काय करावे?

Submitted by काड्यासारू आगलावे on 10 July, 2023 - 05:45

काही त्रासदायक प्रश्नांना काय ऊत्तर द्यावे?
१) गावी गेल्यावर केव्हा आला? केव्हा जाणार? कूठे राहतो? असा प्रश्न भेटनारे १०० लोक तरी विचारतात. तेच तेच ऊत्तर देऊन फार त्रास नी कंटाळा येतो. एकवेळ अशा येते की ह्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडायचीच भिती वाटते.
२) दोन दिवसांच्या कामाला दोन दिवसच लागनार. तरी दोन दिवस का लागताहेत असं येऊन अनेक अडानी विचारतात. त्यांच्या पासून कशी सूटका करावी किंवा काय करावे की ते पून्हा असले फालतू प्रश्न विचारनार नाहीत.

Group content visibility: 
Use group defaults

गुटखा / पान खायला सुरवात करा आणि प्रश्न विचारणाऱ्याच्या अंगावर शिंतोडे उडवत उत्तर देण्याची कला अवगत करा. पुढल्या वेळेस पासून कोणी असल्या नसत्या चौकशा करणार नाही.

हे काय आत्ताच आलो, तुमच्याकडेच राहणार, जेवणार , तुमच्याकडेच थोडं काम आहे.. होईल का थोडी पैशांची सोय..??

बस्स..!! पुढच्या वेळेस तुमची तोंडी परिक्षा समाप्त..!

ही मस्त आयडिया आहे रूपाली यांची. पैसे उधार मागावे किंवा मी LIC एजन्सी घेतलीय तुम्ही दोन विमा उतरवाच म्हणुन मागे लागायचे.

संभाषणात, स्वत: पुढाकार घ्यायचा, "काल आलो आहे, परवा जाणार आहे, अमक्या ठिकाणी रहातो" Happy

त्यांना तुमचे नाव/ गाव माहित आहे म्हणून हे निरर्थक वाटणारे प्रश्न... बोलायला काही तरी/ कुठूनतरी सुरवात करायला हवी ना? त्यांना तुमच्या विषयी प्रेम/ आत्मियता/ जिव्हाळा वाटत असेल म्हणून चौकशी करत आहेत.

<< काड्यासारु आगलावे नावाला जागा. कोण जवळही फिरकणार नाही.. परतीच्या प्रवासाचं भाडही देतील. Happy >>
------- यांच्या कडून आगी लावायच्या असतील तर यांचे time table बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

त्यांना तुमचे नाव/ गाव माहित आहे म्हणून हे निरर्थक वाटणारे प्रश्न... बोलायला काही तरी/ कुठूनतरी सुरवात करायला हवी ना? त्यांना तुमच्या विषयी प्रेम/ आत्मियता/ जिव्हाळा वाटत असेल म्हणून चौकशी करत आहेत>>>>

गावी हे खरेच असेच असते. बाहेरुन आलेला माणुस तिथे उठुन दिसतो, लक्षात येतो आणि चौकशी करतात. त्यात वैताग येण्यासारखे काय आहे? पहिल्यांदा विचारतात, दुसर्‍या वेळी आपणच विचारायचे, काय कसे? बरे आहे ना? त्यांना आपण ओळख ठेवली याचा आनंद होतो आणि तेही तोंड्भर हसुन बरे आहोत, तुम्ही बरे ना? विचारतात. आपणही हसुन बरे म्हणायचे आणि पुढे जायचे. याचा कितीसा त्रास होतो?

आता घरात एकटे बसुन कंटाळलात, बोलायलाही कोणी नाही म्हणुन हा धागा काढुन प्रत्येकाच्या सल्ल्याला आग घालायची गंमत घेत असाल तर मग ठिक. चालुद्या. सगळेच एकेक उपाय वाचुन गंमत घेऊ.

फक्त स्माईल केली कि मीही करून पुढे जाईन.>> मला तर त्या स्माईल चा ही राग येतो. माझ्याकडे पाहून दात वेंंगाडतो काय? एव्हढच काय, कुणी कुणाकडे बघून हसलं तरी माझा राग मस्तकातून तळपायात जातो. म्हणजे काय ते समजा आता.

संयमाने, शांतपणे, नम्रपणे सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावीत.
फायदे -
१. तुम्हाला छान वाटेल.
२. प्रश्न विचारणाऱ्यांना छान वाटेल कि तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिलीत.
३. हे संभाषण ऐकणाऱ्यांना तुमच्याविषयी आदर वाटेल.
४. घरातील लहान मुले हे ऐकत असतील तर त्यांच्यावर नम्रतेचे चांगले संस्कार होतील.

एकदा आपण व्यवस्थित उत्तरे देणार आहोत असे ठरवले कि चिडचिडेपणा होणार नाही असे वाटते. बऱ्याचदा असे प्रश्न हे संभाषणातील filler असतात. संभाषण पुढे नेण्यासाठी, जसे कि इंग्रजीत काही लोक तुमचा दिवस कसा होता व हवामानावर बोलतात तसे.

माबो वाचक - प्रतिसाद आवडला, सहमत. या भर म्हणून मी वर चार आपूलकीचे प्रतीप्रश्न विचारायला सुचवेल जेणेकरुन त्यांची प्रश्न विचारण्याची भिड चेपेल आणि संवादात मोकळे पणा राहिल.

<< माबो वाचक सर, हे करून पाहिलंय. शांत वगैरे काही वाटत नाही. ऊलट समोरचा जास्त चेकाळतो ना काहीबाही विचारायला लागतो. आणी असे पावलापावलावर भेटतात. तीन दिवसात्या सूटीत दोन दिवस ह्यातच निघून जातात.>>
-------- एव्हढा मोठा मित्रपरिवार आहे, आपुलकीने चौकशी करतो हे वाचून मला तुमचा हेवा वाटत आहे. हा मैत्रीचा ठेवा जपा.
पुढच्या वेळी पुण्यावरुन येतांना या प्रत्येक मित्र/ मैत्रिणीसाठी बाकर वडी आणि पेढे आणायचे. त्यांना पुण्याला, सहकुटुंब परिवार, येण्याचे आमंत्रण द्यायचे. वाटण्यासाठी address चे प्रिंट काढून ठेवायचे.

तुम्ही लकी आहात की इतकी चौकशी करणारे लोक आजुबाजुस आहेत.. बर्याच काळाने गेले की लोक चौकशी करतातच.. त्यात काय वेगळे सांगताय?
भोचक चौकशा किंवा पर्सनल गोष्टी विचरायला लागले की टाळायचं, किंवा काम आठवल्या सारखं करून काढता पाय घ्यायचा. वर कुणी म्हटलं त्याप्रमाणे इन्शुरन्स काढता का? प्लिज काढा, माझ्या भाव कडून च काढा असं मागे लागा..
आणि माबोकर सांगताहेत ते सर्व उपाय मोडित काढायचे असतिल तर मग इथे धागा काढून भोकाड नको Happy

@उदय - धन्यवाद
<<<आणी असे पावलापावलावर भेटतात. तीन दिवसात्या सूटीत दोन दिवस ह्यातच निघून जातात.>>>
जास्त वेळ अशी विचारपूस चालू राहिल्यास नम्रपणे रजा घ्यावी. उदा. "तुमच्याशी बोलायला मला आवडले असते, परंतु मी गडबडीत आहे, त्यामुळे क्षमस्व. पुन्हा कधीतरी निवांत बोलू."