कथाशंभरी - केक! - मॅगी

Submitted by मॅगी on 3 September, 2022 - 11:42

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. 

लहानपण आठवून सोनालीचे डोळे पाणावले होते. आईबाबाची सततची भांडणे, बाबाचे पिणे, त्रास. शेवटी घटस्फोट झालाच. एका वाढदिवसाला ती बाबाकडे निघाली होती. वाटेत आईने ऑर्डर केलेला केक घेऊन ती घरी पोचली. केक खाल्ल्यावर बाबाने नेहमीप्रमाणे तिच्या शॉर्ट ड्रेसवरून आईला नावे ठेवलीच. ती वैतागून खोलीत जाऊन बसली. संध्याकाळी बाबाला नेहमीच्या गोळ्या देताना काहीतरी गफलत होऊन हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत तो गेलाच.

"बाबा..."

"अग्ग सोनूडी.. तुला त्याची पीनट बटर ऍलर्जी थोडीच माहीत होती..." आई म्हणाली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलगी समजते तिने गोळ्या चुकीच्या दिल्या, पण केक आईने ऑर्डर केला होता आणि फक्त आईला ऍलर्जी माहीत होती. म्हणजे समजून जा.

जमलीय.

मस्त! Happy

घटस्फोट झाला होता ना? तरी का मारले म्हणे?
ती खोलीत जाऊन बसली, नेहमीच्या गोळ्या देताना वगैरे वर्णनावरुन ते एकत्र राहत असावेत असा फील येतोय उगाचच!

धन्यवाद सगळ्यांना.

अमित, आमच्याकडे एक छोटं वादळ आलंय त्यामुळे इथे येत नाही हल्ली. Happy

स्वरूप, मुलगी मोठी आहे आणि वडीलांकडे अधूनमधून जात असते. मुलीशी वडीलांचं नातं चांगलं असेल. त्या घरात तिची जुनी खोली अजूनही आहे. फक्त आई वडीलांचा डिव्होर्स झालाय. डिव्होर्सनंतरही आई वडीलांच्यात काही भांडण, एकमेकांना त्रास देणे असू शकते.

जमलीय !

या पीनट ॲलर्जीचा उल्लेख असणारी कथा गेल्यावेळीही होती ना ईथे एक.. त्यामुळे याबद्दल समजलेले

वाढदिवस कुणाचा होता? वडिलांचा की मुलीचा? (बहुदा वडिलांचा)

घटस्फोट झाला होता तर आई कशाला केक ऑर्डर करेल?
पीनट बटरचा केक असतो?
पीनट बटरचा केक खाऊन लगेच रिॲक्शन होत नाही आणि वडिलांना कळत नाही?
पीनट बटरच्या ऍलर्जीने मृत्यू होतो आणि हे माहीत असूनही दुकानात तो विकतात?

उ बो,
१. वडीलांचा वाढदिवस.
२. मुलगी केक घेऊन जाणार म्हणून आई ऑर्डर करू शकते की आणि तिला तर करायचाच होता.
३. हो, साध्या बटरऐवजी पीनट बटर वापरतात, प्लस हा खास ऑर्डरचा कस्टम मेड केक होता.
४. रिऍक्शन झालेली कळते पण मुलीला ती गोळ्यांमुळे वाटते आणि वडील इतके मरायला टेकलेले असतात की त्यांना सांगता येत नाही.
५. हो, दुकानात विकतात कारण ऍलर्जीने मरू शकणारे लोक जगात फार कमी आहेत. उरलेल्या लोकांसाठी पीनट बटर डेलिकसी आहे.

पीनट बटरचा केक खाऊन लगेच रिॲक्शन होत नाही आणि वडिलांना कळत नाही?>> मला पण उबो सारख्याच शंका आहेत.
त्यांना अ‍ॅडमिट केले तर सर्व रिपोर्टिन्ग उप लब्ध असेल. डिस्चार्ज समरीत डेथ ड्यु टु एलर्जिक रिअ‍ॅक्षन असे नक्की येणार व डेथ सर्तिफिकेट वर पण येइल. हॉस्पिटल वाले कसली अ‍ॅलर्जी तर नाही असे दर वेळी साधारण तासा तासाला विचारतात. नट अ‍ॅलर्जीने लोक्स मेलेले माहीत आहे. पन हे भारतात तितके होत नाहि जितके युरोपाम्रविकेत होते. पर्सेंटेज वाइज.

डेथ सस्पिशिअस असेल तर पोस्ट मॉर्टेम पण होईल.

मुळात डिवोर्स एकदा झाला आहे तरी ही बायको त्याला का मारते? काय खुन्नस.

शोर्ट ड्रेस कोण घालते वडिलांनी टिका करायला? आई का मुलगी? मुली ने घातला म्हणून आईवर टिका का?

मुळात पीनट बटर कुकीज व केक आर मेड फॉर पपीज!!! जनरली. ही स्पेशल ऑर्डर आहे. व्याख्या विख्हि वुखु. चिंधी आत्याचे स्प्रिट.

अमा, पर्सेंटेज वाइज एखादा माणूस आपल्याकडे भारतात असूच शकतो.

पोस्टमॉर्टेम झाले की नाही वगैरे शतशब्दकथेत येऊ शकत नाही, कादंबरी लिहावी लागेल.

मुलीने शॉर्ट ड्रेस घातला म्हणून टीका आईवर केली की ती कसं मुलीला चांगलं! वळण लावत नाही. हे फक्त उदा. आहे. अश्याच अजून गोष्टींमुळे आईने केकची ऑर्डर दिली असेल!

पी ब केक वीगन असल्यामुळे सगळ्या स्टायलिश वीगन माणसांमध्ये प्रसिद्ध आहे. पपीजचा राहिला नाही तो आता.

एनिवे, याउप्पर ज्यांना गोष्ट कळणार नाही, आवडणार नाही त्यांनी गोली मारो. सोडून द्या, लिहायचे कष्ट घेऊ नका.

<< ४. रिऍक्शन झालेली कळते पण मुलीला ती गोळ्यांमुळे वाटते आणि वडील इतके मरायला टेकलेले असतात की त्यांना सांगता येत नाही.
५. हो, दुकानात विकतात कारण ऍलर्जीने मरू शकणारे लोक जगात फार कमी आहेत. उरलेल्या लोकांसाठी पीनट बटर डेलिकसी आहे. >>
Lol

नवऱ्याला पीनट बटरची ऍलर्जी आहे, हे माहीत असूनही ती मुद्दाम तो केक ऑर्डर करते. +
जी गोष्ट बायकोला माहीत आहे, पण बाबाला माहीत नाही? आणि तो तरीही पीनट बटर केक खातो?
>>
ये बात कुछ हजम नही हुई.

जाता जाता: माझ्या मुलीला काजू, hazelnut, walnut, macadamia nuts, pecan ची ऍलर्जी आहे (पण peanut ची नाही), त्यामुळे एकंदर ऍलर्जी या प्रकाराबद्दल कल्पना आहे. ती nuts प्रकारातील कुठलेही पदार्थ खात नाही, काजू पेस्ट असलेले पण. Allergies can be fatal.

अरे यार, बाबाला सांगितलं थोडंच आहे त्यात पी बटर आहे म्हणून. खाताना कळत नाही त्याला. मुलीलासुद्धा माहीत नसेल केकमध्ये काय आहे ते.

<< खाताना कळत नाही त्याला. >>
ज्या व्यक्तीला ऍलर्जी आहे, त्याची बायको मुद्दामहून तसा केक खास ऑर्डर करेल, ती व्यक्ती चुकून पीनट बटर केक खाईल, त्याला खाताना कळणार पण नाही, त्याला रीॲक्शन होणार नाही हे माझ्या लक्षातच आले नाही. तुम्ही महान कथा लेखिका आहात आणि कथा समजण्यात माझी चूक झाली, हे मी मान्य करतो.

त्याला रिअ‍ॅक्शन येईपर्यंत मुलगी वैतागून खोलीत गेली होती, त्यामुळे तिला गोळ्या द्यायला बाहेर आली तेव्हाच कळलं.

इतकं हायपर होण्याची गरज नाही. मी माझा अँगल सांगितला, तोही तुम्ही विचारला म्हणून.
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

कथा छान जमलिये..
इतकं पोस्ट मार्टम का चाल्लय लोकहो? कथा लिबर्टी म्हणुन सोडुन देऊया.

Aashu29 सहमत...
कथा आहे ही.. software चा code नाही की जिथे logic इतके तपासले जावे.

Pages