हॅप्पी दिवाळी

Submitted by मिरिंडा on 29 November, 2020 - 23:37

दिवाळी ग दिवाळी
आलीस माझ्या घरी
फटाके फुलबाज्यांची
जोरदार रोषणाई

करंज्यापुऱ्या लाडू मीचिवडा
चकल्या अनारसे भारी
आवडला नाही फराळ
तरी खातोय घरोघरी

पाडवा भाऊबीजेची
घालतानाओवाळणी
बायकोचा जीव
होई वरखाली

पगाराचा भर्डा
बोनसचा खुर्दा
कपड्यांची रेलचेल
दागिन्यांची घडणावळ

सगळेच कसे मंगल
सगळेच कसे आनंदी
दरिद्र्याच्या घरची मात्र
चूल थंड थंड

लॉकडाऊनच्या राज्यात
नोकरी नाही करी
तरी विश करतो
हॅप्पी दिवाळी

अरुण कोर्डे
९००४८०८४८६

Group content visibility: 
Public - accessible to all site users