ऑफिस डब्यासाठी सामिष पदार्थ सुचवा.

Submitted by अश्विनीमामी on 24 April, 2023 - 22:00

मध्यंतरी मी काही खास स्वयंपाक करणे जवळ जवळ सोडलेच होते. मुले वीकांताला आली की मना सारखे काही ऑर्डर करत. माझ्या रोजच्या जेवणाला मी साधे व्हेज चविष्ट बनवत असे. परवाच्या वीकांताला सहजच सर्व घटक पदार्थ हाताशी होते म्हणून नेहमी पेक्षा अर्ध्या प्रमाणात का होईना चिकन बिर्याणी बनवली. ती मला तितका वेळ इंडक्षन पाशी उभे राहुन एकतर बनवता आली व छान घरगुती फ्लेवरफुल मसाले दार झाली.

ती इतकी आव्डली की रविवारी दोन टाइम खाउन परत डब्यात पण नेली सोमवारी ऑफिसला. ( मुले इथून कॅब करून सोम्वारी सकाळी डिरेक्ट ऑफिसातच जातात) साडे अकराला पोहोचतात व दीड पावणे दोन ला लंच करतात. ऑफिसात मायक्रोवेव्ह अवन आहे. त्यामुळे डबा गरम करता येतो पण तवा नाही. पोळी/ पराठे गरम करता येत नाहीत.

तर प्रश्न असा की रविवारी करता येइल व सोम्वारी डब्यात नेता येइल असे मांसा हारी पदार्थ सुचवा. चिकन फिश मटन काहीही. मी शुक्रवारी सकाळी बिग बास्केट ऑर्डर टाकते. ते शनिवारी येते. डिरेक्ट फ्रीझरला टाकेन सामिष पदार्थ. व रविवारी बनवुन फ्रिज मध्ये ठेवेन.

सोमवारी सकाळी ब्रेफा व हा लंच चा डबा फिनिश करता येइल.

मी व्हेजच जेवते ९० % व्हीगन मील्स . पण डब्यासाठी जमेल तितके व जमेल तितके दिवस चविष्ट बनवायचे मनावर घेतले आहे.

सध्या मला येणा रे पदार्थः

चिकन बिर्याणी
अंडा पुलाव. तेलंगणा अंडा बिर्यानी. ही सोमवारी सकाळी पण एकदा बनवली आहे.
एग करी व रोटी/ प्राठा
साधी चिकन करी कसुरी मेथी घालून बरोबर पोळी.
चिकन सँडविच. चिकन सलाड बनवुन. सलाड व ब्रे ड डब्यात वेगवेगळे देता येइल.
शीग कबाब - हे बिग बास्केट वर झोराबिअन चे रेडीमेड मिळतात. ते परतुन व पोळी
खिमा करी व पाव.
खिमा पराठा - चिकन व मटन चा खिमा दोन्हीचे वेग वेगळे बनतात
खिम्याचे शामी कबाब. व सलाड.

फिशचे काही फार्से येत नाही. प्रॉन करी व राइस येते , पापलेटे/ सुरमई फ्राय करता येतात यु ट्युब बघून. आत्ता गं बया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिकन ६५ राहिलेच. हे एकेकाळी जवळ जवळ एक दिवसा आड बनवले जात असे. पण ह्यात तळणी आहे. व करेक्ट मसाले मुंबईत मिळत नाहीत. ह्यासाठी दही आणावे लागेल. मेरा मेरे प्रिय बॉयफ्रेंड दही के साथ बहुत बुरा ब्रेक अप हुवा है. सध्या दह्याची तहान ताकावर भागवत आहे. ते ही अमूलचे पांचट ताक. फिर दही घरपे आया तो मेरा कंट्रोल फिसल जाएगा.

व ह्या बरोबर काय द्यावे व काय खावे हा प्रश्नच आहे. पोळी?!

फिशचे बनवायला फारसे काही यायची गरज नाही. ओले खोबरे, भिजवलेल्या लाल तिखट्/बिनातिखट (आपल्या श्रद्धेनुसार) मिरच्या, उलिकसे आले, लसुण, कांदा, धणे यांचे गंधगोळी वाटण करायचे आणि हाती लागेल तो मासा यात घालुन उकळी काढायची. तेलातच फोडणी द्या हाही आग्रह नाही. सगळे एकत्र करुन चुलीवर चढवले तरी चालते. आमटी पातळ/जाड कशी ठेवायची ही तुमची श्रद्धा. पातळला वेगळी नावे, जाडाला वेगळी नावे, फोडणी करुन केल्याला वेगळी नावे, विनाफोडणीला वेगळी नावे!!! आपण कशाला त्यात पडा? अन्न हे साक्षात परब्रम्ह, त्याला नावे ठेऊ नये; निवांत यज्ञकर्म केल्याच्या भावनेने उदरभरणं करावे. डब्यात हवे तर जाडसर ठेवा, भाताबरोबर तरीही खाता येते.

हे करुन फ्रिजात ठेऊ नका, वाटपाची चव उतरते. शिजवलेली माशाची आमटी फ्रिजात ठेवलेली चालते.

कोळंबी तवा फ्राय! मधुराज रेसिपीने भारी होते. इकडे शिजवलेले फ्रोजन श्रिंप मिळतात, तसे असले तर अगदी १० मिनिटात तयार होते. भाकरी, पोळी, भात जे काय असेल त्याच्या बरोबर मस्त लागते. काहीच नसेल तर ब्रेड मध्येही छानच लागेल.

अंडा मोगलाई/ अंडा भुर्जी दिसली नाही वरती.>> गार चांगली लागे ल का? माझी स्पर्धा " आय विल ऑर्डर समथिंग" शी आहे. अंडे पणकॉप्रमाइज च्च करतो आम्ही लंच मध्ये. ब्रेफा मध्ये अंडी हाफ फ्राय व सॉसेजेस आहेतच म्हणून लंच ला मी नाय नेणार होईल.

साधना धन्यवाद वाटप ट्राय करते.

करुन फ्रिजात ठेऊ नका, वाटपाची चव उतरते. शिजवलेली माशाची आमटी फ्रिजात ठेवलेली चालते..... +१.
कोलंबीचे सुकं,सुक्या मासळीेत बोंबील बटाटा भाजी, जवळा करंदी यांची कांद्यावर परतलेली भाजी मस्त लागते.

कांदा(अर्धा),खोबरे,धणे,तिखट,चिंच(छोट्या लिंबाएवढी) हे सर्व वाटावं गंधासारखे वाटायचे. नंतर त्यात 6ते 7 तिरफले घालून एक घसरा द्यायचा.हे वाटण भांड्यात kadhoon thode पाणी घालून सारखे केल्यावर त्यात मांजाळी (मांदेली) घालून मध्यम गॅसवर 5 मिनिटे शिजवावे.गॅस बंद केल्यावर 1-२ चमचे कच्चे खोबरेल तेल घालावे.त्यात मुरू द्यावे.जेवताना गरम करावे. कन्सिस्टांसी जराशी जाडसर ठेवा.
हे वाटण बांगडे,मांदेली, यांना छान लागते.

थाई करी, फ्राईड चिकन / सॉसेजेस विथ भाज्या (आशियाई पद्धतीने). चिकन फ्राईड राईस विथ भाज्या / टोफू / ग्रिल्ड फिश विथ राईस इत्यादी वगैरे

मेथी,चवळी,लाल माठ, अशी कोणती ही पालेभाजी आणि .
भाकरी किंवा चपाती.
मुळा पाना सहित. खिसून त्याची सुकी भाजी.किंवा
कारले फ्राय.
भेंडी, तेंडली फ्राय.
आणि भाकरी किंवा चपाती.

थाई करी, फ्राईड चिकन / सॉसेजेस विथ भाज्या (आशियाई पद्धतीने). चिकन फ्राईड राईस विथ भाज्या / टोफू / ग्रिल्ड फिश विथ राईस इत्यादी वगैरे>> थाई करी आठवण करुन दिलीत धन्य वाद हे पदार्थ सोपे आहेत व मी आधी केलेले आहेत. मेमरी रिफ्रेश करते. इथे मी चार पाच थाई पदार्थ पाक कृती पण लिहिल्या आहेत. मी थाई पदार्थांचे वर्क शोप केलेले आहे.

सध्या कोरिअन रामेन फार फेवरिट आहे. प्रॉन टेंपुरा व प्रॉन टेंपुरा सुशी. सीवीड व आपला आंबे मोहोर राइस वापरून करता येइल का बघते.

भुर्जी/चिकन/पनीर रॅप्स, त्यात लेट्युस ची पानं, थोडा गार्लिक सॉस लाऊन वगैरे. लावालावी Wink ऑफिसात करायची. सगळं वेगळं घेऊन जायचं. फार लाडात असाल तर अवाकाडो चा स्प्रेड लावावा.

खिमा पाव
लेमन चिकन राईस
ब्लॅक पेपर चिकन राईस अशी १ डिश इकडे मिळते (सोया सॉस, मिरे पावडर, सिमला मिर्ची,चिली सॉस टाकून अंगसर रस असतो)
कांदे पाथ, विनेगर्,आले, मिरे, मीठ घालून चिकन परतवलेले असते थोडी कॉर्न स्तार्च ग्रेव्ही, सोबत भात.
चिकन घातलेला पास्ता..
चिकन सूप आणि भात (गरम करता येतेच मावे असेल तर)
फिश पदार्थांचा जरा वास येतो पण सामन सॅलड किंवा जाड्या भरड्या ब्राऊन ब्रेड मधे लेत्युस पानं, सॉसेस आणि सामन च्या चकत्या (सफेद विनेगर, लेमन, मीठ, मिरे पावडर मधे ठेवलेल्या) हे सँड्विच वास न मारता राहते.
प्रॉन लिप्ते- चपात्या

आवडला हा धागा Happy

ब्लॅक पेपर चिकन राईस अशी १ डिश इकडे मिळते (सोया सॉस, मिरे पावडर, सिमला मिर्ची,चिली सॉस टाकून अंगसर रस असतो)
कांदे पाथ, विनेगर्,आले, मिरे, मीठ घालून चिकन परतवलेले असते थोडी कॉर्न स्तार्च ग्रेव्ही, सोबत भात.>> मस्तच वाटते आहे. आधी घरी टेस्ट रन करुन बघते.

पास्ता पण जबरी.

डबे पण जास्तीचे माग वावे लागतील कारण मुलुंडचा डबा अंधेरीला गेला की परतच येत नाही. ह्या ह्या.

एग रोल - सोमवार सकाळी तयार करायचा. चपाती रविवारची चालेल.
तयार चपाती, फेटलेली अंडी आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, इतर हर्ब्स, बारीक चिरलेली शिमला मिरची, पातीचा कांदा, बारीक चिरलेले मश्रूम, श्रेडेड ग्रिल्ड चिकन, कोथिंबीर यापैकी असेल ते काहीही, मीठ
फेटलेल्या अंड्यात चपाती सोडून इतर घटक मिक्स करा. हे मिश्रण तव्यावर बटर/साधे तेल/ऑलिव्ह ऑइल घालून ऑम्लेट सारखे पसरा. किंचित शिजले की तयार चपातीने त्याला कव्हर करा. खमंग भाजू द्या. अंडे असलेली साईड तुम्हाला हवी तेव्हढी भाजली गेली की साईड उलटून शेकवून घ्या. थोडे थंड झाले की रोल करा. रोल करताना मध्ये आवडत असल्यास हवे ते लेट्युस/गाजर, बीटचे फिंगर्स/केचप/सॉस/पुदिना चटणी/मेयो लावा. नाहीतर सोबत घ्या.
मी शक्यतो चीज घालत नाही. कारण ते लंच टाइम पर्यंत सॉगी होते. हवे तर खाताना एक/दोन चीज स्लाइस रोल मध्ये घाला. थंड झाल्यावरही चांगले लागते.
अंडा बुर्जीही मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून चांगली लागते. फक्त कांदा चांगला परतला गेला पाहिजे.

चिकन/एग फ्राईड राईस - सर्व भाज्या बारीक चिरून हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या. मोकळा भात करून फ्रिजमध्ये ठेवायचा. चिकन ग्रील किंवा तंदूर करून ठेवायचे. सोमवारी सकाळी तिळाच्या तेलात हाय फ्लेम वर भाज्या परतून सोया सॉस, व्हाईट व्हिनेगर आवडत असल्यास थोडे चिली ऑइल/शेजवान सॉस घालून चिकन परतून घेऊन भात मिक्स करून एक वाफ आणायची.
एग फ्राईड राईस करणार असाल तर तव्यावर एग फ्राय करून भाताला वाफ आली कि मिक्स करायचे.

मीठ घालून उकडलेल्या राजमा बीन्स, कॉर्न, रंगीत शिमला मिरचीचे क्यूब्ज, थोड्या तेलावर परतून टोमॅटो सॉस/टोमॅटो चिली सॉस घालून मिक्स करून ठेवा. सकाळी त्यात ग्रिल्ड/तंदूर चिकन व चीजचे तुकडे घाला. हे मिश्रण एका डब्यात, दुसऱ्यात (रेडिमेड) साल्सा व तिसऱ्या डब्यात रेडिमेड टॅको शेल्स. लंच टाइमला बीन्स मावेला गरम करायचे, चीज वितळेल. टॅको शेल मध्ये भरा, साल्सा पसरा, लंच रेडी.

कोळंबी पुलाव - नारळाच्या दुधातील. रविवारी रात्री करून ठेवलात तर सोमवारी जास्त चवदार लागेल.

हिरव्या/लाल मसाल्यातील तिसऱ्या - दुसऱ्या दिवशी अजून छान लागतात व चपाती

अय्या काय मस्त मस्त रेसीपी. धन्यवाद माझे मन. कोळंबी पुलाव तो ट्राय करेंगे. वो आता है. तिसृया माहीत नाहीत. पण शोधते.

अंडा पराठा. अंड्यांचे ओमलेट्साठी करतो तसे मिश्रण तयार करून घ्यायचे. त्यात आवडीनुसार थोडे oregano, थो s डी बारीक चिरलेली सिमला मिरची असे हवे ते घालायचे. पण मूळ बेस ऑमलेट चाच. म्हणजे कांदा मिरची कोथिंबीर मीठ. आणि सगळे जास्तीचे जिन्नस बारीक चिरून चांगले भरपूर फेटायचे. मैदा आधी तेल घालून मळून ठेवायचा. हवी तर त्यात कणीक घाला किंवा पूर्ण कणीकच वापरा. मैद्याचे बरे लागतात. मग मैद्याच्या चपात्या/ पोळ्या लाटून घ्या. घडी न घालता. मध्यम गरम नॉनस्टिकवर थोडे तेल पसरून पोळी ठेवा. एका भागाला तेल लागेल अशी फिरवा. लगेच परता. लगेच अंड्याचे मिश्रण ओता. लगेच पोळीच्या दोन्ही बाजू दुमडून टोकेही आतल्या बाजूला दुमडून लांब रुंद शंकरपाळीचा आकार तयार करा. बाजूने तेल सोडा. अंडे किंचित घट्ट झाले असेल आतापर्यंत. पुन्हा परता. वरून कालथ्याने दाब देऊन शिजवा. ताजे हवे असेल तर अंडे घातले की चीज किसून घाला. सर्व्ह करताना पराठ्याचे तीन तुकडे ( टोकाकडचे दोन त्रिकोण आणि मधला चौकोन) असे डिशमध्ये गरम गरम ठेवून वर कुरकुरीत decoration करा. आवडत्या सॉस बरोबर द्या. चीज नसेल तर न कापता मायक्रोमध्ये गरम करता येते. कृती लांबलचक झालीय पण पटकन होते.
पाकृ लिहिण्याची आणि करण्याची सवय नाही. पण ही जमते.

झिंग्याची सुकी भाजी आणि भाकरी याशिवाय दुसरा पदार्थ सुचला नाही. जोडीला सुके बोंबील असतील तर चार चांद लागतील!>> रेसीपी पण द्या रॉय. झिंगे म्हणजे प्रॉन. ना. व सुके बोंबिल कुठे मिळतात? भाकरी जमत नाही कारण इंडक्षन कुकटॉपच आहे.

स्वीट कॉर्न चिकन किंवा क्रॅब सुप.
चिकन फ्राईड राईस.

माझ्या नवर्‍याची स्पेशिअ‍ॅल्टी आहे वरचे दोन पदार्थ.

वर्षू यांच्या रेसिपीने अंडा घोटाळा - https://www.maayboli.com/node/54324

मापो तोफू आणि भात https://www.maayboli.com/node/63279

चिकन मीटबॉल्स आणि पास्ता

सॉसेज आणि रेड बीन्स https://www.maayboli.com/node/64937

व्हाइट बीन चिकन चिली https://www.maayboli.com/node/65234

At the risk of sounding like a vegan..
ऑफिसच्या मायक्रोवेव्हमध्ये फिश गरम करायचं म्हणजे मागच्यांचे हाल Happy

I know, moroba. Specially, सुके मासे, (किव्वा मासे सरसकट) डब्यात टाळलेले बरे. सगळीकडे ऑफिस मध्ये वास पसरेल.

पण सगळ्या रेसीपी मस्त आहेत एकदम.
माझ्या मते खालील पदार्थ,
चिकन कोणत्याही भारतीय प्रकारे/ अंडाकरी + भात / चपाती / नान
चिकन पास्ता
Shrimp पास्ता (पार्सले मिळत असेल तर ती घालून) ina garten chi lemon shrimp scampi recipe मस्त आहे, पटकन होते

ऑफिसच्या मायक्रोवेव्हमध्ये फिश गरम करायचं म्हणजे मागच्यांचे हाल >> Lol हे मात्र अगदी खरं आहे. मावे मध्ये भयाण वास रहातो. तीच गत पोर्कची.

हे या विकेंडचे फोटो आधी खाऊगल्लीवर टाकणार होतो. ते आता आधी ईथे टाकतो.

ओवन वगैरे चोचले ऑफिसला जाऊ लागल्यापासून सुरू झाले
अन्यथा शाळा कॉलेजात मी माझ्या नॉनवेज डब्यासाठीच फेमस होतो. कारण चपाती किंवा तांदळाची भाकरी, फिशफ्राय, सारभात, कोलंबी सारे साग्रसंगीत असायचे. थंड गरम काही फरक पडायचा नाही. डबा उघडताच त्यात सत्ते पे सत्ता स्टाईल दहाबारा हात पडून चौथ्या मिनिटालाच तो फस्त झालेला असायचा Happy

IMG_20230426_022425.jpg

.

IMG_20230426_022452.jpg

हि सोलकढी.. हिला सुद्धा मी नॉनवेजच समजतो. कारण आमच्याकडे ही तेव्हाच केली जाते जेव्हा नॉनवेज जेवण असते. वेज जेवणाऱ्या पाहुण्यांचे आम्ही असे लाड करत नाही Happy

काही जण ऑफिसला डब्यासोबत ताक नेतात.
तसे मी एकेकाळी सोलकढी न्यायचो. अर्थात डब्यात नॉनवेज असेल तरच हे लाड Happy

IMG_20230426_022346.jpg

माझ्या जुन्या हापिसात नॉन व्हेज व व्हेज साठी वेगवेगळे मायक्रोवेव्ह होते. तसे असेल तर उत्तम. नसेल तर कॅन्टीन कमिटी, फूड कमिटी, एच आर वगैरेना सांगायचे. बेसिक मायक्रोवेव्ह फार महाग नसतो. फारच लो हँगिंग फ्रुट असल्याने सहसा मागणी मान्य होते. त्यांना त्यांच्या मंथली रिपोर्ट मध्ये मांडायला एक सॉलिड मुद्दा मिळतो.

असे ऐकले की सोलकढी मधे हाय कॉलेस्त्रॉल असते..नारळ दुधामुळे...? म्हणुन आधी फार ओरपून प्यायचे तसे पित नाही हल्ली.
जाणकारांनी प्रकाश टाका.

सध्या मटन खिमा व मटन पिसेस ऑर्डर केले आहे आणि प्रॉन्स. शामी कबाब हातखंडा रेसीपी व मटन सुक्के युट्युब बघून करीन. रणवीर ब्रारची मटण बिर्याणी रेसीपी पण छान आहे. परवाच नवी आलेली आहे. काय बनवले त्याचे फोटो टाकीन.

आशू २९ नारळ दुधा मुळेच बहुतेक. पण एक नाहीतर दोन वाटीनी फार फरक नाही पड् णार. मी डाबरचे नारळ दूध वापरते ते कमी लागते. आख्हा नारळ मी गेल्या दहा वर्शात आणलेला नाही.

घरात तांदूळ ही नाहीत. मी बिर्याणीला दावत बासमती वापरते. ते ही मागवले आहेत.
प्रॉन पुलाव साठी आंबे मोहोर किंवा सुरती कोलम मस्त होईल. बासमती फार कोरडा होईल.

मोटिवेशन में टॅण करण्यासाठी माबोकरांचे धन्यवाद.

असे ऐकले की सोलकढी मधे हाय कॉलेस्त्रॉल असते..नारळ दुधामुळे...? म्हणुन आधी फार ओरपून प्यायचे तसे पित नाही हल्ली.
>>> सोलकढी व इतर नारळाचे पदार्थ हाय कॉलेस्ट्रॉलवाले हे खरे आहे. शिवाय जुन्या पद्धतीने खटाटोपही फार असतो. आता ओळखीतल्या बर्याच कुटुंबानी सोलकढी करण्याचे प्रमाण कमी आणले आहे.

पण ट्रॅडिशनली सोलकढी फार दाट नसते. मांसाहारी मसालेदार पदार्थांनी ऍसिडिटी होऊ नये म्हणून एखाद वाटी घेतात लोकं. काही जण भातावर रस्सा घ्यायच्या ऐवजी सोलकढी घ्यायचे.

असे ऐकले की सोलकढी मधे हाय कॉलेस्त्रॉल असते..नारळ दुधामुळे...
>>>>

मला वाटते जर तुम्ही कोकणातले असाल तर नारळ खाताना फार विचार करायची गरज नाही. क्यों की ये पचाने के लिये जो जिगर लगता है वो कोकणी माणूस लेके पैदा होता है Happy

हेच भात आणि मासे यांनाही लागू. बरीच लठ्ठ लोकं भात सोडतात. कोकणात भात प्रामुख्याने खातात. मेले कोण जाडे होत नाहीत Happy

माश्यांबाबतही हेच. जसे माश्याला पोहायला शिकवावे लागत नाही तसे कोकणातल्या पोरांना मासे खाताना तोंडात आलेले काटे कसे काढावेत हे शिकवावे लागत नाही Happy

काही जण भातावर रस्सा घ्यायच्या ऐवजी सोलकढी घ्यायचे.
>>>

हे मी करतो. मटण असेल तर सोलकढी भातावर घेतो. किंवा मटण रस्सा आणि सोलकढी मिक्स करून घेतो. बेस्ट लागते.

सध्या दुकानांत पॅकेटमध्ये ज्या सोलकढी भेटतात त्यांचा अनुभव मात्र वाईट आहे. माझा घसा धरतो. मेले काय टाकतात काय माहीत Sad

रोज सकाळी एक चमचा खोबरेल प्यावे, थोडा फार स्वयंपाकही खोबरेलात करावा असे एक स्वानुभवाचे फॉरवर्ड काही वर्षांपूर्वी डॉ मीना नेरुरकर ह्यांच्या नावाने फिरत होते. ते खूप लोकप्रिय झाले होते.

अमेरिकेतल्या कुठल्यातरी रिसर्चचा संदर्भ आणि दाखलाही असायचा त्यात. त्याचा शरीराच्या अनेक तक्रारींवर इलाज/ उपाय सांगितला होता.

खोबरेल तेल पिण्या पेक्षा
खोबरे च खाल्ले तर काय वाईट आहे मग.
चवीला पण छान लागते,तोंडाचा व्यायाम होतो आणि भेसळ असण्याची शक्यता झीरो

ऑफिस मध्ये जाणारे खुप कमी लोक घरातून रोज tipin घेवून जातात.
ऑफिस मध्ये कॅन्टीन असतेच.
तेथील च अन्न बहुसंख्य ऑफिस गोइंग लोक खातात.
किंवा फास्ट फूड.
घरातून जेवण tipin मध्ये घेवून जाणारे एक तर नगण्य लोक आहेत.
आणि त्या मध्ये मासे, मटण, etc.
सारख्या वेळ लागणारे पदार्थ tipin मध्ये घेवून जाणारे तर दुर्मिळ च आहेत

आणि त्या मध्ये मासे, मटण, etc. सारख्या वेळ लागणारे पदार्थ tipin मध्ये घेवून जाणारे तर दुर्मिळ च आहेत
>>>>

छे.. मी रविवारचे सोमवारी आणि बुधवारचे गुरुवारी डब्यात न्यायचो. वेळ चपात्या करायचा फक्त.

खरा प्रामाणिक मायबोली कर.
स्वयंपाक करण्यात खास रस ऑफिस गोइंग स्त्री पुरुषात नसतो.
त्यांच्या कडे वेळ पण नसतो.
Fastfood हे prestige shi शी संबंधित समजणारे जास्त आहेत.
ज्वारी ची भाकरी लो स्टेटस चे प्रमाण आहे pizza burger म्हणजे अती आधुनिक.

बरेच पर्याय वर आलेले आहेत पण माझेही २ पैसे -
- चिकन/मटण सुकं, कोल्हापुरी पद्धतीनं / कधी वर्‍हाडी पद्धतीनं
- माश्याच्या तर्‍हेतर्‍हेच्या तुकड्या
- चिकन/ मटण खिमा, त्याचे पराठे, समोसे, रोल्स
- कोळंबी/कोलिम इ. चं लथपथ अश्या ग्रेव्हीसोबत
- चिकन सलाड
- चिकन, मटण चॉप्स च्या टिक्क्या/ बर्गर्स
- सुकी मासळी चालत असेल तर चटणी इ. करून चांगलं लागेल असं वाटतंय
- अंड्याची फ्रँकी आत मसालेदार बटाटा सुकी भाजी भरून (बंगाली स्टाईल; बॉंग ईट्स चॅनल वर रेस्पी आहे)
- चिकन फ्राईड राईस/ नूडल्स
- क्रॅब मीट सँडविच!

छे.. मी रविवारचे सोमवारी आणि बुधवारचे गुरुवारी डब्यात न्यायचो. >> मी पण तसेच करणार आहे. रविवारी बनवून ठेवणार सोमवारी देणार.

स्वयंपाक करण्यात खास रस ऑफिस गोइंग स्त्री पुरुषात नसतो.>> मला आव्डते मुलांसाठी बनवायला काही पण. त्यातच दोन बटाटे टाकले की माझे पण काम होते. माझी इतकी धावपळ नस्ते तरुण लोकांइतकी. तितकीच आपली मदत. गार पिझा बर्गर चांगले लागत नाही.

अमा तुम्ही आयुष्य भरभरुन जगता असे माझे नीरीक्षण आहे. आनंदी स्वभाव, हौशी वृत्ती, सुग्रणपणा. मस्त मस्त गुण आहेत तुमच्यात. नॉट टु मेन्शन परखडपणा Happy

Pages