हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी

Submitted by अमितव on 2 February, 2023 - 00:09

हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.

गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.

सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्‍या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.

हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.

हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिपोर्ट वेळीच आला म्हणून तुमच्या आमच्या सारखे सामान्य गुंतवणूकदार वाचले. नाहीतर एफपी ओ चा सापळा लावलाच होता.

बरं झालं धागा काढलात.
अदाणी ग्रुपने हिंडेनबर्गला दिलेलं ४१३ पानांचं उत्तर (!), त्याआधी त्यांच्या (ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या?) सीएफओने तिरंग्याच्या साक्षीने केलेलं भाषण हे सगळं प्रकरणाची नाट्यमयता वाढवतात.

अदाणींची बाजू मांडणार्‍या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत.

इतर राजकीय पक्षांच्या आमदार्/खासदार/ मण्त्री ह्यांच्याविरोधात सक्रीय होणार्‍या इडी/सीबीआय ह्या एजन्सीज , तसेच अर्थमण्त्री किंवा इतर सरकारी अधिकारी ह्यांचे ह्याबाबतीतले मौन हे काय सुचवते? एल आय सी ने ' आम्ही अदानी गृप कडे ह्याबाबत विचारणा करु' असे बिधान केल्याचे वाचनात आले. ह्यापलिकडे मात्र कोणिही काही बोललयाचे वाचनात नाही. एनडीव्ही जर आधीचा असता तर नक्की एखादा कार्य्करम केला असता. पण....

मनीकंट्रोलच्या डाटा प्रमाणे अदानी एंटरप्राइसेस च्या शेअर होल्डिंग ~ ७३% अदानी कडे आहे आणि त्यातील २.६६% प्लेज (तारण) ठेवले आहेत. किंमत वाढवून अगदी कमीत कमी शेअर तारण ठेवून सगळा डोलारा उभा केला आहे. अदानी कडे FII चे ~ १६% टक्के आणि स्वतःचे ~ ७३%, म्हणजे ~ ८९% शेअर त्याच्या कुटुंबामध्ये आहेत.

हिंडेनबर्गने अदानी ग्रुपचे securities शॉर्ट कसे केले ह्याचे US मधील इतर शॉर्ट सेलरला कोडे पडले. त्यांनाही शॉर्ट करायचे आहे परंतु प्रोसेस माहीत नसल्याने गप्प बसून आहेत.
https://www.moneycontrol.com/news/business/hindenburg-bet-against-indias...

हो. अमेरिकन ट्रेडर / गुंतवणूकदाराला भारतीय कंपनीचे शेअर्स शॉर्ट कसे करता आले असा प्रश्न एकांनी विचारला आहे. अदाणी ग्रुपचे शेअर्स अमेरिकन एक्स्चेंजेसमध्ये लिस्ट झालेले नाहीत . बाहेरच्या ट्रेडरला भारतात शॉर्ट सेलिंग करता येत नाही. असं त्यांचं म्हणणं आहे.
वरच्या बातमीतलं through U.S.-traded bonds and non-Indian-traded derivatives, along with other non-Indian-traded reference securities म्हणजे बाँड्सही शॉर्ट केलेत.

काही होणार नाही.
सेबी हिंडेन्बर्गलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायची तयारी करत आहे.

शेल कंपन्या किंवा तत्सम न तपासण्याजोगी माहिती वगळली तरी इतर तपासण्याजोगी (ओपन सिक्रेट) माहिती सुधा डेंजर आहे. लहान ऑडिटर, कमकुवत फांडामेंटल इत्यादी.

<< सेबी हिंडेन्बर्गलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायची तयारी करत आहे. >>
------ हे तितकेही सोपे नाही. हिंडेनबर्ग अमेरिकेत आहे, फ्रॉडचे आरोप करणारे भारतात / भारतीय असते, तर सगळी सरकारी यंत्रणा वापरुन तोंडे कायमची बंद केली असती. आताही मोदी सरकार अडाणीला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करेलच. उघडपणे करणे जमणार नाही पण मैत्रीला जागावेच लागेल (बसखाली ढकलणे एव्हढेही सोपे नाही...).

काही चुकीचे केले नाही त्याला डर कसली? अडाणी समुहाने स्वच्छ व्यावहार केल्याचे कागदोपत्री पुरावे कोर्टाला दिले तर(च) हिंडेनबर्ग ची अडचण वाढेल. शाब्दिक धमकी देण्यापर्यंत ठिक आहे, अमेरिकेन कोर्टात हिंडेनबर्गचे आरोप खोडून काढणे महाकठिण आहे.

RBI asks Indian banks for details of exposure to Adani Group
https://www.indiatoday.in/business/story/rbi-seeks-exposure-details-indi...

मला वाटते हे पहिलेच पाउल आहे शासनाकडुन हिंडनबर्ग आरोपांनंतर. सेबीची चौकशी आधीच सुरू होती, आता हिंडन रिपोर्टचा अभ्यास करू एवढे सेबी म्हणाली होती.

अडाणीचे शेअर्स आजही पडत आहे, शेवटचे बघितले तेव्हा ADANI ENTERPRISE LTD -१३ % घसरला आहे, इतरत्रही घसरण सुरु आहे.

फोर्ब्सच्या अंदाजानुसार ते २.५$ बिलीयन्सचे शेअर्स खरेदी करणारे... सर्वच मजा आहे.
https://www.forbes.com/sites/johnhyatt/2023/02/01/theres-evidence-that-t...

<< सेबीची चौकशी आधीच सुरू होती, >>

------ अशा चौकशा नेहेमीच सुरु असतात. फक्त चौकशीची गती किती आहे हे समजणे महत्वाचे असते. Happy

धन्यवाद अमितव.. हा धागा काढून जाणकारांचे मत घ्यावे याच विचाराने आज मायबोली उघडलेली. बर झालं तुम्ही धागा काढलात ते. आरोप खरोखरच गंभीर आहेत. हे जर ओपन असेल तर हिडन काय काय असेल रे बाबा! कल्पनाच करवत नाही. यांना मोदी सरकार पण झुकत माप का देतय ?

मला कळत नाही एल आय सी ने एवधी मोठी गुंतवणुक कशी केली. काही दिवसात एल आय सी झोपणार अश्याने आणि नुकसान सामान्य माणसाचे होणार. वर्षानुवर्ष विश्वासार्हता कमवली आणि आता एका फटक्यात गेली.

जाणकारांचे दोन्ही बाजूकडील मत ऐकायचे आहे. त्यासाठी सर्वांना आधीच धन्यवाद!

फोर्ब्सच्या अंदाजानुसार ते २.५$ बिलीयन्सचे शेअर्स खरेदी करणारे... सर्वच मजा आहे. >> म्हणजे हा अजून एक सापळा आहे का ?

हिंडेनबर्गने P- Notes चा वापर करून शॉर्ट केले असण्याची शक्यता व्यक्त केली जाते, जे कायदेशीर आहे.

RBI asks Indian banks for details of exposure to Adani Group>>>
RBI. SEBI, LIC ह्यांना आज जाग आली ह!
खर तर अडाणी = RBI. SEBI, LIC! SBI
A Journalistic History of the Adani Group
https://thewire.in/business/adani-rise-reading-list
लोक केव्हापासून बोंब मारून राहिले आहेत.
ह्याची आज झोप व्यत्यय झाली.

https://twitter.com/ndtv/status/1620982882813743104
गौतम अदाणींचं एफ पी ओ मागे घेण्याबाबतचं वक्तव्य अदाणी टीव्हीवरून

https://www.forbes.com/sites/johnhyatt/2023/02/01/theres-evidence-that-t...
There’s Evidence That The Adani Group Likely Bought Into Its Own $2.5 Billion Share Sale

एलआयसी झोपणार नाही असे वाचलं
कारण त्यांची एकूण इन्व्हेस्टमेंट मधली 2 टक्केच अडाणी ग्रुप मध्ये आहे

खरेखोटे माहिती नाही

पण ही सुरूवात होती, अजून गाळात जायच्या आधीच बाहेर आला हे बरे झाले

हो. मीही वाचलं .एका म्युच्युअल फंड हाउसने आणि एकेका स्कीममध्ये एखाद्या कंपनीमध्ये किती गुंतवणूक करावी यावर मर्यादा घालणारे सेबीचे नियम आहेत.
इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीत IRDA चेही असेच नियम असावेत. तरीपण अदाणी ग्रुपच्या सात कंपन्या आहेत . नियम ग्रुपबद्दल नसून कंपनीबद्दल असतात. त्यामुळे थोडी काळजी वाटतेच.

प्रचंड प्रमाणात ड्रग्ज अदाणीच्या मालकीच्या मुंद्रा पोर्टवरच पकडले जायचे याचीही नोंद यानिमित्ताने.

एलआयसी झोपणार नाही असे वाचलं
कारण त्यांची एकूण इन्व्हेस्टमेंट मधली 2 टक्केच अडाणी ग्रुप मध्ये आहे>> दोन टक्का असो वा अर्धा टक्का. यांना काय अधिकार आहे जनतेचा पैसा भंगार कंपनीत घालायचा. सगळे भक्ताडे माना खुपसून बसलेत आता.

सामान्य गुंतवणूकदारांनी एफ पी ओ ला भरभरून प्रतिसाद दिला असता तर मागे घेतलाच नसता भले नंतर खड्ड्यात जावो.
अगदी बरोबर.
स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी manipulation करून FPO subscribe केला आणि बाजार बंद झाल्यावर कॅन्सल केल्याची घोषणा केली.

माबोवरचे दिवंगत Blackcat हे नेहमी म्हणायचे, विश्र्वगुरुंनी ज्यांना ज्यांना मिठी मारली ते बुडाले.

Pages