हिंदी चित्रपटसंगीताबद्दल गप्पा -१. पार्श्वगायकांच्या आधीचा जमाना

Submitted by भरत. on 28 June, 2023 - 01:47

हिंदी चित्रपटसंगीताचा प्रवास
या धाग्यावरील प्रतिसादांतून प्रेरणा घेऊन त्याबद्दल चर्चा करण्यासाठी धागा.
संगीतकार, गीतकार, गायक, वादक, गाण्याचं टेकिंग, या विषयावरची किंवा संदर्भ आलेली पुस्तके, यु ट्युब चॅनेल्स, ऐकावेत असे रेडियो कार्यक्रम, कोण श्रेष्ठ यावरून हमरीतुमरीवर येणे, कोणावर अन्याय झाला आणि कोणाचे वाजवीपेक्षा जास्त कौतुक झाले, इ.इ.

सुरुवात सुरुवातीपासून म्हणजे पार्श्वगायन सुरू व्हायच्या आधीच्या काळात पडद्यावर दिसणारे लोक स्वतः गाणी म्हणत तेव्हापासून करूया.

१९८२ साली नूरजहाँच्या भारत भेटीत झालेल्या Mortal Men, Immortal Melodies या कार्यक्रमावर आधारित फिल्म.

सह्याद्रीच्या पाउलखुणा दाखवताना कार्यक्रमाच्या सदोष गुणवत्तेबद्दल एक पाटी दाखवतात, ती इथे लावायची गरज आहे.

हा धागा प्लेबॅक सिंगिंग सुरू व्हायच्या आधीचा काळ आणि प्लेबॅक सुरू झाल्यानंतरचा सिंगिंग स्टार्सचा काळ- कुंदनलाल सैगल, नूरजहाँ , सुरैया इ. पुरता ठेवू.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाले.
चर्चा करताना १९४० चे दशक, ५०, ६०, ७०, ८० , ९० अशी दशके घेतली तर त्या त्या दशकातले महत्वाचे ट्रेण्डस क्रमवार येऊ शकतील. एखाद्या दशकात जर १८०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले तर त्या साठी वेगळा धागा निघावा. हिंचिग - ६० चे दशक भाग क्ष्क्ष.

किंवा सुरूवातीपासूनचे संगीतकार घ्यावेत. संगीतकार आणि संगीत हे समीकरण असल्याने तसाही उद्देश पूर्ण होईलच.

मूकपटाच्या काळात थेटरमध्ये वादक बसत आणि चित्रपटात चाललेल्या प्रसंगाला अनुरूप संगीत वाजवत. इथून सुरुवात झाली असं म्हणता येईल.

(कॉपायची परवानगी आझ्युम करतो आहे)
------------------------
सामो, लताने दिवंगत कलाकारांची गाणी गाऊन श्रद्धांजली नावाचे दोन अल्बम काढले होते. त्यातला दुसरा माझ्याकडे होता.. त्यातली जी गाणी मी पहिल्यांदा ऐकली ती आवडली. पण जी आधी मूळ गायकांची ऐकली होती, ती तितकीशी आवडली नाहीत.
हेमंतकुमारचं "रुलाकर चल दिये इक दिन हंसी बनकर जो आए थे "हे लताचं आधी ऐकलं. तेव्हा आवडलं. मग कधीतरी हेमंतकुमारचं
ऐकल्यावर ते पुसले गेलं.
लताच्या गायकीतला शार्पनेस तोवर कमी झाला होता.
तुम्ही ऐकलेल्या गाण्यात सैगलचा है आणि लताचा हे ऐकून येतो. इतका फरक पडला.
Submitted by भरत. on 23 June, 2023 - 20:08

------------------------
किशोरबद्दल - साधारण १९६९ पर्यंत तो बहुतांश स्वतःच नायकाचे रोल्स करण्याच्या मागे होता व शक्यतो फक्त देव आनंद करता पार्श्वगायन करत असे. याला अपवाद आहेत - तुम्ही लिहीले आहे तसे पडोसन सारखे पण अगदी एखाद दुसरे, व ते ही मुख्यतः बर्मन पितापुत्रांच्या संगीतात. इतरांनी तोपर्यंत त्याला तसा वापरलेला नाही - पण शक्यता अशी आहे की तो ही तोपर्यंत नायक म्हणूनच प्रयत्न करत असावा. हे सगळे वेळोवेळी वाचलेल्या माहितीतून. पण त्याची १९६९ च्या आधीची गाणी पाहिलीत एखाद दुसरा अपवाद वगळता देव आनंद करता व स्वतःकरता गायिलेलीच असतील.

१९६९ साली आलेल्या आराधना मधून राजेश खन्नाचा तर "स्टार म्हणून" उदय झालाच पण किशोर एक पार्श्वगायक म्हणून एकदम टॉपवर गेला. कारण नंतर पहिली काही वर्षे राजेश खन्ना करता व नंतर अमिताभकरता त्याचाच आवाज जास्त वापरला जात असे. मग ७० च्या दशकात गाण्यांची स्टाइलही बदलली. त्यामुळे किशोर इतका डॉमिनंट झाला की रफीही मागे पडला.
Submitted by फारएण्ड on 23 June, 2023 - 21:07

-----------------------------

“१९६९ पर्यंत तो मुकेश, रफी वगैरेंच्या "लीग" मधे नव्हता. मात्र नंतर लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांना मागे टाकून गेला. ” - बरोबर आहे. १९७५/७६ साली मुकेशचं निधन झालं. १९८० साली रफीचं. पण रफीच्या आयुष्यातली शेवटची काही वर्षं, विशेषतः राजेश खन्ना आणि नंतर अमिताभ (व्हाया विनोद मेहरा प्रभृती) ह्यांच्या उदयानंतर आणि शम्मी कपूर, राजेंद्र कुमार ई. मंडळींच्या अस्तानंतरचं संगीतही बदलत गेलं. किशोर कुमार १९८७ साली हे जग सोडून जाईपर्यंत त्याने बदललेल्या काळावर आणि संगितावर स्वतःची खूप मोठी छाप सोडली.
Submitted by फेरफटका on 24 June, 2023 - 00:34

---------------------

आराधनाच्या आधी देखील किशोर कुमार ए-लिस्टर होता. एस्डीने त्याला घेउन एक्से-एक गाणी डिलिवर केली - गाईड, जुल थिफ, नौ दो ग्यारा, प्रेम पुजारी, पेइंग गेस्ट, तीन देवियाँ (हा पिक्चर तर गाण्यांचा खजिना आहे); या व्यतिरिक्त पडोसन, चलती का नाम गाडी, दिल्ली का ठग वगैरे आहेतच. "रुप तेरा मस्ताना" ने त्याला पहिलं अ‍ॅवॉर्ड मिळवुन दिलं परंतु तोवर तो चांगला एस्टॅब्लिश झाला होता...

सिक्स्टीजची गाणी देवसाब करता गायली गेली यामागचं कारण त्याचा आवाज देवसाब करता(च) सूट करत होता हे नसुन संगितकार एस्डी हे आहे. तलत, मुकेश प्रमाणे किशोर कुमार देखिल मोजक्याच नायकांकरता आवाज देत होता (रादर त्याचा आवाज सूट होत होता) असा अंदाज बांधणं त्याच्या वर्सटिलिटिवर अन्याय करणारं आहे...
Submitted by राज on 24 June, 2023 - 18:39

-------------------------

I dont know. जर कालानुक्रमे चर्चा करायची तर एवढ्यात नको असं वाटतं. वेळ येईल आणि तोवर लोकांचा उत्साह आणि पेशन्स टिकला तर मीच करेन कॉपी पेस्ट.

रघू, भरत यांचा प्रतिसाद कदाचित माझ्या प्रश्नावरती होता. तुम्हाला उद्देशून नाही.

अरे वा, सही धागा Happy
ही चर्चा कुठे झालेली? मिसली मी. बरं झालं इथे टाकली. वाचते.
धन्यवाद.

धिस इज गुड.

मला वाटते, यातही ६० चे, ७० चे, ८० चे, ९० चे दशक वगैरे वेगवेगळे धागे करावेत. यामुळे कालानुक्रमे माहिती संकलित होईल. आपल्याला आठवतं ते लिनियर असतंच असं नाही, त्यामुळे जे आठवलं त्याच्याशी रिलेटेड धाग्यवर जाऊन लिहिता येईल. वाचकांना असलेला रस आणि आवडीनिवडी यानुसार ते वाचू शकतील, आणि अभ्यासकांसाठीही हा एक महत्वाचा संदर्भ दस्तावेज तयार होईल..

साजिरा, तुम्हीच करा ना. म्हणजे त्याची मालिका सुद्धा बनेल. ज्यांना ज्या काळात रस असेल ते त्या काळानुसार लिहीतील.यात एक सूचना.
चित्रपट संगीत सुरू होण्याआधी असा एक धागा असावा. म्हणजे तोपर्यंत काय होते वगैरेची माहिती सुद्धा मिळत जाईल.

हो. दशकांचे धागे हवेत. इथे सुरुवात केली आहे.
रघू आचार्य, ते उत्साह. टिकण्याबद्दल तुम्हांला उद्देशून नव्हे, तर जनरल पब्लिकबद्दल लिहिलंय.
आताच त्या धाग्यावर कोणी फिरकत नाहीए.
पण तरीही लिहायचा प्रयत्न करू. कारवॉं बढता जाएगा

ओके. हा जनरल राहू द्यात.
कालक्रमानुसार ( क्रोनोलॉजिकल ऑर्डर चा मराठी शब्द गुगल करून लिहीला आहे. चुभूद्याघ्या) एकाच वेळी धागे काढता येतील. एखाद्या दशकात सिनेमे मागे पुढे झाले तर फारसे बिघडत नाही.

प्रशासकांनी वेगळा विभाग बनवल्यास अजून उत्तम. बघूयात काय म्हणतात ते.

साजिरा, तुम्हीच करा ना.
>>>
म्हणजे हात दाखवून अवलक्षण. माझ्या धाग्यांना किती प्रतिसाद आहेत, ते माझे लेखनमध्ये दिसतेच आहे. Proud कमी प्रतिसाद बघून विषयाचं ज्ञान असलेलेही लिहिणार नाहीत..

धन्यवाद भरत! Happy

एकतर दशकाप्रमाणे धागे असूदेत नाहीतर हाच फ्री फ्लोइंग असूदे. नाहीतर "४० बद्दल अजून कोणाचे काही बोलायचे राहिले आहे का - एक, दोन, तीन..." असे करून कोणीतरी हॅमर आपटल्या शिवाय पुढे जाता येणार नाही Happy

'तिस्ता नदीसी तू चंचला, मै भी तो हुं कबसे मनचला' - हे हेमलता व येसुदास यांचे फार सुंदर गाणे दूरदर्शनवर प्रक्षेपित होत असे. फार गोड आहे.

अरे वा, मस्त धागा!! Happy
(चर्चाप्रस्तावातच हमरीतुमरीची परवानगी दिल्याबद्दल आभार. Proud )

हा धागा काढला हे छान केले.
त्या धाग्यावरील प्रतिसाद उडत उडत वाचलेत, सावकाश वाचणार आहे सगळे आणि तिथे दिलेल्या लिंक्स़ उघडुनही पाहीन.
माझे या विषयावरील ज्ञान सुमार पेक्षाही कमी आहे.
काही अगदीच ठराविक गायक व संगीतकार यांची जुजबी माहिती आहे. त्यामुळे ज्ञानात भर पडते आहे.
तुम्हा लोकांचा व्यासंग बघुन थक्क झालो.

माझ्या वाचण्यात आले की नौशाद रतन या चित्रपटापासून हिट झाला आणि त्याच बरोबर जोहराबाई अंबालेवाली सुद्धा.
त्याकाळी त्यातील सगळी गाणी गाजली होती, त्यातील रुमझुम बरसे बादरवा आणि अखियां मिलाके जिया भरमाके ही विशेष. याबद्दल तिकडे उल्लेख दिसला नाही, असुन नजरेतुन निसटल्या असल्यास क्षमा असावी.

माझा तरी व्यासंग बिसंग नाय हो. आवडीचा विषय असल्याने, इथे तिथे वाचलेलं आणि मुख्य म्हणजे ऐकलेलं आठवून इथे लिहितो.

रफीची उत्कृष्ट गाणी नौशाद बरोबर आहेत. लताची पण कितीतरी नितांत सुंदर गाणी नौशाद बरोबर आहेत, आणि नूरजहाँची पण. आवडता संगीतकार. मोठी पोस्ट टाकतो नौशाद वर. लताची नाsत मुघल ए आजम मध्ये सुरू होते (बेकस पे करम), एकदम काटा येतो अंगावर काय गायली आहे लता, उच्चार, शब्द, चाल, मधुबाला सगळच भारी आहे.

आर. सी, बोराल (१९०३ - १९८१) : हिंदी चित्रपट संगीताचे पितामह !

लाल चंद बोराल हे कलकत्या मधील प्रसिद्ध धृपद गायक! त्यांचे चिरंजीव राय चंद बोराल. वडिलांकडूनच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा वारसा आर. सी. बोराल यांनी घेतला. वडिलांबरोबर अनेक संगीत मैफलींना ते जात. गायन आणि तबलावादन दोन्हीची त्यांनी तालिम घेतलेली आणि दोन्हीची साथ ते वडिलांना देत असत.

१९२७ मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (पुढे या कंपनीचे नाव ऑल इंडिया रेडिओ झाले) ते काम करू लागले. १९३१ मध्ये ते कोलकत्यातील फिल्म निर्माती कंपनी - न्यू थिएटर येथे रुजू झाले. सुरुवातीच्या सायलेंट चित्रपटांच्या काळातही त्यांनी चित्रपटांना संगीत दिले.

बोलपटामध्ये "मुहोब्बत के आसूँ" (१९३२)या चित्रपटात त्यांना प्रथमच संगीतकार म्हणून संधी मिळाली. पुढे "धूप छाँव" (१९३५) मधल्या गाण्यांनी त्यांचे नाव झाले. हिंदी चित्रपट संगीतात कोरस प्रथम आणला तोही आर सी बोराल यांनी!
https://www.youtube.com/watch?v=U90ldCxSLzQ

सुमारे ७०-७५ हिंदी आणि साधारण तितक्याच बंगाली चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. १९५३ मधला "दर्द ए दिल" हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा हिंदी चित्रपट. बंगाली चित्रपटांमध्ये मात्र त्यांनी १९६० पर्यंत संगीत दिले.

आर सी बोराल यांनी हिंदी चित्रपट संगीतात अनेक नवीन गोष्टी सुरु केल्या. त्याकाळी गझल गायकीचा प्रघात जास्त होता. आर सी नी हा प्रभाव कमी करून, आज ज्याला लाईट संगीत (मराठीत प्रतिशब्द?) म्हणतात ते चित्रपट संगीतात आणलं. जोडीने बंगाली धून आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत हिंदी चित्रपटांमध्ये आणलं.
याशिवाय प्ले बॅक (मराठीत प्रतिशब्द?) संगीत त्यांनीच आणले. कोरस ची सुरुवात ही त्यांनीच केली. पहाडी सन्याल, कानन देवी, कुंदन लाल सैगल, तलत मेहमूद, राधा राणी, इला घोष, सुपरवा सरकार, धंनजय भट्टाचार्य हे काही सुरुवातीचे नावाजलेले गायक ही आर सी बोराल यांचीच देन !
चित्रपट "विद्यापती" ( १९३७) मध्ये त्यांनी दिलेले संगीत आजवर दिल्या गेलेल्या भारतीय चित्रपट संगीतातील सर्वात सुंदर चित्रपट संगीत मानले जाते. पुढच्या गाण्यात अगदी सुरुवातीचे संगीत, आणि जोडून असणारे पाहिले गाणे ऐकले तरी अंदाज येईल.
https://youtu.be/Plv8iJV31gs

हिंदी चित्रपट संगीतामध्ये व्हॉयोलिन, सतार, इतर तयार तंतू वाद्ये (स्ट्रींग) आणि पियानो प्रथम आणला तो आर सी बोराल यांनीच. एक गंमत. "हारजीत" हा १९३९ चा चित्रपट. यातलं गाणं "मस्त पावन शाखाये लहाराये" हे गीत. त्यात सुरुवातीला वाजणारे हे व्हायोलिन ऐका, कोणतं गाणं आठवलं सांगा बरं (२० व्या सेकंदांपासून ऐका)
https://youtu.be/97gqq1v_YKE

बोराल यांनीच ऑर्केस्ट्रा हिंदी चित्रपट संगीतात आणला. हिंदुस्तानी संगीत आणि पाश्चात्य संगीत यांची अतिशय सुंदर गुंफण पहिल्यांदा केली ती बोराल यांनीच. बोराल यांनी ३० वाद्यांचा समावेश आपल्या ऑर्केस्ट्रामध्ये केला होता. "चंडिदास" ( १९३२) या चित्रपटामध्ये त्यांनी पार्श्वसंगीत (बॅकग्राउंड ) फार प्रभावीपणे चित्रपटात आणले.
आणखीन एक फार सुंदर अन अभिमानाची गोष्ट बोराल यांनी केली. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या आणि नोटेशन बद्ध केलेल्या आपल्या राष्ट्रगीताचे पहिले ऑर्केस्ट्रेशन (मराठीत प्रतिशब्द?) केले ते आर सी बोराल यांनी; "हमराही" ( १९४४) या चित्रपटात.
https://youtu.be/qzd7z8ADvH8

त्यांनी संगीत दिलेली आणि गाजलेली काही गाणी

इक बंगला बने न्यारा : https://youtu.be/1QwnFzxnMj0
तेरी गठरी मी लागा चोर : https://youtu.be/2TNbIFXRnM8
मन कि आखें खोल बाबा : https://youtu.be/5dkLKV5zp3U
कौन मन लुभाया : https://youtu.be/jJUBab1wgWU
ना तो दिन हि दिन वो राहे मेरे : https://youtu.be/AYbFNUuzNlE
आणि बाबुल मोरा नैहर छुटो ही जाय : https://youtu.be/doNOIJnk3kc

प्रसिद्ध संगीतकार अनिल विश्वास यांनी आर सी बोराल यांना " हिंदी चित्रपट संगीताचे पितामह " म्हणून संबोधले होते. किती यथार्थ संबोधन ___/|\___
---
(चू भू द्या घ्या)
रात्री उशीरा पोस्ट टाकतेय. सो चुका असतील तर त्या दुरुस्त करता येणे शक्य होईल्/नाही माहित नाही.( संपादनाची वेळ संपली असेल) सो आधीच क्षमस्व

छान माहिती अवल. एक दोन गाणी सोडली तर काहीच माहिती नव्हती पण आर सी बोराल नाव ऐकले होते.

तेरी गठरी मे लागा चोर चे धमाल विडंबन - और कौन हो सकता है - किशोर चे Happy
https://www.youtube.com/watch?v=fyNCpEgcbTo&t=248s

यात तिचे ऐकून एकदम पटल्यासारखे करत छत्री वगैरे फेकून देताना त्याचा आविर्भाव फार धमाल आहे.

वा अवलजी भन्नाट पोस्ट. दोन तीन नवीन गाणी समजली. मस्त मस्तच. त्यांची इतर पण दोन गाणी ऐकली कुतूहलाने. सैगल टॉपक्लास. सुरुवात एकदम सिंफनी स्टाईलने आहे बऱ्याचदा. काय वाद्यवृंद वापरलाय, भारीच. चांगलाच खुराक आहे हा विकेंड साठी. धन्यवाद.

Pages