प्रजनन आरोग्य

Submitted by vrushali m on 14 February, 2023 - 01:59

प्रजनन आरोग्य

प्रजनन व्यवस्थेशी किंवा प्रजननाशी निगडित शारीरिक , मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे चांगले प्रजनन आरोग्य . पण प्रत्यक्षात या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो . उदा . , स्त्रीरोगशास्त्र , किशोरवयीन आरोग्य , माता आरोग्य , कौटुंबिक हिंसाचार आणि एच. आय. व्ही यातल्या प्रत्येक घटकाशी मानसिक आरोग्याचे महत्त्वपूर्ण प्रश्न निगडित आहेत .
त्यांच्या बद्दल आपण माहिती घेणार आहोत.
प्रजनन आरोग्यासाठी स्त्रीचे आरोग्य मग ते शारीरिक असो किंवा मानसिक ह्यावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे .

आत आपण स्त्री रोग आणि मानसिक आरोग्याबद्दल जाणून घेऊ :

स्त्रीरोग आणि मानसिक आरोग्य मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून तीन प्रकारच्या स्त्रीरोगविषयक समस्या महत्त्वाच्या आहेत :

• स्त्रीरोगविषयक तक्रारी . या तक्रारी नेहमीच्या आहेत , विशेष करून अंगावरून जाणे आणि ओटीपोटात दुखणे . या समस्या असणाऱ्या अनेक स्त्रियांना थकवा , अशक्तपणा आणि डिप्रेशन व चिंता याचाही त्रास असतो .

• पाळीविषयक तक्रारी . पाळी सुरू होण्याआधी काही स्त्रियांना अस्वस्थ वाटते . इंग्रजीत याला प्रीमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम ( pre - mensrual syndrome ) म्हणतात . चिडचीड होणे , एकाग्रतेचा अभाव , थकवा आणि उदास , निराश वाटणे अशा त्रास स्त्रियांना होऊ शकतात . पुढे मासिक पाळी बंद होण्याच्या काळात काही स्त्रियांना डोकेदुखी , अचानक रडू येणे , चिडचीड , काळजी , झोप नीट न लागणे , थकवा आणि लैंगिक संबंध न ठेवण्याची इच्छा अशा तक्रारी जाणवतात .

• जननसंस्थेशी संबंधित शस्त्रक्रिया . कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया ( नसबंदी ) , गर्भाशयावरील शस्त्रक्रिया ( उदा . , गर्भाशय काढून टाकणे ) आणि स्तनावरील शस्त्रक्रियांनंतर ( उदा . , कर्करोगाचे उपचार ) स्त्रियांना मानसिक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात . जननेंद्रियांच्या शस्त्रक्रियेनंतर स्त्रियांवर वेगळ्याच प्रकारचा ताण येतो . कारण या अवयवांचा संबंध थेट स्त्रीच्या लैंगिकतेशी आणि स्त्रीत्वाशी जोडलेला असतो .

आता आपण माता आरोग्य आणि मानसिक आरोग्य ह्याबद्दल माहिती जाणून घेऊ.

माता आरोग्य आणि मानसिक आरोग्य मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी आणि फलदायी काळ असू शकतो . पण त्याचबरोबर स्त्रीच्या शरीरात , नातेसंबंधांमध्ये आणि कामामध्ये प्रचंड बदल घडवून आणणाराही हा काळ आहे .
उदाहरणार्थ , इतर अपत्यांसोबतच्या आणि जोडीदाराबरोबरच्या तिच्या नातेसंबंधांवर कदाचित परिणाम होईल . बाळाच्या आगमनाबरोबर तिचे काम बरेच वाढू शकेल . या सर्व बदलांचे अर्थातच भावनांवरही परिणाम होऊ शकतात . मानसिक आरोग्याच्या दृष्टीने माता आरोग्याच्या दोन विशिष्ट परिस्थिती महत्त्वाच्या आहेत • बाळाच्या जन्मानंतर येणारे डिप्रेशन / नैराश्य बाळाच्या जन्मानंतर लगेचच्या काळात स्त्रियांना डिप्रेशनचा त्रास होण्याची खूप शक्यता असते .
लग्नात सुखी नसणे , कौटुंबिक हिंसाचार , मुलाला अंगावर पाजताना येणाऱ्या समस्या , नवजात अर्भकाचे आजारपण किंवा मृत्यू आणि काही समाजात मुलीचा जन्म या सगळ्या गोष्टींमुळे डिप्रेशनच्या शक्यतेची सावली अधिक गडद होते . याउलट व्यवस्थित नियोजन केलेल बाळंतपण घरातील जवळच्या नातेवाईकांकडून मदत आणि पाठिंबा या गोष्टी बाळंत स्त्रीला पोस्टनेटल ( प्रसूतीनंतरच्या ) डिप्रेशनपासून वाचवू शकतात . हे डिप्रेशन बराच काळ टिकू शकते . असे घडल्यास बाळाकडे दुर्लक्ष होऊन बाळाच्या वाढीवर आणि प्रगतीवर परिणाम होऊ शकतो .

• गर्भपात आणि जन्माआधी मूल दगावणे :
नैसगिक किंवा करवलेल्या गर्भपातामुळे संबंधित स्त्रीला डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो . गर्भपात केला असल्यास स्त्रीला त्याबद्दल अपराधीपणाची भावना वाटू शकते . आपले शरीराची खात्री देता येत नाही आणि आपण मुलाला जन्म देऊ शकत नाही या भावनेने स्त्रीच्या स्व - प्रतिमेला धक्का बसतो . जन्माआधी मूल दगावल्यानंतर काही गमावणे , दुःख , उदासी , राग , पोकळी , अपुरेपणा , दोष देणे आणि मत्सर वाटणे अशा भावना संबंधित स्त्री अनुभवू शकते . माता आरोग्य सेवांमध्ये काम करणारे आरोग्यसेवक
उदा . प्रसूतिपूर्व काळजी घेणाऱ्या परिचारिका आदी मूल बगावल्यानंतर किंवा बाळंतपणानंतर येऊ शकणाऱ्या डिप्रेशनला प्रतिबंध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात . ज्या स्त्रियांना डिप्रेशनचा त्रास होण्याची शक्यता आहे -
उदा . , ज्यांची मुले जन्माआधी किंवा
बाळंतपणात दगावली आहेत , किंवा ज्या स्त्रिया त्यांच्या संसारात सुखी नाहीत आणि ज्यांना इतर कुटुंबीयांचा फारसा आधार नाही - अशा स्त्रियांचे विशेष करून समुपदेशन करावे . समुपदेशनाचा हेतू दुहेरी असावा . - • जर जन्माआधी मूल दगावले असेल तर या स्त्रीला आघाताला सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे किंवा नवजात बाळाच्या आईला स्तनपान , बाळाचे संगोपन , पुरेशी विश्रांती आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व तसेच आपल्या भावना इतरांपाशी बोलण्याने होणारा फायदा याबाबत सल्ला देणे .

• नवजात बाळाच्या आईवडिलांचे एकत्रितपणे समुपदेशन करावे .
बाळाचे संगोपन ही दोघांनी वाटून घेण्याची जबाबदारी आहे हे आवर्जून सांगावे . कारण काही समाजात बाळाचे संगोपन ही पूर्वापारपासून सर्वस्वी आईची जबाबदारी मानली जाते . सर्व वडिलांना हे शिक्षण देण्याची गरज आहे की संगोपन ही दोघांची केवळ जबाबदारी नसून तो एक आनंददायी अनुभवही आहे .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users