वाड्यातल्या गप्पा

Submitted by अस्मिता. on 24 June, 2021 - 11:18

वाड्यातल्या गप्पा
IMG-20240909-WA0003_1.jpgहा धागा एक माणसांनी भरलेला वाडा आहे , कोणीही या, कधीही या, अंगणात कोणीतरी बाज टाकून बसलेले असेलच. तुमचे हसूनच स्वागत होईल.  मायबोलीवरचे इतर लेखन इथे कॉपी करून आणू नका. त्या विषयीचे गॉसिपही नकोच. राजकारण नकोच. कसलेही चित्र द्या , कसल्याही शुभेच्छा द्या. रोज द्या / कधीतरी द्या. लिंक्स द्या.

धाग्याचे नियम-
कुणालाही हेटाळणीजनक प्रतिसाद देऊ नका. प्रत्येकजण (अमेरिकेतले/ भारतातले/ किंवा अजून कुठलेही) आपापल्या अनुभवविश्वातील गप्पा मारायला येथे येणं साहजिकच आहे. हा धागा फनहितार्थ आहे, जनहितार्थ नव्हे. त्यामुळे अपेक्षा नकोत आणि दबाव आणण्याचे प्रयत्नही नकोत. त्यांना आपापल्या समविचारी लोकांसोबत आनंदाने गप्पा मारायचा अधिकार आहे. सर्वांशीच सौजन्याने वागा आणि गोड बोला. Happy
धन्यवाद.


Happy करा सुरू.. !

***दवंडी***
वाडा निवडक हा धागा वाडा, मग, अग वरील निवडक पोस्ट्ससाठी काढला आहे. तो पहाण्यास पश्चिम महाराष्ट्र ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
वाड्याची तिजोरी गप्पांचाच ठेवा.
ही तिची किल्ली-उघड दार वाडेकरा
प्रताधिकारमुक्त चित्र सौजन्य - अनिरुद्ध

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात….

सरकारी NPTEL https://nptel.ac.in/ हे पोर्टल
आहे. इथे जाऊन कुठलाही आवडता विषय निवडुन त्याचा त्याच पोर्टलवर अभ्यास करता येतो. तुम्ही सध्या काय शिकताय यावरुन विषयाचे बंधन येत नाही. म्हणजे तुम्ही मेडिकल शिकताय पण लॉजिक हा आवडता विषय आहे जो मेडिकलला घेता येत नाही तर या पोर्टलवर तुम्ही तो घेऊ शकता.

रु १००० भरुन एक परिक्षा देता येते. परिक्षा ऑफलाईन असते. अशा कितीही द्या. चांगले मार्क मिळाले तर सध्या जे शिकताय त्या अभ्यासक्रमाचे एक क्रेडिट तुमच्या खात्यात जमा होणार.

शाळेसाठीही ही सोय आहे. स्वयम नावाने आहे बहुतेक. शाळेत शिक्षक मिळत नसतील स्वयम सुरु करा आणि तिथे शिका.

https://swayam.gov.in/

ज्याना गरज आहे, मुले शाळा कॉलेजात आहेत त्यांनी चेक करा आणि लाभ घ्या.

जनहितार्थ Happy Happy

हे पोर्टल बघितले होते मागे, आयाम ला इकॉनॉमिक्स मध्ये काहीतरी extra, पुढचे शिकायचे होते म्हणून. पण त्याला तिथले कोर्स आवडले नाहीत, मग बहूतेक कोर्सेरा किंवा अजून कुठूनतरी हावर्ड चा एक आवडलेला कोर्स केला होता.

मी माझ्यासाठी इथले काही कोर्स बुकमार्क करून ठेवले आहेत. सध्या वेळ कमी आणि कामं जास्त अशी स्थिती आहे. घरात मदतनीस नसल्यावर घरकामात खूपच जास्त वेळ जातो. तरी आता झाडणे आणि सफाई कामाला आहे एक बाई. पण स्वयंपाकघरात सगळं आमचे आम्हीच बघतोय. आयाम वेळ मिळाला की भांडी करतो आणि रोज बऱ्यापैकी भांडी आवरतो. समीर ज्या दिवशी घरी असेल त्यादिवशी निम्मा तरी स्वयंपाक आणि भाज्या चिरणं करतो. पण तो घरी असायला हवा. त्यात आमच्याकडे पालेभाज्या फक्त याच सिझन मध्ये मिळत असल्याचे निवडायला कितीही वेळ लागत असला तरी आणल्या जातात. काल सीझन ची पहिली शेपू भाजी केली.

साधनाताई, हे आम्हाला स्टाफला पण कम्पल्सरी असतात. मी केला एक. वर्षभरात एक तरी करावा असं आहे. पण संस्थेच्या बाकी गोष्टी ढासळल्यावर आम्हीपण "ऑमी नॉय ज्जा!" केलं. काही कोर्सेस खरंच मस्त आहेत. न करण्यात नुकसान आमचंच आहे, पण सध्या तरी तिप्पट लोड झालाय म्हणून वेळही देता येत नाहिये. पुन्हा एक करायचाय मला.

तिथले काही कोर्सेस इतके एकसुरी ऐकायला लागतात की निद्रानाशावरचं औषध म्हणून द्यावेत! ताबडतोब झोप येणार! पण हल्लीचे काही काही छान आहेत. हे टेक्निकल चं. इतर कोर्सेस चं माहिती नाही.

बहूतेक सगळ्याच कॉलेज / युनी मध्ये शिक्षकांना कम्पल्सरी आहेत. मला माझ्या विद्यापीठात शिकवणाऱ्या बहिणीने सांगितले होते याबद्दल.

पोर्टलची कल्पना चांगली आहे. पुढे कंपन्या यातली क्रेडिट जमेस धरू लागल्या तर लोकांना फायदा होईल.

आयाम वेळ मिळाला की भांडी करतो आणि रोज बऱ्यापैकी भांडी आवरतो. समीर ज्या दिवशी घरी असेल त्यादिवशी निम्मा तरी स्वयंपाक आणि भाज्या चिरणं करतो >>> मस्त. भारतात आता हे कॉमन होत चालले आहे का? माझा समज आहे की अजूनही नाही.

तिथले काही कोर्सेस इतके एकसुरी ऐकायला लागतात की निद्रानाशावरचं औषध म्हणून द्यावेत! >>> Lol

भारतात आता हे कॉमन होत चालले आहे का? माझा समज आहे की अजूनही नाही.>>>> खूप कॉमन नाही. बहुतांशी ठिकाणी अजूनही घरकाम आणि स्वयंपाक घरातल्या बाईची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी असते. बाकी मेंबर त्यांच्या सवडीने मदत करतात. तरी कोविड काळात बराच फरक पडला.
खूप कमी ठिकाणी घरकामात मदत म्हणून नाही तर घरातल्या बाईप्रमाणेच पूर्ण किंवा अर्धे किंवा जमेल तितके काम बाकी मेंबर करतात.

हाय हॅल्लो, नमस्कार वाडा! कआस?
मधे मधे वाचन मोड मधे वाड्यावर चक्कर टाकणे झाले. पण लिहीले नाही.
सध्या जमेल तसे फक्त वाड्यावर येऊन वाचून जाते आहे. तेवढेच बरे वाटते चार लोक दिसली की Happy
बालरात्रीच्या / दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा Happy

अनया, तुमच्या रांगोळ्या नेहमीच रेखीव, सुंदर असतात. ते फक्त दोनच रंगात, तरीही छान दिसतात.

मी नैसर्गिक पद्धतीने रंग तयार करते. त्यामुळे फार व्हरायटी नसते. आत्ताच्या रांगोळीतला जांभळा रंग मायाळूच्या फळांपासून आणि निळा गोकर्णीच्या फुलांपासून केला आहे.
सर्वांचे आभार

आत्ताच्या रांगोळीतला जांभळा रंग मायाळूच्या फळांपासून आणि निळा गोकर्णीच्या फुलांपासून केला आहे. >> मायाळूचे फळ कधी पाहिले नाही. नवीन माहिती आहे माझ्यासाठी Happy

अनिरुद्ध आहे का?
आज सोड्यांची सुकी भाजी केली आणि छान झालेली. ज्वारीची भाकरी, सोड्यांची झणझणीत भाजी आणि कच्चा कांदा. मस्त जेवण झालं शुक्रवारचं. अशी केलेली. अनेक धन्यवाद! Happy