पोस्ट ऑफीस उघडं आहे - सोनी मराठी वरील नवीन मालिका

Submitted by सान्वी on 6 January, 2023 - 11:53

सोनी मराठी वर कालपासून म्हणजेच ५ जानेवारी पासून 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' ही नवीन मालिका सुरू झाली आहे. अजून २ च भाग प्रसारित झालेत. पण तरी पाहताना मजा आली. सगळी उत्तम आणि अनुभवी स्टारकास्ट दिसते, बरीचशी मंडळी हस्याजत्रे मधलीच आहेत. मकरंद अनासपुरे यांना टीव्ही वर मी पहिल्यांदाच पाहिले. पोस्टातले इरसाल नमुने मस्त दाखवलेत एकेक. सध्याची पोष्टाची परिस्थिती पाहता १९९७ च्या काळातले पोस्ट आणि त्यावेळी घडणाऱ्या गमतीजमती पाहताना नॉस्टॅल्जिया आला. मर्यादित भागांची असेल असे त्यांनी आधीच जाहीर केलंय. माझ्यासारखीच अजून कुणाला मालिका आवडली असल्यास नक्की या धाग्यावर चर्चा करायला आवडेल.

Group content visibility: 
Use group defaults

प्रोमो चांगला वाटला. हास्यजत्रा मधले कलाकार आहेत बरेचसे. होप्फुली स्क्रिप्टस चांगली असावी.

मी याच सिरीज बद्दल एक प्रोमो हास्यजत्रा मधे पाहिला बहुतेक. पोस्टाच्या पेटीचे आत्मवृत्त टाइप काहीतरी होते. प्रसाद ओकने सादर केले.

सिरीज चे नाव मात्र असे का ठेवले माहीत नाही. अनेक जुने शाळकरी विनोद आठवले Happy

नाव मस्त आहे !
एके काळी तुमच्या पॅंटची झिप उघडी आहे हे समोरच्याला पोस्ट ऑफिस उघडे आहे असे म्हणून सांगितले जायचे.
सध्या काय पद्धत आहे माहीत नाही.

end>> रात्री 9 ते 10 असते,आणि रिपीट अजिबातच नाही दुसऱ्या दिवशी
आजचा एपी पण मस्त होता, किसान /इंदिरा विकास पत्र वगैरे नॉस्टॅल्जिक उल्लेख..
मनी ऑर्डर करतानाचे संवाद पण मस्त होते
एक रुपया च्या जुन्या नोटा,तिकीटं वगैरे तपशील छान घेतले आहेत

मालिका चांगली आहे पण एक तास अति होतो. मकरंदचा गुळसकर चांगला आहे. बाकी ठिक वाटले. प्रोमोचा अतिरेक चालू आहे पण रिपीट नाही हे आश्चर्य.

स्वप्नील जोशी आणि अनासपुरे बाद नट आहेत हे माझे वै मत.

हास्य जत्राचे लेखन आणि कलाकार अफलातून आहेत. विषय हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील येणारे प्रसंग असतात.

बघितले दोन्ही भाग.... बरे वाटले!!
दूरदर्शनच्या जमान्यातल्या सिरियल्सची आठवण झाली!!

९० चा काळ चांगला उभा केला आहे फक्त पोस्टाच्या मानाने जरा जास्तच उजेड आहे Wink

९० चा काळ चांगला उभा केला आहे फक्त पोस्टाच्या मानाने जरा जास्तच उजेड आहे >> अगदी अगदी, मीही कुठल्याच पोस्ट ऑफिस मध्ये एवढा उजेड आणि खेळती हवा असल्याचं पाहिलं नाही. Lol
दूरदर्शनच्या जमान्यातल्या सिरियल्सची आठवण झाली!! >> ऑफीस ऑफीस ची आठवण येते मध्येच. परंतु रटाळ वर्षानुर्षांपासून चालणाऱ्या सुमार मालिकांमधून थोडीशी सुटका आणि हस्यजत्रेपेक्षा थोडा वेगळा विनोदाचा फ्लेवर असल्यामुळें मजा येतेय.

काही पकड घेईना
एकतर मला वाटलेलं की पंचायत च्या धर्तीवर गाव, इरसाल, मनस्वी व्यक्तिरेखा आणतील
पण यांना पाचकळ विनोद आणि स्टीरिओटाइप च्यापुढं जाताच येत नाहीये

नम्रता संभेराव आणि शिवाली परब जास्त न्याय देऊ शकल्या असत्या
इव्हन राऊत पण
पण तो प्रभाकर मोरे आणि दत्तू मोरे बघूनच आता कंटाळा येतो
तेच ते टिपिकल बोलत राहतात

प्रभाकर मोरे दशावतारी किंवा खेळे यातून बाहेर येत नाही. त्यात भारी आहे.
दत्तू मोरे आणि गौरव मोरे फक्त टपल्या आणि लाथा मारण्यासाठी ठेवले आहेत. कोणी पाहुणे आले की हेच एपिसोड असतात.

चला हवा येऊ द्या'तला पोस्टमन(लेखन जगताप) सागर कारंडे उभा करतो तो आख्या पोस्ट ऑफिसला खाऊन टाकून शकतो.

दत्तू मोरे आणि गौरव मोरे फक्त टपल्या आणि लाथा मारण्यासाठी ठेवले आहेत. कोणी पाहुणे आले की हेच एपिसोड असतात.>>>
अगदी फार बोर झालाय ते आता
आणि ते मोरे फॅमिली चे स्किट बघवत नाही, त्यात रसिका असूनही

तिलाही बऱ्यापैकी मर्यादा आहेत अभिनयाला

पृथ्विक,नमू आणि शिवाली गावातले प्रेम आणि अडथळे फारच भारी कल्पना टोकदार पद्धतीने मांडतात.

>>चला हवा येऊ द्या'तला पोस्टमन(लेखन जगताप) सागर कारंडे उभा करतो तो आख्या पोस्ट ऑफिसला खाऊन टाकून शकतो.

ही कसली तुलना?? दोन्हीत एक "पोस्टमन" सोडला तर तसे काहीही साम्य नाहिये..... पूर्ण वेगळ्या कन्सेप्ट आणि जॉनर आहेत दोन्ही!!

हो.. ऑफिस ऑफिस मालिकेशी तुलना व्हायला हवी.. बाकी मी पोस्टाची सिरीअल पाहिली नाही. पण त्या पठडीतील असावी असे वाटते.

यु ट्युब वर पहिला भाग पाहिला . पहिला भाग बघताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. यात लोक आंतर्देशिय पत्र , स्टॅम्प घेणे , रजिस्टर पोस्ट किंवा मनी ऑर्डर करायला जात होते ते दाखवले आहे.
सिरियल मात्र आवडली नाही. त्या मानाने ऑफीस ऑफीस मात्र खुप छान आहे.
पोस्टाचे १९९० मधले काम आणि २०२३ मधले काम यात खुप फरक आहे. सध्या पोस्टाची जुनी कामे कमी आणी आधार, Driving Licence,, बॅक साठी जास्त वापर होतो. पिंपरी पोस्ट ऑफीस मध्ये पासपोर्ट चे काम पण होते.

ही सिरियल बघायची शक्यता नाही. पण हास्यजत्रेबद्दल बोलायला इथे धागाच नाही. त्यातले रोहीत माने, श्रमेश, हेमंत पाटील वगैरे जास्त आवडतात. ओंकार भोजनेही आवडायचा. बाकी काही काही स्किट्स आवडतात. इशा डे आणि वनिता खरात बॅकग्राऊंडमध्ये घोड्यांसारख्या विचित्र खिंकाळत असतात त्याचा वैताग यायला आहे. सतत बघत राहिलं की तोच तोचपणा येऊन बोअर व्हायला लागतं.

Pages