विविध धर्मातील कर्मकांडे

Submitted by उपाशी बोका on 24 April, 2023 - 13:58

दुसऱ्या धाग्यावर होणारी चर्चा वाचून हा धागा सुरू केला आहे. विविध धर्मांची कर्मकांडे याच्यावर चर्चा होऊ द्या इथे. पटकन सुचलेले उदाहरण म्हणजे हिंदू धर्मातील आरती करणे, मुस्लिम धर्मात नमाज अदा करणे, ख्रिश्चन धर्मात चर्चमध्ये जाणे वगैरे. हा प्रकार कर्मकांड (ritual) या प्रकारात मोडणारा आहे ना? अशी अजून काय कर्मकांडे आहेत?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नवर्‍याच्या ऑफिसात अ‍ॅश वेनसडे जोरात साजरा होतो. सर्वजण कपाळावरती राखी रंगाचा क्रॉस काढुन येतात. अगदी सगळे प्राध्यापक, विद्यार्थी. सग्गळे!!!

गणपती सण कशाला साजरा करतात हे माहीत नसतानाही तुम्ही काही लोक का साजरा करतात? वगैरे प्रश्न ऐकलेले मुस्लिम परिचितांकडून, ऐकलेले आहेत.
-------------
अवांतर -
न्यु जर्सीत मुस्लिम परिचितांकडून बरेचदा ऐकलय - भारतत काय गर्दी असते नाही!!!
टेक्सासमधल्या ऑफिसात हा एक पाकिस्तानी सहकारी , भारतात गायी रस्त्यावर कशा फिरतात हे रंगवून सांगताना ऐकलेले आहे.
गणपतीचा विषय निघाल्यानंतर जवळच्या इन्डोनेशिअन ख्रिश्चन मैत्रीणीचा 'ओकारी काढण्याचा' हावभाव पाहीलेला आहे. अरे यांना माहीत तरी असतं का की काय कहाणी आहे , उगाच मानव + हत्ती , मानव + माकड संकर वगैरे स्टुपिड कल्पना करतात की काय नकळे. पण तिला शिसारी आलेली पाहीलेली आहे.

टिव्हीवरती कार्यक्रम पाहीलेले आहेत ज्यात काळे लोक गॉसपेल क्वायर वरती अंगात आल्यासारखे रडत, नाचत असतात. हां तो उन्माद चर्चपुरता व ४ भिंतींच्या आत मर्यादित असतो ते आहे.
मी फक्त काळेच लोक असे टिव्हीवरती नाचताना पाहीलेले आहेत. त्यामुळे काळे लिहीलेले आहे. गोरेही नाचत असतील माहीत नाही.
-------------
एकाच कपमधुन वाईन वगैरे पितात चर्चमध्ये ते मी एका लहान बाळाच्या बॅप्टिझमला पाहीलेले आहे. तीच ग्लासाची कड, पेपर नॅपकिनने पुसून रांगेतील व्यक्तीना ती वाईन एकेक घोट दिली जाते. आता कोव्हिडपश्चात बदलले असेल तर माहीत नाही.

पारसी लोकांबद्दल ऐकिव माहीती ही आहे की हे लोक अग्निपूजक असतात. तसेच यांच्या देवळांत इतर जनांना मनाई असते. हे लोक देवळात स्वतःच्या थोबाडीत वगैरे लावून घेत जोरजोरात कन्फेस करतात. खखोदेजा.

गेल्याच आठवड्यात न्यु यॉरकमधील चायना टाऊनमधल्या मोठ्ठ्या बुद्धिस्ट मंदिरात गेले होते. त्यांच्या देव्हार्‍यात एक मोठ्ठी म्हणजे ४ फुट आणि रुंद अशी कळशी होती. पूर्ण उदबत्तीच्या राखेने भरलेली. लोक त्या कळशीतच उदबत्ती लावत होते. व ती कळशी त्या राखेने भरत जात होती. अतिशय शांत मस्त देउळ होते. कुआन यिन जी की अवलोकितेश्वराचे स्त्री रुप आहे तिला लोक तेलाची बाटली वहात होते. मी ही एक बाटली वाहून आले.

शीख धर्माबद्दल माझे मिश्र मत आहे. लंगर (अन्नदान) व सेवाभाव - हे गुण घेण्यासारखे आहेत.

मात्र कोती माणसे जिथून तिथून सारखीच. शीख मैत्रिणीच्या तेव्हाच्या मित्राच्या घरी गेले होते कारण त्याचे आई-वडील भारतातून आलेले होते. त्या मित्राचे वडील मला म्हणाले - तुमचे देव, ब्रह्मा वगैरे आपल्या स्वतःच्याच मुलीच्या मागे लागलेले वगैरे आढळतात.
टेक्सासमधील गुरुद्वारात, काही जण शीख धर्म हा हिंदू धर्मापेक्षा उत्तम कसा याचे बौद्धिक घ्यायला सुरुवात करीत. काहींना वाटे फुकटचा पुक्खा झोडायला आम्ही येतो. बोलत नसत पण देहबोलीतून कळतात या गोष्टी.

लो कल्लो बात! जे सीख नाहीयेत ते गुरुद्वारात पुख्खा झोडायलाच जातात असेच मला वाटत होते Happy मी तर अक्षरधाम असो नाहीतर ब्रिजवॉटरचे बालाजी टेम्पल दोन्हीकडे खादाडीसाठीच जाते . Proud
बाकी या बाफवर नक्की काय लिहायचे आहे? सर्व धमातल्या अनिष्ट प्रथा लिहायच्या आहेत का? पण कर्मकांड वेगळे. (असे मला वाटतेय.)

या बाफ चे प्रयोजन समजले नाही, न्यू जर्सी मध्ये कोणत्या देवळात खायला मिळते, कोठे फुकट असते, कोणत्या वारी, कोणती भाषा , ई ई वर मी झगत लिहू शकेन !

अ‍ॅश वेन्सडे ला सकाळी एक माणूस ट्रेन स्टेशन वर थांबलेला असतो. न्यूयॉर्क ला जाणर्‍या सर्वांना कपाळाला राखेने क्रॉस काढतो. मीही काढून घेतो.

कर्मकांड हाच खरा धर्म होय. सगळे धर्म त्यामुळेच तर टिकून आहेत. तत्विकतेचा नुसता मुलामा असतो. आत्मिक उन्नती वगैरे बोलण्याच्या गोष्टी. निरर्थक कर्मकांडामुळेच धार्मिक नेत्यांना मेंढरे हाकणे सोपे जाते.

कर्मकांड हाच खरा धर्म होय. सगळे धर्म त्यामुळेच तर टिकून आहेत. तत्विकतेचा नुसता मुलामा असतो. आत्मिक उन्नती वगैरे बोलण्याच्या गोष्टी. निरर्थक कर्मकांडामुळेच धार्मिक नेत्यांना मेंढरे हाकणे सोपे जाते.

कर्मकांडे आर फन राईट? मस्त आरती करणे, जळत्या कापरावरुन हात फिरवणे, उदबत्ती, निरांजनात जळणारं तूप, कापूर्, चंदन, फुले असा मस्त वास दरवळणे, अथर्वशीर्ष म्हणणे आणखी कुठली स्त्रोत्रे म्हणणे ... किंवा चर्च मध्ये गेल्यावर त्या काडीने ज्योतसेज्योत जलाते चलो करत मेणबत्ती लावणे आणि ती काडी परत त्या राखेत बुचकळणे, दर्ग्यात काय मी जात नाही त्यामुळे तिकडच्या मजा माहित नाहीत. पण अशीच आणि इत्यादी जर कर्मकांडे असतील तर मलातर कर्मकांडे फारच आवडतात. याकाही अनिष्ट प्रथा नाही काही!
आता अनिष्ट प्रथा लिस्ट करायला आणि एक धागा कोण काढतंय?
देवळात आणि कॉस्को मध्ये सँपलिंग करायला मिळालं नाही तर जाण्यातली मजाच संपते.

<< कर्मकांडे आर फन राईट? >>
देवापुढे कोंबडी कापणे आणि ईदला बोकडाचा बळी देणे या प्रथा (कर्मकांडे) नाहीत? पण बरोबर आहे, कुणाला कोंबडीचा आणि मटण बिर्याणीचा प्रसाद आवडत असेल, तर कदाचित नसतीलही या अनिष्ट प्रथा.

मी गुरुद्वारात तिथे मिळणारा तो प्रचंड सुंदर कडा प्रशाद खायला जाते. तिथला लंगर कधी चाखला नाहिये. तो चाखण्यासाठी व मंदिराचे स्थापत्य पाहण्यासाठी एकदातरी सुवर्ण मंदिरात जावे ही इच्छा आहे.

बाकी माझा देव माझ्या मनात आहे, त्याला भेटण्यासाठी खास मंदीरात जायची आवश्यकता मला वाटत नाही. पण तिथे भंडारा असेल तर भंडार्‍यात जेवण करणे हा अनुभव घेतल्याशिवाय मला राहवत नाही. Happy

कर्मकांडे आर नॉट फन… माणसाला जखडुन ठेवणारे ते जाड दोरखंड आहेत. कर्मकांडे करता करता माणुस इतका थकुन जातो की आपण हे का करतोय याचा विचार करायची कुवतही त्याच्यात राहात नाही. तोच त्याच्यासाठी धर्म बनतो.

आज सर्वत्र कर्मकांडे हीच धर्मांची ओळख बनलेली आहे.

परंपरा एक दोन माहीत आहेत..
Christian लोकांच्या लग्नात सुरवातीला च वाइन दिली जाते सर्वांना .
आणि लग्नाच्या जेवणात नॉन वेज मेनू असतात.
त्या प्रमाणे मुस्लिम लोकांच्या लग्नात पण नॉनव्हेज मेनू च असतात.
नवऱ्या मुलाचा चेहरा पूर्ण झाकलेला असतो फुलांच्या माळ नी..
त्याला समोर बसवून विविध प्रश्न विचारले जातात आणि कबूल आहे असे उत्तर त्याच्या कडून घेतले जाते.

कर्मकांड हाच खरा धर्म होय. सगळे धर्म त्यामुळेच तर टिकून आहेत....+१.
पण मग अमितव म्हणाले तसे ..उदबत्ती, निरांजनात जळणारं तूप, कापूर्, चंदन, फुले असा मस्त वास दरवळणे, अथर्वशीर्ष म्हणणे आणखी कुठली स्त्रोत्रे म्हणणे ... हे वातावरण पण आवडते.

आपण धर्मातील कर्मकांड ह्या विषयावर बोलत आहे.
कर्मकांड प्रतेक धर्मात आहे.
एक असा धर्म ह्या पृथ्वी च्या पाठीवर नाही की त्या धर्मात कर्मकांड नाहीत
Submitted by Hemant 333 on 24 April, 2023 - 20:50

परंपरा एक दोन माहीत आहेत.
Submitted by Hemant 333 on 25 April, 2023 - 09:20

आधीची पोस्ट वाचून वाटले तुम्हाला धर्मातील कर्मकांडे यावर चांगली माहिती आहे, म्हणुन वेगळा धागा काढुन लिहा असे सुचवले.
असो.

ज्यू आणि मुस्लिम धर्मीय पाळतात एक अनिष्ट प्रथा, सरकमसिजन (सुंता) करण्याची. त्यात फिमेल जेनिटल म्युटीलेशन आणखी कितीतरी पटीने वाईट, हे ज्यू करत नाहीत पण काही मुस्लिम करतात अर्थात त्यांच्यात सुध्दा हा प्रकार कमीच आढळतो. पण मुलांचे मात्र जवळपास सार्वत्रिक रित्या होतेच. ह्यात चुकीच्या पद्धतीने हताळल्यामुळे इन्फेक्शन किंवा इजा होऊ शकते आणि काही वेळेस जीव सुद्धा जातो. ख्रिस्तोफर हीचन्स जा नास्तिक वक्ता एका ज्यू राबाय शी बोलत असताना हीच ने राबायला शब्दिकरीत्या झोडपले होते. (हीच च्या अश्या कितीतरी चित्रफिती नेट वर आहेत. त्यांना गंमतीने hichslap असे म्हणतात.)
https://youtu.be/Xx_ov2NiNo4
हिचन्सचा इस्लाम वर थोडा जास्तच राग होता. त्यामुळे त्याने जन्मभर ख्रिश्चन धर्मावर सपासप कोरडे ओढले असले तरी कोणाला त्याला "अमुक वर का बोलत नाही" म्हणायची हिंमत नव्हती.
शेवटी शेवटी अतिशय तर्कशुद्ध हीच इस्लाम द्वेषाने अतिशय बायसड झालेला आणि सोशलिस्ट असूनही इराक युद्धासाठी बुशचे समर्थन करत होता. पण, तसे असेल तरी त्याच्या अनेक डिबेट आणि मुलाखती अतिशय मनोरंजक आहेत.

अश्या अनेक नास्तिक लोकांच्या अनेक जबरदस्त मुमेंट्स आहेत. एकदा कधीतरी सगळ्या एकत्रित करून मायबोली टाकल्या पाहिजेत.

अगदी अगदी.
हीच तर खासियत आहे नास्तिक लोकांची.
आपण जसे नास्तिक आहोत तसे पूर्ण जगातील धर्म नष्ट होवून सर्व लोकांनी नास्तिक झाले पाहिजे असं ह्यांचे खुळ असते.
त्या साठी हिंसा
भले हे धर्म मानत नाहीत ,देव मानत नाहीत असे दाखवत असतात.
पण दिवसातील २४ तास धर्म आणि देव ह्या चच विचार करत असता तेवढा आस्तिक लोक पण करत नाहीत

<< पूर्ण जगातील धर्म नष्ट होवून >>
दुर्दैवाने तसे काही होण्याची शक्यता नाही, पण झालेच तर हरकत काय आहे? धर्म, देव, कर्मकांड यांच्यामुळेच जगात कितीतरी युद्धे, कित्येक प्रॉब्लेम झाले आहेत? नरबळी देणे आणि लहान मुलांची (आणि मुलींचीसुद्धा) सुंता करणे ही विकृती त्यातूनच आली आहे. (कर्मकांडाचे १ उदाहरण)

काहींना वाटे फुकटचा पुक्खा झोडायला आम्ही येतो. बोलत नसत पण देहबोलीतून कळतात या गोष्टी.>>>
तुम्ही ही ६ प्रतिसादातुन तेच केले आहे. दुसर्‍यांस सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र टेक्सासचे पाषाण.

मी फक्त काळेच लोक असे टिव्हीवरती नाचताना पाहीलेले आहेत. त्यामुळे काळे लिहीलेले आहे. गोरेही नाचत असतील माहीत नाही.>>>
रेसिस्ट

धर्म नष्ट झाले तर वर्ण आहेत, लिंगभेद आहेत.... यादी लांब होत जाईल

पारसी लोकांबद्दल ऐकिव माहीती ही आहे की हे लोक अग्निपूजक असतात. तसेच यांच्या देवळांत इतर जनांना मनाई असते >> खरे आहे. जैन धर्मियांच्या काही प्रार्थनास्थाळात देखिल इतरेजनांना प्रवेश दिला जात नाही.

अय्यपा मंदिराबद्दल आप्ल्याला ठाउक आहेच

सुंता?
मला एका सिंधी चाइल्ड स्पेशिअलिस्ट् त्याचे फायदे समजाऊन सांगितले होते. कुमार१ कदाचित प्रकाश टाकू शकतील.

@ केकू
नवजात मुलग्याची सुंता
ही प्रथा सुमारे 15,000 वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये उगम पावली असे समजले जाते.

फक्त वैद्यकीय दृष्टिकोनातून काही मुद्दे :
१. गेल्या 20 वर्षांमध्ये या शस्त्रक्रियेचे भविष्यात होणारे फायदे हा अत्यंत वादग्रस्त विषय झालेला आहे.

२. 2012 मध्ये अमेरिकी बालरोग संघटनेने असे जाहीर निवेदन दिलेले आहे :
नवजात मुलाची सुंता केल्याने भविष्यात काही फायदे मिळतात, असे सिद्ध करणारा विदा अत्यंत अपुरा आहे. संबंधित डॉक्टरने मुलाच्या पालकांना हे समजावून सांगावे”.

३. सुंता केल्याने होणारे त्रास/ गुंतागुंत:
a . तात्पुरते : रक्तस्त्राव, जंतूसंसर्ग
b . दीर्घकालीन : यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे लघवीच्या छिद्रात निर्माण होणारा अडथळा

इथे एका दीर्घकालीन अभ्यासाचा सारांश दिलेला आहे :

https://read.qxmd.com/read/25284631/a-review-of-the-current-state-of-the...

धन्यवाद कुमार१.
आपण दिलेली लिंक सावकाशीने वाचीन म्हणतो.

ख्रिस्ती धर्मात; Ascension डे असतो; मे महिन्यातला तिसरा गुरुवार. त्या दिवशी ख्रिस्त स्वर्गात गेला असे समजतात
जर्मनी मंध्ये या दिवशी father's डे सेलेब्रेट kartat. सकाळी फॅमिली बरोबर आणि संध्याकाळी मित्राबरोबर बिअर पीत भटकणे . फ्रायडे ला मॅक्सिमम गोष्टी बंद असतात; schools, ऑफिसेस etc.
४ दिवस सुट्टीचे.

कर्मकांडे म्हणजे श्रद्धा प्रतिबिंबित गतानुगतिक कर्मे. श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक म्हणजे पहिला शब्द दोन अक्षरी आहे व दुसरा चार अक्षरी आहे असे आमचे कठोरे बुद्धी वादी प्रा. य.ना. वालावलकर म्हणतात. तात्विक दृष्ट्या ते बरोबरही आहे.
मला या लेखात विविध संस्कृतीतील कर्मकांडे यावर प्रकाश दाखवणारा सविस्तर लेख अभिप्रेत होता.

म्हणून तर हा लेख "माहिती हवी आहे" सदराखाली आहे. वेगवेगळ्या धर्मात काय rituals आहेत, त्यांचे धर्मातील महत्त्व, त्यातील अनिष्ट प्रथा कशा बदलल्या किंवा बदलायची गरज आहे अशी चर्चा करायला.

निव्वळ हिंदू धर्माचा विचार केला तर बारसे, मुंज, यज्ञ, उपास, आरती, जप, वर्षश्राध्द असे किती तरी प्रकार आहेत. काहींच्या मते हा वेळेचा अपव्यय असू शकेल, पण वर अमितव यांनी म्हटल्याप्रमाणे यातून कुणाला समाधान पण मिळत असेल.

Pages