकरांसाठी जी गटगे होतात त्यातल्या काही गटगांच्या वृत्तांतामध्ये ‘सगळ्यांनी किती कल्ला केला आणि हॉटेल मॅनेजरने शेवटी नम्रपणे आवाजावर नियंत्रण ठेवायची सुचना केली’ हे उल्लेख वाचल्याचे आठवतेय. आनंद झाला की आरडाओरडा करणे हा तो प्रदर्शित करण्याचा भारतीय किंवा आशियायी समाजाचा एक भाग असावा. बाहेरुन शांतपणा शिकुन आलेले माबोकरही अशा कल्ल्यात भाग घेत असावेत असे समजायला वाव आहे.
मला शांत देवळे आवडतात. मी मुद्दाम अशी शांतता अनुभवायला आडवारी देवळात जाते. पण सणावारी देवळात गेले आणि तिथे चर्चसारखी शांतता तेव्हा आढळली तर मला सण असल्यासारखे वाटणार नाही हेही तितकेच खरे आहे. सणाची गजबज हवीच, नायतर काय शोकसभा सुरु आहे का असे म्हणावे लागेल. अर्थात मी इथेच गजबजीत राहात आहे म्हणुन चालुन जाते.
ज्या समाजाला अशा गजबजीची सवय नाही तिथे गजबजप्रिय लोकांनी काळजी घ्यायला हवी हेमावैम.
एक fb वर रीळ बघितलं (NJ मधील)
एक fb वर रीळ बघितलं (NJ मधील) की एका माणसाच्या घरात लावलेले फटाके, उडून एक घर सोडून पलीकडचे घर जळले..
तर मला ह्या धाग्यावरील NJ Cha प्रतिसाद आठवला.
म्हणून खोलात जाऊन बघितलं तर ह्या क्लिप दिसल्या...
https://youtu.be/V9vVold1d14?si=k3lnKUJ9d3mmkj-x
https://youtube.com/shorts/gEtcjYnStk4?si=zkjyscYN-a_9B5mE
रस्त्यावर फटाके वाजवायची परवानगी घेतली.. ? आणि ती मिळाली?
किती पातळ्यांवर हे चुकीच आहे...
एक तर स्वतः ला, कुटुंबाला, शेजाऱ्यांना सगळ्यांनाच ( लाकडी घरांमुळे ) धोका असतानाही. तसेच रेटून फटाके लावायचे.
तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन त्यांचे वातावरण बिघडवण्याचे काम करता , शिस्त मोडता हे बरोबर नाही . .. त्याबरोबर तुम्ही देशाला किंवा पूर्ण कम्युनिटीलाही बदनाम करता.. मग कोणी बोलले तर दोष कोणाचा? का आपणच लोकांना करणे द्यावीत.
४ July la आकाशात उडणारे फटाके लावतात ते मोकळ्या जागेवर , professional लोक (?) बहुदा..
खाजगीत पण लावल्याचे आवाज येतात पण अगदी तुरळक...
एक वर्ष आमच्या अपार्टमेंट मॅनेजर ने घरी येऊन फुलबाजीची पेटी दिली तेव्हा फारच आश्चर्य वाटले होते.. लाकडी बिल्डिंग मध्ये अशी बुद्धी तिला का व्हावी .?
हे असे अनिर्बंध फटाके जगात
हे असे अनिर्बंध फटाके जगात कुठेच लावू नयेत खरं तर. भारतात लावले जातात , त्याचा ही खूप त्रास होतोच. बिन आवाजाचे अनार वगैरे ही कधीतरी फुटतात आणि अपघात होतो. भुई चक्र कुठेतरी आड जागी जाऊन बसते वगैरे. एवढच कशाला दिवाळीत लावल्या जाणाऱ्या पणत्या ही खूप डेंजर वाटतात मला, मुलं फिरत असतात त्यांना जमिनीवरच्या अश्या दिव्यांची सवय नसते, अंगात पायघोळ कपडे असतात, accident व्हायला काय वेळ?
परदेशस्थ भारतीय आम्ही फटाके वाजवले हे हल्ली अभिमानाने आणि कौतुकाने सांगतात हे अनुभवते आहे गेली काही वर्ष. ते कौतुक ह्यावर्षी आगी लागेपर्यंत वाढले. व्हिडिओ बघताना काय आगीशी खेळ असं वाटत होतंच.
आपल्या सेफ्टीसाठी नियम हवेतच कशाला ? ते आपल्याला स्वतःच कळले पाहिजे. आणि नियम असून ही ते धाब्यावर बसवण्याची काय ही मानसिकता !
Pages