खिसा..........

Submitted by यतीन on 14 February, 2020 - 05:10

खिसा..........
एक अजब रसायन, खिसा असला तर भरलेले हवा, रिकामा तर नको अन् त्यातला त्यात तो हवे तेच भरलेला हवा, प्रत्येक च्या मनात हिच भावना असते खिसा तर हवाच आणि तोही हव्या त्या गोष्टीनी भरलेला असावा......

म्हणुनच खिसा हे अजब रसायन आहे,
खिसा असले तर तो हवे ते भरवायला पळवतो अन् नसले तर ते का नाही याची काळजी करायला लावतो.
बर खिसा असल्यावर तो कापला जाऊ नये म्हणून आणखीच तो काळजी घ्यायला लावतो.

खिसा हा प्रत्येकाच्या सदराच्या डाव्या बाजूला असतो तसेच आपले ह्रदय हे सुद्धा डाव्या बाजूला, बरे खिसा पण मनासारखे काम करतो आणि मन पण तसेच जे हवे ते ते घेण्याकरता जीवाचा आटापिटा करायला लावतो.

मला तर असे वाटते की खिसा आणि मन नाण्याच्या एकच बाजू आहे कारण हे दोघेही एकाच बाजूला म्हणजे डाव्या बाजूलाच असतात,
एकावर एक..... किंवा एकमेकांच्या बरोबर असतात, दोघेही एकाच ठिकाणी असतात.
अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण डावी बाजू ही वाम बाजू म्हणून मांडतो आणि उजवी बाजू म्हणजे चांगली किंवा अगदीच ती बाजू बरोबर आहे म्हणून मान्य करतो.

आपण डावी बाजू पवित्र आहे म्हणून कधीच मांडणी करतच नाही तरी सुद्धा आपले मन डाव्या बाजूला अन् खिसा सुध्दा डाव्या बाजूलाच असतो.........

मग खिसा असणे हे चांगले का?
का मन हे डाव्या बाजूला असणे?

याचे कोडे सुटेल का.....
हो कोडे मन किंवा खिसा........
हे एक विलक्षण सुंदर आणि आकर्षक करणारी गोष्ट आहे,

मन शांत असेल तर खिसा भरलेला नसतो, अन् खिसा भरलेला असेल तर मन शांत रहात नाही.

म्हणून खिसा शांत असेल मन प्रसन्न व टवटवीत राहते,

बघा प्रयत्न करून........

यश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults