नवरा - व्यक्ती - पुरुष

Submitted by KulkarniRohini on 22 October, 2019 - 05:00

आजवर सगळे असे म्हणतात की बायकांच्या काय मनात असत कळत नाही. पण मला माझ्या नवऱ्याच्या मनात काय आहे ते आजवर कधीच कळले नाहीये.
कधी कधी रेलशन develop करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, आपल्या स्वभावाला मुरड घालावी लागते, त्यातल्या त्यात जर भांडण झाले तर अजून मेहनत.
एकत्र कुटुंबात चांगलं communication कसं होईल?

Group content visibility: 
Use group defaults

(हे काल्पनिक ललित आहे की कोतबो?)
हा बराच खाजगी प्रश्न आहे.नवरा जर आधीपासूनच शांत असेल, (काहीजणांना माणसं अस्तित्व म्हणून बरोबर हवी असतात.ती
माणसं बरोबर असली म्हणजे हे लोक सतत त्यांच्याबरोबर गप्पा मारणे किंवा मिळून करायचा छंद(स्वयंपाक, टीव्ही,गाणी ऐकणे,फिरणे) करतीलच असं नाही.'लांब लांब बसून पुस्तक वाचणे' हे पण टुगेदर टाईम च्या व्याख्येत येत असेल.)
'शांत आणि आनंदी'/'काहीतरी खटकल्याने शांत' यातला फरक ओळखता आला तर पुढे स्ट्रॅटेजी ठरवता येईल.पहिल्या पर्यायात काही विशेष करायची गरज नाही असं वाटतं.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती! प्रथम तुम्ही तुमच्या अपेक्षा आणि त्याचं वागणं यातील गॅप किती आहे ते पहा. तो काही खटकल्याने तसा दूर दूर राहतोय की मूळ स्वभावच तसा आहे? त्याच्या तुमच्या कडून कशा वागण्याच्या अपेक्षा आहेत? त्या तुम्ही कितपत पूर्ण करीत आहात?
खूप जणांना (जबाबदारी- किंवा काम) अंगावर घ्यायला नको असते...जितकं टाळाता येइल तितके बरे......! म्हणून मग जास्ती खोलात शिरायचेच नाही......अलिप्त रहायचे....तो तसा आहे का?
किंवा मग काही जणांना स्वतःचे तेच खरे करायची सवय असते....दुसर्‍याचे मत...ते इन लाईन असेल तर ठीक.... नाहीतर त्या इश्यू वर डिस्कस करायचेच कशाला...? असे मत असू शकते.....
तुम्हीच यातून मार्ग काढायला हवा...त्याला बोलतं करुन...कधी गोडी गुलाबीने, कधी रागवून रुसून......पहा जमतंय का........

तो अत्यंत गप्प बसू शकणारा इगो असलेला माणूस आहे. भांडण झाल्यास गप्प बसणे काहीच न बोलणे त्याला जमते.
बऱ्याचदा भांडण झाल्यास, मी रुसले असेल तरी मलाच जाऊन बोलावे लागते.
काहीच happening होत नाही.
सगळं काही होऊ पण शकेल पण मलाच सगळं करावे लागेल, तो फक्त सोबत असेल तेही मला वाटल्यास. त्याच्या कडून कसलाच initiative नसतो.

आणि एकवेळ सगळं करेल पण माझ्या समाधान साठी. मी सांगितले तरच, पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न.
मला सहजीवन याचा नेमका अर्थ कुणी सांगेल का? एक belong ing ness वाटलं पाहिजे न, रिते पण वाटत

ताई , तुम्हाला काही सोल्युशन देण्याची माझी अजिबात पात्रता नाही पण तुमच्या इथल्या चारही पोस्ट वाचून एक सावधगिरीचा सल्ला द्यावासा वाटतो .. तुम्ही खूप भोळेपणाने - सरळ मनाने इथे लिहित आहात , ते ठीक आहे , चर्चेतून तुम्हाला काही सोल्युशन मिळावं अशी माझीही इच्छा आहे . पण इथल्या पर्सनल मेसेज सुविधेचा वापर करून कुणाशी बोलत असाल तर जरा जपून ... अकाऊंट स्त्रीचंच आहे याची खात्री असेल तर बोला .. नाहीतर सहानुभूतीचा आव आणून खाजगी प्रश्न विचारून आपलं विकृत कुतूहल शमवू पाहणारे पुरुष इथेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही , त्यापलीकडे जाऊन वैयक्तिक माहिती - मदतीचा खोटा हात - फोनवर बोलू , व्हाट्सअप वर बोलू .. असे पैंतरे वापरून गळाला लावण्याचे प्रयत्न करणारे महाभाग सुद्धा असू शकतात .

तुम्ही सगळं समजण्याइतक्या मॅच्युअर असालच पण ज्या काही पोस्ट केल्या आहेत त्यावरून भाबड्या वाटलात म्हणून सांगितलं , लहान तोंडी मोठा घास घेतला असेल - अनाहूत सल्ल्याचा राग आला असेल तर माफ करा .

तुम्हाला समजलेलं नाही तर हे पहा - लग्नाला 8 वर्षं झालेली , एक मुलगी असलेली स्त्री . नोकरी करणारी .

दोघांच्या संसाराची सवय झाली असताना अचानक एकत्र कुटुंबात राहावं लागल्याने नाराज असण्याची शक्यता - ( मी एकत्र कुटुंबात राहते सो माझ्या चिमुरडीला रिमोट मिळणं लांबची गोष्ट) . विचारून पाहू - तसं असलं तर सहानुभूतीचं नाटक करून बोलणं वाढवता येईल .

आणि आता ह्या पोस्ट वरून - सरळच मॅरीड लाईफ मध्ये असमाधानी ..

मुलीची इतर मुलांबरोबर , स्वतःच्या मॅरीड लाईफची इतरांच्या रिलेशनशिपशी तुलना करून आपलं व्यवस्थित आहे की नाही हे ताडून पाहण्याचा भोळा स्वभाव ... जर या मॅरीड लाईफ मधल्या असमाधनाला बोलून बोलून हवा दिली तर बाईंच्या मनात आपल्याविषयी जागा निर्माण होईल .. अशी दूरवरची आशा ठेवून सुद्धा विकृत लोक स्त्रियांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू शकतात ... त्यांचा हेतू पूर्ण होणार नाही पण त्यांनी कान भरून भडकवल्याने विनाकारण संसारात वादळ उठण्याची शक्यता ... तेव्हा पर्सनल मेसेज सुविधा वापरत असाल तर कोणाशी बोलायचं हे विचारपूर्वक निवडा .

मी स्त्री असो की पुरुष .. इथेच सल्ला देइन.. कुठे खाजगीत मेसेजामेसेजी करणार नाहीये... Lol

पण राधानिशा यांचा वरचा सल्ला फारच उपयुक्त आहे ..

If he needs space, give him space. त्यांचे त्यांना वाटू देत. बळजबरीने मन जिंकता येत नाही.

@radhanisha बराच अभ्यास केलेला दिसतो आहे माझ्या बद्दल. असो काळजी करण्याचे कारण नाही आणि तुम्हाला वाटतय तितकी मी असमाधानी नाहीये. अभ्यास केलाच असेल तर माझा ब्लॉग नाही का वाचला? त्यात माझा नवरा helping आहे अस सांगितलंय बरका एक artical मध्ये.
आणि मुलीचं, नवऱ्याचं दुसर्या कुणाशी comparison करणारी मी नाहीये. Analysis करण्यासाठी मी काही मुद्दे लिहिले.
अमुक एक असा आहे आणि माझाही असाच असलं पाहिजे असा आग्रही सूर मी लावला नाही.
तो बोलत नाही ही एकच बाजू घेऊन मी काल ही पोस्ट केली. अनु म्हणाली तसं हा विषय बराच खाजगी आहे. जस्ट एक नवरा बायको मधलं relation कसं improve होईल एवढंच मला विचारायचे होते. मी पोस्ट तर नक्कीच एडिट करेन आणि पुन्हा कधी डिस्ट्रुब असताना लिहायचे टाळेन.

बाकी रिप्लाय वाचून मला बरंच बरं वाटलं. धन्यवाद

If he needs space, give him space. >> मग लग्न करायचं नव्हतं, रहायचं होतं स्वतःची स्पेस धरुन !