बधाई दो: फुल्टु धमाल

Submitted by अश्विनीमामी on 19 March, 2022 - 06:51

नमस्कार ह्यात स्पॉयलर्स आहेत. सिनेमा बघितला नसल्यास कृपया पुढे वाचू नका.

तीन दिवसांची वीकेंड आल्याने घरातली सर्व कामे व आराम शुक्रवारी करुन झाला. आता आज काय करायचे म्हणून आत्ता बधाई दो बघायला
घेतला आहे. संवाद फार मजेशीर आहेत व भूमी, राजकुमार मस्त दिसत आहेत. म्हणून धावत्या समालोचनासारखे धावते परीक्षण. कारण एक एक बारके बारके पॉइंट मिस होतील नाहीतर.

नेहमी प्रमाणे उत्तर भारतीय मध्यमवर्गीय सेटप दिसतो आहे. द फिल्म ओपन्स विथ( माफ करा सर्व स्क्रिप्ट लिहिताना मी अशीच सुरुवात करते म्हणून हे इंग्रजी व्याख्या विख्हिई वुख्हू) हिरोची आई बिनदिक्कत जांभई देत आहे. ही जरा मंद आहे. किंवा त्या घरात राहुन तशी झाली असावी. अपर क्लास मुंबईवाले अश्यावेळी तीन तीनदा एक्सुज मी म्हणतील. पण हिचे आरामात चालू आहे. व शेजारी थोरली जाउ बसली आहे. कोणीतरी कोणाला तरी लॅक्सेटिव्ह घे असा सल्ला देत आहे. हिरोची बहीण बहुतेक आलेली आहे भावाच्या लग्नाची फिक्सिन्ग करायला. हिचा नवरा फारच उभा आहे. मुलींचे फोटो बघताना मुलगी जरा जाडी आहे म्हटल्यावर टिपिकल भार्तीय बाप्यांचा डायलॉग टाकतो. " हाथमें तो कुछ लगना चाहि ये.!! आजुबाजूला सर्व महिला असून सुद्धा. क्रिंज क्रिंज. हिरोची आई कधी जीवनात काही निर्णय घेतलेली नाही. ती मुलाच्या लग्नाचा मोठा निर्णय तर आजिबात घेउ शकत नाही आहे. मंद पणे बसून आहे.

मध्येच रा. रा. चा शॉट आहे अप्रतिम बॉडी बनवलेली आहे. व प्रॉपरली ग्रूम्ड आहे. इझी ऑन द आईज . नाहीतर असतात एकेक,
.. दिसले की डोळ्यात आय ड्रॉप्स घालावे वाटतात. तर असा हा हँडसम हंक महिला पोलिस ठाण्यात नियुक्त आहे. पण वैतागलेला आहे बदली मागत आहे. बॉस ला एक औश्धाची बाटली उघडून द्यायची तर ते झाकण नेमके गोल गोल फिरते आहे. हा भारतात नेहमी येणारा प्रश्न आहे व काहीतरी जुगाड करून हे झाकण उघडावे लागते. रारा अश्या जागा मस्त घेतो. ह्याच्या ऑफिसच्या मागेच क्रेश आहे त्यामुळे पण तो वैतागला आहे. बच्चों की कँ कँ से कानसे खून निकलता है म्हणतो. नाझनीन असिस्टंट कंपुटर ऑपरेटरला आजिबातच काही कळत नाही माउस हातात घेउन बघत आहे. तर घरून फोन येतो. घरचे नाझनीनशी पण लग्न कर चालेल असे म्हणतात ती बावळट समोरच आहे. तिचे लग्न झाले म्हणून सांगतो. आगाउ बहीण लगेच अपने कास्ट की लडकी शोधायला जाते. ऑफिसात क्रेश मधला एक पोरगा कायम ह्याला ढिशुम ढिशुम करत असतो मागून. तो क्रेश चा कलकलाट लै भारी आहे.

कट टू भूमि हाउस. हे ही मिडलक्लास बाय फार आहेत. हिचा भाउ केस शेव्ह करत आहे. वडील डींगे मारत आहेत व आई मुक्याचे व्रत घेउन मुलीला छान ड्रेस घालायला शिकवत आहे. ( रिफत बी आठवा, ये रोलर पोलर से लडके नहीं पटते!! सेम सेंटिमेंट) मुलगी पडली समलिंगी. आईला धूप घालत नाही. व स्पोर्ट कोच आहे तर तसेच कपडे घालावे लागतात ना. रारा व टीम् बागेतुन आशिकांना हाकलवत आहेत. एक समलिन्गी कपल मिळते त्यांना हा असेच सोडून देतो. लबाड. भुमिच्या लग्नाचे पण मध्यस्थाकरवी प्रयत्न चालू आहेत. ही गोरी आहे का ते बघायला मध्यस्त बाई सरळ तिच्या जॅकेटची झिप खाली करते. आईच्या पिरपिरीला कंटाळून ही घर सोडून जायच्या प्रयत्नात आहे. हिची एक मैत्रीण आहे पण तिचे लग्न झाले आहे. पर्सनल स्पेस की कोई कोंसेप्ट ही नही है.

हिला एक त्रास देणारा मुलगा आहे. ही तक्रार करायला पोलिस स्टेशनात येते. रारा त्या मुलाला समज देउन सोडून देतो. मीट क्युट झाल्यावर तिच्या मागेच आहे. लग्नाची बात छेडतो तर त्याचेच काँस्टेबल पकडतात हा त्यांना हाकलून देतो. हा सीन फारच मजेशीर आहे. दोघे एकमेंकांची
लैंगिक ओळख करून घेतात. व लग्न करायचे ठरते. आता बरीच लग्नाची धमाल आहे. तो परेन्त मी गेम खेळत आहे. बधाईया दो टिपिकल लग्नाचे गाणे आहे. गाणे मग स्पॉटिफाय वर लावुन नाच करणेबल आहे. वीकेंड है भाई.

चला कट टु हनीमून. दोन वेगळ्या रुमा बुक आहेत. राराच्या खोलीत टॉवेलचे हंस वगैरे करुन ठेवले आहेत. ह्याचा मित्र येणार असल्याने ही एकटीच गोव्यात फिरायला जाते. एक ग्लास बीअर भी हो जाए. ही परत येइपरेन्त हा टल्ली झालेला आहे.मित्राने टांग मारलेली आहे. बहुतेक प्रेमभंग झालेला आहे. रारा टोटली रॉक्स. हा आपली बनवलेली बॉडी शो ऑफ करत आहे. मस्ट बी सम गे थिंग. पण बिचारा वाट्तो आहे.
त्याचे सर्व स्ट्रगल सांगत आहे. स्वतःला होमो कॉप म्हणतो. केविलवाणा वाटतो आहे.

नेक्स्ट डे हॉटेलचा मस्त ब्रेफा आहे. व कबीर पण आलेला आहे. एक गे लव्हस्टोरी दाखवतात गाणे चालू आहे. दिलसे मिले दिल छान घेतले आहे गाणे. बरोबर सुमन पण खिलत आहे. छान प्रियाराधनाचे सीन आहेत जे हेटरोनॉर्मॅटिव्ह नाहीत. गोवा तो आखिर गोवा है. सब के लिये. हनीमून करून परत येतात. कबीरला सोडताना धड बाय पण म्हणता येत नाही. कुचंबणा.

आता जोडपे पोलिस लाइनच्या फ्लॅट मध्ये राहायला आले आहेत. रूममेट्स सारखे राहतात. कबीर जात येत आहे. हर फादर इज टोटली रिवोल्टिन्ग इन अ व्हेरी मिडल क्लास वे. आता हिला ग्फ्रे भेटते आहे. मीट क्युट एकदम शिटी. ( चिकवा वर शोभेल असे. ;)) पण गफ्रे गोड आहे. हिच्या जिवाची तडफड होते. ही नॉर्थ इस्टची मुलगी आहे. पॅथलॅब मध्ये काम करत आहे. भूमि जबरदस्त लाइन मारत आहे. गाणे आले आता मी गेम खेळते फोनवर!!

गाणे संपले दोघी एकमेकींशी कॉफी डेट. एकमेकींची परिस्थिती समजून घेतात.

आता एकदम ह्यांना पोलीस कॉलनीत घर मिळते. गावाच्या मध्यात. हा जरा नाराज आहे. कारण इथे कबीर नीट येउ शकणार नाही. खालचे लोक्स भेटायला येतात. हा लगेच उभा बाप्या सारखा बायकोला चहा बनवायला पाठिवतो. ही करत नाही. तो सीन मस्त आहे. आता मुली एच एंड एम मध्ये जाउन शायनिन्ग चालू आहे. पुढे जाउन गाणे, अजून रिलेशन शिप डेव्हलप होते आहे. गे बार वगैरे. साँग ऑन तो गेम ऑन.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता खूप मजा आहे कारण शेजारी पाजारी खालचे येतात त्यांच्या समोर हे प्रकरण दाबणे केवळ अशक्य आहे. हिची मैत्रीण रिमझिम पोलिस कॉलनीत राहायलाच आलेली आहे. कारन दोन मुलींवर इतका कोणी संशय घेत नाही. पण कबीरला इथे आणणे जरा अवघड आहे. ही पहिल्या
प्रेमाची कथा सांगते. तिला मूल हवे आहे. मुला साठी तिने लग्न पण करायचे ठरवले पण तिला काही ते सहन होईना. पुरुश स्पर्श. मूल हवे तर परदेशी जायला लागेल म्हणून सुमनने पासपोर्ट काढून ठेवला आहे. रिमझिम व ती दोघी दात काढतात चल परदेस जाते है. बच्चा करते है.
आता परत मुलींचे प्रेमगीत.

ते झाल्यावर आता हे दोघे एकत्र आले की रिमझिमला जेलस वाट्ते आहे. मेजर फाइट हॅपनिन्ग.

कट टू एकदम कबीर व रारा बेड्रुम सीन. ह्याला घर घ्यायचे आहे. पण कबीरची घुसमट होते आहे. तो निघून जायच्या बेतात आहे. मेजर फाइट हॅपन्स. हा घरी परत. तो तिला पहिल्या बॉफ्रे बद्दल सांगतो. ती त्याला समजून घेते. हृद्य सीन आहे.

आता मेजर परी क्षा आहे. सासरी जातात दिवाळीला. मम पण एकदम फ्रेम टु फ्रेम साचून आले आहे. अनबिलीव्हेबल प्रेशर मुलासाठी. त्यावरुन ह्याच्या मनात घट्ट असलेला पुरुष वर्चसव वाद बाहेर येतो. गे हैं तो क्या हुवा संस्कारी है!!! जबरदस्त जबरदस्त.

आता होमेपदी क्रीपी उभा साला बरोबर दारू पीत आहे रारा. उभा क्रीप ला हा तिला काही एक इशू आहे असे सांगतो. बहुतेक. बीइन्ग टोटल क्रीप. आता घरचे महिलामं डळ तिला डॉक्टरकडे घेउन जातात. प्रायवसी नाहीच. गायनॅककडे नेतात. ही जाम भडकलेली आहे. रिपोर्ट आल्यावर
कळते की हिच्यात काहीच तक्रार नाही. लक्ष ठेवायला सासूला बरोबर पाठवतात.

आता घरुन आधीच तिथे असलेल्या रिमझिमला आई बघण्या आधी हाकलायची धावपळ चालू आहे. त्या डुटीवर नाझनीनला लावले आहे. हे
मुळातच बघण्याजोगे आहे. ताईजी घरातले सर्व जाणून घेउन मूल का होत नाही त्या मिशन वर आहे. हा भाग जरा अ नि अ आहे. दोघे एक एक बीअर घेताना मुला साठी एकत्र यायचे ठरवतात व लगेच पाउस पडू लागतो. गाणे आले. बॅक टु गेम. समलैंगि कता के नाम पे धब्बा लगा रहे है. ये.

आता रिम्ह झिम उखडलेली आहे ह्या वरून.

आता एक वरात चालू आहे का गे परेड आहे बहुतेक. नो नो इट इज अ गे मॅरेज. एका मुलाला बोलवतो. एकदम दिलसे मिले दिल कबीर का रिप्लेसमेम्त मिल गया शायद. एकदम जबरदस्त केमिस्ट्री आहे. परत गाणे आले रा. रा परत प्रेमात पडलेला आहे अनाम बाप्याच्या. नया नया प्यार मिल गया है. दिल खुश. हा तर वकील आहे व छान दिसत आहे. लैच शायनिन्ग चालू आहे. चहा ची टपरी. कोर्ट इथे तिथे मिलन चालू आहे.

आता ही लाल नाइटी घालून आईला काही काही सांगते. तुमच्या मुलातच खोट आहे. रिपोर्ट रिमझिम च्या लॅब मधून मेनेज करतात. पण आता घरचे मूल दत्तक घ्यायला तयार झाले आहेत. हे सुमीचे फार काळापासून स्वप्न होते.

आता मूल घ्यायचे दत्तक हे नक्की झाले आहे व प्रोसेस सुरू, छानशी डबल डेट होते. हा आपले सत्य अजूनही लपवत आहे आई पासून पण मित्र येउन धडकतो. आई गेली म्हणून मुली धमाल करत आहेत. पण आई परत येते. व सुनेला मैत्रीणी सोबत पकडते. आईला लाइफ्टाइम शॉक बसलेला आहे. रिम्झिम एकदम हॉट आहे. मग सर्व सत्य एकदम बाहेर येते. भाउ तोरसे कर म्हणतात तसे. सत्य तुम्ही लपवू शकता पण सत्याचे
परिणाम लपवू शकत नाही त्यांना सामोरे जावेच लागते.

हिच्या घरी लिहा भाउच विकृत म्हणतो मोठे भांडण होते. आई सर्व मध्यमवर्गीय गैर समजांचा पेटारा उघडून रडत आहे. कमिन्ग आउट इज रिअली टफ इन इन्डीया. दोन्ही बाजुंनी.

रारा कडे तिचे कॅरेक्टर अ‍ॅसेसिनेशन चालू आहे पण काही क्लीअर करत नाही. जनरल बोलत आहे. पण पुढे जाउन स्वतः चे पण सत्य सांगतो.
छान स्वगत संवाद आहे. मोनोलॉग. सीमा पहावा प्राइसलेस लुक!! बोलुन टाकल्याने ह्याला एकदम मोकळे वाटत आहे. फोन वर रडतो. व तिला पण सांगतो , समलैंगिक व्यक्तीच्या जीवना तील एक मह त्वाचा प्रसं ग. ती पण समजते. हा फार रडत आहे. जीव मोकळा झाल्याने.
आता दोघांएकमेकाच्या मैत्रीची गरज आहे.

आई पण वर येते व त्याला समजून घेते. मिठी मारते. मच रोना धोना ऑल अराउंड. आता परत गाणे, मुली सेपरेट घर घेतात.
परेड येते आहे. हा ले दर जाकीट घालून बंदोबस्तास उभा आहे. प्राइड परेड चालू आहे. हा पण एक सप्तरं गी मास्क घालतो. गाणे छान आहे.

मूल दत्तक घेण्यासाठी दोघे एकत्र राहतात. घटस्फोट घेत नाहीत. ताईजी उठून जाते.

एक वर्शानं तरः बाळ आले आहे. काही एक पुजा चालू आहे. राराच्या घरचे एक जण तो उभा जावई व बहीण आला आहे व हिचे आईबाप. सर्व आले आहेत राराच्या घरचे. द फिल्म एंड्स हिअर. बाळाला मस्त फॅमिली आहे. लव्ह विथ प्राइड.

पाहिला काल. धमाल पिक्चर आहे. रारा व भूमी दोघांची कामे जबरी. उत्तर भारतीय वातावरण, सहजपणाने येणारे विनोद वगैरे अगदी परफेक्ट!

काल पाहिला... छान घेतला आहे... काही काही पंचेस मस्त जमले आहेत..
रारा सगळ्यात बेस्ट... काय बोलतो चेहेरा या माणसाचा.... जबरदस्त एक्सप्रेशन्स देतो ...
गे आणि लेस्बियन मुद्दा, त्यांची घुसमट , घरातल्यांची रीअ‍ॅकशन मस्त पकडल्या आहेत अगदी..
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकही बेड सीन नाही.... हे सगळ्यात आवडलं... कथानकाची गरज वगैरे असलं काही नसतं... त्याशिवाय पण आशय उत्तम पोचवता येतो हे दाखवुन दिलंय दिग्दर्शकाने..